भारतीय इतिहास आणि संस्कृती ही मंदिर स्थापत्यातील वैविध्यासाठी ओळखली जाते. भारतातील प्रांतिक भेदांनुसार मंदिर स्थापत्य कालानुरूप विकसित झाले. प्रत्यक्ष मंदिर स्थापत्यामध्ये अनेक प्रकार असले तरी, मुख्यतः ही शैली उत्तर भारत आणि दक्षिण भारत या प्रांतिक भेदानुसार विभागली जाते. उत्तर भारतातील मंदिर स्थापत्य शैली ही नागर म्हणून ओळखली जाते तर दक्षिणेकडील द्राविड किंवा द्रविड. २२ जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिराचे उद्घाटन होणार आहे. चंद्रकांत सोमपुरा (८१) आणि त्यांचा मुलगा आशिष (५१) यांनी या मंदिराची रचना नागर शैलीत केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर भारतीय कला परंपरेतील या शैली विषयी जाणून घेणे संयुक्तिक ठरावे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मंदिर स्थापत्य
हिंदू मंदिर हे अनेक प्रतिकांचा समन्वय असते. मनुष्य हा सर्वात विकसित प्राणी आहे, मंदिर स्थापत्य मानवी शरीराची प्रतिकृती आहे, असे हिंदू परंपरा मानते. मानवी शरीराच्या वेगवेगळ्या भागांच्या अनुरूप मंदिराच्या भागांचे पाद ते शिखा असे नामकरण करण्यात आलेले आहे. चरण, पाद, जंघा, ग्रीवा, मस्तक इत्यादी मानवी शरीराच्या अंगांनुसार मंदिराची रचना आढळते. म्हणजेच येथे मानवी शरीर आणि मंदिर यांच्यात साधर्म्य साधले आहे. शरीर कितीही सुंदर असो ते आत्म्याविना निर्जीव आहे. त्याच प्रमाणे देवतेशिवाय मंदिराला पावित्र्य नाही. म्हणूनच मंदिरासाठी देवालय, शिवालय, देवतायन अशा संज्ञा आपल्या संस्कृतीत देण्यात आल्या आहेत, असे कृष्ण देवा यांनी आपल्या ‘टेम्पल्स ऑफ नॉर्थ इंडिया’ या पुस्तकात नमूद केले आहे.
अधिक वाचा: Hikayat Seri Ram मलेशियातील मुस्लिमांना प्रिय ‘राम’ नाम असलेले ‘हिकायत सेरी राम’ नेमके आहे तरी काय?
प्रासाद
याशिवाय मंदिरासाठी ‘प्रासाद’ ही संकल्पना देखील प्रचलित आहे. मंदिरात स्थापना करण्यात आलेली देवता ही विश्वाची स्वामी आहे. प्रासाद हा शब्द महाल आणि मंदिर या दोन्हींसाठी वापरला जातो. मंदिरातील देवतेला सिंहासन, छत्र देऊन नृपतुल्य सन्मान केला जातो. म्हणूनच राजा आणि विश्वाचा राजा यांच्या निवासात साम्य असले पाहिजे ही संकल्पना विकसित झाली. याचीच परिणती आपल्याला नंतरच्या काळातील मोठ्या मंदिर रचनेतही आढळून येते. म. श्री. माटे यांनी ‘प्राचीन कालभारती’ या पुस्तकात नमूद केल्याप्रमाणे, ‘भारतातील मंदिरे पाहिल्यानंतर त्यांच्या रंगरूपात प्रथम दर्शनी आढळणारे वैविध्य चकित करणारे आहे. उत्तर भारतातील कृष्णा- गोदावरी नद्यांच्या उत्तरेला असणाऱ्या प्रदेशातील मंदिरांचे रूप आणि या नद्यांच्या दक्षिणेकडील म्हणजे दक्षिण भारतातील रूप यांच्यात स्पष्ट भेद आढळून येतो. याच मुळे युरोपियन अभ्यासकांनी उत्तर भारतातील उत्तर भारतीय मंदिर शैलीला इंडो -आर्यन (नागर) तर दक्षिण भारतातील शैलीला द्राविड (द्रविडीयन) शैली अशी नावे रूढ केली.
भारतीय संस्कृतीतील मंदिराचे विधान
भारतीय स्थापत्य शास्त्रात गर्भगृह, अंतराळ, मंडप, शिखर असे काही प्रमुख घटक आढळत. म. श्री. माटे यांनी नमूद केल्याप्रमाणे कोणत्याही देवालयात आवश्यक असणारी खोली म्हणजे देवतेची मूर्ती ठेवण्याची जागा. हीच खोली गाभारा किंवा गर्भगृह म्हणून ओळखली जाते. सामान्यतः गर्भगृह हे चौरस आकाराचे असते. उपासकास उभे राहण्यासाठी गर्भगृहासमोर एक लहानसा मंडप असतो, तो अर्धमंडप म्हणून ओळखला जातो, आणि त्या नंतर प्रदक्षिणापथ येतो. नंतरच्या कालखंडात मंदिरासमोर अधिक मंडप वा सभामंडप बांधण्यात येऊ लागल्यावर अर्धमंडपाचे रूपांतर अंतराळात झाले. नागर मंदिरात अंतराळ हा अत्यावश्यक भाग आहे, तर हाच भाग द्राविड मंदिरात वैकल्पिक ठरतो. नागर मंदिराचे मंडप, देवतेसमोर एकापुढे एक असे, चौरस आकाराचे असतात. त्यापैकी काही बंदिस्त- सर्व बाजूंनी भिंती असणारे तर काही उघडे- म्हणजे तीन बाजूना कमरेइतक्या उंचीची भिंत असणारे असतात. मंडपांना दोन्ही बाजूंला प्रवेशिका किंवा मुख मंडप असते. द्राविडी शैलीतील मंदिरांतील मंडप आयताकार, मोठे असतात, द्राविडी मंदिरात अनेक ठिकाणी मुख मंडप असतात.
रथ
नागर मंदिरात तीन बाजूंच्या भिंतींचे मधले भाग खूप पुढे आलेले असतात त्यांना ‘रथ’ म्हणतात. पुष्कळदा अनेक स्तंभ एकमेकांना जोडून उभे केलेले आहेत असे वाटावे अशी रचना असते, भिंतीची अशी मोडणी केलेली असल्याने बाह्याकार पुष्कळदा नक्षत्राकृती होतो. मंडपाच्या भिंतीचीही अशाच प्रकारे मोडणी केलेली असते, द्रविड मंदिरात अशा प्रकारची मांडणी आढळत नाही.
अधिक वाचा: विश्लेषण: रामायण एक अन्वयार्थ अनेक!
उंचीला प्राधान्य
नागर मंदिरावरील मूर्ती भिंतींवर, भिंतींच्या पुढे येणाऱ्या कोनाड्यात बसविलेल्या असतात. नागर मंदिरातील अर्ध मंडप, मंडप, अंतराळ, गाभारा या प्रत्येक भागावर ओळखू येईल असे निराळे छप्पर असते. ही छपरे कोनाकार, शंकूच्या आकाराची आहेत. गर्भगृहावरील शिखर सर्वात उंच, तर इतर भागावरील उंचीने कमी होत जातात. शिखराच्या बाबतीत नागर शिखर हे उंच, वक्राकार बाह्यरेषा असणारे असे आहे. मूलतः नागर मंदिरात उंचीला प्राधान्य दिले जाते.
