गेल्या अनेक दिवसांपासून कर्नाटकमध्ये ‘मंकी फिव्हर’ या आजाराने धुमाकूळ घातला आहे. कर्नाटकातील कन्नड जिल्ह्यात या आजाराच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. ‘मंकी फिव्हर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या घातक ‘कायसनूर फॉरेस्ट डिसीज (केएफडी)’ मुळे दोन व्यक्तींचा मृत्यू झाल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे. ‘मंकी फिव्हर’चा वाढता प्रादुर्भाव पाहता, कर्नाटकचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. आरोग्य अधिकारी बैठका घेऊन या आजाराचा प्रसार रोखण्याची तयारी करत आहेत.

कर्नाटकात ‘मंकी फिव्हर’मुळे दोघांचा मृत्यू

आरोग्य विभागाच्या म्हणण्यानुसार ‘मंकी फिव्हर’मुळे पहिला मृत्यू ८ जानेवारी रोजी शिमोगा जिल्ह्यातील होसानगर तालुक्यात झाला. मृत्यू झालेली मुलगी १८ वर्षांची होती, तर या आजारामुळे दुसरा मृत्यू उड्डपी जिल्ह्यातील मणिपाल येथे नोंदवण्यात आला; जेव्हा चिक्कमंगलुरूमधील शृंगेरी तालुक्यातील ७९ वर्षीय व्यक्तीचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला.

pets cats
पाळीव प्राण्यांच्या विरहाच्या भीतीने नैराश्य, तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
Mother Saved Her Daughters Life Who Had Drowned In The Sea Thrilling Video Went Viral
एक लाट अन् माय-लेकींचा थेट मृत्यूशी सामना; नेमकं काय घडलं? Shocking Video पाहून अंगाचा थरकाप उडेल
Dengue, chikungunya fever, Dengue Pune,
दिवाळीनंतर पुण्यात डेंग्यू, चिकुनगुन्याचा ताप अचानक कमी! जाणून घ्या कारणे
Loksatta explained Why has the central government recommended the influenza vaccine
केंद्र सरकारने इन्फ्लूएन्झा लशीची शिफारस का केली आहे? भारताला फ्लूचा विळखा?
The monkey pulled the girl's hair
‘त्याने तिचे केस ओढले आणि…’ माकडाबरोबर मस्ती करणं पडलं महागात; VIDEO पाहून बसेल शॉक

आतापर्यंत राज्यात या आजारामुळे एकूण ४९ रुग्ण बाधित असल्याची नोंद करण्यात आली आहे. यात सर्वाधिक ३४ रुग्ण उत्तर कन्नड जिल्ह्यातील आहेत. १२ रुग्ण शिमोगा आणि उर्वरित तीन चिक्कमंगलुरू जिल्ह्यांमध्ये आहेत, असे वृत्तसंस्थेने रविवारी सांगितले. ‘मंकी फिव्हर’च्या रुग्णांमध्ये होणारी वाढ आणि या आजारामुळे झालेल्या दोन मृत्यूंच्या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण आयुक्त डी. रणदीप यांनी शनिवारी शिमोगाला भेट दिली. त्यांनी स्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि या संदर्भातील पाऊले उचलण्यासाठी तीन जिल्ह्यांतील आरोग्य अधिकाऱ्यांच्या बैठकाही घेतल्या.

राज्याच्या आरोग्य आयुक्तांनी सांगितले की, १ जानेवारीपासून विभागाने बाधित जिल्ह्यांमधून २२८८ नमुने गोळा केले आहेत. यापैकी ४८ पॉझिटिव्ह आले आहेत. “शुक्रवारपर्यंत जिल्ह्यात ‘मंकी फिव्हर’चे ३१ रुग्ण आढळले आहेत, तर १२ जण रुग्णालयात दाखल झाले आहेत. या सर्वांची प्रकृती स्थिर आहे. आम्ही आतापर्यंत कोणतीही गंभीर प्रकरणे पाहिली नाहीत. सर्व खबरदारी घेतली जात आहे. आमचे वैद्यकीय अधिकारी आणि क्षेत्रीय कर्मचारी यांनी ग्रामसभा आणि ग्रामपंचायत स्तरावर अनेक बैठका घेतल्या आहेत. आमची सर्व तालुका आणि जिल्हा रुग्णालये अशा आजारांना सामोरे जाण्यासाठी कर्मचारी आणि सुविधांनी सुसज्ज आहेत”, असे त्यांनी पीटीआयला सांगितले.

