तेलंगणा राज्यात ३० नोव्हेंबर रोजी विधानसभेसाठी मतदान पार पडेल. पाच पैकी चारही राज्यातील मतदान उरकल्यामुळे आता सर्वच पक्षातील नेत्यांनी तेलंगणामध्ये प्रचाराचा जोर वाढविला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही रविवारी (दि. २६ नोव्हेंबर) हैदराबाद येथे प्रचारसभा घेतली. यावेळी त्यांनी भाजपाच्या अजेंड्यावर असलेल्या जुन्या मागणीची पुन्हा री ओढली. तेलंगणात सत्ता आल्यानंतर हैदराबादचे नाव बदलून ‘भाग्यनगर’ आणि महबूबनगरचे नाव ‘पलामुरू’ असे केले जाईल, अशी घोषणा योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा केली. २०२० साली हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणूक प्रचारादरम्यान योगी आदित्यनाथ यांनी हीच घोषणा केली होती. मात्र महानगरपालिकेत भाजपाला सत्ता मिळविता आली नाही, पण निवडणुकीत जोरदार मुसंडी मारत भाजपा महानगरपालिकेतला दुसरा मोठा पक्ष ठरला. योगी आदित्यनाथ यांनी पुन्हा तेच कार्ड वापरल्यामुळे तेलंगणा निवडणुकीत भाजपाला किती लाभ होईल? हे ३ डिसेंबरच्या निकालातून कळेलच. मात्र हैदराबादचे नाव भाग्यनगर करण्यासाठी काही संदर्भ आहेत का? गेल्या काही वर्षांपासून भाजपा ही मागणी का करत आहे? या प्रश्नांचा घेतलेला हा आढवा ….

योगी आदित्यनाथ काय म्हणाले?

रविवारी महबूबनगर येथे प्रचारार्थ घेतलेल्या जाहीर सभेत बोलत असताना योगी आदित्यनाथ म्हणाले, “माफियाराजच्या विरोधात लोकांना जागृत करण्यासाठी आणि महबूबनगरला परामुरूच्या रुपात पुन्हा एकदा आणण्यासाठी मी येथे आलो आहे. जर तेलंगणात भाजपाची सत्ता आली तर हैदराबाद आणि महबूबनगर यांचे नाव बदलून भाग्यनगर आणि परामुरू असे ठेवण्यात येईल. २०१७ च्या आधी उत्तर प्रदेशमध्ये प्रत्येक दोन-तीन दिवसांतून एकदा दंगली उसळायच्या. माफिया समांतर सरकार चालवत होते. मात्र भाजपाच्या डबल इंजिनच्या सरकारने माफियाराजला संपवले. मागच्या अडीच वर्षात उत्तर प्रदेशमध्ये दंगली उसळलेल्या नाहीत.”

Siddheshwar Yatra Festival
Siddheshwar Yatra : सोलापुरात नंदीध्वजांच्या मिरवणुकीने सिद्धेश्वर यात्रेला प्रारंभ
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
स्वामी विवेकानंद यांनी पाश्चिमात्य देशांना हिंदू धर्माची ओळख कशी करून दिली? (फोटो सौजन्य इंडियन एक्स्प्रेस)
स्वामी विवेकानंद यांनी पाश्चिमात्य देशांना हिंदू तत्वज्ञानाची ओळख कशी करून दिली?
tulja bhavani shakambhari navratrotsav loksatta news
शाकंभरी नवरात्र महोत्सव : सहाव्या माळेला महिषासूरमर्दिनी अलंकार महापूजा
chandrapur tirupati balaji loksatta news
बालाजी मंदिरात सशस्त्र दरोडा, पुजाऱ्याला बंदुकीचा धाक दाखवून…
This is nation of Hindus their interests come first says Nitesh Rane
हे हिंदूंचे राष्ट्र, त्यांचे हित प्रथम – नितेश राणे
Suvarnadurga Fort marathi news
दापोली येथील सुवर्णदुर्ग किल्ल्याला मिळणार ‘वर्ल्ड हेरीटेज’चा दर्जा; जिल्हा प्रशासनाकडून पाहणी
bmc has decided to completely ban POP idols during Maghi Ganeshotsav
‘पीओपी’वरून पुन्हा घोळ आयत्या वेळच्या घोषणेमुळे माघी गणेशोत्सवात मूर्तिकार, मंडळांसमोर फेरनियोजनाचे आव्हान

हे वाचा >> तुमची पिढी संपेल पण हैदराबादचं नाव भाग्यनगर होणार नाही; ओवेसींचा हल्लाबोल

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनीही शुक्रवारी (दि. २४ नोव्हेंबर) तेलंगणात घेतलेल्या जाहीर सभेत सांगितले की, जर भाजपाची सत्ता आली तर ३० मिनिटांत हैदराबादचे नाव बदलले जाईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडूनही भाग्यनगरचा उल्लेख

जुलै २०२२ मध्ये भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक बैदराबाद येथे पार पडली. या बैठकीनंतर भाजपाचे नेते रविशंकर प्रसाद यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात तेलंगणाची राजधानी हैदराबादला भाग्यनगर असे संबोधले. “हैदराबाद हे भाग्यनगर असून आपल्या सर्वांसाठीच हे खूप महत्त्वाचे आहे”, असे पंतप्रधान मोदी म्हणाले असल्याचे रविशंकर प्रसाद यांनी सांगितले होते.

डिसेंबर २०२० साली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने दौरा केला असताना भाग्यलक्ष्मी मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते. भाजपाच्या नेत्यांनी प्रचारात भाग्यनगरचा उल्लेख केल्यामुळे अमित शाह यांच्याकडून ही प्रतिकात्मक कृती करण्यात आल्याचे बोलले गेले.

भाग्यलक्ष्मी मंदिर कुठे आहे?

भाग्यलक्ष्म मंदिरामुळे हैदराबादचे नाव भाग्यनगर असावे, असा एक तर्क मांडला जातो. देवी लक्ष्मीची पूजाअर्चा होत असल्यामुळे या मंदिराला भाग्यलक्ष्मी मंदिर म्हटले जाते. हैदराबादमधील प्रसिद्ध चारमिनारला लागूनच आग्नेय दिशेला भाग्यलक्ष्मी मंदिर स्थित आहे. जुन्या हैदराबाद शहरातील अगदी मोक्याच्या ठिकाणी हे मंदिर असून ते १९ व्या शतकात बांधले गेले असल्याचे काही लोक सांगतात. चारमिनारची आग्नेय दिशेकडील भिंतीला लागून बांबूचे खांब आणि ताडपत्री टाकून मंदिर उभारलेले आहे. त्यावर छोटेसे छप्पर असून आत लक्ष्मीची मूर्ती आहे.

मंदिर किती जुने आहे?

भाग्यलक्ष्मी मंदिर केव्हा आणि कसे उभारले गेले, याचा निश्चित इतिहास नाही, मात्र १९६० च्या दशकात मंदिर स्थापन झाल्याचे सांगितले जाते. आज मंदिरात असलेली लक्ष्मीची मूर्ती त्याचवेळी स्थापन केली गेली. चारमिनारचे (Charminar) बांधकाम १५९१ मध्ये सुरू करण्यात आले. मुहम्मद कुली कुतुब शाह (Muhammad Quli Qutb Shah) यांनी आपल्या राज्यातून प्लेगचा नायनाट व्हावा, या प्रार्थनेसाठी या मशिदीची स्थापना केली होती. तर सिकंदराबादचे खासदार जी. किशन रेड्डी यांच्यामते मशिदीचे बांधकाम करण्याच्या आधीपासून याठिकाणी मंदिर होते.

भारतीय पुरातत्व विभागाकडे चारमिनारच्या देखभालीची जबाबदारी आहे. विभागातील अधिकाऱ्यांनी द इंडियन एक्सप्रेसला काही वर्षांपूर्वी दिलेल्या माहितीनुसार सदर मंदिरामुळे मशिदीच्या आवारात अतिक्रमण केलेले आहे. पुरातत्व विभागातील अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, वाहनाच्या धडकेपासून मशिदीचे संरक्षण करण्यासाठी छोटेशे खांब उभारण्यात आलेले होते. १९६० दशकात कधीतरी यापैकी एका खांबाला भगव्या रंगात रंगवल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर काही लोकांनी तिथे आरती करण्यास सुरुवात केली. कालांतराने राज्य मार्ग परिवहनाची बस या संरक्षक खांबाला आदळल्यामुळे त्याचे नुकसान झाले. त्यानंतर एका रात्री बांबूपासून बनविलेले छोटेसे बांधकाम करून त्याखाली देवीची मूर्ती ठेवण्यात आली.

हे ही वाचा >> आणखी एका शहराचं नामांतरण?; हैदराबाद नाही भाग्यानगर… RSS चं ‘ते’ ट्विट ठरतंय चर्चेत, जानेवारीत BJP सोबत बैठक

काँग्रेस नेते आणि तेलंगणा विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते मोहम्मद शब्बीर अली यांनी द इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, बांबूचे बांधकाम केल्यानंतर प्रत्येक वर्षी उत्सावादरम्यान मंदिराचा परिसर एक-दोन फुटांनी वाढत गेला. २०१३ साली उच्च न्यायालयाने हा विस्तार थांबविण्याचे आदेश पोलिसांना दिले, तोपर्यंत मंदिराचा विस्तार होत होता.

मंदिराला कोण भेट देतात?

