केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीच्या कामाची (रिकार्पेटिंग) पाहणी केली. हे काम अतिशय संथ गतीने असल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. कामाला होणाऱ्या विलंबामुळे विमान संचालनाला फटका बसत असून यामुळे तिकीट दरात वाढ व विमान प्रवाशांची गैरसोयही होत आहे. त्यामुळे नागपूरचे खासदार म्हणून गडकरींनी धावपट्टीच्या कामावरून प्रशासन आणि कंत्राटदाराला धारेवर धरले.

धावपट्टीचे रिकार्पेटिंग म्हणजे काय?

विमानतळ धावपट्टीची दुरुस्ती एक नियमित होणारी प्रक्रिया आहे. विमानतळावरील रहदारीचे प्रमाण आणि विमानांच्या विविधतेनुसार काही ठराविक वर्षांनी धावपट्टीची देखभाल दुरुस्ती (रि-कार्पेट) आवश्यक असते. हे काम विमानतळाच्या व्यग्रतेवर अवलंबून असते. धावपट्टीवर उतरणाऱ्या विमानांची संख्या तसेच विमानांच्या आकारमानानुसार वेगवेगळ्या विमानांच्या धावपट्टी दुरुस्तीचा वेळ व कालावधी कमी अधिक असू शकतो. विमानांच्या सुरक्षिततेसाठी ही दुरुस्ती अत्यंत महत्त्वाची व आवश्यक मानली जाते.

brahmos missile loksatta news
प्रथम फिलिपिन्स, आता व्हिएतनाम, मग इंडोनेशिया… चीनच्या भयाने भारतीय ब्रह्मोस क्षेपणास्त्रांना आग्नेय आशियात वाढती मागणी?
IND vs AUS Usman Khawaja Reveals How He Stop Virat Kohli Sam Konstas Fight on Field Melbourne
IND vs AUS: “मी विराटला ओळखतो…,” कॉन्स्टास-कोहलीमध्ये मैदानात…
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली नाही’, डॉ. मनमोहन सिंग यांच्या स्मृतीस्थळाच्या मागणीवर प्रणव मुखर्जींच्या लेकीचा संताप
urmila kothare car accident video
अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारने दोन मजुरांना चिरडलं, एकाचा मृत्यू; घटनास्थळावरील व्हिडीओ आला समोर
suresh dhas prajakta mali on santosh deshmukh murder
Prajakta Mali: प्राजक्ता माळीचं नाव का घेतलं? सुरेश धस यांनी मांडली भूमिका; तक्रारीच्या मुद्द्यावर म्हणाले…
Former Prime Minister of India Manmohan Singh
अग्रलेख: मार्दवी मार्तंड!
women are saying no to sex after Trumps win
डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर अमेरिकेतील महिलांचा लैंगिक संबंधास नकार; कारण काय? काय आहे 4B चळवळ?
NCP Clock
NCP Clock Symbol : ऐन निवडणुकीत सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवारांना आदेश; पक्षचिन्हाबाबत दिला ३६ तासांचा अल्टिमेटम!

हेही वाचा : प्रथम फिलिपिन्स, आता व्हिएतनाम, मग इंडोनेशिया… चीनच्या भयाने भारतीय ब्रह्मोस क्षेपणास्त्रांना आग्नेय आशियात वाढती मागणी?

नागपूर विमानतळ रिकार्पेटिंगचे प्रकरण काय?

भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (एएआय) २०१३-१४ मध्ये नागपूर विमानतळाच्या धावपट्टीचे रिकार्पेटिंगचे काम केले होते. त्यानंतर डीजीसीएने एप्रिल २०२३ रोजी धावपट्टीची पाहणी केली आणि रिकार्पेटिंगचे काम हाती घेण्याची सूचना केली. ‘एएआय’ने १ एप्रिल २०२३ पासून काम सुरू करू, असे सांगितले. या कामासाठी विमानांचे वेळापत्रक बदलण्यात आले. पण, लालफीतशाहीचा अडसर निर्माण झाला. या कामाचे कार्यादेश विलंबाने म्हणजे कंत्राटदार कंपनी के. जी. गुप्ता यांना मे २०२४ रोजी दिले. त्यांना १२ महिन्यांत काम पूर्ण करायचे आहे.

कामाची सध्या स्थिती काय आहे?

कंत्राटदार कंपनीने काम सुरू केले आहे. पण गती अत्यंत संथ आहे. धावपट्टीच्या कार्पेटिंगचे काम तीन स्तरीय असते. पहिल्या स्तराचे ८० ते ९० टक्के काम झाले आहे. दुसऱ्या स्तरातील ३३२० मीटरपैकी ४०० मीटरचे काम झाले आहे. ते झाल्यानंतर तिसऱ्या स्तराचे काम सुरू होईल. हे सर्व काम झाल्यानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालकांकडे (डीजीसीए) मान्यतेसाठी अर्ज केला जाईल. विमानतळ प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार, रिकार्पेटिंगचे संपूर्ण काम मे २०२५ पर्यंत पूर्णत्वास येईल. यासाठी दररोज किमान ८ तास काम करावे लागले. सध्या इतका वेळ उपलब्ध आहे.