‘मंकी फिव्हर’ म्हणजे नक्की काय?

कियास्नूर फॉरेस्ट डिसीज(केएफडी) हा कियास्नूर फॉरेस्ट डिसीज व्हायरस (केएफडीव्ही) मुळे होणारा विषाणूजन्य आजार आहे, जो फ्लॅविविरिडे कुळातील आहे. माकडांच्या शरीरावर असणार्‍या टीक्स (रक्त शोषणारा कीटक) चावल्यामुळे हा आजार पसरतो. यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (सीडीसी) नुसार कर्नाटक (पूर्वीचे म्हैसूर) मधील कियास्नूर या जंगलातील आजारी माकडामुळे हा विकार त्या जंगलाच्या (ठिकाणाच्या) नावाने ओळखला जाऊ लागला.

या आजाराने अनेक माकडांचा मृत्यू झाल्याने याला ‘मंकी फिव्हर’ असेही म्हटले जाते. तेव्हापासून दक्षिण आशियातील विविध भागांमध्ये या आजाराच्या दरवर्षी ४०० ते ५०० हून अधिक केसेस नोंदवण्यात आल्या आहेत.

आजाराचा प्रादुर्भाव

सीडीसीने सांगितले की, टीक्सच्या चाव्याव्दारे विशेषत: हेमाफिसालिस स्पिनिगेरा प्रजाती किंवा संक्रमित प्राण्यांशी संपर्कात आल्यानंतर हा आजार मानवांमध्ये पसरतो. जंगली भागात जिथे संक्रमित टीक्सचा प्रादुर्भाव असतो, तिथे काम करणार्‍या किंवा त्या परिसरातून ये-जा करणार्‍या लोकांना संसर्ग होण्याची शक्यता असते.

‘मंकी फिव्हर’ची लक्षणे

सेंट्रल कोस्टल ॲग्रिकल्चरल रिसर्च इन्स्टिट्यूटने दिलेल्या अहवालानुसार, ‘मंकी फिव्हर’च्या लक्षणांमध्ये ताप, तीव्र डोकेदुखी, स्नायू दुखणे, अशक्तपणा, मळमळ, उलट्या आणि अतिसार यांसारख्या गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्या जाणवू लागतात; यामुळे शरीरातील प्लेटलेट्सची संख्याही कमी होते.

पीटीआयला माहिती देतांना उत्तर कन्नड जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नीरज बी म्हणाले, “एकदा तुम्हाला ‘मंकी फिव्हर’आला की, तुम्हाला पुढील तीन ते पाच दिवसांत लक्षणे दिसू लागतात. ज्यात जास्त ताप, तीव्र अंगदुखी, डोकेदुखी, लालसरपणा या लक्षणांचा समावेश आहे. यामध्ये अनेकांना डोळ्यांवर सूज, सर्दी आणि खोकलाही होतो. या आजाराच्या काही गंभीर केसेसमध्ये एन्सेफलायटीस, हिपॅटायटीस आणि अवयव निकामी होण्यासारख्या समस्याही निर्माण होऊ शकतात, ज्यामुळे रुग्णाला आपला जीव गमवावा लागतो.

आजारावरील उपचार

टीक्स चावणे टाळण्यासाठी आणि संक्रमित प्राण्यांचा संपर्क कमी करण्यासाठी प्रभावी उपाययोजना आवश्यक आहेत. हा विषाणू बहुतांंश जंगलात आढळतो. यामध्ये डीईईटी असलेले कीटकनाशक वापरणे, भरपूर पाणी पिणे, अशा परिसरात वावरताना संरक्षणात्मक कपडे घालणे, जनावरांशी संपर्क टाळणे आवश्यक आहे.

हेही वाचा : पाकिस्तानमध्ये अनेक महिलांना त्यांच्या पतींनी मतदानापासून रोखले; काय आहे यामागचे कारण?

दुर्दैवाने, ‘मंकी फिव्हर’साठी कोणतेही विशिष्ट अँटीव्हायरल उपचार नाहीत. त्यामुळे याची लक्षणे आढळल्यास शक्य तितक्या लवकर दवाखान्यात जाऊन डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. या आजारात डॉक्टर सपोर्टिव्ह थेरपी देतात, ज्यामध्ये हायड्रेशनची काळजी आणि रक्तस्त्राव विकार असलेल्या रुग्णांसाठी विशेष खबरदारी घेणे समाविष्ट आहे. आजाराच्या काही गंभीर प्रकरणांमध्ये हॉस्पिटलायझेशन आवश्यक असू शकते.