चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हे पाच दिवसांच्या युरोप दौऱ्यावर आहेत. फ्रान्स दौऱ्यानंतर जिनपिंग सर्बिया आणि हंगेरीला पोहोचले, जे चीनसाठी महत्त्वाचे असलेले युरोपातील दोन छोटे देश आहेत. आठ वर्षांपूर्वी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी सर्बियाला पहिली भेट दिली होती. या भेटीचे सकारात्मक परिणाम दिसून आले, त्यानंतर सर्बिया मध्य आणि पूर्व युरोप (CEE)मध्ये चीनचा पहिला व्यापक धोरणात्मक सहयोगी झाला. चीन आणि सर्बिया यांच्यातील संबंध गेल्या आठ वर्षांत झपाट्याने दृढ झाले आहेत. व्यापारातील अडथळे आणि कथित चिनी हेरगिरीवरून चीन आणि काही युरोपीय देशांमधील तणाव वाढला आहे. चीनचे युरोपियन युनियन (EU) बरोबरचे व्यापारी प्रश्न प्रामुख्याने स्वस्त चिनी इलेक्ट्रिक वाहनांच्या (EVs) निर्यातीवरील घर्षणामुळे आणि युरोपीय कंपन्यांना चीनमधील बाजारपेठेतील प्रवेश मर्यादित झाल्यामुळे उद्भवतात. गेल्या महिन्यात युरोपमध्ये बीजिंगसाठी हेरगिरी केल्याबद्दल सहा लोकांवर आरोप ठेवण्यात आले होते आणि डिसेंबर २०२३ मध्ये इटली चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हमधून बाहेर पडला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा