आपण नेहमीच परीकथा, पौराणिक कथा यांच्या माध्यमातून देव, पऱ्या स्वर्गात राहतात अशा कल्पना ऐकलेल्या असतात. किंबहुना कित्येक चित्रपटातून ढगांच्या वर वास्तव्यास असणाऱ्या चांगल्या- वाईट जगाची संकल्पना रंगवलेली असते. या जगातील अनेक दूत पृथ्वीतलावर आपल्या आवडत्या माणसाच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी येतात. भारतीय पौराणिक विश्वातील अप्सरा, यक्ष, गंधर्व या ढगापलीकडच्या विश्वात गायन, वादन करत असतात. त्यांच्या या ध्वनीचे सूर पृथ्वी तालस्वर ऐकू येतात, अशी कल्पना कथांमध्ये केली जाते. इतकेच नाही तर भारतीय पौराणिक कथांमध्ये आकाशवाणी ही संकल्पना आवर्जून येते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आकाशकंपने
या कथा असल्या तरी काही जण अमुक एका ठिकाणी ढगातून येणारा ढोल- ताशांचा आवाज ऐकला, असं सांगतात, आपल्यातील काही यावर चमत्कार म्हणून विश्वास ठेवतात, तर काही जण दुर्लक्ष करतात. पण तुम्हाला असं सांगितलं ‘हो’, आकाशातून ढगांच्या गडगटांशिवाय इतरही आवाज ऐकू येतात, तर तुमचा या गोष्टीवर विश्वास बसले का?, परंतु हे सत्य आहे. एखाद्या काल्पनिक कथेत काहीही घडत असले तरी, आकाशातून हे येणारे आवाज नैसर्गिक सत्य मानले जातात. निसर्गात होणाऱ्या या घटनेचे वर्णन ‘स्कायक्वेक’ म्हणजेच आकाशात होणारे भूकंप असे करण्यात येते. या आकाशकंपनांचे मूळ हे रहस्यमय असल्याने ही कंपने ‘मिस्ट्री बूम’ म्हणूनही ओळखली जातात. आकाशकंप ही एक अशी घटना आहे जिथे आकाशातून मोठा आवाज येत असल्याचे सांगितले जाते. या आवाजामुळे इमारतीमध्ये किंवा विशिष्ट क्षेत्रामध्ये लक्षणीय कंपने होऊ शकते. ज्यांना आकाशकंपांचा अनुभव येतो त्यांच्याकडे ते कशामुळे घडते याचे स्पष्टीकरण नसते त्यामुळेच हे कंपन रहस्यमय मानले जाते.
अधिक वाचा : इस्रायल- अमेरिका संबंधांचा लोलक मैत्रीच्या दिशेने कसा सरकला?
स्कायक्वेक्स म्हणजे भूकंपच
संशोधकांच्या मते आकाशकंप हे भूकंपांसारखेच असतात पण ते जमिनीच्या, समुद्राच्या खाली न होता आकाशात होतात. एखाद्या तोफगोळ्याचा किंवा सोनिक बूमचा आवाज ज्या प्रकारे असतो, तसाच आवाज या आकाश कंपनात होतो. ज्या संशोधकांनी हा आवाज ऐकला आहे, त्यांनी या आवाजाचे वर्णन करताना ‘आवाज प्रचंड मोठा’ असल्याचे नमूद केलेले आहे, अनेकदा या आवाजामुळे घरांच्या खिडक्या, दरवाजे खडखडाट करतात, असेही अनुभव नमूद करण्यात आलेले आहेत. अभ्यासकांच्या मतानुसार ज्या वेळेस सोनिक बूम होतो, त्यावेळेस अशा स्वरूपाचा आवाज होणे अपेक्षित आहे. परंतु आकाशकंपनासाठी अशा स्वरूपाचे कोणतेही कारण आढळून येत नाही. संशोधकांनी या नैसर्गिक घटनेसाठी अनेक अनुमाने प्रस्तुत केली आहेत, तरीही या विचित्र आणि असामान्य घटनेसाठी अद्याप कोणतेही निश्चित कारण सांगितले गेलेले नाही.
आवाजाची नोंद
आकाशातून येणाऱ्या आवाजाची नोंद जगात अनेक ठिकाणी करण्यात आलेली आहे. त्यात चीन, अमेरिके मधील फिंगर लेक्स, कॅनडातील फंडीचा उपसागर, जपानचा उत्तर समुद्र आणि बेल्जियम, ऑस्ट्रेलिया, इटली, आयर्लंड आणि स्कॉटलंडमधील काही ठिकाणे, भारतातील उत्तर प्रदेश, गंगेचा किनारा, हिमाचल प्रदेशातील मरवड़ी/मराड़ी गाव, हंसवार इत्यादी प्रदेशांचा प्रामुख्याने समावेश आहे. बांगलादेशामध्ये या आकाशकंपांना ‘बारिसाल गन’ म्हणून ओळखले जाते, या नावात बरिसाल नावाच्या पूर्व बंगालच्या प्रदेशाचा संदर्भ आहे. इटालियन लोकांमध्ये आकाशकंपांसाठी वेगवेगळी नावे आहेत ज्यात ‘ब्रोंटिडी’, ‘लागोनी’, ‘बाल्झा’ इत्यादि नावांचा समावेश होतो. ‘उमिमारी’ हे नाव जपानमधील आकाशकंपांचे वर्णन करण्यासाठी वापरले जाते. नेदरलँड आणि बेल्जियमच्या भागात आकाशकंपांना ‘मिस्टपॉफर’ असे संबोधले जाते. अमेरिकेमध्ये या आकाशकंपांना ‘सेनेका गन’ आणि ‘मूडस नॉइसेस’ म्हणतात.
आकाशकंपाची संभाव्य जनमानसातील कारणे?
या आकाश कंपनांची कारणमीमांसा करताना अनेक गोष्टी पडताळून पाहण्यात आल्या आहेत. अभ्यासकांच्या मते काही वेळा, विमानातून निघणारे सॉनिक बूम काही विशिष्ट ठिकाणी होणाऱ्या काही आकाशकंपांचे कारण असू शकतात. परंतु, हे स्पष्टीकरण कोणत्याही प्रकारच्या सुपरसॉनिक उड्डाणाच्या शोधापूर्वीच्या घटनांसाठी पुरेसे नाही, यासारख्या घटना फार आधीपासून नमूद करण्यात आलेल्या आहेत. उत्तर अमेरिकेत स्थानिक समजुतींनुसार हे आवाज ‘ग्रेट स्पिरिट’द्वारे सतत निर्माण केले जातात. काही लोकांच्या मते, या ध्वनी प्रभावांसह विचित्र हवामान आणि चमकणारे आकाश हे अनोळखी फ्लाइंग ऑब्जेक्ट्स किंवा UFOs मुळे होते.
अधिक वाचा : नुकत्याच जन्माला आलेल्या ‘इस्रायल’चे महत्त्व सुएझ कालव्याने कसे सिद्ध केले?
शास्त्रज्ञांनी दिलेली संभाव्य स्पष्टीकरणे
शास्त्रज्ञांच्या मते, आधुनिक काळातील काही आकाशकंप लष्करी विमान किंवा उल्कामुळे होणाऱ्या ध्वनिकंपांमुळे झालेले असण्याची शक्यता आहे. याशिवाय जमिनीवर ज्वालामुखीचा उद्रेक आणि भूकंप यामुळे दूर अंतरावरून ऐकू येणारे वेगवेगळे आवाज निर्माण होवू शकतात. यासंदर्भात अनेक अहवाल उपलब्ध आहेत, ज्यात आकाशात ऐकू येणाऱ्या ध्वनीसाठी जमिनीवरील भूकंपाला कारणीभूत म्हणून नमूद करण्यात आलेले आहे. २००१ साली स्पोकेन वॉशिंग्टनमध्ये आणि १८११ साली न्यू माद्रिद आणि मिसूरी येथे झालेल्या भूकंपांमध्ये लांबवर आकाशात तोफखान्याच्या गोळ्यांसारखे काही आवाज येत होते, असे अहवालांमध्ये नमूद करण्यात आलेले आहे. याशिवाय लांबवर होणाऱ्या विजांच्या कडकडाटांमुळे देखील आकाशकंप होत असण्याची शक्यता शास्त्रज्ञांकडून नोंदविण्यात आलेली आहे.