चारमिनार परिसरातील हिंदू व्यापारी, व्यावसायिक या मंदिराला रोज भेट देतात. उत्सवाच्या काळात आणि विशेषकरून दिवाळी दरम्यान मंदिरात दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या मोठ मोठ्या रांगा लागतात. भाग्यलक्ष्मी मंदिरात उत्सव काळात पूजा केल्याने भाग्य प्राप्त होते, अशी येथील भाविकांची श्रद्धा आहे. दुसरीकडे हिंदू राजकीय संघटना भाग्यलक्ष्मीचा संबंध भाग्यनगरशी जोडतात आणि हैदराबाद शहर पूर्वी भाग्यनगर या नावाने ओळखले जायचे, असा दावा करतात. मात्र कुतुबशहांनी त्यांची राजधानी गोलकोंडा येथून हलविल्यानंतर या शहराचे नाव बदलले, असा आरोप हिंदू संघटनाच्या वतीने करण्यात येतो.

मंदिराभोवती राजकीय वाद कधी निर्माण झाला?

जुने हैदराबाद हे सांप्रदायिकदृष्ट्या संवेदनशील शहर मानले जाते. १९७० च्या दशकापासून मंदिराशी निगडित या परिसरात धार्मिक तणाव आणि हिंसाचाराचे प्रकार घडले आहेत. नोव्हेंबर १९७९ मध्ये, सौदी अरेबियातील मक्का मशीदीवर कट्टरतावाद्यांनी हक्क सांगितल्यानंतर एआयएमआयएम (AIMIM) या पक्षाने जुन्या हैदराबाद शहरात बंदची हाक दिली. दिवाळीचा महिना असल्यामुळे अनेक हिंदू दुकानदारांनी त्यांचे दुकान खुले ठेवण्याचा निर्णय घेतला आणि तसे एआयएमआयएम पक्षाला कळवले. यावरून हैदराबाद शहरात बराच वाद झाला आणि परिणामस्वरुप भाग्यलक्ष्मी मंदिरावर हल्ला करून त्याची मोडतोड करण्यात आली.

काही वर्षांनंतर सप्टेंबर १९८३ मध्ये, गणेशोत्सवाच्या काळात मंदिर परिसरात फलक लावल्यामुळे पुन्हा एकदा तणावाची परिस्थिती निर्माण झाली. जमावाच्या हल्ल्यात मंदिर आणि शहरातील ऑलविन मशिदीचे नुकसान झाले.

नोव्हेंबर २०१२ रोजी, मंदिर व्यवस्थापनाने बांबूच्या जागी पत्र्याचे शेड उभारण्याचा निर्णय घेतल्यामुळे तणाव निर्माण झाला. प्रकरण आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात गेले. उच्च न्यायालयाने मंदिराच्या जागी आणखी काही बांधकाम किंवा विस्तार करण्यास निर्बंध घातले.

भाजपाची मंदिराच्या राजकारणात उडी आणि नाव बदलण्याचा प्रस्ताव

२०२० साली हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीआधी भाजपाने पहिल्यांदा मंदिर आणि हैदराबादच्या नामकरणाच्या प्रश्नाला हात घातला. महानगरपालिकेच्या प्रचारासाठी येथे आलेल्या भाजपाच्या काही नेत्यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि त्यानंतर हैदराबादचे नामकरण भाग्यनगर करण्याची घोषणा केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीदेखील २०२० साली मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यामुळे त्यांचाही नाव बदलण्याच्या मागणीला पाठिंबा आहे, असा प्रश्न उपस्थित केला गेला. त्यावेळी स्पष्टीकरण देताना अमित शाह म्हणाले की, मी फक्त मंदिरात दर्शन घेण्यासाठी गेलो होतो. त्यामुळे या भेटीचा वेगळा अर्थ काढू नये.

त्याच्या पुढच्या वर्षी पूर आल्यामुळे मदतीचे वाटप करण्याच्या मुद्द्यावरून तेलंगणामध्ये राजकीय वाद निर्माण झाला होता. तेलंगणा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बंदी संजय कुमार यांनी तेलंगणा राष्ट्र समितीच्या (आता पक्षाचे नाव भारत राष्ट्र समिती) नेत्यांना आव्हान देताना सांगितले की, त्यांनी देवी भाग्यलक्ष्मीची शपथ घेऊन सत्य सांगावे. सत्ताधारी टीआरएसला आव्हान दिल्यानंतर बंदी संजय कुमार यांनी भाग्यलक्ष्मी मंदिराला भेट देऊन दर्शनही घेतले. तसेच भाग्यलक्ष्मी देवीची शपथ घेऊन त्यांची बाजू खरी असल्याचेही ते म्हणाले.

हैदराबाद महागनरपालिकेच्या निवडणुकीनंतर ‘भाग्यनगर’चा विषय अधूनमधून सार्वजनिक मंचावरून उपस्थित झालेला आहे. हैदराबादमध्ये २०२२ साली झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर या विषयाला देशभरात प्रसिद्धी मिळाली.

Story img Loader