दक्षिण कोरियाच्या सरकारने गुरुवारी (८ नोव्हेंबर) एक महत्त्वाचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार, वय मोजण्याची दक्षिण कोरियातील पारंपारिक पद्धतीत बदल करण्यात येणार आहे. त्याऐवजी आता आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वीकारण्यात आलेल्या पद्धतीचा अवलंब केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर दक्षिण कोरियातील वय मोजण्याची जुनी पद्धत काय आहे? ही पद्धत का बंद करण्यात आली? वय मोजण्याची नवी पद्धत काय असणार? ही पद्धत स्वीकारण्याचं कारण काय? या सर्व गोष्टींचा हा खास आढावा…

दक्षिण कोरियात वापरल्या जाणाऱ्या पारंपारिक वय मोजण्याच्या पद्धतीमुळे ‘बायोलॉजिकल’ वयात जवळपास दोन वर्षांपर्यंत वाढ होत होती. त्यामुळेच दक्षिण कोरियातील सत्ताधारी ‘पीपल्स पॉवर पार्टी’चे प्रमुख यू सांग बूम म्हणाले, “पारंपारिक पद्धतीमुळे वयावरून अनेक कायदेशीर आणि सामाजिक वाद निर्माण होत आहेत. त्यामुळे सामाजिक आणि आर्थिक परिणाम होत आहे. हा परिणाम कमी करण्यासाठी पारंपारिक पद्धतीचा फेरविचार केला जात आहे.”

article about upsc exam preparation guidance
यूपीएससीची तयारी : CSAT ची तयारी
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Beed Sarpanch Murder Case Prime Accused Valmik Karad Cast
अग्रलेख : कूच बिहार!
Unlocking the Secrets of Adolescence from 30,000-Year-Old Skeletons
३०,००० वर्षांपूर्वीच्या सांगाड्यांमधून किशोरावस्थेचे उलगडले रहस्य; काय सांगते नवीन संशोधन?
Correlation between geological events and their time
कुतूहल : भूवैज्ञानिक कालमापन
Olympics to visit India How is the 2036 Games being planned Why are more than one city preferred 
ऑलिम्पिकचे भारतभ्रमण? २०३६ च्या स्पर्धेचे नियोजन कसे? एकापेक्षा अधिक शहरांना का पसंती?
Loksatta editorial Copernicus Climate Change Service Report
अग्रलेख: विक्रमी आणि वेताळ
Technical progress , Visual pollution, thinking attitude,
क्षण आणि मनविध्वंसाच्या टोकावर

दक्षिण कोरियात वय मोजण्याची पारंपारिक पद्धत हटवून नव्या आंतरराष्ट्रीय वय मोजण्याच्या पद्धतीची अंमलबजावणी जून २०२३ पासून होणार आहे.

कोरियात पारंपारिक पद्धतीनुसार वय कसं मोजलं जायचं?

कोरियात सध्या वज मोजण्याच्या तीन पद्धती वापरल्या जातात. एक पद्धत जगभरात वापरली जाते तीच आहे. यानुसार बाळाच्या जन्माच्यावेळी त्याचं वय शुन्य असतं आणि त्यानंतर जन्मदिनागणिक त्याच्या वयात एक-एक वर्ष वाढत जातं. मात्र, ही पद्धत दक्षिण कोरियात केवळ ठराविक कायदेशीर आणि प्रशासकीय कामांमध्येच वापरली जाते.

दुसरी वय मोजण्याच्या पद्धतीला ‘कोरियन वय’ म्हणतात. या पद्धतीत बाळाचा जन्म होतो तेव्हा त्याचं वय एक वर्ष मानलं जातं. यानंतर प्रत्येक १ जानेवारीला त्याच्या वयात एका वर्षाची वाढ होते. यात बाळाच्या जन्मदिनांकाचा काहीही संबंध नसतो. बाळ कधीही जन्मलेलं असलं तरी प्रत्येक १ जानेवारीला त्याचं वय एक वर्षाने वाढतं. उदा. एखाद्या बाळाचा जन्म ३१ डिसेंबर २०२१ रोजी झाला तर जन्मानंतर लगेच त्याचं वय एक मानलं जाईल. त्यानंतर लगेच दोन दिवसांनी म्हणजे २ जानेवारी २०२२ रोजी हे बाळ दोन वर्षांचं होईल.

कोरियातील वय मोजण्याच्या तिसऱ्या पद्धतीत बाळाच्या जन्मानंतर त्याचं वय शून्य असतं. तसेच प्रत्येक वर्षाच्या १ जानेवारीला त्याच्या वयात एका वर्षाची भर पडते. ही पद्धतही कायदेशीर आणि प्रशासकीय कामांमध्ये वापरली जाते. या पद्धतीचा वापर कोरियात बंधनकारक सैन्य सेवेसाठी, शाळा कधी सुरू करायची आणि मुलांना कायदेशीर संरक्षण कधी द्यायचे हे सर्व या प्रकारच्या वय पद्धतीने ठरवलं जातं.

कोरियात वेगळ्या पद्धतीने वय का मोजलं जातं?

दक्षिण कोरियात वय मोजण्यासाठी ज्या पारंपारिक पद्धतींचा वापर होतो, तशाच काहिशा पद्धती चीन, जपान, व्हिएतनाम इत्यादी देशांमध्येही आढळतात. असं असलं तर हळूहळू सर्व देश वय मोजण्याच्या आंतरराष्ट्रीय पद्धतीकडे वळले. दक्षिण कोरियानेही १९८५ मध्ये वय मोजण्याची आंतरराष्ट्रीय पद्धत स्वीकारली. मात्र, याशिवाय दक्षिण कोरियात त्यांचं स्वतःचं वेगळं कॅलेंडरही वापरलं जातं. हे कॅलेंडर कोरियाचे संस्थापक अध्यक्ष किम ई सूंग यांच्या जन्मावर आधारित आहे.

दक्षिण कोरियात आता वय मोजण्याच्या पद्धतीत बदल का?

दक्षिण कोरियात सत्ता बदल झाल्यानंतर नव्या राष्ट्राध्यक्षांनी निवडणुकीत दिलेल्या आश्वासनानुसार वय मोजण्याच्या पद्धतीत बदल करण्याचं धोरणं स्वीकारलं. वय मोजण्याच्या वेगवेगळ्या पद्धतींमुळे नागरिकांच्या वयात अंतर पडत आहे. त्यामुळे प्रशासकीय कामात आणि आर्थिक-सामाजिक पातळीवर याचे परिणाम होत आहेत. नवी पद्धत स्वीकारल्यास वयाच्या अंतराचा गोंधळ संपेल, अशी भूमिका सत्ताधारी पक्षाने मांडली आहे.

हेही वाचा : “दोघांनी छेडलं आणि दोघांनी वाचवलं”, मुंबईत विनयभंग झालेल्या कोरियन तरुणीने घेतली ‘Indian Heroes’ची भेट

विशेष म्हणजे याआधी झालेल्या सर्वेक्षणानुसार, दक्षिण कोरियात ७० ते ८० टक्के लोकांना वय मोजण्याची आंतरराष्ट्रीय पद्धत हवी आहे. दुसरीकडे काही लोक पारंपारिक वय मोजण्याची पद्धत कोरियाच्या संस्कृतीचा भाग असल्याचं सांगतात. तसेच पारंपारिक पद्धतीत वाढणाऱ्या एक किंवा दोन वर्षांच्या वाढीचं स्वागतही करतात.

Story img Loader