ब्राझीलमधील बहिया राज्यांमध्ये ओरोपोच तापामुळे (Oropouche Fever) दोघांचा मृत्यू झाल्याची घटना नोंद झाली आहे. ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयाने २५ जुलै २०२४ रोजी याबाबतचे वृत्त दिले आहे. मृत झालेल्या दोन्हीही व्यक्ती महिला असून, त्या तिशीच्या आतील आहेत. या मृत महिलांना इतर कोणतेही रोग नव्हते. मात्र, त्यांच्यामध्ये डेंग्यूप्रमाणेच लक्षणे दिसून येत होती. ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले, “जगभरामध्ये या संक्रमणामुळे मृत्यू झाल्याची नोंद आजवर कुठेच झालेली नव्हती.”

हेही वाचा : पॅरिस ऑलिम्पिकमधील खेळाडूंचं खाणं काय आहे? प्रत्येक खेळाडूंचा आहार कसा निश्चित केला जातो?

nagpur,tiger,railway,
VIDEO : हे काय ! रेल्वेच्या धडकेत १३ वाघ मृत्युमुखी
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Victims of bulldozer action in UP welcome SC verdict
‘बुलडोझर’ निकालाचे उत्तर प्रदेशातील पीडितांकडून स्वागत; नुकसानभरपाईच्या मागणीसाठी न्यायालयात जाण्याचे संकेत
Dengue, chikungunya fever, Dengue Pune,
दिवाळीनंतर पुण्यात डेंग्यू, चिकुनगुन्याचा ताप अचानक कमी! जाणून घ्या कारणे
Loksatta explained Why has the central government recommended the influenza vaccine
केंद्र सरकारने इन्फ्लूएन्झा लशीची शिफारस का केली आहे? भारताला फ्लूचा विळखा?
world environment council lokrang
विळखा काजळमायेचा!
mumbai weather updates city records moderate air quality
मुंबईतील हवेचा दर्जा मध्यम श्रेणीतच
Special campaign against Pneumonia by Zilla Parishad to prevent child death
बालमृत्यू टाळण्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे न्यूमोनियाविरोधात विशेष मोहीम

जुलै महिन्याच्या अखेरीपर्यंत ब्राझीलमधील २० राज्यांमध्ये ओरोपोच तापाची ७,२३६ प्रकरणे नोंदवली गेली आहेत. यातील बहुतांश रुग्ण हे अॅमेझॉन व रोंडोनिया या राज्यांतीलच आहेत. २०२३ मध्ये ब्राझीलमध्ये ८४० प्रकरणांची नोंद झाली होती. लॅटिन अमेरिका आणि कॅरेबियनमध्ये ओरोपोच तापाची साथ येणे फारच सर्वसामान्य मानले जाते. तापास कारणीभूत ठरणारा हा विषाणू १९५५ साली त्रिनिदाद व टोबॅगोमध्ये सर्वांत आधी सापडला होता. इटलीमध्ये ओरोपोच विषाणू सापडण्याचे सर्वांत पहिले प्रकरण जून २०२४ मध्ये नोंदवले गेले. युरोप खंडात आढळून आलेले हे पहिलेच प्रकरण होते. इटालियन वृत्तपत्र ‘Il Messaggero’ने वृत्त दिले आहे की, इटलीमध्ये निदान झालेला रुग्ण नुकताच कॅरेबियन ट्रिपवरून परतला होता.

ओरोपोच तापाची साथ कशी पसरते?

ओरोपोच हा विषाणूजन्य रोग संक्रमित मिज माशी आणि डासांच्या दंशाद्वारे पसरतो. मध्य व दक्षिण अमेरिका आणि कॅरेबियनमध्ये हा रोग बराच काळ पसरत असला तरी काही देशांमध्ये या वर्षी निदान झालेल्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ झाली आहे. यापूर्वी ओरोपोच विषाणू ज्या देशांमध्ये कधीही आढळला नव्हता, त्या देशांतही आता या विषाणूने संक्रमित झालेले रुग्ण आढळून येत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने ११ जून रोजी क्यूबामध्ये प्रथमच या विषाणूचा उद्रेक झाल्याची नोंद केली आहे. “क्यूबामध्ये आढळलेले हे पहिलेच प्रकरण आहे. त्यामुळे तिथे या प्रकरणांच्या आणखी नोंदी होण्याची शक्यता सर्वाधिक आहे,” असेही जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

डेंग्यूसारखीच लक्षणे

ओरोपोच ताप हा ओरोपोच विषाणूच्या संक्रमणामुळे येतो. या विषाणूचा प्रसार क्युलिकोइड्स पॅरेन्सिस मिज माशीच्या दंशाद्वारे होतो. मात्र, अद्याप तरी या विषाणूचे संक्रमण माणसाद्वारे माणसामध्ये झाल्याची नोंद झालेली नाही. या रोगाची लक्षणे अगदी डेंग्यूसारखीच असतात आणि डासाने दंश केल्यानंतर चार ते आठ दिवसांदरम्यान सुरू होतात. ही लक्षणे दिसण्याची सुरुवातदेखील अचानकच होते. या लक्षणांमध्ये सामान्यतः ताप, डोकेदुखी, वेदना, थंडी वाजून येणे, सांध्यांमध्ये जडपणा येणे आणि कधी कधी मळमळ व उलट्या येणे यांचाही समावेश होतो. बहुतांश रुग्ण सात दिवसांच्या आत बरे होतात. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, या विषाणूचे गंभीर संक्रमण होणे दुर्मीळ आहे. या रोगासाठी कोणतीही विशिष्ट लस किंवा अँटीव्हायरल उपचार सध्या तरी उपलब्ध नाहीत. त्यातच आता या संक्रमणामुळे दोन मृत्यू झाल्यानंतर या विषाणूच्या संक्रमणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे.

हेही वाचा : सुशिक्षित मातांचं वाढतं प्रमाण नव्या शैक्षणिक धोरणासाठी किती अनुकूल? विद्यार्थ्यांच्या लेखन, वाचन, गणितात खरंच पडतो का फरक?

ओरोपोच विषाणूच्या प्रसारामध्ये हवामानाची भूमिका

मे २०२३ च्या इन्फेक्शियस डिसीज ऑफ पॉवर्टीमध्ये प्रकाशित झालेल्या शोधनिबंधामध्ये असे म्हटले आहे की, ओरोपोच तापावर अद्याप सखोल अभ्यास झालेला नाही. त्यामुळे साथरोग म्हणून पसरण्याची या रोगाची क्षमता कितपत आहे, याबाबतचे संशोधन अद्यापही अपूर्णच आहे. ओरोपोच तापाची बहुतेक प्रकरणे ही उष्ण कटिबंधीय हवामानाशी संबंधित आहेत, असे दिसून येत आहे. मात्र, सध्या या रोगाबाबत पुरेशी माहिती उपलब्ध नसल्याने कोणताही ठोस निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल. कारण- या विषाणूच्या संक्रमणाच्या काही नोंदी या उष्ण कटिबंधीय क्षेत्राबाहेरही झालेल्या आहेत. या विषाणूबाबत आणि त्याच्या प्रसाराबाबतच्या बऱ्याचशा गोष्टी या पुरेशा स्पष्ट नसल्या तरीही अभ्यासकांच्या मते झाडे नष्ट होणे आणि मोठ्या प्रमाणावर होणारी जंगलतोड या बाबी रोगाच्या उद्रेकाच्या मूळाशी असल्याचे दिसून येते.