चाचेगिरी हा समुद्रमार्गे करण्यात येणारा जुना गुन्हा आहे आणि तो अनेक शतकांपासून अस्तित्वात आहे. अलिकडच्या वर्षांत आफ्रिकेचा पश्चिम किनारा, एडनचे आखात, हॉर्न ऑफ आफ्रिका, बांगलादेश आणि मलाक्काच्या सामुद्रधुनीवर समुद्री चाच्यांनी हल्ले केले आहेत. खरं तर चाचेगिरी हे बेकायदेशीर कृत्य आहे. या सागरी भागात पोलीस बंदोबस्त कमी असून, किनारी देशांकडे असलेले सागरी सैन्यही कमकुवत आहे, तर काही देशांकडे अजिबात नाही. या भागात सामान्यत: जहाज वाहतुकीचे केंद्रीकरण असते, एकतर जहाजांच्या मार्गावरील चोक पॉईंट असतात, तिथे जहाजांना एकत्र यावे लागते, तर काहींना बंदरात लगेचच प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे जहाजांना समुद्रातच राहावे लागते. या भागांच्या जवळच्या जमिनीवर अनेकदा खराब प्रशासन किंवा अशांतता असते, त्यामुळे बेरोजगारी, दारिद्र्य आणि परिणामी गुन्हेगारी वाढते. हे क्षेत्र बहुतेक आंतरराष्ट्रीय जल, आंतरराष्ट्रीय सामुद्रधुनी किंवा द्वीपसमूहाच्या मधोमध असते, त्यामुळे तिथे अनेक देशांच्या सागरी सीमा अधिकारक्षेत्रावरून वाद असतात. म्हणून कायदेशीर गुंतागुंत आणि समन्वयात अडचणी येतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा