सर्वोच्च न्यायालयातील प्रलंबित खटल्यांची माहिती आता राष्ट्रीय न्यायिक डेटा ग्रिड अर्थात नॅशनल ज्युडिशियल डेटा ग्रिड (NJDG) या ऑनलाइन पोर्टलशी जोडली जाणार असल्याचा निर्णय गुरुवारी (१४ सप्टेंबर) घेण्यात आला. एनजेडीजी या पोर्टलवर देशभरातील न्यायालयांमधील प्रलंबित खटले, निकाली काढलेले खटले याबाबतची अद्ययावत माहिती सादर केलेली असते. यात आता सर्वोच्च न्यायालयाचीही भर पडली आहे. या निर्णयाबाबत माहिती देताना सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड म्हणाले, “आजचा दिवस ऐतिहासिक असा म्हणावा लागेल. एनजेडीजीची निर्मिती राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्र आणि सर्वोच्च न्यायालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या पथकाने केली आहे. सर्वोच्च न्यायालयातील सुरू असलेल्या खटल्यांची आणि प्रलंबित खटल्यांची माहिती अद्ययावत करून आपण न्यायिक प्रक्रियेत पारदर्शकता आणण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत आहोत.”
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा