कोण होता हिटलर?
अनेकजण २० एप्रिल हा दिवस जगाच्या इतिहासातील काळा दिवस मानतात. जगाच्या इतिहासात हुकूमशहा म्हणून नोंद झालेल्या ॲडॉल्फ हिटलर याचा २० एप्रिल १८८९ हा जन्मदिवस. बव्हेरियाच्या सरहद्दीवरील ‘ब्रानाऊ अम इन’ या गावी सायंकाळी साडे सहा वाजता ‘ॲलॉइस’ व ‘क्लारा’ या दाम्पत्याच्या पोटी अॅडॉल्फचा जन्म झाला. ॲलॉइस (हिटलरचे वडील) हे कस्टम अधिकारी होते. हिटलर हे आडनाव ‘हाईडलेर’ या नावाचा अपभ्रंश आहे असे काही अभ्यासक मानतात. ॲलॉइसचे वडील जॉर्न जॉर्ज म्हणजेच ॲडॉल्फचे आजोबा हे ‘हाईडलेर’असे नाव लावीत होते. ॲलॉइस हे आपल्या चुलत्याकडे म्हणजेच योहान नेपोमक हीडलर याच्याकडे लहानाचे मोठे झाले. हिटलरचा हा चुलता ‘हुएटलर’असे नाव लावीत होता त्याचमुळे ॲलॉइस हे देखील हेच नाव नंतर वापरू लागले. नंतर काळाच्या ओघात हुएटलर या नावाचा अपभ्रंश होऊन हिटलर नावात ते रुपांतरीत झाले. ॲलॉइस हिटलर म्हणजेच ॲडॉल्फचे वडील यांचे तीन विवाह झाले होते. त्यांना पहिल्या पत्नीपासून संतान प्राप्ती न झाल्याने त्यांनी तिला त्यांनी घटस्फोट दिला आणि दुसरा विवाह केला. ॲलॉइस यांना दुसऱ्या पत्नीपासून दोन मुले होती. परंतु त्यांची दुसरी पत्नी क्षय रोगामुळे मरण पावली. म्हणून त्यांनी तिसरा विवाह केला तो ‘क्लारा’शी; ही त्यांच्यापेक्षा १८ वर्षांनी लहान होती तिच्या पासून त्यांना पाच अपत्ये झाली . त्यातील तीन लहान असतानाच मरण पावली व जी जगली त्यातील एक म्हणजे ‘ॲडॉल्फ’ व दुसरा म्हणजे ‘पॉल’. पॉल हा हिटलर हे नाव लावण्याऐवजी ‘पॉल ॲलॉइस’ एवढेच नाव लावीत होता. हिटलर याचा हा धाकटा भाऊ पॉल मात्र ॲडॉल्फच्या अखेरच्या क्षणांचाही साक्षीदार होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा