-ज्ञानेश भुरे

आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा हंगाम संपला की नवा हंगाम सुरू होईपर्यंतचा कालावधी खेळाडूंसाठी खूप महत्त्वाचा असतो. विश्रांतीबरोबरच सराव, प्रशिक्षण आणि नव्या हंगामाचे नियोजन या आघाड्यांवर त्यांना काम करायचे असते. म्हणूनच अशा स्पर्धा विरहित कालावधीचे खेळाडूच्या कारकिर्दीत अनन्य साधारण महत्त्व असते. ते ओळखले नाही, तर विकसनशील खेळाडूंवर त्याचा विपरीत परिणाम होतो. स्पर्धाविरहीत कालावधीच्या महत्त्वाविषयीचा हा आढावा.

Jharkhand Chief Minister Hemant Soren
विश्लेषण : हेमंत सोरेन यांच्या करिष्म्यासमोर झारखंडमध्ये भाजप निष्प्रभ!
fide world chess championship 2024 gukesh d vs ding liren
भारत वि. चीन… आता बुद्धिबळाच्या पटावर! जगज्जेतेपदाच्या लढतीत…
loksatta analysis how shiv sena rebel leader eknath shinde establish his own unique identity in two and a half year
शिवसेनेतील सर्वांत यशस्वी बंडखोर… एकनाथ शिंदेंनी सव्वादोन वर्षांत कशी प्रस्थापित केली स्वतःची खणखणीत ओळख?
walking pneumonia in delhi
‘Walking pneumonia’ काय आहे? जाणून घ्या या गंभीर आजाराची लक्षणे अन् उपाय…
king charles coronation cost
देश संकटात आणि राजाच्या राज्याभिषेकावर दौलतजादा; नागरिकांची आगपाखड
plastic production india
२०४० पर्यंत प्लास्टिकचे उत्पादन ७०० दशलक्ष टन; याचा परिणाम काय? जागतिक स्तरावर प्लास्टिक करार किती महत्त्वाचा?
Assembly Election 2024 How the results in Marathwada are in favor of the Mahayuti
आरक्षण मागणीच्या भूमीमधील निकाल महायुतीच्या बाजूने कसे? मराठवाड्यात नेमके काय घडले?
Devendra Fadnavis made a comeback big victory maharashtra assembly elections 2024 BJP
विश्लेषण : विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने देवेंद्र फडणवीसांचा धडाक्यात कमबॅक! अपयश गिळून काम केल्याचे फळ कसे मिळाले?

‘ऑफ सिझन’ कालावधी म्हणजे नेमके काय?

प्रत्येक खेळात स्पर्धेच्या हंगामाचा शेवट असतो. हाच शेवट खेळाडूंना त्यांच्या पुढील तयारीची दिशा दाखवत असतो. क्रीडा क्षेत्राच्या परिभाषेत नव्या हंगामाला सुरुवात होईपर्यंतच्या कालावधीला “ऑफ सिझन’ असे म्हटले जाते. या कालावधीत खेळाडू त्यांच्या दुखापतींमधून बाहेर पडण्याकडे लक्ष देतात, मानसिकदृष्ट्या खंबीर राहण्याचा प्रयत्न करतात. नव्या हंगामाला सामोरे जाण्यासाठी या कालावधीचे अधिक अचूक नियोजनकरणे खूप आवश्यक असते. कारण याचा फायदा त्याला पुढील हंगामात मिळणार असतो.

ऑफ सिझन कालावधी साधारण कधी सुरू होतो?

ॲथलेटिक्ससाठी हा कालावधी ऑक्टोबरमध्ये सुरू होतो आणि तो फेब्रुवारी किंवा मार्चपर्यंत चालतो. कुस्तीसाठी दोन महिन्यांचा कालावधी मिळतो, तर बॉक्सिंगला तीन महिने हा कालावधी असतो. बहुतेक खेळांना असा कालावधी साधारणपणे दोन ते तीन महिन्यांचा मिळतो.

या कालावधीत खेळाडू नेमके काय करतात?

या कालावधीत खेळाडूंचा स्नायू बळकट करण्याकडे आणि खेळातील गतिशीलता वाढवण्याकडे अधिक कल असतो. खेळ कुठलाही असो, खेळाडूंसाठी वजन हा महत्त्वाचा घटक असतो. आपल्या खेळाला आवश्यक असेल असे वजन राखणे, आपल्या खेळाचा पाया भक्कम करणे याकडेही खेळाडू लक्ष पुरवतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नव्या हंगामासाठी पुरेल इतकी ऊर्जा मिळविण्याचे काम खेळाडू करतात. अर्थात, हे सगळे नियोजन प्रत्येक खेळासाठी वेगवेगळे असते.

