‘ला निना’ पावसाळ्यात सक्रिय होणे भारतीय उपखंडासाठी चांगले असते. हिवाळ्यात तो सक्रिय झाल्यास फायद्यापेक्षा तोटाच जास्त होऊ शकतो.

‘ला निना’ सक्रिय होणार म्हणजे काय?

‘ला निना’ची स्थिती निर्माण होते म्हणजे प्रशांत महासागराच्या पूर्वेकडील भागात पाण्याचे तापमान सरासरीपेक्षा पाच अंश सेल्शियसने कमी होते. अशी स्थिती निर्माण झाल्यास ‘ला निना’ सक्रिय झाला, असे म्हटले जाते. ‘ला निना’मुळे प्रशांत महासागरात हवेची घनता वाढते, हवा दाट होते. प्रशांत महासागरावर हवेचा दाब वाढून भारतीय उपखंडाच्या दिशेने वारे वाहू लागतात. हे वारे बाष्पयुक्त असतात. अशी स्थिती पावसाळ्यात निर्माण झाल्यास सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यता असते. आता हीच स्थिती जर हिवाळ्यात तयार झाली तर प्रशांत महासागराकडून भारतीय उपखंडाकडे येणाऱ्या वाऱ्याचा दाब जास्त राहील. त्याचा परिणाम म्हणून बंगालच्या उपसागरात कमी दाबाची क्षेत्रे तुलनेने जास्त तयार होतील.

La Nina, The rainy season, climate patterns, global phenomenon
विश्लेषण : ‘ला निना’चा पावसाळी मुहूर्त चुकला! आता कडाक्याच्या थंडीबरोबर गारपिटीचीही शक्यता?
29th October 2024 Horoscope Today
Daily Horoscope, 29 October : धनत्रयोदशीला मेष, सिंहसह…
share market down marathi news,
शेअर बाजारात दिवाळीपूर्वीच आतिषबाजी!
article nobel prize winner south korean author han kang
विश्व साहित्याला गवसलेला नवा सूर
Ajit Pawar, Niphad assembly constituency, election 2024
अजित पवार गटाकडून ‘निफाड’ मतदारसंघातील रहस्य कायम
new method for elephants counting
विश्लेषण: हत्ती गणनेच्या नव्या पद्धतीतून अचूक संख्या समोर येईल?
History of Geography earth atmosphere Global warming temperature
भूगोलाचा इतिहास: पृथ्वीला जेव्हा ताप येतो…
Gang rape in Bopdev Ghat triggers safety concerns
असुरक्षित टेकड्या; भयभीत पुणेकर

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे पश्चिम दिशेकडून म्हणजे हिमालयाकडून येणारे थंड वाऱ्याचे झोत किंवा वाऱ्याचे झंझावात (पश्चिम विक्षोप) हे जास्त संख्येने येतात. त्यामुळे हिमालयाच्या पायथ्याशी बर्फवृष्टी होते, या स्थितीमुळे उत्तर भारतासह महाराष्ट्रात जास्त थंडी पडते किंवा थंडी पडण्याची शक्यता वाढते.

हेही वाचा :National Ayurveda Day 2024:धन्वंतरी कोण आहेत? आयुर्वेद दिवस आणि धनत्रयोदशी यांचा नेमका संबंध काय?

राज्यासाठी नुकसानकारक?

‘ला निना’मुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबांची क्षेत्रे सातत्याने तयार होतात. त्यामुळे महाराष्ट्रावर बाष्पीयुक्त वारे येतात. ढगाळ वातावरण तयार होते. बाष्पीयुक्त ढग आणि उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा संयोग होऊन कधी कधी महाराष्ट्रात हिवाळ्यात पाऊस पडताना दिसतो. याच काळात उत्तरेकडून थंड वाऱ्याचा झोत, थंड वारे जर महाराष्ट्रावर येत राहिले तर अचानक थंडी वाढते. उत्तर महाराष्ट्र, विदर्भात पारा दहा अंश सेल्शियसच्याही खाली जातो. २०२१ मध्ये अशीच स्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी १० नोव्हेंबर रोजी पुण्यातील कमाल तापमान १० अंश सेल्शियसपर्यंत खाली गेले होते. हिवाळ्यात अचानक पाऊस पडल्यामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान होते. दाट धुके पडल्यामुळे पिकांवर रोगांचा, किडीचा प्रादुर्भाव वाढतो. त्यामुळे ‘ला निना’ची स्थिती महाराष्ट्रासाठी नुकसानकारकही ठरू शकते.

