अमोल परांजपे

अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये तेथील काँग्रेससाठी झालेल्या मध्यावधी निवडणुकांमध्ये भारतीयांच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वाची गोष्ट घडली. ‘हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटीव्ह्ज’ या तेथील कनिष्ठ सभागृहात भारतीय वंशाच्या सदस्यांची संख्या आतापर्यंतची सर्वाधिक, पाच झाली. श्री ठाणेदार यांच्या विजयानंतर अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहातील ‘सामोसा कॉकस’ चर्चेत आले आहे.

US elections are held on the first Tuesday in November
विश्लेषण : अमेरिकेत मतदानासाठी केवळ ‘नोव्हेंबरचा पहिला मंगळवार’ हाच दिवस का? कारण व्यावहारिक की धार्मिक?
24th October 2024 Horoscopes In Marathi
24 October Horoscope : गुरुपुष्यामृत योग कोणत्या राशींसाठी…
Vikas Yadav
Vikash Yadav: पन्नूनच्या हत्येच्या कटात भारत सरकारच्या कर्मचाऱ्याचा सहभाग- अमेरिकेचा आरोप; दिल्लीत यादवला अटक का करण्यात आली होती?
US blames former Indian officer for trying to kill Khalistanist leader Pannu
भारताच्या माजी अधिकाऱ्यावर आरोपपत्र; खलिस्तानवादी नेता पन्नू याच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा अमेरिकेचा ठपका
gurpatwant singh pannun
गुरपतवंत सिंग पन्नूच्या हत्येचा कट रचल्याचे प्रकरण : अमेरिकेच्या आरोपपत्रातील ‘तो’ आरोपी आता सरकारचा कर्मचारी नाही, भारताचे स्पष्टीकरण!
The University of Oxford announced its new chancellor candidates on Wednesday
‘ऑक्सफर्ड’च्या प्रमुखपदाच्या शर्यतीत तीन भारतीय,अंतिम ३८ जणांची घोषणा; इम्रान खान यांचे नाव वगळले
rupay card launch in maldives
भारताच्या ‘RuPay’ कार्डची सेवा आता मालदीवमध्येही; इतर कोणकोणत्या देशांत चालतं रुपे कार्ड? त्याचा फायदा काय?
mohhammad mizzu meet india
भारतविरोधी भूमिका घेणारे मालदीवचे राष्ट्राध्यक्ष भारत दौर्‍यावर; या दौर्‍यामागील त्यांचा उद्देश काय?

प्रतिनिधीगृहातील ‘कॉकस’ म्हणजे काय?

सोप्या भाषेत सांगायचे, तर सेनेट किंवा हाऊसमध्ये निवडून आलेल्या समविचारी किंवा समान वंश, वर्ण इत्यादी असलेल्या प्रतिनिधींचा गट. अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये ही अत्यंत प्रचलित पद्धत आहे. हे ‘कॉकस’ अनेकदा अनऔपचारिक स्वरूपाचे असतात. एखाद्या समान मुद्द्यावर पक्षभेद विसरून सदस्य एकत्र येतात आणि सरकार-प्रशासनाकडे त्या मुद्द्याचा पाठपुरावा करतात. काँग्रेसमध्ये असे शेकडो लहान-मोठे ‘कॉकस’ आहेत आणि त्यांचा कमी-अधिक प्रमाणात प्रशासनावर दबावही असतो.

काँग्रेसमधील प्रभावी असलेले ‘कॉकस’ कोणते?

‘ब्लॅक किंवा आफ्रिकन अमेरिकन कॉकस’ आणि ‘हिस्पॅनिक कॉकस’ या दोन गटांचे अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये सर्वाधिक वजन आहे. यातील पहिला कृष्णवर्णीय प्रतिनिधींचा गट आहे, हे नावावरून लक्षात आले असेल. दुसरा गट आहे स्पॅनिश ही मातृभाषा असलेल्या प्रतिनिधींचा. यातील बहुतांश प्रतिनिधी हे मेक्सिकोमधून आलेले निर्वासित आहेत. याखेरीज अमेरिकन मूळनिवासी नागरिक (रेड इंडियन्स) यांचाही वेगळा गट आहे. शिवाय समलैंगिकांचे हक्क, शिक्षणव्यवस्थेतील बदल, आरोग्ययंत्रणा सुधारण्यासाठी इत्यादी विषयांवरील ‘कॉकस’ प्रभावी आहेत.

विश्लेषण: भारतावर सात वेळा हल्ले करणारा मक्की आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित; चीननंही पाठिशी घातलेला मक्की आहे तरी कोण?

‘सामोसा कॉकस’ म्हणजे नेमके काय?

सामोसा हा भारतातील लोकप्रिय पदार्थ आणि त्यामुळेच भारतीय वंशाच्या प्रतिनिधींच्या गटाला ‘सामोसा कॉकस’ असे संबोधले जाते. हे अर्थातच अधिकृत नाव नाही. इलिनॉय येथून ‘हाऊस’वर निवडून गेलेले डेमोक्रॅटिक सदस्य राजा कृष्णमूर्ती यांनी भारतीय लोकप्रतिनिधींच्या गटाला हे नाव दिले आहे. अमेरिकेतील भारतीय वंशाच्या नागरिकांना येणाऱ्या अडचणी, त्यांचे प्रश्न या गटाने एकत्र मांडावेत, अशी साधारण संकल्पना आहे. सध्याच्या ‘हाऊस’मधील सामोसा कॉकस हे सर्वात मोठे आहे.

सध्याच्या सामोसा कॉकसमधील लोकप्रतिनिधी कोण?

२०२० साली अध्यक्षीय निवडणुकीबरोबर झालेल्या ‘हाऊस’ निवडणुकीत भारतीय वंशाचे चार सदस्य निवडून गेले होते. कृष्णमूर्ती यांच्यासह प्रमिला जयपाल (वॉशिंग्टन), रोहित (रो) खन्ना (कॅलिफोर्निया), ॲमी बेरा (कॅलिफोर्निया) हे चौघे सामोसा कॉकसचे सदस्य होते. नोव्हेंबर २०२२मध्ये झालेल्या निवडणुकीत हे चौघेही पुन्हा निवडून आले आणि मिशिगनमधून श्री ठाणेदार यांचाही विजय झाल्यामुळे आता प्रथमच भारतीय वंशाचे पाच सदस्य ‘हाऊस’मध्ये आहेत. विशेष म्हणजे हे सर्वजण डेमोक्रेटिक पक्षाचे सदस्य आहेत. यापैकी ठाणेदार यांचा कर्नाटकात, जयपाल यांचा चेन्नईमध्ये आणि कृष्णमूर्ती यांचा दिल्लीत जन्म झाला. अन्य दोघे जन्माने अमेरिकन आहेत.

विश्लेषण : पोखरामध्ये विमान दुर्घटनेत ६८ जणांचा मृत्यू; का आहे नेपाळला अशा भीषण दुर्घटनांचा इतिहास?

श्री ठाणेदार कोण आहेत?

कर्नाटकातील चिकोडी येथे मराठी कुटुंबात श्री यांचा जन्म झाला. त्यांचे बालपण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत गेले. वडिलांची नोकरी गेल्यानंतर बेळगावमध्ये लहानमोठी कामे करून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. रसायनशास्त्रातून पदवी घेतल्यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेतले. १९७९ साली ते पीएचडी करण्यासाठी अमेरिकेत गेले आणि त्यानंतर त्यांनी तिथेच आधी नोकरी आणि नंतर स्वत:चा व्यवसाय सुरू केला. २०१८मध्ये त्यांनी सर्वप्रथम आपले राजकीय नशीब आजमावले. मिशिगन राज्याच्या गव्हर्नरपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठी ते प्राथमिक फेरीत (प्रायमरीज) उतरले. सुरुवातीला ते आघाडीवरही होते. मात्र, अखेरच्या टप्प्यांत मागे पडले आणि तिसऱ्या स्थानी राहिले. त्यानंतर दोनच वर्षांनी मिशिगनच्या हाऊसमध्ये (राज्याचे प्रतिनिधिगृह) ते निवडून आले. लगेचच दोन वर्षांनी झालेल्या मध्यावधी निवडणुकीत मिशिगनच्या १३व्या जिल्ह्यातून देशाच्या हाऊसमध्ये निवडून आले.

ठाणेदार यांच्या विजयाने काय फरक पडला?

मध्यावधीला हाऊस आणि सेनेटच्या निवडणुकीत मिळून जवळजवळ १०० भारतीय वंशाचे उमेदवार रिंगणात होते. त्यातील वर उल्लेख केलेले पाच उमेदवार हाऊसमध्ये निवडून आले आहेत. हाऊसमध्ये असलेल्या ‘सामोसा कॉकस’चा हा सर्वात मोठा आकार आहे. ठाणेदार यांचे स्वागत करताना कॉकसमधील अन्य चार उमेदवारांनी आगामी काळात हा आकार आणखी वाढावा, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. अमेरिकेत मोठ्या संख्येने असलेल्या भारतीय वंशाच्या नागरिकांच्या अडचणी आणि त्यांचे प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडण्यासाठी हे अधिक गरजेचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

‘सामोसा कॉकस’चा भारताला फायदा किती?

अर्थात हे सर्वजण अमेरिकेचे नागरिक आहेत आणि त्या देशाचे हित पाहणे हे राजकारणी म्हणून त्यांचे प्रथम कर्तव्य आहे. त्यामुळे या सामोसा कॉकसचा आकार आणखी मोठा झाला, तरी अमेरिकेची भारताविषयी धोरणे बदलण्यासाठी त्याचा फारसा परिणाम होण्याची शक्यता कमी आहे. असे असले तरी अमेरिकेत स्थायिक झालेल्या किंवा एच१बी१ व्हिसावर तिथे गेलेल्या भारतीयांचे प्रश्न मात्र अधिक वेगाने मांडले आणि सोडविले जाऊ शकतात. शिवाय अमेरिकेच्या प्रतिनिधीगृहात एक गट आधीपासून अस्तित्वात आहे, जो अमेरिका-भारताचे संबंध अधिक दृढ व्हावेत, यासाठी काम करतो आहे.

विश्लेषण : Exoplanets म्हणजे नेमकं काय? James Webb telescope ने शोधलेल्या पहिल्या exoplanets चे महत्व काय?

‘सेनेट इंडिया कॉकस’ अधिक प्रभावी आहे का?

आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या दृष्टीने विचार केला, तर सामोसा कॉकसपेक्षा भारताला अधिक मदत होते ती ‘सेनेट इंडिया कॉकस’ची. अर्थात, याचा हाऊसशी काही संबंध नाही. भारताबरोबर अधिक चांगले संबंध प्रस्थापित व्हावेत, व्यापार अधिक वाढावा, परस्पर सहकार्याने दोन्ही देशांचे हित जपले जावे, यासाठी हा गट काम करतो. २००४ साली रिपब्लिकन सेनेटर जॉन कॉर्निन आणि डेमोक्रॅटिक सेनेटर हिलरी क्लिंटन यांनी एकत्र येऊन हा पक्षनिरपेक्ष गट स्थापन केला. एखाद्या देशाशी संबंध सुधारण्याबाबत दबावगट म्हणून निर्माण झालेले हे पहिले सेनेट कॉकस होते. सध्या कॉर्निन आणि सेनेटर मार्क वॉर्नर (डेमोक्रॅट) हे या कॉकसचे संयुक्त अध्यक्ष आहेत.