शनिवारी संध्याकाळपासून X म्हणजेच Twitter या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक विचित्र गोष्ट ट्रेंड सुरू आहे. जर तुम्ही X वापरत असाल तर तुम्हालासुद्धा हे लक्षात आले असेल. खरं तर शनिवारी संध्याकाळपासून X वर अशा हजारो पोस्टचा महापूर आला आहे, ज्यामध्ये एका पांढऱ्या पेजवर ठळक काळ्या रंगात ‘Click Here’ असे लिहिले आहे. या मजकुराबरोबर डाव्या बाजूला तळाशी बाणाचे चिन्ह असून, ‘Alt’ लिहिलेले आहे. कोणीही alt वर क्लिक केल्यानंतर एक मेसेज पाहायला मिळतो आहे. परंतु जर तुम्ही Alt वर क्लिक केले नाही तर तुम्हाला फक्त चित्र दिसेल, पण त्यात लपलेला मेसेज पाहता येणार नाही. Click Here ट्रेंड सुरू झाल्यापासून केवळ सामान्य लोकच नव्हे तर मोठे राजकीय पक्ष, स्पोर्ट्स क्लब, फुटबॉल संघ आणि चित्रपट कलाकारही यात भाग घेताना पाहायला मिळत आहेत. भाजपा, काँग्रेस, आप, युरोपियन फुटबॉल क्लब बार्सिलोना आणि पॅरिस सेंट जर्मेन (PSG) यांनीसुद्धा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वर “Click Here” ट्रेंडला सुरुवात केली आहे. गेल्या वर्षी या ट्रेंडने पहिल्यांदा जागतिक लक्ष वेधून घेतले होते, परंतु आता तो ट्रेंड पुन्हा एकदा सुरू झालाय.
Alt text काय आहे?
खरं तर हे एक टेक्स्ट फीचर असून, फार पूर्वीच सुरू करण्यात आले आहे. याच्या मदतीनं एखादी व्यक्ती फोटो शेअर करताना त्याबद्दल विशिष्ट मजकूर लिहू शकते. ऑल्ट टेक्स्ट फीचर म्हणून फोटोवर एक हजार अक्षरांपर्यंतचा मेसेज लिहिता येऊ शकतो. X वर या फीचरच्या मदतीने मजकूर अधिक लोकांपर्यंत पोहोचवता येतो. खरं तर ज्या लोकांपर्यंत हा मेसेज पोहोचत नाही, त्यांच्यासाठी हे फीचर फायदेशीर ठरणार आहे. ज्या भागात इंटरनेट स्पीड कमी आहे, अशा भागातील लोकांसाठीही ऑल्ट टेक्स्ट फीचर उपयोगी ठरणार आहे. भाजपानेही “Click Here” द्वारे पक्षाचे लोकसभा निवडणुकीचे घोषवाक्य हिंदीत पोस्ट करत लिहिले आहे. “फिर एक बार मोदी सरकार” (पुन्हा एकदा मोदी सरकार). X मधील अनेक खात्यांनी “Click Here” चा विनोद तयार करण्यासाठी वापर केला आहे, तर ब्रँड आणि संस्थांनी त्यांची टॅगलाइन अन् घोषणांचा प्रसार करण्यासाठी ते साधन म्हणून वापरले आहे. कोणताही वापरकर्ता त्यांच्या फोटोंबरोबर ALT बॉक्स ठेवू शकतो आणि त्यांना हवा तो मजकूर त्याबरोबर जोडू शकतो.
हेही वाचाः हवेतच विमानाचा दरवाजा निखळला; बोइंग मॅक्स कंपनीची विमानं का होतात दुर्घटनाग्रस्त?
Alt text कसा वापरायचा?
