Prevantive Chemotherapy कर्करोगाच्या पेशींना संपविण्यासाठी आणि कर्करोग शरीराच्या अन्य भागात पसरू नये म्हणून केमोथेरपीचा उपचार केला जातो. केमोथेरपीचे शरीरावर अनेक दुष्परिणामही होतात; परंतु अत्याधुनिक केमोथेरपीमध्ये याचे प्रमाण कमी झाले आहे, असे तज्ज्ञ सांगतात. परंतु, आता केमोथेरपीचीच एक नवी पद्धत चर्चेत आहे आणि ती म्हणजे प्रिव्हेंटिव्ह केमोथेरपी.

ब्रिटनच्या राजकुमारी कर्करोगासाठी प्रिव्हेंटिव्ह केमोथेरपी उपचार घेत आहेत. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

ब्रिटनच्या राजकुमारी कर्करोगासाठी प्रिव्हेंटिव्ह केमोथेरपी उपचार घेत आहेत. ब्रिटनच्या शाही परिवारातील प्रिन्सेस ऑफ वेल्स केट मिडलटन यांनी जानेवारीमध्ये त्यांच्या ओटीपोटाच्या शस्त्रक्रियेदरम्यान कर्करोग आढळून आल्याचा खुलासा केला. नुकतेच त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडीओ संदेश शेअर केला; ज्यात त्यांनी कर्करोगाबद्दल सांगितले. या संदेशात त्यांनी प्रिव्हेंटिव्ह केमोथेरपीचादेखील उल्लेख केला. प्रिव्हेंटिव्ह केमोथेरपी म्हणजे काय? या थेरपीचा उपचार कधी केला जातो आणि तिचा परिणाम किती काळ टिकतो? याबद्दल तज्ज्ञ काय सांगतात, जाणून घेऊ या.

Mangal Gochar 2024
पुढील १२९ दिवस मंगळ करणार मालामाल; ‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार बक्कळ पैसा अन् प्रत्येक कामात यश
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Sonali Bendre was body shamed due to her long neck, people called her giraffe
“मला जिराफ म्हटलं जायचं”, सोनाली बेंद्रेवर एकेकाळी व्हायची टीका, बॉडिशेमिंगचा आरोग्यावर कसा होतो परिणाम, तज्ज्ञांनी केला खुलासा
pune Arogya sena
औषधांच्या किमती नियंत्रणात आणा, आरोग्य व्यवस्था सक्षम करा! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेनेकडून खुला जाहीरनामा
Radhika Deshpande
“सगळे दागिने विकले, पण मंगळसूत्र…”; अभिनेत्री राधिका देशपांडे काय म्हणाली?
Garlic Rate, Vegetable Rate, Pune, Garlic,
लसूण महागला, परराज्यातील लसणाची आवक कमी
Commodification of beauty
स्त्री ‘वि’श्व : सौंदर्याचं वस्तूकरण
Take SH 24 vaccine to protect against influenza Directives of Union Health Ministry
वाढत्या इन्फ्लूएन्झापासून बचावासाठी ‘एसएच २४’ लस घ्या! केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे निर्देश

प्रिव्हेंटिव्ह केमोथेरपी म्हणजे काय?

प्रिन्सेस ऑफ वेल्स यांनी आपल्या व्हिडीओ संदेशात सांगितले की, शस्त्रक्रियेपूर्वी त्यांना कर्करोग नव्हता. परंतु, शस्त्रक्रियेनंतर केलेल्या चाचण्यांमधून कर्करोग असल्याचे समोर आले. प्रिव्हेंटिव्ह केमोथेरपी उपचाराला एक सहायक थेरपी म्हणूनही ओळखले जाते. कर्करोग परत येण्याची आणि शरीरात पसरण्याची शक्यता कमी करण्यासाठी शस्त्रक्रियेनंतर प्रिव्हेंटिव्ह केमोथेरपीचा वापर केला जातो. वॉर्विक विद्यापीठातील मॉलेक्युलर ऑन्कोलॉजीचे प्राध्यापक लॉरेन्स यंग स्पष्ट करतात, “शस्त्रक्रियेद्वारे सर्व कर्करोगाच्या पेशी काढून टाकल्यानंतरही या रोगाच्या सूक्ष्म पेशी शरीरात लपून राहू शकतात. चाचण्यांद्वारे त्या शोधता येणं कठीण आहे.”

