जगातील काही देशांमध्ये सध्या प्लास्टिकचा पाऊस पडतो आहे, हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण हे खरं आहे. काही दिवसांपूर्वीच न्यूझीलंडमध्ये पडलेल्या पावसानंतर घराच्या छतांवर प्लास्टिकचे ५ हजार सुक्ष्मकण आढळून आले आहेत. तर वर्षभरात ७४ मेट्रिक टन प्लास्टिकचे कण पडल्याची माहितीही पुढे आली आहे. मात्र, हा प्लास्टिकाचा पाऊस नेमका का पडतो आहे? याचा मानवी आरोग्यावर नेमका कसा परिणाम होतो? सविस्तर जाणून घेऊया.

‘प्लास्टिक रेन’ म्हणजे नेमकं काय?

Viral video rickshaw driver writes interesting question on backside of rickshaw viral
VIDEO: पाण्यात लवकर विरघळणारा पदार्थ कोणता? कोल्हापुरच्या रिक्षा चालकानं लिहलं भन्नाट उत्तर; वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Pune Municipal Corporation faces the challenge of preventing 40 percent water leakage
लोकजागर : ४० टक्के पाणीगळती रोखा, मग कौतुक करा!
worlds most polluted city
लाहोरवर काजळी भारतामुळे? जगातील सर्वात प्रदूषित शहर होत ओढवली नामुष्की
why water tanks are black in colour
घराच्या छतावरील पाण्याच्या टाकीचा रंग काळाच का असतो? अन् त्यावर रेषा का असतात?
Why antimicrobial resistance is a major challenge facing the healthcare sector
प्रतिसूक्ष्मजीव रोधकता हे आरोग्यक्षेत्रासमोरील मोठे आव्हान का आहे?
Muddy and smelly water
मुंबई: पूर्व उपनगरात गढूळ व दुर्गंधीयुक्त पाणी; भातसा पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे नदीपात्रात गढूळ पाणी, महापालिकेचा दावा
pune citizens are in trouble due to bad weather Care advice from healthcare professionals
खराब हवामानामुळे पुणेकर बेजार! आरोग्यतज्ज्ञांचा काळजी घेण्याचा सल्ला

हेही वाचा >>विश्लेषण : २०३६ साली होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या यजमानपदासाठी भारत उत्सुक, पण ते शक्य आहे का? जाणून घ्या

जगात अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्याबरोबरच प्लास्टिकचे सुक्ष्मकण जमिनीवर पडत आहेत, त्यालाच ‘प्लास्टिक रेन’ असं म्हणतात. या प्लास्टिक कणांचा आकार साधारण ५ मिलीमीटर इतका असतो. हे तेच प्लास्टिक आहे, ज्याचा वापर आपण दैनंदिन जीवनात करतो. ‘द वायर’च्या रिपोर्टनुसार, आपण प्लास्टिकचा वापर केल्यानंतर ते कचराकुंडीत फेकून देतो. हेच प्लास्टिक पुढे समुद्रापर्यंत पोहोचते. तसेच बाष्पीभवनाच्या प्रक्रियेमुळे तेच प्लास्टिक सुक्ष्मकणांच्या स्वरूपात पावसाबरोबर जमिनीवर पडते.

हेही वाचा >> विश्लेषण: आणखी एक भारतीय बनावटीचे कफ सिरप वादग्रस्त का ठरले? उझबेकीस्तानमध्ये काय घडले?

‘प्लास्टिकचे कण’ डोळ्याने बघता येतात?

अनेकांना ‘प्लास्टिक रेन’बाबत माहिती नसली, तरी हवेत आपल्याला प्लास्टिकचे कण दिसून येतात. हे प्लास्टिकचे कण उघड्या डोळ्याने दिसत नसले, तरी UV लाईटच्या मदतीने ते बघता येतात. धक्कादायक बाब म्हणजे आपल्या घरातदेखील हे कण आढळून येतात.

सायन्स जर्नलच्या एका संशोधनानुसार, अमेरिकेतील सर्वात कमी प्रदूषित भाग असलेल्या दक्षिणी राष्ट्रीय उद्यानात यंदा १४ महिने पाऊस पडला. यादरम्यान पावसाबरोबर एक हजार मेट्रिक टन प्लास्टिकचे कण जमिनिवर पडले. विशेष म्हणजे हा भाग शहराच्या बाहेर असून याठिकाणी प्रदूषण देखील सर्वात कमी आहे. वैज्ञानिकांच्या मते २०३० पर्यंत अमेरिकेत ४६० मेट्रीक टन प्लास्टिक कण पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, याबाबत भारतात कोणतेही संशोधन झाले नसून सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये परिस्थिती आणखी गंभीर असेल, असा अंदाज वैज्ञानिकांनी वर्तवला आहे.

हेही वाचा >> विश्लेषण: अल्पवयीन मुलांचा गंभीर गुन्ह्यातील सहभाग का वाढतोय?

मानवी आरोग्यावर काय होतो परिणाम?

२०२१ मध्ये झालेल्या संशोधनानुसार, एका व्यक्तीच्या शरीरात श्वसनाद्वारे दररोज ७ हजार प्लास्टिक कण आत जातात. हे जवळपास धुम्रपान आणि तंबाखूच्या सेवनाप्रमाणेच आहे. या प्लास्टिक कणांचा आरोग्यावर नेमका काय परिणाम होतो, याबाबत माहिती उपलब्ध नसली, तरी यामुळे श्वसनक्रिया आणि पचनक्रियेवर वाईट परिणाम होऊ शकतो, असा अंदाज वैज्ञानिकांनी वर्तवला आहे.