ऑफ सिझन सरावासाठी खेळाडूंसाठी काही विशिष्ट केंद्र असते का?

खेळाडू सहसा आपल्या नेहमीच्या सराव केंद्रावर प्रशिक्षण करणे पसंत करतात. अनेकदा उंचीवरील ठिकाणे निवडण्याकडे खेळाडूंचा कल असतो. अशा उंचीवरील प्रशिक्षणामुळे शरीरातील लाल पेशींमध्ये वाढ होऊन हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधीची कार्यप्रणाली सुधारते. स्पर्धेचा कालावधी जसा जवळ येतो तसे खेळाडू व्यायाम करून शारीरिक क्षमतेकडे अधिक लक्ष देतात. इतर प्रयत्नांची तीव्रता कमी करून खेळावर लक्ष केंद्रित करतात. जेणेकरून शरीर स्पर्धेसाठी तयार रहाते.

भारतात सध्या अशा प्रकारे कुणी नियोजनाला सुरुवात केली आहे?

आपल्या कारकिर्दीकडे कायमच गांभीर्याने बघणाऱ्या भालाफेक प्रकारातील खेळाडू नीरज चोप्रा यात आघाडीवर आहे. नीरजने इंग्लंडमधील लॉफबरो विद्यापीठामध्ये अशा ऑफ-सिझन प्रशिक्षणाला सुरुवात केली आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात नीरज सर्वप्रथम आपल्या वजनाकडे लक्ष पुरवेल. योग्य व्यायाम करून आवश्यक वजन राखण्याचा त्याचा मानस आहे. त्याचबरोबर क्षमता कशी वाढेल याकडे तो लक्ष पुरवेल. त्यानंतर खेळाच्या प्रत्यक्ष प्रशिक्षणाला सुरुवात करेल. त्याचप्रमाणे कुस्तीगीर रवी दहियाने दिल्लीतील छत्रसाल मैदानात प्रशिक्षणाला सुरुवात केली आहे. या कालावधीत त्याचे मुख्य लक्ष गुडघ्याच्या दुखापतीतून पूर्ण बरे होण्याकडे असेल. त्याचबरोबर पुन्हा ५७ किलो वजनाकडे त्याला परत यायचे आहे. यासाठी त्याला किमान आठ किलो वजन कमी करावे लागेल.

भारतातील हा कालावधी इतर देशांपेक्षा वेगळा कसा ठरतो?

भारतीय खेळाडूंना मुळात असा ऑफ सिझन कालावधी फारसा मिळत नाही. भारतात प्रशिक्षण किंवा सरावापेक्षा खेळण्याला अधिक महत्त्व दिले जाते हे खेळ आणि खेळाडूच्या विकासासाठी मारक आहे. परदेशातील चित्र नेमके उलटे आहे. ते नव्या हंगामातील स्पर्धा डोळ्यासमोर ठेवून प्रशिक्षण कार्यक्रम आखतात. यावर्षी भारतीय धावपटू आंतरराष्ट्रीय हंगाम संपला तरी संघटकाच्या हट्टापायी राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होत होते. ज्युडोपटू तुलिका मानला बरगड्या फ्रॅक्चर असतानाही राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत खेळावे लागले. कुस्ती, बॉक्सिंग या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा वर्ष संपत असल्या तरी चालू आहेत. राष्ट्रीय स्पर्धा संपल्या की युवा खेळाडू प्रस्तावित आंतरविद्यापीठ स्पर्धा कार्यक्रमात व्यग्र राहतील. अशा वेळी विश्रांती आणि सराव यांना वेळ कसा मिळत नाही.

यासाठी काय करायला हवे?

सर्वांत महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रीय क्रीडा महासंघांनी आपल्या वार्षिक कार्यक्रमाचे अचूक नियोजन करण्याची गरज आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धांचा कार्यक्रम पाहून खेळाडूंचा सहभाग निश्चित करायला हवा. प्रत्येक स्पर्धेत आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंनी खेळायला हवे असा आग्रह सोडायला हवा. थोडक्यात काय तर स्पर्धांचे आयोजन आणि प्रशिक्षण कालावधी याबाबत जागरुकता पाळल्यास देशातील क्रीडा प्रगती अधिक वेगाने होईल.