सिद्धार्थ खांडेकर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बहुचर्चित अमेरिका दौऱ्याच्या कार्यक्रमपत्रिकेतील एक महत्त्वाचा विषय दोन देशांमधील संरक्षण सहकार्य वृद्धिंगत करणे हा होता. याअंतर्गत अमेरिकेकडून भारताच्या तेजस या लढाऊ विमानांच्या दुसऱ्या आवृत्तीसाठी इंजिनांच्या संयुक्त निर्मितीसाठी सामंजस्य करार होणे अपेक्षित होते. जनरल इलेक्ट्रिक आणि हिंदुस्तान एरॉनॉटिक्स लिमिटेड यांच्यात असा सामंजस्य करार गुरुवारी वॉशिंग्टनमध्ये झाला. या करारावर अमेरिकेच्या काँग्रेसकडून शिक्कामोर्तब होणे बाकी आहे. ते झाल्यानंतर दोन देशांतील संरक्षण सहकार्य कार्यक्रमाला नवीन दिशा मिळेल हे नक्की. या कराराविषयी…

Ajit pawar on NCP BJP Alliance
Gautam Adani BJP-NCP Alliance Talks : “राष्ट्रवादी-भाजपाच्या युतीच्या बैठकीत गौतम अदाणीही होते”, अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले…
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : नीतिशास्त्र, सचोटी  आणि नैसर्गिक क्षमता
midc conversion land in thane belapur belt for residential complexes
नवी मुंबईच्या औद्योगिक पट्ट्यातीलही भूखंड खासगी विकासकाकडे!
Vistara Completes Merger With Air India
‘विस्तारा’ नाममुद्रा इतिहासजमा; एअर इंडियामध्ये विलीनीकरण पूर्ण
Resolution to grant special status to Jammu and Kashmir approved
जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देण्याचा ठराव मंजूर; विधानसभेत जोरदार खडाजंगी
Donald Trump
विश्लेषण: डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाची जागतिक समुदायाला धास्ती का वाटते? शांतता, पर्यावरण, आर्थिक मदतीचे मुद्दे बासनात?
Rumors bomb plane, Airline, Rumors bomb,
विमानात बॉम्ब ठेवल्याची अफवा, विमान कंपनीसह प्रवाशांना मनस्ताप

करारात काय?

भारतीय हवाई दलासाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा तेजस या लढाऊ विमानांच्या दुसऱ्या पिढीसाठी (एमके२) एफ४१४ हे जेट इंजिन संयुक्त स्वरूपात विकसित करणे ही करारातील प्रमुख तरतूद आहे. ही इंजिन निर्मिती भारतातच करण्याचे प्रस्तावित आहे. तेजस विमानांसाठी जनरल इलेक्ट्रिक किंवा जीई याआधीही इंजिने पुरवत होतीच. ती एफ४०४ या प्रकारातील आहेत. तेजस एमके२ हे मध्यम वजनाचे भारतीय बनावटीचे लढाऊ विमान असून, सध्या हवाई दलाच्या ताफ्यातील जग्वार, मिराज-२००० आणि मिग-२९ या विमानांची जागा ते घेईल, असे नियोजित आहे.

जनरल इलेक्ट्रिकच्या एफ४१४ जेट इंजिनाचे वैशिष्ट्य काय?

प्रवासी आणि लढाऊ विमानांसाठी जेट इंजिनांची निर्मिती करणे ही अत्यंत गुंतागुंतीची आणि खर्चिक प्रक्रिया असते. केवळ अमेरिका, रशिया, ब्रिटन आणि फ्रान्स या देशांकडेच लढाऊ विमानांसाठी इंजिन बनवण्याची क्षमता आहे. भारताने डीआरडीओच्या माध्यमातून अशा प्रकारची इंजिन्स बनवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत, पण अद्याप त्यांना म्हणावे तसे यश आलेले नाही. कावेरी इंजिनाच्या निर्मितीसाठी झालेल्या अक्षम्य विलंबाबद्दल महालेखापरीक्षकांनी डीआरडीओवर ताशेरे ओढले होते. सध्या एफ४१४ हे इंजिन अमेरिकी नौदलाच्या एफ-१८ सुपर हॉर्नेट आणि इलेक्ट्रॉनिक युद्धासाठी वापरल्या जाणाऱ्या ईए-१८ ग्राउलर या विमानांमध्ये वापरले जाते. याशिवाय स्वीडिश कंपनी ग्रिपेनच्या एका प्रकारात वापरले जाते.

भविष्याकडे नजर?

भविष्यात एफ-१८ हॉर्नेट या लढाऊ विमानाच्या खरेदीचा प्रस्ताव अमेरिकेकडून मांडला जाऊ शकतो. त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे, मध्यम पल्ल्याच्या लढाऊ विमानाच्या निर्मितीची भारताची योजना आहे. आत्मनिर्भर भारत कार्यक्रमाअंतर्गत देशांतर्गतच युद्धसामग्रीच्या निर्मितीचे केंद्राचे धोरण आहे. प्रस्तावित लढाऊ विमान सुखोई-३० या विमानाची जागा घेईल, असे नियोजित आहे. या विमानासाठीही एफ४१४ इंजिन योग्य ठरेल, असे जनरल इलेक्ट्रिकचे मत आहे. या विमानासाठी इंजिन विकत घेण्याची किंवा देशातच बनवण्याची वेळ येईल, त्यावेळी फ्रेंच साफ्रान आणि ब्रिटिश रोल्स रॉइस या कंपन्यांच्या तुलनेत जनरल इलेक्ट्रिकने आघाडी घेतलेली असेल.

प्रत्यक्ष निर्मिती कधी सुरू होणार?

संयुक्त निर्मिती म्हणजे एक प्रकारचे तंत्रज्ञान हस्तांतरच असते. अशा प्रकारच्या हस्तांतराविषयी निर्णय घेण्याचा अधिकार अमेरिकी कंपन्यांना नाही. यासाठी अमेरिकी काँग्रेसमध्ये प्रस्ताव सादर होऊन तो मंजूर व्हावा लागेल. केंद्र सरकारच्या संरक्षणविषयक मंत्रिमंडळ समितीने गतवर्षी ऑगस्टमध्ये तेजस – एमके२ प्रकल्पाला मंजुरी दिली. त्यासाठी ९ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. २०२४-२५ दरम्यान या विमानाचे प्रारूप (प्रोटोटाइप) विकसित होईल आणि प्रत्यक्ष उत्पादन २०२७मध्ये सुरू होईल, असा अंदाज आहे.