शस्त्रक्रियेद्वारे सर्व कर्करोगाच्या पेशी काढून टाकल्यानंतरही या रोगाच्या सूक्ष्म पेशी शरीरात लपून राहू शकतात. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

प्रिव्हेंटिव्ह केमोथेरपीचा उपचार कधी केला जातो?

कर्करोग विशेषज्ञ व सल्लागार ऑन्कॉलॉजिस्ट डॉ. करोल सिकोरा म्हणतात की, जेव्हा कर्करोग पुन्हा होण्याचा धोका जास्त असतो, तेव्हा हा उपचार घेतला जातो. ते स्पष्ट करतात, “कोणत्या रुग्णाला कोणता उपचार द्यावा याचा अंदाज लावण्यास डॉक्टर सक्षम आहेत. या केमोथेरपीचा खूप फायदा होतो,” असेही त्यांनी सांगितले. ‘स्काय न्यूज’चे विज्ञान वार्ताहर थॉमस मूर हे “डॉक्टर्स पेशींवर चाचण्या करतात आणि त्यातूनच कर्करोगाचे निदान होते,” असे या शस्त्रक्रियेच्या प्रक्रियेबद्दल सांगतात. “प्रिव्हेंटिव्ह केमोथेरपीबद्दल बोलायचे झाल्यास, शस्त्रक्रियेनंतरही शरीरात राहिलेल्या कर्करोगाच्या पेशी पसरू नयेत म्हणून या थेरपीचा वापर केला जातो,” असे त्यांनी सांगितले.

रेडिओथेरपी किंवा शस्त्रक्रियेनंतर कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी म्हणून करण्यात येणारा उपचार, असे ‘नॅशनल हेल्थ सर्व्हिस’ने या केमोथेरपीचे वर्णन केले आहे. क्वीन मेरी युनिव्हर्सिटी ऑफ लंडन अॅण्ड कन्सल्टंट ब्रेस्ट सर्जन, होमर्टन युनिव्हर्सिटी हॉस्पिटल येथील डॉ. मंगेश थोरात म्हणतात की, चाचण्या आणि स्कॅनिंगमध्ये कर्करोगाच्या सूक्ष्म पेशी शोधणे कठीण आहे. त्यामुळेच कर्करोग आहे हे कळल्यावर प्रिव्हेंटिव्ह केमोथेरपीचा उपचार केला जातो.

राजकुमारीच्या शस्त्रक्रियेनंतर कर्करोग असल्याचे आढळून आल्यावर केमो देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. “शस्त्रक्रिया कर्करोगावरील सुरुवातीच्या टप्प्यातील सर्वांत प्रभावी उपाय आहे. परंतु, कधी कधी कर्करोगाच्या काही पेशी त्यांच्या उत्पत्तीच्या ठिकाणाहून बाहेर पडतात आणि फुप्फुस किंवा यकृत यांसारख्या इतर अवयवांमध्ये शिरतात. सध्या उपलब्ध असलेल्या चाचण्या अशा सूक्ष्म पेशींचा शोध घेऊ शकत नाहीत. त्यामुळे शस्त्रक्रियेद्वारे कर्करोगाच्या पेशी पूर्णपणे काढून टाकल्यानंतरही काही पेशी शरीरात राहतात,” असे डॉक्टर सांगतात.

ते सांगतात, “या उपचारात कर्करोगाचा प्रकार लक्षात घेऊन, शरीराच्या सर्व अवयवांपर्यंत पोहोचू शकणाऱ्या औषधांचा वापर केला जातो. केमोथेरपी अशा प्रकारचा उपचार आहे; ज्यामध्ये विभाजित पेशींवर वेगानं कार्य करणारी औषधं वापरली जातात; जी या पेशींना नष्ट करतात.”

