आपण सगळ्यांनीच कधी ना कधीतरी ‘नो शेव नोव्हेंबर’ असं काहीतरी ऐकलं असेलच. आपल्या जवळच्या किंवा त्यांच्या जवळच्या किंवा त्यांच्या जवळच्यांच्या जवळच्या अशा कुठल्यातरी ग्रुपमध्ये ‘नो शेव नोव्हेंबर’म्हणणारं, पाळणारं कुणीतरी सापडतंच.पण हा नेमका काय प्रकार आहे? नोव्हेंबर महिन्यात केस न कापण्याचं आवाहन करणारी ही मोहीम नेमकी आहे तरी काय? ही खरंच मोहीम आहे की फक्त एक फॅशन ट्रेंड? या सगळ्याला कधीपासून सुरुवात झाली? सविस्तर जाणून घेऊयात!

फॅशन की मोहीम?

खरंतर आपला पेहेराव किंवा केसांशी संबंधित कोणतीची बाब ही फॅशन किंवा स्टाईलच्या परिभाषेत बोलली जाते. तसाच ‘नो शेव नोव्हेंबर’ हाही एखादा फॅशन ट्रेंड आहे असं जर तुम्हाला वाटत असेल, तर तुमची गल्लत होतेय. कारण पहिल्याप्रथम जरी ही फॅशनशी संबंधित एखादी बाब वाटत असली, तरी त्यामागे एक खूप सुंदर आणि महत्त्वाचं असं कारण किंवा धोरण आहे! पूर्ण महिनाभर केस न कापण्याचं आवाहन करणारी ही मोहीम कॅन्सरपीडित रुग्णांसाठी सुरू करण्यात आली होती. या मोहिमेचा इतिहास मोठा रंजक आहे! पण त्याआधी, ही मोहीम नेमकी काय आहे ते समजून घेऊ..

Consistent and self believe key to success best example boy win table tennis match video viral on social media
“हरलेला डावही जिंकता येतो” स्पर्धेत शेवटच्या संधीचं चिमुकल्यानं कसं सोनं केलं? VIDEO एकदा पाहाच
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Marathi Rangbhoomi Divas , Marathi Theatre Day, 5th November
विश्लेषण : रंगभूमी दिन ५ नोव्हेंबरला का असतो? यंदा अद्याप साजरा का झाला नाही?
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा
Sharad Pawar, Sudhir Kothari Hinganghat,
वर्धा : अखेर शरद पवार थेट ‘हिंगणघाटच्या शरद पवारां’च्या घरी, म्हणाले…
Chhagan Bhujbal plea dispute with BJP for release from ED Mumbai print news
भुजबळ यांच्या दाव्याने नवे वादळ; ‘ईडीपासून मुक्तीसाठी भाजपबरोबर; ओबीसी असल्याने कारवाई’
Assembly Election 2024 Malegaon Outer Constituency Dada Bhuse print politics news
लक्षवेधी लढत: मालेगाव बाह्य : मंत्री दादा भुसे यांचा मार्ग यंदा खडतर
cm eknath shinde
“हफ्ते घेणारे नव्हे; हफ्ते देणारे आमचे…”, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विरोधकांना टोला

काय आहे ‘नो शेव नोव्हेंबर’?

नोव्हेंबर महिना सुरू झाला की अनेक लोक पूर्ण महिनाभर दाढी-कटिंग न करण्याचा प्रणच करतात! पण बऱ्याच जणांना हे असं का करतात? याची पुरेशी कल्पना नसते. ‘नो शेव नोव्हेंबर’लाच काहीजण ‘मूव्हेंबर’ असंही म्हणतात. ही संपूर्ण मोहीम कर्करोगग्रस्तांच्या प्रती सहवेदना व्यक्त करण्यासाठी सुरू झाली, वाढली आणि आता प्रस्थापितही झाली.उपचारांदरम्यान कॅन्सरग्रस्त रुग्णांना मोठ्या प्रमाणावर तणाव आणि वेदना सहन कराव्या लागतात. पण या कालावधीत उपचारांचे नकारात्मक परिणाम म्हणून त्यांचे केसही मोठ्या प्रमाणावर गळतात.

विश्लेषण : बॉलिवुड अभिनेत्री आणि प्रेग्नन्सी; करिअरवर काय परिणाम होतो? आलिया भट्टमुळे चर्चेला उधाण!

या मोहिमेत सहभागी होण्यासाठी जगभरातून लोक पूर्ण महिना दाढी किंवा कटिंग करत नाहीत. त्यानंतर ज्या कर्करोगग्रस्त रुग्णांना उपचारांमुळे केस काढावे लागले, त्यांना हे केस दान करण्यात येतात.

कशी सुरुवात झाली ‘नो शेव नोव्हेंबर’ला?

सर्वात आधी २००३ साली ऑस्ट्रेलियातल्या मेलबर्नमध्ये ‘मूव्हेंबर'(Movember) या मोहिमेला सुरुवात झाली. यामध्ये जस्टिन कोगलन, अॅडम गॅरॉन, ल्युक स्लॅटरी आणि ट्रॅविस गॅरॉन या चार मित्रांनी अशा प्रकारे केस वाढवून कर्करोगग्रस्तांप्रती सहवेदना व्यक्त केल्या. त्यानंतर फक्त कर्करोगग्रस्तच नव्हे, तर इतरही गंभीर आजारातील रुग्णांना त्यांनी केस दान केले.

त्यानंतर २००७मध्ये खऱ्या अर्थाने ‘नो शेव नोव्हेंबर’ या मोहिमेचा पाया रचला गेला. कॅलिफोर्नियामध्ये राहणाऱ्या हिल कुटुंबात या संकल्पनेचा जन्म झाला. या कुटुंबाचा प्रमुख मॅथ्यु हिल यांचं २००७मध्ये कोलन कॅन्सरमुळे निधन झालं. या दु:खद प्रसंगामुळे हिल कुटुंब कोलमडून पडलं. पण त्यातून त्यांनी आपल्याप्रमाणेच ज्यांना अशा प्रकारच्या यातना भोगाव्या लागतात, त्यांना मदतीचा हात पुढे करण्यासाठी पुढाकार घेतला. हिल यांच्या आठ मुलांनी ही मोहीम व्यापक स्तरावर लोकांपर्यंत पोहोचवण्यास सुरुवात केली. २००९ मध्ये या मोहिमेला ‘नो शेव नोव्हेंबर’असं नाव पडलं.

विश्लेषण: पुण्यातील ओशो आश्रमाच्या संपत्तीचा वाद नेमका काय आहे? आश्रमावर मालकी कोणाची?

‘मूव्हेंबर’ की ‘नो शेव नोव्हेंबर’?

बऱ्याचदा मूव्हेंबर आणि ‘नो शेव नोव्हेंबर’ या दोन्ही संकल्पना एकसारख्याच वापरल्या जातात. मात्र, त्या दोन्हींमध्ये काहीसा फरक आहे. ‘नो शेव नोव्हेंबर’ मोहिमेमध्ये महिन्याचा काही काळच थोड्या फार प्रमाणात केस कापणं किंवा ट्रीम करणं टाळलं जातं. पण ‘मूव्हेंबर’ मोहिमेमध्ये मात्र पूर्ण महिनाभर केस अजिबात कापले जात नाहीत.

थोडक्यात, या दोन्ही संकल्पना एकमेकींपासून काही प्रमाणात भिन्न असल्या, तरी त्यांचा हेतू मात्र तितकाच वाखाणण्याजोगा असल्याचं सांगत या मोहिमेत जगभरातून अनेक लोक दरवर्षी सहभागी होत असतात.