गारपिटीची शक्यता किती?

‘ला निना’मुळे मध्य भारतासह आणि महाराष्ट्रावर बाष्पयुक्त हवा तयार होते किंवा हवेत बाष्पाचे प्रमाण वाढते. त्यामुळे तापमानात काहीशी वाढ होते. बाष्पयुक्त हवेला, ढगांना अचानक उत्तर भारतातून थंड हवेचा झोत येऊन मिळाला तर गारपीट होण्याची शक्यता वाढते. साधारण १५ जानेवारीपासून मार्चअखेरपर्यंत हा गारपिटीचा काळ असतो. या काळात गारपीट होण्याची शक्यता वाढते. उत्तर महाराष्ट्रात केळी, द्राक्ष, कांद्यासह अन्य फळपिकांचे आणि रब्बी पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यताही असते. त्यामुळे ‘ला निना’ पावसाळ्यात सक्रिय होणे भारतीय उपखंडासाठी चांगले असते. हिवाळ्यात ‘ला निना’ सक्रिय झाल्यास फायद्यापेक्षा तोटाच जास्त होऊ शकतो.

हेही वाचा :इस्रायलने संयुक्त राष्ट्रांच्या ‘पॅलेस्टाइन निर्वासित संस्थे’वर बंदी का घातली?

केवळ ‘ला निना’मुळेच थंडी पडते?

‘ला निना’ थंडी पडण्यासाठी महत्त्वाचा घटक असला तरीही त्याबरोबरीने अनेक घटक कारणीभूत ठरतात. प्रामुख्याने हिमालयाच्या पलीकडून अनेकदा थेट सैबेरियातून थंड वाऱ्याचे झोत भारताच्या दिशेने, हिमालयाच्या पायथ्यापर्यंत येतात. हे थंड वाऱ्याचे झोत एका रेषेत येत नाहीत, नागमोडी वळणे घेत येतात. त्यामुळे मध्य आशियापासून उत्तर भारतापर्यंतचे वातावरण थंड होते. ‘ला निना’ नसेल तर थंड वाऱ्याचे झोत कमी प्रमाणात किंवा कमी संख्येने येतात. त्यामुळे ‘ला निना’सह अन्य स्थितीही षोषक असली तरच थंडी पडते. थंड वाऱ्याचा झोत जास्त असेल तरच मध्य महाराष्ट्रापर्यंत थंडी येते अन्यथा उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ गारठलेला असतो आणि उर्वरित राज्यात थंडी फार नसते. हवामान बदलामुळे एकूणच जगभरात थंडीचे प्रमाण कमी झालेले दिसते.

हेही वाचा :हायबॉक्स गुंतवणूक घोटाळ्यात भारती सिंगसह एल्विश यादवचे नाव; काय आहे हा १००० कोटी रुपयांचा घोटाळा?

‘ला निना’बाबत अंदाज का चुकतोय?

भारतीय हवामान विभागासह जागतिक हवामान संघटना आणि अमेरिकेची हवामान संघटना जुलै अखेरपासून ‘ला निना’ सक्रिय होण्याचा अंदाज व्यक्त करीत आहेत. जुलै अखेरपासून ऑक्टोबर अखेरपर्यंत ‘ला निना’ सक्रिय झालेला नाही. पावसाळ्याचे चार महिने प्रतीक्षा करूनही आणि शक्यता असूनही ‘ला निना’ सक्रिय झालेला नाही. आताही ‘ला निना’साठी पोषक वातावरण असल्याचे सांगितले जात आहे. पण, अद्याप तरी ‘ला निना’ सक्रिय झालेला नाही. प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा किमान पाच अंश सेल्शियसने कमी होण्याची गरज आहे. पण, जागतिक तापमान वाढ, हवामान बदल, प्रदूषणामुळे एकूण जागतिक हवामानविषयक प्रणालींवर विपरीत परिणाम होताना दिसत आहेत. त्यामुळे ‘ला निना’ कधी सक्रिय होणार याबाबत हवामानविषयक संस्था आणि शास्त्रज्ञ ठोसपणे काहीच सांगत नाहीत.
dattatray.jadhav@expressindia.com