अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुसऱ्यांदा अध्यक्ष बनल्यानंतर स्थलांतरितांबाबत काही दूरगामी निर्णय घेतले आहेत. याचा फटका मोठ्या प्रमाणात अशा स्थलांतरितांना बसेल, जे ‘ग्रीन कार्ड’च्या प्रतीक्षेत आहेत. हे कोणत्या ना कोणत्या स्वरूपाच्या तात्पुरत्या व्हिसाच्या आधारावर तेथे राहात आहेत. पण सातत्याने तेथे राहून ग्रीन कार्ड म्हणजेच अमेरिकेत कायमस्वरूपी राहण्याची परवानगी मिळवण्याच्या प्रतीक्षेत आहेत. यानिमित्ताने ग्रीन कार्ड, नागरिकत्व आणि व्हिसा निवास यांचा धांडोळा…

ग्रीन कार्ड म्हणजे काय?

ग्रीन कार्ड म्हणजे अमेरिकेत कायमस्वरूपी राहण्याचा निवासी परवाना. हे मूळचे अमेरिकी नसतात. त्यामुळे जन्मसिद्ध नागरिकत्व (बर्थराइट सिटिझनशिप) किंवा स्वाभावीकृत नागरिकत्व (नॅचरलायझेशन सिटिझनशिप) यांपैकी कोणत्याही प्रकारात मोडत नाहीत. ग्रीन कार्ड धारक किंवा इच्छुक हे नेहमीच अमेरिकेमध्ये कोणत्या ना कोणत्या तात्पुरत्या व्हिसावर गेलेले असतात. साधारण ९० दिवस ते दहा वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ हे अमेरिकेत राहिलेले असतात. ग्रीन कार्ड कधी मिळेल, याविषयी काही निकष नसतात. सध्या हजारो इच्छुक अमेरिकेत ग्रीन कार्डच्या वर्षानुवर्षे प्रतीक्षेत आहेत. नोकरीच्या निमित्ताने तेथे गेलेले, विद्यार्थी म्हणून गेल्यानंतर तेथे नोकरी लागलेले असंख्य भारतीय ग्रीन कार्डच्या प्रतीक्षेत आहेत. पण अमेरिकी नागरिक असलेल्या कुणा व्यक्तीशी विवाह झाल्यास ग्रीन कार्ड अधिक तत्परतेने मिळते. याशिवाय अमेरिकेच्या विविधता प्रोत्साहन व्हिसा उपक्रमाअंतर्गत ग्रीन कार्ड लॉटरी काढली जाते. हादेखील व्हिसा मिळवण्याचा एक मार्ग आहे.

Waqf Board Bill JPC meeting
Waqf Board Bill: संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीत राडा; अरविंद सावंत, असदुद्दीन ओवेसींसह १० खासदार निलंबित
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
FIITJEE centres shut in several cities
‘FIIT-JEE’ची शिकवणी केंद्रे अचानक बंद; हजारो विद्यार्थ्यांवर परिणाम अन् पालकांचे लाखोंचे नुकसान, प्रकरण काय?
c section deliveries rising in us
ट्रम्प यांच्या ‘त्या’ निर्णयामुळे भारतीय महिला वेळेपूर्वीच करताहेत सिझेरियन प्रसूती; नेमकं प्रकरण काय?
Gopal Shetty on Devendra Fadnavis
Gopal Shetty: अर्ज मागे घेण्यासाठी ईडीची चौकशी लागणार? गोपाळ शेट्टी यांनी देवेंद्र फडणवीसांबद्दल म्हटले…
Amul Milk Price
Amul Milk Price : अमूलचा ग्राहकांना मोठा दिलासा, दूध दरात केली कपात; जाणून घ्या नवे दर
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले त्या मधुरिमा राजे कोण आहेत?
maharashtra assembly election 2024
काँग्रेस अखेर शंभरीपार, अर्जमाघारीनंतर सर्वच पक्षांची अंतिम आकडेवारी आली समोर; वाचा काय आहे नेमकं समीकरण!

अमेरिकी नागरिकत्व म्हणजे काय?

अमेरिकेबाहेरील जवळपास कोणत्याही व्यक्तीला अमेरिकी नागरिकत्व मिळवण्यासाठी ग्रीन कार्ड प्राप्त करावे लागते. कारण यासाठी प्रदीर्घ काळ अमेरिकेत वास्तव्य गरजेचे असते. जन्मसिद्ध, स्वाभावीकृत, सैन्यदलांत सेवा अशा अनेक मार्गांनी नागरिकत्व मिळते. यात अमेरिकेत जन्माला आलेल्यांना आपोआप नागरिकत्व मिळण्याचा मुद्दा सध्या गाजतो आहे. अमेरिकेबाहेर जन्म झाला पण पालक अमेरिकेचे नागरिक असतील, तरीदेखील नागरिकत्व प्राप्त होते. स्वाभाविकीकरणाचे काही निकष असतात. याअंतर्गत, ग्रीन कार्ड धारकांनी मोजक्या सैन्यदल विभागांमध्ये सेवा दिल्यास, ग्रीन कार्ड धारकाचा विवाह अमेरिकी नागरिकाशी झाल्यास, ग्रीन कार्ड मिळाल्यानंतर ३ ते ५ वर्षे अमेरिकेत राहिल्यानंतर आणि अमेरिकी इंग्रजी व तेथील शासनव्यवस्थेविषयी जुजबी माहिती प्राप्त केल्यानंतर नागरिकत्व बहाल होऊ शकते. हे करण्याआधी अर्थातच इच्छुकाने अमेरिकेप्रति निष्ठा जाहीर करणे गरजेचे असते.

ग्रीन कार्ड आणि नागरिकत्वामध्ये फरक…

ग्रीन कार्डधारक आणि अमेरिकी नागरिकांच्या अधिकारांमध्ये मूलभूत फरक आहेत. ग्रीन कार्ड धारकांना अमेरिकेत कायमस्वरूपी राहण्याचा हक्क असतो. पण स्थानिक, प्रांतिक वा राष्ट्रीय अशा कोणत्याही निवडणुकीत ते मतदान करू शकत नाहीत. त्यामुळे अर्थातच त्यांना निवडणूकही लढवता येत नाही. प्रशासनाच्या काही विभागांमध्ये सेवा देण्यापासूनही ग्रीन कार्ड धारक प्रतिबंधित असतात. मात्र मोजक्या सैन्यदल विभागांमध्ये त्यांना सेवा बजावता येते.

ग्रीन कार्ड धारकाने एखादा गंभीर गुन्हा केल्यास त्याच्या मूळ देशात त्याला परत पाठवले जाऊ शकते. हा धोका अर्थातच नागरिकांना नसतो.

ग्रीन कार्डधारक असताना अमेरिकेबाहेर किती वर्षे आणि किती वेळा जावे यावर मर्यादा येतात. सातत्याने अमेरिकेबाहेर राहिलेल्यांचा ग्रीन कार्ड धारक दर्जा रद्द होऊ शकतो. विशेषतः अशा व्यक्तीस नागरिकत्व हवे असेल तर याबाबतचे नियम कडक असतात. हे बंधन अमेरिकी नागरिकत्व प्राप्त झालेल्यांवर नसते.

अमेरिकी सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ – उदा. मेडिकेअर, मेडिकेड – ग्रीन कार्ड धारकांना मिळत नाही.

किती भारतीय ग्रीन कार्डच्या प्रतीक्षेत?

जवळपास १० लाख कौशल्यधारक, उच्चशिक्षित भारतीय ग्रीन कार्डच्या प्रतीक्षेत असल्याचे अमेरिकेच्या नागरिकत्व व स्थलांतर विभागाच्या अहवालात आढळून येते. भारतीयांसाठी प्रतीक्षेचा काळ चिनी इच्छुकांपेक्षा अधिक आहे. कारण भारतीया इच्छुकांची संख्या अधिक आहे आणि त्या तुलनेत भारताच्या वाट्याला असलेला कोटा मर्यादित आहे. ईबी-वन, ईबी-टू आणि ईबी-थ्री अशा तीन विभागांमध्ये ग्रीन कार्ड धारकांची विभागणी होती. पहिल्या विभागात अत्युच्च कौशल्याधारित, दुसऱ्या विभागात प्राधान्याने शिक्षण आणि संशोधन क्षेत्रातील आणि तिसऱ्या विभागात बहुराष्ट्री कंपन्यांमध्ये कार्यरत असलेले तंत्रज्ञ अशी सर्वसाधारण विभागणी आहे. भारतीयांना जवळपास दहा वर्षेदेखील ग्रीन कार्डची प्रतीक्षा असते. या काळात त्यांची कुटुंबे तात्पुरत्या व्हिसावर सोबत असतात. तशात बर्थराइट सिटिझनशिप रद्द होणार असल्यामुळे, ग्रीन कार्डच्या प्रतीक्षेत किती काळ राहायचे असा प्रश्न यांच्यासमोर उपस्थित होतो.

Story img Loader