विशेष म्हणजे हे फीचर फोटोंमध्ये वापरले जाऊ शकते, परंतु हे फीचर व्हिडीओसह उपलब्ध नाही. तुम्ही X वर पोस्ट करण्यासाठी फोटो अपलोड करताच तुम्हाला फोटोवर +ALT देखील दिसेल. +ALT वर क्लिक करून तुम्ही कोणताही मेसेज लिहू शकता आणि सेव्ह करू शकता. असे केल्याने तुम्ही लिहिलेला मेसेज त्या फोटोमध्ये जोडला जाणार आहे. फोटो पोस्ट केल्यानंतर Alt वर क्लिक केल्यासच हा मेसेज पाहायला मिळणार आहे. मोबाइल तसेच लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर ही सुविधा वापरता येते. तुम्ही तुमच्या फोटोंमध्येच माहिती देऊ शकता, ज्याला बऱ्याचदा alt text म्हटले जाते. alt text हे एका महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानासह कार्य करते, जे दृष्टिदोष असलेल्या व्यक्तींसाठी फायदेशीर ठरते. उदाहरणार्थ, सॅमसंग फोनच्या सेटिंग्जमध्ये गेल्यानंतर ॲक्सेसिबिलिटी विभागात जाऊन Talk Back पर्याय दिसतो. वापरकर्ता व्हॉइस कमांडद्वारे त्यांचा फोन नियंत्रित करू शकतो किंवा स्क्रीनवर काय लिहिले आहे ते समजू शकतो. सॅमसंगने परवानगी दिल्याप्रमाणे तुम्ही ॲक्सेसिबिलिटीमध्ये जाऊन तो पर्याय निवडू शकता. स्क्रीन रीडरद्वारे दृष्टिदोष असलेली व्यक्ती फोटोबरोबर असलेला Alt text काय आहे हे समजून घेण्यासाठी वाचू शकतो. सोशल मीडियावर कुठेही पोस्ट केलेल्या ऑनलाइन फोटोंमध्ये Alt text लिहिलेले वाक्य Google ला त्या वेबपेजचा वापर करून समजून घेण्यास मदत होते. खरं तर हे वेबसाइटसाठी सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन (SEO) सुधारते, त्यामुळे योग्य कीवर्ड वापरल्यास आपला मजकूर गुगलवर लवकर ट्रेंड होण्याचीही शक्यता आहे.
राजकीय पक्षांचे ‘Click here’
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीला २० दिवसांपेक्षा कमी दिवस शिल्लक आहेत, त्यामुळे देशातील राजकीय पक्षांनीही आपापल्या पद्धतीने Click here ट्रेंडचा फायदा घेण्यास सुरुवात केली आहे. पक्षांच्या अधिकृत X हँडलवरून Click hereची छायाचित्रे पोस्ट करण्यात आली होती, ज्यामध्ये छुपे मेसेज होते. Click hereचा फोटो पोस्ट करताना भाजपाने ऑल्ट टेक्स्टमध्ये लिहिले की, “पुन्हा एकदा मोदी सरकार.” Click here फोटो शेअर करताना आम आदमी पार्टीने ऑल्ट टेक्स्टमध्ये लिहिले की, “देश वाचवण्यासाठी ३१ मार्चला रामलीला मैदानावर या.” तसेच शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी Click here म्हणजे काय आहे, असा सवाल केला. आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा यांनीही फोटो पोस्ट केले आहेत, ज्याचा Alt text मजकूर असा आहे की, “केवळ मोदीच येतील.” तर इंडिया विथ काँग्रेस नावाच्या X हँडलने Click here फोटोसह एक लांबलचक मजकूर पोस्ट केला आहे.
Click here ट्रेंडवर टीका कशासाठी?
२०२३ च्या BBC लेखात मॅकडोनाल्ड्स आणि रेड बुल यांसारख्या प्रमुख ब्रँड्सने Click here शेअर केले होते, तेव्हा ट्रेंडच्या विरोधात टीकेची झोड उठली होती. या फोटोतील मजकुराकडे विनोद म्हणून पाहिले जात आहे, त्यामुळे दृष्टिदोष असलेल्या लोकांसाठी गोंधळ आणखी वाढण्याची शक्यता आहे. तुमची सोशल मीडिया टीम अंध लोकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करते आणि ॲल्ट टेक्स्टचा अशा प्रकारे गैरवापर करीत असल्याचे खरोखरच निराश झालो असल्याचंही स्कॉट-गार्डनर यांनीही बीबीसीला सांगितले होते. द न्यू यॉर्क टाइम्समधील २०२२ च्या लेखात असे म्हटले आहे की, “वेब ऍक्सेसिबिलिटीवर लक्ष केंद्रित करणाऱ्या उटाह स्टेट युनिव्हर्सिटीशी संलग्न असलेल्या WebAIM द्वारे एक दशलक्ष मेनपेजवरील लोकांचा मजकूर गहाळ झालाय. फेब्रुवारी २०२१ पर्यंत ६०.६ टक्के लोकांमध्ये वैकल्पिक मजकूर गहाळ झाल्याची उदाहरणे आहेत. कार्नेगी मेलॉनच्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, २०१९ मध्ये फोटोसह १.०९ दशलक्ष ट्विटच्या मजकुरापैकी केवळ ०.१ टक्के ऑल्ट मजकूर समाविष्ट आहे.