उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील लुलू मॉल सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. लुलू मॉलचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्वतः केले आहे. योगी यांचे मॉलचे मालक युसूफ अलीसोबतचे फोटोही खूप व्हायरल होत आहेत. मॉलवर कधी जिहादी गटाशी संबंध असल्याचा तसेच जिहादला प्रोत्साहन दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. लुलू मॉलमध्ये ७-८ लोक नमाज अदा करत असल्याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. या व्हिडिओ वरुन चांगलाच वाद निर्माण झाला आहे.

मॉलमध्ये धार्मिक कार्यक्रमांना परवानगी देत असल्याचा आरोप

Shah Rukh Khan Rejected Karan Arjun
‘या’ कारणामुळे शाहरुख खानने ‘करण अर्जुन’ करायला दिला होता नकार, आमिर खानची लागली होती वर्णी, पण…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
mita shetty
टाटा इंडिया इनोव्हेशन फंडाची कामगिरी कशी राहील?
Mumbai airport international travelers
Mumbai Airport International Passengers: मुंबई विमानतळावरून १२ लाख प्रवाशांची आंतरराष्ट्रीय वारी
goa cm pramod sawant
Pramod Sawant: महायुती की महाविकास आघाडीच्या काळात उद्योग महाराष्ट्राबाहेर? मुख्यमंत्र्यांचे मोठे विधान
Mumbai metro marathi news
मेट्रो कनेक्ट ३ ॲप ॲन्ड्रॉईड फोनवर अपडेट करू नका, एमएमआरसीचे प्रवाशांना आवाहन, तांत्रिक अडचणींमुळे अपडेट केल्यानंतर ॲप होते बंद
slum MIDC
एमआयडीसीलाही झोपड्यांच्या जागा, ‘क्लस्टर’साठी साडेबारा टक्के योजनेचा प्रस्ताव

सध्या प्रत्येक सोशल मीडियावर लुलू मॉलवरून चांगलीच चर्चा रंगल्याची दिसून येत आहे. कोणत्याही मॉलमध्ये कोणत्याही प्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांना परवानगी कशी काय देता, असा प्रश्न लोकांकडून विचारण्यात येत आहे. मात्र, आम्ही कोणत्याही धार्मिक कार्यक्रमाला चालना दिली जात नसल्याचे मॉल प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचा- विश्लेषण : माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्यावरील टिकेसाठी कारणीभूत ठरलेले नुसरत मिर्झा कोण आहेत?

मॉलकडून अधिकृत निवेदन

लुलू मॉलने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, ‘लुलू मॉल सर्व धर्मांचा आदर करतो. आम्हाला येथे कोणत्याही प्रकारचा धार्मिक मेळावा किंवा प्रार्थना करण्याची परवानगी नाही. आम्ही आमच्या मजल्यावरील कर्मचारी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांना अशा घटना घडू नयेत, अशा सूचना दिल्या आहेत. आम्हाला हा मॉल जागतिक दर्जाचा बनवायचा आहे. हे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे ही विनंती.

लुलूचा अर्थ काय?
युसुफ अली यांनी २००० साली आखाती देशांमध्ये लुलू हायपरमार्केट ग्रुपची स्थापना केली. अली यांनी तयार केलेल्या सगळ्या मॉलला लुलू नाव देण्यात आले आहे. अरबी भाषेत लुलुच्या नावाचा अर्थ मोती असा होतो.

हेही वाचा- विश्लेषण : रुपयातून आंतरराष्ट्रीय व्यवहाराची रिझर्व्ह बँकेची यंत्रणा नेमकी काय?

वादामागचे खरे कारण काय?
लुलू मॉल वादात येण्याचे एकमेव कारण व्हायरल व्हिडिओ नसून मॉल प्रशासनावर मुस्लिमांनाच नोकऱ्या दिल्याचा आरोपही होत आहे. उजव्या विचारसरणीच्या संघटना आणि अखिल भारतीय हिंदू महासभेच्या काही सदस्यांनी लुलू मॉलच्या गेटवर धरणे आंदोलन केले होते. लुलू मॉलमधील ७० टक्के पुरुष कर्मचारी मुस्लिम आहेत आणि ३० टक्के महिला कर्मचारी हिंदू समुदायातील आहेत. असे करून लुलू मॉलचे व्यवस्थापन लव्ह जिहादला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप शिशिर चतुर्वेदी आणि संघटनेच्या इतर लोकांनी केला आहे.