‘वोट जिहाद’ म्हणून चर्चेत असलेल्या मालेगाव येथील हजार कोटींच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य सूत्रधार मेहमूद भागड ऊर्फ चॅलेंजर किंग ऊर्फ एमडी असल्याचे सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) तपासात निष्पन्न झाले आहे. ३५ वर्षीय भागडने मालेगाव आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी आरोपी सिराज मोहम्मदच्या अटकेनंतर परदेशात पलायन केल्याचा संशय आहे. गेल्या तीन ते चार महिन्यांत एवढ्या मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार व नेमका कशासाठी झाला आणि यात तथाकथित वोट जिहादचा संबंध काय, याविषयी…

नेमके प्रकरण काय?

मालेगाव येथील सिराज अहमद हारून मेमनने नाशिक मर्चंट को-ऑप बँकेसह दोन बँकांमध्ये सुमारे १४ खाती उघडली होती. त्यात नागरिकांच्या केवायसी कागदपत्रांचा वापर करून त्याने शेतकऱ्यांना पैसे पाठवण्यासाठी नवा व्यवसाय सुरू करत असल्याचे भासवले होते. सिराजने कृषी व्यवसायासाठी बँक खाती उघडण्यास सांगितले होते. त्या बदल्यात त्याने कृषी उत्पन्न बाजार समितीत काम मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते, असे तक्रारदार जयेश मिसाळ यांनी पोलिसांना सांगितले. सिराजने मिसाळ यांच्याप्रमाणे इतर ११ जणांची बँकेत खाती उघडली होती. या खात्यांमध्ये कोट्यवधी रुपये जमा झाल्याचे आणि ते अन्य खात्यात वळविण्यात येत असल्याचे नंतर मिसाळ आणि अन्य खातेदारांच्या लक्षात आले. या प्रकाराचा मिसाळ आणि इतर खातेधारकांना धक्का बसला. त्यांनी याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार केली. सिराजने आपल्या बँक खात्यांचा गैरवापर करून त्यात बेकायदेशीरपणे पैसे हस्तांतरित केल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. कमी कालावधीत या १४ बँक खात्यांमध्ये १२५ कोटी रुपयांच्या व्यवहार झाल्याचे दिसून आले. याप्रकरणी नाशिक पोलिसांनी सिराजसह इतर आरोपींनाही अटक केली आहे.

overseas debt become expensive due to the depreciating rupee
रुपयाच्या अवमूल्यनामुळे परदेशातून कर्ज उभारणी महाग
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Direct tax rises 16 prcent to Rs 16.9 lakh crore in FY25
वैयक्तिक प्राप्तिकरातील वाढ अर्थव्यवस्थेसाठी वरदान; प्रत्यक्ष कर संकलन १२ जानेवारीपर्यंत १६.९० लाख कोटींवर
Image Of Priyanka Gandhi And PM Modi
Dollar vs Rupee : “रुपयाच्या घसरणीचे सर्व विक्रम मोडले, पंतप्रधानांनी जनतेला उत्तर द्यावे”, प्रियांका गांधींची पंतप्रधान मोदींवर टीका
Seizure and attachment action against 3000 properties for non-payment of property tax
मालमत्ता कर थकबाकीदारांच्या दारात आता बॅण्डवादन
lokmanas
लोकमानस: उपभोग, गुंतवणूक, निर्यातीत वाढ आवश्यक
Markets uneasy over concerns of GDP slowdown print eco news
‘जीडीपी’ मंदावण्याच्या चिंतेने बाजारात अस्वस्थता
Loksatta editorial on Goods and Services Tax GST Collection
अग्रलेख: अल्पात अडकणे अटळ?

हेही वाचा >>>विश्लेषण : आरे कारशेडपाठोपाठ आता डोंगरी कारशेडचा वाद… १४०० झाडांची कत्तल का करावी लागणार?

ईडी तपासात का सहभाग झाली?

सिराजने १४ बँक खाती उघडली होती आणि त्यात १२५ कोटी रुपये जमा झाले होते. त्यानंतर त्यातील ९५ कोटी रुपयांची रक्कम इतर २१ खात्यांमध्ये हस्तांतरित करण्यात आली. ती रक्कम पुढे २५० बँक खात्यांमध्ये जमा झाली. ती खाती व्यक्ती व एकल मालकी कंपन्यांची आहेत. त्यामुळे त्या सर्व बनावट कंपन्या असल्याचा संशय आहे. नवी मुंबई, नाशिक, सुरत, अहमदाबाद, राजकोट आणि दिल्लीसारख्या शहरांमध्ये अनेक एकल मालकी कंपन्या स्थापन करण्यात आल्या होत्या. त्यावरून ८०० कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. तसेच मालेगाव येथील बँक खात्यांवरून ही रक्कम काढून ती हवाला ऑपरेटरच्या माध्यमातून इतरत्र वळवण्यात आली. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात मनी लाँडरींग झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्यामुळे ईडीने तात्काळ याप्रकरणी तपासाला सुरुवात केली.

तपासात आतापर्यंत काय आढळले?

मालेगाव येथील हजार कोटींच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणातील मुख्य सूत्रधार मेहमूद भागड ऊर्फ चॅलेंजर किंग ऊर्फ एमडी असल्याचा संशय आहे. ईडीच्या तपासानुसार, गरीब व्यक्तींच्या नावावर मालेगाव येथील दोन बँकामध्ये १४ खाती उघडण्यात आली होती. त्यातील चार कोटी रुपये दुबईतील पाच कंपन्यांना हस्तांतरित केल्याचे आढळले. या पाच कंपन्या आरोपी सिराज मोहम्मद सिराजशी संबंधित असल्याचे दाखवण्यात आले आहे. पण प्रत्यक्षात भागड त्या कंपन्या नियंत्रित करत असल्याचा ईडीला संशय आहे. भागडने या प्रकरणातील अटक आरोपी नागानी अक्रम मोहम्मद शफी आणि वसीम वलीमोहम्मद भेसाणिया यांना प्रति महिना ३५ हजार रुपये पगारावर नोकरीवर ठेवले होते. या दोघांनी अल्प कालावधीत काही शहरांमध्ये अनेक एकल मालकी कंपन्या स्थापन केल्या. भागड हा या संपूर्ण प्रकरणातील सूत्रधार असल्याचे शफीच्या चौकशीतून उघडकीस आले आहे. सिराजच्या अटकेनंतर भागडने शफीला देश सोडून पळून जाण्याचा सल्ला दिला होता. भागडच्या सूचनेनुसार, शफीने देश सोडण्याचा प्रयत्न केला, मात्र अहमदाबाद विमानतळावर तो पकडला गेला. अटक आरोपी शफी व भेसाणिया यांनी भागडच्या आदेशावर तीनशेहून अधिक बँक खाती व अनेक बनावट कंपन्या स्थापन केल्याचे ईडीच्या तपासात उघड झाले आहे. आरोपींनी २०० हून अधिक बँक खाती बेकायदेशीर आर्थिक व्यवहारांसाठी वापरली होती. या खात्यांवर जमा झालेली रक्कम अहमदाबाद, मुंबई, व सुरत येथील हवाला ऑपरेटर्सच्या मदतीने इतरत्र वळवण्यात आली होती.

हेही वाचा >>>विश्लेषण : थेट विदेशी गुंतवणुकीचे उच्चांकी शिखर; जगाला भारताचे आकर्षण कशामुळे?

हे खरेच वोट जिहादचे प्रकरण आहे का?

गैरव्यवहाराप्रकरणी मेमनला स्थानिक पोलिसांनी अटक केल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणाला ‘वोट जिहाद फंडिंग’ गैरव्यवहार असे म्हटले होते. पण अद्याप तरी ईडीच्या तपासात या रकमेचा निवडणुकीत गैरवापर झाल्याचा कोणताही ठोस पुरावा हाती लागलेला नाही. दरम्यान, हे प्रकरण सध्या तरी मनी लाँडरिंगचे असल्याचे सूत्रांनी सांगितले. एकल मालकी कंपन्याचे जाळे स्थापन करून त्याद्वारे सुमारे ८०० कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याची माहिती ईडीच्या तपासात मिळाली आहे. या प्रकरणात सध्या तरी १२०० कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचे दिसून येत आहे. याप्रकरणी नुकतेच ईडीने मुंबई व अहमदाबाद येथील सात ठिकाणी छापे टाकले. त्यात मुंबईतील अंगडिया व्यवसायिकाशी संबंधीत एका ठिकाणाचा समावेश होता. या कारवाईत १३ कोटी ५० लाख रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. तपासानुसार नागाणी अक्रम मोहम्मद शफी व वासिम वलीमोहम्मद भेसानिया यांनी बनावट खात्यांमधून मोठ्या प्रमाणत रक्कम काढल्याचे समजले. ते दोघे मेहमूद भागड ऊर्फ चॅलेंजर किंग ऊर्फ एमडी याच्या सांगण्यावरून काम करत होते, असे चौकशीत सांगितले. त्यानुसार नागाणी अक्रम शफी व वासिम भेसानिया यांना ईडीने शुक्रवारी अटक केली. आता ईडी त्या माध्यमातून अधिक तपास करत आहे. 

Story img Loader