शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरआरटीएसच्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. पहिल्या टप्प्यात ही रेल्वे दिल्ली ते मेरठ धावणार असून तिचा वेग १८० किलोमीटर प्रतितास एवढा असेल. सेमी हाय स्पीडने धावणारी ही भारतातील पहिली रेल्वे आहे. याअनुषंगाने आरआरटीएस प्रकल्प काय आहे, नमो भारत रेल्वेची निर्मिती का करण्यात आली ? या रेल्वेने दिल्लीला खरंच फायदा होईल का? हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टीमच्या अतिजलद ‘नमो भारत’ रेल्वे लोकार्पित केली. या सिस्टीमची ही पहिलीच रेल्वे असून पहिल्या टप्प्यात दिल्ली ते मेरठ या भागात ती धावेल. दिल्ली ते मेरठ हा संपूर्ण कॉरिडॉर ८२ किलोमीटरचा आहे. त्यातील १७ किलोमीटरच्या टप्प्याचे काम पूर्ण झाले. यामध्ये १६ स्थानके आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात साहिबााबाद, गाझियाबाद, गुलधर, दुहाई आणि दुहाई डेपो ही स्थानके आहेत. हा संपूर्ण कॉरिडॉर २०२५ पर्यंत कार्यान्वित होण्याची शक्यता आहे.
आरआरटीएस प्रकल्प काय आहे ?
आरआरटीएस म्हणजे रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टीम होय. शहरांमधील आंतरवाहतूक व्यवस्था सुधारणे, व्यापक प्रमाणावर वाहतुकीचे जाळे निर्माण करणे हे आरआरटीएसचं उद्दिष्ट आहे. मुख्यत्वे एनसीआरमध्ये सर्वांना परवडेल अशी, जलद आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्था उभारण्याचे आणि शहराचा विकास करण्याचे काम आरआरटीएसद्वारे केले जात आहे. एनसीआरमध्ये जलद आणि सुरक्षित वाहतूक व्यवस्था निर्माण करण्याबाबतचा अभ्यास भारतीय रेल्वेने १९९८-९९ मध्ये केला. त्याअंतर्गत रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टीमअंतर्गत कोणते विभाग एकमेकांना जोडण्यात येऊ शकतात, हे निश्चित करण्यात येणार होते. याचेच पुढचे पाऊल म्हणजे, २००६ पर्यंत दिल्ली मेट्रो मार्गांचा विस्तार गुडगाव, नोएडा आणि गाझियाबाद या एनसीआर मधील शहरांपर्यत करण्याबाबत सर्वेक्षण करण्यात आले.
हेही वाचा : गगनयान मोहीम काय आहे? स्वबळावर भारताचा पहिला अंतराळवीर अवकाशात कधी जाणार?
नॅशनल कॅपिटल रीजन प्लॅनिंग बोर्ड (NCRPB) ने “एनसीआर-२०३२’हा वाहतूक व्यवस्थेसंदर्भातील अहवालाचा अभ्यास केला. त्यानुसार एनसीआरपीबीने एनसीआर शहरांना जोडण्यासाठी आठ टप्पे (कॉरिडॉर) निवडून हाय-स्पीड ट्रेनची शिफारस केली. त्यातील पहिल्या टप्याचे शुक्रवारी उदघाटन झाले. दिल्ली ते मेरठ असा हा १७ किलोमीटरचा टप्पा आहे. आरआरटीएसच्या या सेमी हाय स्पीड ट्रेनचे नामकरण ‘नमो भारत’ असे करण्यात आले आहे.
एनसीआरटीसी आणि ‘नमो भारत’ विषयी…
नॅशनल कॅपिटल रिजन ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन (NCRTC) ही केंद्र सरकार आणि दिल्ली, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश सरकारची संयुक्त उद्योग कंपनी आहे. या कंपनीने रिजनल रॅपिड ट्रान्झिट सिस्टम (RRTS) ची निर्मिती केली आहे. एनसीआरटीसी ही संस्था गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालयाच्या अंतर्गत असून दिल्ली आणि एनसीआर भागांमध्ये आरआरटीएस प्रकल्प राबवणे हे संस्थेचे मुख्य कार्य आहे. हे क्षेत्र ५५ हजार चौरस किलोमीटरमध्ये पसरलेले असून ४६ कोटी लोकसंख्या आहे. दिल्ली आणि एनसीआर भागांचा जीडीपी साधारण ३७० अब्ज डॉलर आहे.