विशिष्ट वयोगटांवर याचा अधिक चांगला परिणाम होतो का?

बर्मिंगहॅम युनिव्हर्सिटीचे सल्लागार कोलोरेक्टल सर्जन अॅण्ड्र्यू बेग्स हे प्रिव्हेंटिव्ह केमोथेरपीचे वर्णन करताना सांगतात, “हा उपचार म्हणजे फरशीवर काहीतरी सांडल्यावर ब्लिचने पुसण्यासारखे आहे.” वयोमान आणि या केमोथेरपीचे परिणाम यांचा एकमेकांशी काहीही संबंध नाही. ज्यांची रोगप्रतिकारक क्षमता चांगली असते, त्यांना इम्युनोथेरपी नावाची केमोथेरपी दिली जाऊ शकते, असे ते सांगतात. ते म्हणतात की, तरुण केमोथेरपीचे जास्त डोस सहन करू शकतात. त्यामुळे उरलेल्या पेशीही नष्ट होण्याची शक्यता जास्त असते. केमोथेरपी उपचार कर्करोगाच्या प्रकारावर अवलंबून असून, तो साधारणपणे तीन ते १२ महिन्यांदरम्यान केला जातो.

तरुण केमोथेरपीचे जास्त डोस सहन करू शकतात. (छायाचित्र-इंडियन एक्सप्रेस)

प्रिव्हेंटिव्ह केमोथेरपीचा परिणाम किती काळ टिकतो?

हे कर्करोगाच्या प्रकार आणि टप्प्यावर अवलंबून असते. राजकुमारीने त्यांना कोणत्या प्रकारचा कर्करोग आहे, हे उघड केले नाही. प्रोफेसर लॉरेन्स म्हणतात, “केमोथेरपीची क्रमवारी आणि उपचाराचा कालावधी हा कर्करोगाच्या प्रकार आणि टप्प्यावर अवलंबून असतो.” प्रोफेसर लॉरेन्स सांगतात की, केमोथेरपीचे दुष्परिणाम औषधांच्या प्रकारावरदेखील अवलंबून असतात. परंतु, केमोथेरपीदरम्यान सामान्यतः थकवा, मळमळ, भूक न लागणे, अशी लक्षणे जाणवतात.

हेही वाचा : होळी पौर्णिमेपर्यंत तापमान ४० अंशावर जाणार? तापमानवाढीचा वेग दुप्पट, तज्ज्ञही झाले अवाक!

प्रिव्हेंटिव्ह केमोथेरपी कशी दिली जाते?

अमेरिकेतील कर्करोगाच्या प्रमुख डॉक्टर पॅट प्राइस यांनी ‘स्काय न्यूज’ला सांगितले, “शस्त्रक्रियेनेच कर्करोग काढून टाकला जातो. कधी कधी काही पेशी शरीरात राहून जातात; ज्यामुळे कर्करोग पुन्हा होण्याची शक्यता असते.” शस्त्रक्रियेनेनंतर डॉक्टर अनेकदा प्रिव्हेंटिव्ह केमोथेरपी देतात. त्यात सामान्यत: गोळ्या किंवा इंजेक्शनचा वापर होतो. ही केमोथेरपी बऱ्याचदा चार किंवा सहा महिन्यांच्या कालावधीसाठी दिली जाते. त्यांनी स्पष्ट केले की, केमोथेरपी एखाद्या व्यक्तीच्या शरीरातील कर्करोगाच्या पेशी आणि सामान्य ऊतक (टिश्यू) या दोन्हींना नष्ट करू शकते. त्यामुळे अस्थिमज्जा आणि आतड्यांसंबंधीच्या समस्या उदभवू शकतात आणि आजारी वाटणे किंवा रक्त कमी होणे यांसारखी लक्षणेही उदभवू शकतात.