हेही वाचा : २६/११ दहशवादी हल्ल्याचा कट रचणाऱ्या दहशतवाद्याचा पाकिस्तानात मृत्यू; कोण होता अब्दुल रहमान मक्की?

विलंबाची कारणे काय?

कंत्राटदार आणि विमानतळ प्राधिकरण यांच्या हलगर्जीमुळे धावपट्टीच्या कामाला विलंब होत आहे. मे २०२४ मध्ये काम कंत्राटदार मेसर्स केजी गुप्ता यांना देण्यात आले होते, परंतु काम सुरू होण्यास उशीर झाला. मिहान इंडिया लि.ने भारतीय विमानतळ प्राधिकरणाला विलंबासाठी जबाबदार धरले आहे. एमआयएलच्या म्हणण्यानुसार, एएआयने अपेक्षेपेक्षा पाच महिने उशिरा मार्च २०२४ मध्ये कार्यादेश दिले. दरम्यान, या प्रकरणाची दखल उच्च न्यायालयाने घेतली आहे. उच्च न्यायालयात प्रशासनाने सादर केलेल्या शपथपत्रात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी खासगी विमान, हेलिकॉप्टरची वर्दळ कारणीभूत असल्याचे म्हटले आहे. ऑक्टोबर २०२४ मध्ये हे काम अधिकृतपणे सुरू झाले होते, परंतु निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ९ ऑक्टोबर ते २३ नोव्हेंबर दरम्यान हे काम स्थगित करण्यात आले होते.

गडकरी विमानतळ प्रशासनावर का संतापले?

भारतात विमानाचे वेळापत्रक वर्षातून दोन वेळा तयार केले जाते. साधारणत: ऑक्टोबर ते मार्च या कालावधीत हिवाळ्यासाठी आणि मार्च ते ऑक्टोबर या कालावधीत उन्हाळ्याचे वेळापत्रक निश्चित केले जाते. नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय दर्जा आहे. येथून दोहा आणि शारजाला विमानसेवा आहे. येथे इमरजन्सी लँडिंग मोठ्या प्रमाणात होते. याशिवाय राज्याची उपराजधानी असल्याने येथून दिल्ली, मुंबई, कोलकाता, बेंगळुरू, पुणे, हैदराबादसाठी विमानसेवा उपलब्ध आहे. मात्र, रिकार्पेटिंग करायचे असल्याचे सांगून हिवाळ्याचे वेळापत्रक बदलण्यात आले. विमान उड्डाण सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजतादरम्यान बंद ठेवण्यात आले. सकाळी दहानंतर वेळ उपलब्ध नसल्याने मर्यादित विमानसेवा सुरू आहे. प्रवाशांची संख्या वाढली तरी नवीन सेवा सुरू करता येत नाही. त्यामुळे विमानाचे तिकीट दुप्पट-तिप्पट झाले. प्रवाशांची लूट प्रशासनाच्या चुकीमुळे झाल्याचे सांगून गडकरी यांनी संताप व्यक्त केला. तसेच नागपूरकरांची माफीदेखील मागितली.

हेही वाचा : तिबेटमधील चीनच्या महाकाय धरणामुळे वाढली भारताची चिंता; कारण काय?

जे मुंबईला जमते ते नागपूर का नाही?

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ भारतातील तसेच दक्षिण आशियातील सर्वांत व्यग्र विमानतळ आहे. यास भारतीय उपखंडाचे प्रवेशद्वार म्हटले जाते. दिवसाला येथून ९०० पेक्षा अधिक विमानांचे उड्डाण होते. या विमानतळाच्या धावपट्टीचे रिकार्पेटिंगचे काम ९ डिसेंबर २०२२ ते १० जून २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात आले. इतक्या व्यग्र विमानतळाचे काम सहा महिन्यांत मुदतीच्या आत पूर्ण झाले. त्यासाठी विमानाचे संचालन दररोज १२ तास बंद ठेवण्यात आले होते. नागपूर विमातळावरून केवळ दोन आंतराराष्ट्रीय विमाने जातात. देशांतर्गत दररोज २४ आणि काही आठवड्यातून विशिष्ट दिवशी विमान सेवा आहेत. तशा अशा एकूण ५३ विमानसेवा आहेत. विमानतळाच्या सुरक्षित संचालनासाठी आवश्यक देखभाल दुरुस्तीला विलंब होत आहे. यास प्रशासनाचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे. त्याचप्रमाणे कामासाठी विमानतळ बंद असताना राज्यकर्त्यांकडून खासगी विमान आणि हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी दबाब आणणे हेदेखील तेवढेच कारणीभूत आहेत.

Story img Loader