मेट्रो, भारतीय रेल्वे आणि आरआरटीएसमधील फरक
मेट्रो, भारतीय रेल्वे आणि आरआरटीएस या तीन भिन्न रेल्वे प्रणाली आहेत. आरआरटीएस रेल्वे सुविधा ही मेट्रोपेक्षा अधिक जलद आहे. कमीत कमी वेळेत एनसीआरच्या आसपासच्या भागात ज्यांना प्रवास करायचा आहे, त्यांच्यासाठी आरआरटीएस हा उत्तम पर्याय ठरणार आहे. आरआरटीएसच्या रेल्वे या भारतीय रेल्वेच्या तुलनेत लांब पल्ल्याच्या नाहीत. एनसीआरचा जवळील भागामध्ये जलद, सुरक्षित आणि अधिक वारंवारिता असणारी रेल्वेसेवा आरआरटीएस प्रदान करणार आहे. आरआरटीएसचे डब्बे हे भारतीय रेल्वेपेक्षा अधिक आरामदायक असतील. आरआरटीएस रेल्वे प्रणाली ही आरइआर रेल्वे प्रणाली पॅरिस, रिजनल एक्सप्रेस रेल्वे जर्मनी आणि ऑस्ट्रियामधील तसेच युनायटेड स्टेट्समधील एसइपीटीए प्रादेशिक रेल्वे यासारख्या रेल्वे प्रणालींवर आधारित आहे.
आरआरटीएस प्रकल्पामागील उद्देश
आरआरटीएस प्रकल्पाद्वारे एनसीआरचा विकास आणि तेथील उत्पादकता वाढवण्यात येईल. जे लोक एनसीआरच्या जवळील राज्यांमध्ये किंवा भागांमध्ये राहत आहेत, त्यांना आरआरटीएस रेल्वे वरदान ठरतील. एनसीआरमध्ये नवनवीन उद्योग-धंदे, व्यवसाय निर्माण होत आहेत. कार्यालयीन कामानिमित्त लोकांना एनसीआरमध्ये यावे लागते. आरआरटीएसच्या माध्यमातून जवळपासचे प्रदेश रेल्वेने जोडले जातील. यामुळे लोकांना शहरामध्ये स्थलांतर करण्याची आवश्यकता नाही. खासगी वाहनांपेक्षा सार्वजनिक वाहतुकीकडे लोकांचा कल वाढेल. एनसीआरच्या जवळ असणारे उत्तर प्रदेश, राजस्थान आणि हरियाणा या भागांचाही पर्यायाने विकास होईल.
‘नमो भारत’चे वैशिष्ट्य
मेट्रोपेक्षा आरआरटीएसच्या रेल्वे वेगवान असणार आहेत. १६० किलोमीटर प्रतितास वेगाने या रेल्वे धावतील, पण त्यांची क्षमता १८० किलोमीटर प्रतितास धावण्याची असेल. दिल्ली मेट्रो १०० किलोमीटर प्रतितास वेगाने धावते. दिल्ली मेट्रोची एअरपोर्ट एक्सप्रेस लाइन ही जलदगती मेट्रोसाठी आहे. या मार्गिकेवरील मेट्रोचा वेग १२० किलोमीटर प्रतितास आहे.
‘आरआरटीएस’अंतर्गत कोणते टप्पे विकसित करण्यात येतील ?
आरआरटीएस प्रकल्पांतर्गत आठ विभाग करण्यात येतील. त्यापैकी तीन फेज १ अंतर्गत बांधले जात आहेत: ८२ किलोमीटर लांबीचा दिल्ली-गाझियाबाद-मेरठ मार्ग, १६४ किलोमीटर लांबीचा दिल्ली-गुरुग्राम-एसएनबी-अलवर मार्ग आणि १०३ किलोमीटरचा दिल्ली-पानिपत मार्ग पहिल्या फेजमध्ये समाविष्ट असतील. भविष्यामध्ये दिल्ली-फरीदाबाद-बल्लभगड-पलवल; गाझियाबाद – खुर्जा, दिल्ली – बहादूरगड – रोहतक, गाझियाबाद-हापूर आणि दिल्ली-शहाद्रा-बरौत हे मार्ग विकसित होतील.