अभिजात कला
मूलतः नागर मंदिर स्थापत्य शैली उत्तर भारतात इसवी सनाच्या पाचव्या शतकात उदयास आली. याच कालखंडात द्राविड शैलीही विकसित झाल्याचे मानले जाते. याचा अर्थ हा मुळीच नाही की, तत्पूर्वी भारतात सार्वजनिक मंदिरे अस्तित्त्वात नव्हती. मंदिर स्थापत्य हा विषय बराच सखोल आहे. येथे फक्त एका विशिष्ट शैली संदर्भात नमूद करण्यात आले आहे. येथे शैली किंवा इंग्रजीतील ‘style’ हा शब्द वापरला तरी अनेक अभ्यासकांच्या मते हा शब्द मंदिर स्थापत्याची सखोलता दर्शवत नाही. मंदिर स्थापत्याचे विख्यात अभ्यासक अॅडम हार्डी यांनी त्यांच्या ‘द टेंपल आर्किटेक्चर ऑफ इंडिया’ (२००७) या पुस्तकात नागर आणि द्राविड शैली संदर्भात लिहिताना भारतीय मंदिर स्थापत्याच्या दोन अभिजात भाषा/ व्याख्या असे त्यांचे वर्णन केले आहे.
या स्थापत्य शैलीतील मंदिरे गर्भगृहासह उंच प्लॅटफॉर्मवर (अधिष्ठानावर) बांधण्यात येतात, गर्भगृह म्हणजे जेथे देवतेची प्राणप्रतिष्ठा करण्यात येते. ही मंदिरातील सर्वात पवित्र जागा असते. गर्भगृहाच्या वर शिखर बांधण्यात येते. नागर शैलीत हे शिखर उंच डोंगर/ पर्वताच्या आकाराचे असते. शिखर हे हिंदू परंपरेतील नैसर्गिक आणि वैश्विक व्यवस्थेचे मानवनिर्मित प्रतिनिधित्व करते. मंदिर स्थापत्य व भारतीय कला या विषयातील महत्त्वाच्या अभ्यासक स्टेला क्रॅम्रिश यांनी त्यांच्या ‘द हिंदू टेम्पल’ (खंड १; १९४६) मध्ये म्हटल्याप्रमाणे, ‘प्राचीन ग्रंथांमध्ये वीस प्रकारच्या मंदिरांचा उल्लेख आहे, या वीस प्रकारच्या मंदिरांपैकी मेरू, मंदार आणि कैलास ही पहिली तीन नावे आहेत. तिन्ही पर्वताची नावे आहेत, हे जगाचे अक्ष मानले जातात. नागर मंदिर स्थापत्यात गर्भगृहाभोवती प्रदक्षिणा करण्यासाठी जागा असते. कधी कधी प्रदक्षिणा पथ हा गर्भगृह समोरील मंडपाचा भाग असतो. हा मंडप वेगवगेळ्या शिल्पकृतींनी, चित्रांनी अलंकृत केलेला असतो. प्रदक्षिणा पथावरून मंदिर सांधार आहे की निरंधार हे ठरते.
नागरा वास्तुकलेचे पाच प्रकार
नागर ही संपूर्ण उत्तर भारतातही मंदिरांसाठी सामायिक संज्ञा वापरली जात असली तरी, कालखंड, प्रसार, शिखर, रचना यांनुसार स्थापत्य रचनेत फरक दिसून येतो. हार्डी यांनी नागर मंदिराच्या वास्तुकलेच्या वल्लभी, फमसाना, लतिन, शिखरी आणि भूमिज या पाच पद्धतींचा उल्लेख केलेला आहे. कोणार्क सूर्य मंदिर (ओरिसा), जगन्नाथपुरी मंदिर (ओरिसा), लिंगराज मंदिर (भुवनेश्वर-ओरिसा), मुक्तेश्वर मंदिर (ओरिसा), खजुराहो मंदिरे (मध्य प्रदेश), दिलवाडा मंदिरे (राजस्थान), सोमनाथ मंदिर (गुजरात) ही काही प्रसिद्ध मंदिरे नागर शैलीतील आहेत.