निशांत सरवणकर
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
दहशतवादी कारवाया केल्याच्या आरोपावरून राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) देशभरातील ११ राज्यांत छापे टाकून ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’शी संबंधित सुमारे १०६ जणांना अटक केली आहे. राज्यातही दहशतवाद विरोधी पथकाने राष्ट्रीय तपास यंत्रणेसह संयुक्तरीत्या केलेल्या कारवाईत २०हून अधिक जणांवर कारवाई केली आहे. ही कारवाई अचानक करण्यात आली का, यामागे कारणे काय आहेत, याविषयीचा हा विश्लेषणात्मक आढावा –
‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ काय आहे?
‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ची स्थापना केरळात २००६मध्ये झाली. १९९२मध्ये बाबरी मशिदीची वादग्रस्त वास्तू पाडल्यानंतर ज्या काही मुस्लिम संघटना स्थापन झाल्या होत्या त्यापैकी नॅशनल डेव्हलपमेंट फ्रंट ऑफ केरळ, कर्नाटक फोरम फॉर डिग्निटी आणि मनिथा नीथी पसराय ऑफ तमिळनाडू या तीन संघटनांच्या विलिनीकरणातून ही संघटना स्थापन झाली आहे. ही संघटना दहशतवादी कृत्यांसाठी निधी, सदस्यांसाठी प्रशिक्षण देणे, संघटनेत सामील करून घेण्यासाठी धर्मांतर करणे आदी मार्गांनी सक्रिय असल्याचे राष्ट्रीय तपास यंत्रणेचे म्हणणे आहे.
In major action being taken across 10 states, NIA, ED along with state police have arrested over 100 cadres of PFI: Sources pic.twitter.com/RPXBFxg1m2
— ANI (@ANI) September 22, 2022
या संघटनेचे अस्तित्व कुठे आहे?
राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या माहितीनुसार, या संघटनेने २२ राज्यांत आपले बस्तान बसविले आहे. केंद्र सरकारने बंदी आणलेल्या ‘स्टुडन्ट्स इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया’ (सिमी) या संघटनेचीच ही प्रतिकृती असून सिमीचे अनेक सदस्य या संघटनेत सक्रिय आहेत. याच संघटनेचा सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया हा राजकीय पक्ष आहे. २००९मध्ये स्थापन झालेल्या या राजकीय पक्षात नगरपरिषदांच्या निवडणुकीत आपले बस्तान बसवायला सुरुवात केली आहे. उडुपी जिल्ह्यात तीन नगरपरिषदा जिंकल्या आहेत. याशिवाय कॅम्पस फ्रंट ऑफ इंडिया आणि नॅशनल विमेन्स फ्रंट अशा संघटनाही कार्यरत आहेत. या संघटनेचे मुख्यालय दिल्लीत आहे. मात्र ही दहशतवादी संघटना असल्याचा तपास यंत्रणेचा दावा आहे.
पहिल्यांदाच ही कारवाई झाली?
राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून पहिल्यांदाच ही कारवाई झालेली नाही. २०११नंतर ही संघटना अधिक सक्रिय झाली. २०१३मध्ये केरळ पोलिसांच्या मदतीने राष्ट्रीय तपास यंत्रणेने कन्नूर (केरळ) येथे प्रशिक्षण केंद्र नेस्तनाबूत केले होते. ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या सदस्यांना बॉम्ब तयार करणे, तलवारींचे प्रशिक्षण दिले जात असल्याचे उघड झाल्याचा दावा त्यावेळी राष्ट्रीय तपास यंत्रणेने केला होता. २०१४मध्ये पहिल्यांदा केरळ शासनाने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर करून या संघटनेचा बुरखा फाडला होता. २०१६मध्ये केरळात राष्ट्रीय तपास यंत्रणेने कारवाई करून इस्लामिक स्टेट म्हणजे आयएसचे मोड्युल उद्ध्वस्त केले होते. मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह साहित्यही हस्तगत केले होते. अटक केलेल्या या तरुणांचा ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’शी संबंध असल्याचे स्पष्ट झाले होते. या तरुणांनी अल-झारूल खलिफा हा जिहादी ग्रुप तयार केला होता. देशात बॉम्बस्फोट घडविण्याची योजना होती.
On being asked about raids on PFI offices & leaders' residences, Congress MP Rahul Gandhi said, "all forms of communalism & violence, regardless of where they come from, are the same & should be combated. There should be zero tolerance." pic.twitter.com/DFlNOY5iDR
— ANI (@ANI) September 22, 2022
कारवाई कशासाठी?
या संघटनेकडून इस्लाम धर्माचे रक्षण करण्याच्या नावावर तरुणांना सामील होण्यास सांगून त्यांना देशविघातक कारवाया करायला भाग पाडले होते. याबाबत गुप्तचर विभाग, राष्ट्रीय तपास यंत्रणा तसेच राज्यांतील दहशतवाद विरोधी विभाग यांच्याकडून पाळत ठेवली जात होती. देशविघातक कारवाया केल्या जात असल्याची खात्री पटल्यावर ही कारवाई करण्यात आली. आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या शंभरहून अधिक सदस्यांकडे आक्षेपार्ह साहित्य आढळल्याचे तपास यंत्रणेचे म्हणणे आहे. सिमीप्रमाणेच या संघटनेचे काम सुरू होते. कुठल्याही सदस्याची माहिती या संघटनेने आपल्याकडे ठेवलेली नसल्याचे आढळून आले. या संघटनेशी संबंध लावला जाऊ नये, या दिशेने काम सुरू होते, अशी माहिती या कारवाईत सहभागी झालेल्या एका अधिकाऱ्याने दिली.
विश्लेषण: Lay’s chipsच्या बटाट्यावरून कोर्टात चाललेला झगडा काय आहे?
महाराष्ट्रात कितपत पाळेमुळे?
राज्याच्या दहशतवादविरोधी विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातही या संघटनेने आपली पाळेमुळे रुजवायला सुरुवात केली होती. आता झालेल्या कारवाईत मुंबई, नवी मुंबई, ठाणे, औरंगाबाद, पुणे, कोल्हापूर, बीड, परभनी, नांदेड, मालेगाव, जळगाव येथे या संघटनेने हातपाय पसरायला सुरुवात केली होती. गुप्तचर विभागाने याबाबत वेळोवेळी माहिती पुरविली होती. मात्र गेल्या अडीच वर्षांत त्या माहितीकडे दुर्लक्ष करण्यात आले. आता मात्र राष्ट्रीय तपास यंत्रणेने केलेल्या धडक कारवाईनंतर राज्याचा दहशतवादविरोधी विभागही सतर्क झाले आहे. सिमीच्या कारवाया अशाच पद्धतीने सुरू होत्या. त्यानंतर सिमीच्या काही सदस्यांचा मुंबईतील बॉम्बस्फोटांमध्ये सहभाग आढळला होता.
Today searches were conducted by ED, NIA & State Police forces across 93 locations in 15 states on top PFI leaders & members in 5 cases registered on inputs of involvement of PFI leaders&cadres in funding of terrorism & terrorist activities & radicalising people: NIA pic.twitter.com/PydX99szcK
— ANI (@ANI) September 22, 2022
अंतर्गत सुरक्षेला धोकादायक?
गुप्तचर विभागाने या संघटनेबाबत दिलेल्या अहवालात म्हटले आहे की, ही संघटना मुळातच हिंसक प्रवृत्तीची आहे. उजव्या विचारसरणीच्या मंडळींवर हल्ला करणे हाच त्यांचा अजेंडा आहे. जे कोणी इस्लाम धर्माला विरोध करतील त्यांच्यावर हल्ला केला तर इस्लामकडून पुरस्कृत केले जाईल, अशी शिकवण ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’कडून दिली जाते. या संघटनेच्या हालचालींवर राष्ट्रीय तपास यंत्रणेसह राज्यांतील दहशतवादविरोधी पथकाला नजर ठेवण्यास सांगितले होते. केरळात ही संघटना खून, खुनाचा प्रयत्न, बॉम्बस्फोट आदी हिंसक घटनांमध्ये सक्रिय होती, असा दावा करण्यात आला आहे.