नुकताच जेम्स कॅमेरून दिग्दर्शित ‘अवतार – द वे ऑफ वॉटर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. प्रत्येकाला हा चित्रपट ‘आयमॅक्स’ स्क्रीनमध्ये पाहण्याची इच्छा आहे. कारण त्या स्क्रीनवर एखादा चित्रपट बघायचा आणि खासकरून अवतारसारखा चित्रपट बघायचा अनुभव अविस्मरणीय असाच असतो असं आपण बऱ्याचदा ऐकलं आहे. आता मात्र हे तंत्रज्ञान आणखी प्रगत झालं आहे. भारतात ‘ICE Theatres’मध्ये आपल्याला अवतार आणि त्यासारेख भव्य चित्रपट पाहता येणार आहेत. हे ‘ICE Theatres’ म्हणजे नेमकं आहे तरी काय? तेच आपण जाणून घेऊया.

नावाप्रमाणे या थिएटरचा अर्थ बर्फ आणि त्याच्याशी संबंधीत गोष्टीशी जोडू नका, पण ‘ICE Theatres’ म्हणजे Immersive Cinema Exprience Theatres. एखादा चित्रपट पाहताना प्रेक्षकांनी पूर्णपणे तल्लीन होऊन तो अनुभव घ्यावा यासाठी थिएटरमध्ये केलेली विशेष सोय म्हणजेच ‘ICE Theatres’. यासाठी वेगळं थिएटर उभारायची गरज नसते. सध्या आपल्याकडे जी मल्टीप्लेक्स थिएटर्स आहेत त्यापैकी काही स्क्रीन्समध्ये हा प्रयोग केलेला आढळून येईल.

Correlation between geological events and their time
कुतूहल : भूवैज्ञानिक कालमापन
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Olympics to visit India How is the 2036 Games being planned Why are more than one city preferred 
ऑलिम्पिकचे भारतभ्रमण? २०३६ च्या स्पर्धेचे नियोजन कसे? एकापेक्षा अधिक शहरांना का पसंती?
Information from District Collector Kumar Ashirwad that efforts are being made to start Solapur air service
सोलापूर विमानसेवेला लवकरच मुहूर्त; प्रशासनाकडून आवश्यक बाबींची पूर्तता
Paaru
Video: पारूचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर पद आदित्य वाचवू शकणार का? मालिकेत पुढे काय घडणार? पाहा प्रोमो
pachadlela movie inamdar wada after 20 years look what is history
Video : ‘पछाडलेला’ सिनेमातील जुना वाडा आठवतोय का? कुठे आहे ‘ही’ जागा? फक्त ‘ती’ वस्तू मिसिंग, नेटकऱ्यांनी अचूक हेरलं…
Navri Mile Hitlarla
लवकरच लीला-एजे हटके लूकमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला; त्यांचा नवीन अवतार पाहताच नेटकरी म्हणाले, “आमचे पुष्पा-श्रीवल्ली…”
Dance Viral Video
‘याला म्हणतात अस्सल लावणी…’ चिमुकलीचा जबरदस्त ठुमका पाहून नेटकरीही झाले शॉक; VIDEO एकदा पाहाच…

आणखी वाचा : “मी एखाद्याचा जीव घेतला असता…” रिषभ शेट्टीने सांगितला ‘कांतारा’च्या क्लायमॅक्समागील ‘तो’ भयानक किस्सा

ICE Theatres म्हणजे थिएटरच्या आतमध्ये आपल्या दोन्ही बाजूला ५ ते ६ एलइडी पॅनल बसवले जातात. या पॅनलच्या माध्यमातून मूळ स्क्रीनवर दिसणाऱ्या दृश्यांच्या बरोबरीने त्या दृश्यांशी मिळती जुळती रंगसंगती आणि व्हिज्युअल इफेक्ट त्या पॅनलच्या माध्यमातून स्क्रीनवर दिसणार आणि चित्रपट पाहताना प्रेक्षकांना २७० डिग्रीच्या दृष्टिक्षेपातून चित्रपटाचा थक्क करणारा अनुभव घेता येईल. त्या पॅनल्सवर तुम्हाला चित्रपट दिसणार नाही, पण त्यांच्या माध्यमातून मूळ पडद्यावरच्या कथानकाशी मिळतं जुळतं आभासी विश्व तयार करण्याचा यातून प्रयत्न केला जाईल.

सध्यातरी भारतात अशा प्रकारची थिएटर्स पीव्हीआरने २ ठिकाणी सुरू केली आहेत. दिल्लीतील वसंत कुज भागातील प्रोमेनादे मॉल आणि गुरुग्राम येथील Ambience mall या दोन्ही मॉलमधील ‘पीव्हीआर’ थिएटर्समध्ये हे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. पीव्हीआरचे सीईओ रेनॉड पल्लीरे यांनी इंडियन एक्सप्रेसशी संवाद साधताना या तंत्रज्ञानाचा खुलासा केला. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ICE Theatres ही डॉलबी अटमोस या साऊंड सिस्टमप्रमाणेच काम करणार आहेत. डॉलबीमुळे तुम्हाला जसा चहूबाजूंनी एक साऊंड इफेक्ट मिळतो तसाच अनुभव तुम्हाला दृश्यांच्या बाबतीत बघायला मिळणार आहे.

आणखी वाचा : ५० श्रेष्ठ अभिनेत्यांच्या यादीत किंग खानचा समावेश; हा सन्मान मिळवणारा शाहरुख ठरला एकमेव भारतीय

पुढे ते म्हणतात, “ICE Theatres मध्ये मिळणारा अनुभव तुम्हाला घरी कितीही प्रगत तंत्रज्ञान आलं तरी तो मिळणं अशक्य आहे.” याबरोबरच 4k लेझर प्रॉजेक्शन आणि 3D डॉलबी अटमोस तंत्रज्ञान यामुळे या स्क्रीनमध्ये चित्रपट पाहायचा अनुभव अधिकच संपन्न होणार आहे असंही ते म्हणाले. शिवाय २०२३ च्या मार्चपर्यंत हे तंत्रज्ञान मुंबई पुणे इथल्या चित्रपटगृहातही उपलब्ध करून देण्याचं आश्वासन पल्लीरे यांनी दिलं आहे. शिवाय या थिएटरमध्ये केवळ हॉलिवूड चित्रपटच नव्हे तर ‘सर्कस’ किंवा ‘पठाण’सारखे भारतीय चित्रपट बघातानासुद्धा एक समृद्ध अनुभव चित्रपट रसिकांना मिळेल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

Story img Loader