निरभ्र आकाशीय विजेमुळे देखील काही आकाशकंप होतात, अशा स्वरूपाचे भूकंप काही पर्वतीय प्रदेशांजवळ, तलाव किंवा मैदानासारख्या मोठ्या मोकळ्या जागा असलेल्या भागात घडतात. काही आकाशकंप कोरोनल मास इजेक्शनमुळे निर्माण झाले असण्याची शक्यता वर्तवण्यात येते. याशिवाय पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र ध्वनी प्रभाव निर्माण करते. आकाश कंपनाच्या बहुतांश घटना किनारी भागांजवळ नोंदवण्यात आलेल्या आहेत. काही स्पष्टीकरणे आकाशकंप आणि परिसरात उपस्थित असलेल्या पाण्याची पातळी यांच्यातील संबंधांवर लक्ष केंद्रित करतात. आणखी एका सिद्धांतानुसार अटलांटिकमध्ये महाद्वीपीय शेल्फ खाली पडल्यामुळे आवाज निर्माण होऊ शकतो अशी शक्यता नोंदविण्यात आली आहे. या सगळ्या शक्यता असल्या तरी शास्त्रज्ञांचा अनुमानानुसार आकाशातील हे उफाळणारे आवाज औद्योगिक आपत्ती, ग्लोबल वार्मिंग, टेक्टोनिक प्लेट शिफ्टिंग, ओझोन थर कमी होणे इत्यादींशी संबंधित आहेत हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा नाही.
२०१३ आणि २०१५ या कालखंडादरम्यान शास्त्रज्ञांनी नॉर्थ कॅरोलिना मधील भूकंपाची क्रिया मोजण्यासाठी ४०० वायुमंडलीय सेन्सर आणि सिस्मोग्राफचे मोबाइल नेटवर्क अर्थस्कोप ट्रान्सपोर्टेबल अॅरे वापरला होता. यातून मिळालेल्या माहितीची गूढ आवाज किंवा तत्सम घटनांचा उल्लेख करणाऱ्या स्थानिक बातम्यांच्या लेखांमध्ये नोंदणी केलेल्या डेटाशी तुलना केली गेली. २०२० सालच्या अमेरिकन जिओफिजिकल युनियनच्या (AGU) वार्षिक बैठकीत अभ्यासाचे परिणाम सादर करण्यात आले. “स्थानिक बातम्या तसेच लेखांमधून सेनेका गनच्या उदाहरणांचे कॅटलॉग करून वास्तविक भूकंप-ध्वनी डेटासह त्यांची पडताळणी करण्याचा प्रयत्न करायचा होता,” असे संशोधक एली बर्ड यांनी नमूद केले होते. एली बर्ड हे कॅरोलिना विद्यापीठातील पदवीधर असून भूगर्भशास्त्राचे अभ्यासक आहेत .
अधिक वाचा : ‘सेक्सटॉर्शन’ म्हणजे नेमके काय? यापासून स्वत:ला कसे वाचवाल?
या प्रयोगात कॅरोलिना बीच, NC मधील केप फिअर जवळ, दोन सेन्सरने काही असामान्य सिग्नल रेकॉर्ड केले, ज्यांची लांबी सुमारे १ सेकंद ते सुमारे १० सेकंदांपर्यंत बदलली. या प्रयोगात शास्त्रज्ञांनी जमीन हादरल्याची नोंद केली, परंतु यासाठी जमिनीखाली भूकंप आल्याची कोणतीही नोंद नाही, यामुळेच आकाशकंप यासाठी कारणीभूत असू शकतो अशी शक्यता या संशोधकांकडून नोंदविण्यात आलेली आहे. आमचा विश्वास आहे की ही एक वातावरणीय घटना आहे. जमिनीवरील भूकंपाशी याचा संबंध नाही, या आवाजांसाठी एकच एक असे कारणही नाही, असे निरीक्षण त्यांच्याकडून नोंदविण्यात आले.
आकाशातील इतर विचित्र आवाज
आकाश कंपनांचा ध्वनी हा केवळ एकमेव अक्षय होणारा आवाज नसून असे अनेक आवाज आहेत, त्या आवाजांची व्यापकपणे नोंद संशोधकांनी आजवर केली आहे. परंतु त्याचे अद्याप कोणतेही विशिष्ट कारण समजलेले नाही. आकाशकंप आपल्या ग्रहावर घडणार्या पाच प्रमुख वायू आणि वातावरणीय घटनांमध्ये गणले जातात परंतु त्याची कारणे अज्ञातच आहेत.