रशिया आणि युक्रेनमधील युद्धात दररोज नव्या घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यातच आता युक्रेनने थेट रशियाच्या बलाढ्य ‘मॉस्क्वा’ या युद्धनौकेला लक्ष्य करत मोठं नुकसान पोहचवल्याचा दावा केलाय. दुसरीकडे रशियाने या युद्धनौकेचं नुकसान झाल्याचं मान्य केलंय, मात्र ते युक्रेनच्या हल्ल्यामुळे न होता युद्धनौकेवरील स्फोटकांचा स्फोट झाल्याने नुकसान झाल्याचा दावा केलाय. कारण काहीही असो मात्र रशियाच्या मॉस्क्वा युद्धनौकेला मोठं नुकसान झालंय हे तेवढंच खरंय. त्यामुळे जगभरात सध्या युक्रेनने ज्या नेपच्युन क्षेपणास्त्राचा वापर केल्याचं म्हटलंय त्या क्षेपणास्त्राची चर्चा सुरू आहे. रशियाच्या शक्तिशाली युद्धनौकेला अचूकपणे लक्ष्य करणारं हे क्षेपणास्त्र नेमंक काय आहे, ते कसं काम करतं आणि त्याची वैशिष्ट्ये काय याचं हे खास विश्लेषण…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

युक्रेनने म्हटलंय की युक्रेन सैन्याच्या युद्धनौका विरोधी यंत्रणेचा भाग असलेल्या दोन नेपच्युन क्षेपणास्त्रांनी मॉस्क्वा युद्धनौकेला लक्ष्य केलं. विशेष म्हणजे या क्षेपणास्त्राची रचना रशियन केच-१५ क्षेपणास्त्राप्रमाणेच आहे. रशियाने २०१४ मध्ये क्रिमियावर ताबा मिळवल्यानंतर युक्रेनच्या समुद्री सीमांना धोका निर्माण झाला. ६ वर्षांच्या या तणावपूर्ण स्थितीनंतर नेपच्युन क्षेपणास्त्र यंत्रणा मार्च २०२१ मध्ये युक्रेनच्या सैन्यात तैनात करण्यात आली होती.

युक्रेनच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार नेपच्युन क्षेपणास्त्र यंत्रणा युद्धनौका विरोधी क्षेपणास्त्र यंत्रणा आहे. ही यंत्रणा आपल्या आजूबाजूच्या जवळपास ३०० किलोमीटरच्या परिसरात कोणत्याही युद्धनौकेला लक्ष्य करू शकते.

युक्रेनने लक्ष्य केलेली रशियाची मॉस्क्वा युद्धनौकेची वैशिष्ट्ये काय?

मॉस्क्वा रशियाच्या नौदलातील शक्तिशाली युद्धनौका आहे. ही युद्धनौका क्षेपणास्त्रांनी सज्ज आहे. रशियाचे राजधानी मॉस्कोवरून या युद्धनौकेला मॉस्क्वा हे नाव देण्यात आलंय. त्या युद्धनौकेचं वजन जवळपास १२,४९० टन इतकं आहे. या युद्धनौकेवर ५०० सैनिक असतात. ही युद्धनौका खरंतर १९८३ मध्ये रशियन सैन्यात दाखल झाली होती. त्यावेळी तिचं नाव स्लाव्हा असं होतं. मात्र, २००० मध्ये पुन्हा ही युद्धनौका अद्ययावत क्षेपणास्त्र आणि शस्त्रास्त्रांनी सज्ज करून रशियाच्या सैन्यात नव्याने तैनात करण्यात आली. त्यावेळी या युद्धनौकेला मॉस्क्वा असं नाव देण्यात आलं.

ही युद्धनौका या आधी एकदा चर्चेत आली. तेव्हा रशियाने नुकताच युक्रेनवर हल्ला चढवला होता. तसेच या युद्धनौकेवरील रशियन सैनिकांनी समुद्रात युक्रनीयन सैनिकांच्या बोटीला आत्मसमर्पण करण्यास सांगितले. त्याला प्रत्युत्तर देत युक्रेनच्या सैनिकांनी रशियाच्या युद्धनौकेला आत्मसमर्पणाला नकार दिला. यानंतर रशियाने युक्रेनची ही बोट क्षेपणास्त्राने उडवली. यात सर्व युक्रनेच्या सैनिकांचा मृत्यू झाला होता.

युक्रेनने रशियावर हल्ला कसा केला?

सध्या हाती येत असलेल्या वृत्तांनुसार, युक्रेनच्या टीबी-२ ड्रोनचा वापर करून नेपच्युन क्षेपणास्त्राने रशियाच्या मॉस्क्वा युद्धनौकेवर हल्ला चढवण्यात आला. यावेळी युक्रेनच्या सैन्याने युद्धनौकेची एअर डिफेन्स सिस्टमला वेगळ्याच लक्ष्यात व्यग्र ठेवलं. त्याचवेळी नेपच्युन क्षेपणास्त्राने मॉस्क्वाची सुरक्षा यंत्रणा भेदत हल्ला केला. युक्रेनने याआधी देखील रशियाच्या युद्धनौकांवर हल्ला चढवल्याचा दावा केलाय. मात्र, यावेळचा हल्ला मोठा ठरलाय.

रशियाच्या युद्धनौकेला नेमकं किती नुकसान झालं?

रशियाच्या युद्धनौकेला नेमकं किती नुकसान झालंय याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. काही वृत्तांनुसार युक्रेनच्या क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर रशियाचे मॉस्क्वा युद्धनौका एका बाजुला झुकली आणि अगदी समुद्रात बुडण्याच्या स्थितीत गेली. हे वृत्त युक्रनेकडून आलेले आहेत, त्याला रशियाने अद्याप दुजोरा दिलेला नाही. काही वृत्तांमध्ये तर रशियाचे मॉस्क्वा युद्धनौका या हल्ल्यानंतर बुडल्याचाही दावा करण्यात आलाय. दुसरीकडे रशियाने केवळ या युद्धनौकेला काही प्रमाणात नुकसान झाल्याचं कबुल केलंय.