जानेवारी २०२३ मध्ये अमेरिकन संशोधन संस्था हिंडेनबर्गने अदाणी समूहातील कथित घोटाळ्यासंबंधी एक अहवाल प्रसिद्ध करून खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर आता आणखी एक अमेरिकेतील संस्था ‘द ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट’ (The Organised Crime and Corruption Reporting Project – OCCRP) या संस्थेने अदाणी समूहावर भांडवली बाजारात फेरफार केल्याचा आरोप केला आहे. OCCRP चा अहवाल गुरुवारी (३१ ऑगस्ट) प्रसिद्ध झाला. अदाणी समूहाच्या काही कंपन्यांच्या शेअर्समध्ये अदाणी कुटुंबातील काही व्यक्तिंनी परदेशातून गुंतवणूक केली. ज्यामुळे अदाणी समूहाच्या कंपन्यांच्या शेअर्सचे दर आणि अदाणी समूहाचे बाजारमूल्य अचानक वाढले. हा फुगवटा गैरमार्गाने केला असल्याचा आरोप अहवालातून करण्यात आला आहे.

असा आरोप OCCRP ने आपल्या अहवालात केला. तसेच दोन प्रकरणांची कागदपत्रे त्यांच्याकडे उपलब्ध असल्याचाही दावा त्यांनी केला आहे.

Gujarat gold chain snatchers thieves active in vasai
गुजरातमधील सोनसाखळी चोर वसईत सक्रीय, गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून अटक
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Mokka crime fugitive arrested from Karnatak Pune news
Pune Crime News: मोक्काच्या गुन्ह्यातील फरारीला कर्नाटकातून अटक
judge detained corruption charges
सातारा जिल्हा सत्र न्यायाधीश लाचप्रकरणी चौकशीसाठी ताब्यात
Thane Police begins work to record statement of former Director General of Police Sanjay Pandey
माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांचा जबाब नोंदविण्याचे काम ठाणे पोलिसांकडून सुरू
25 lakh online fraud of senior citizens in kamothe panvel crime news
कामोठेत जेष्ठाची २५ लाखांची ऑनलाईन फसवणूक
Fraud of Rs 42 lakhs through social media Navi Mumbai crime news
नवी मुंबई: समाजमाध्यमाद्वारे ४२ लाखांची फसवणूक
online fraud of Rs 57 lakhs with senior citizen women on pretext of extra returns
जादा परताव्याच्या अमिषाने वृद्धेची ऑनलाईन ट्रेडिंगद्वारे ५७ लाखांची फसवणूक

दरम्यान, अदाणी समूहाने हे आरोप फेटाळून लावले आहेत. “हिंडेनबर्गच्या बिनबुडाच्या अहवालाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी परदेशी माध्यमांना हाताशी धरून जॉर्ज सोरोस यांचे अनुदान लाभलेल्या OCCRP संस्थेने त्यांचे स्वारस्य जपण्यासाठी हा अहवाल प्रसिद्ध केला”, असे प्रत्युत्तर अदाणी समूहाकडून देण्यात आले आहे.

हे वाचा >> अदाणींच्या शेअर्सबाबत OCCRP च्या अहवालात मोठा गौप्यस्फोट, ‘ओपेक फंड’चा वापर करून…

हिंडेनबर्गनंतर अदाणी समूहाच्या व्यवहारावर बोट ठेवणारी OCCRP संस्था काय आहे? तिला कुणाचा पाठिंबा आहे? आणि संस्थेचे उद्दिष्ट आणि कार्यपद्धती काय आहे? याबाबत घेतलेला हा आढावा …

शोध पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांची जागतिक साखळी

OCCRP चे सहसंस्थापक ड्रू सलविन यांनी या संस्थेबद्दल एके ठिकाणी म्हटले, “OCCRP ची निर्मिती नियोजित नव्हती. गरज म्हणून तिची स्थापना करावी लागली. आपल्याच देशातील अनेक गुंतागुंतीच्या समस्यांवर आम्ही सर्व जण काम करीत होतो. पण, काहींना अशी संस्था निर्माण करायला हवी, याची अनुभूती झाली आणि त्यांनी एकमेकांशी संवाद साधला. त्यातून OCCRP संस्था आकारास आली.”

अमेरिकन नागरिक सलविन आणि बल्गेरियन पॉल राडू हे दोघेही शोध पत्रकारिता करतात. संघटित गुन्हेगारी व पद्धतशीर भ्रष्टाचाराचा तपास आणि त्याच्यावर शोध पत्रकारिता करण्याच्या दोघांच्या अनुभवांमधील समानता लक्षात आल्यानंतर या दोघांनी २००६ साली OCCRP ची स्थापना केली.

सुरुवातीला बोस्निया-हर्जेगोविनाची राजधानी साराजेव्हो (Sarajevo) शहरात OCCRP ची पहिली शाखा सुरू करण्यात आली. संयुक्त राष्ट्रांच्या लोकशाही निधी (UNDEF) या उपक्रमातून OCCRP निधी मिळत होता. पाच देशांमध्ये सहा शोध पत्रकारांपासून सुरू झालेला हा प्रवास काही वर्षांनी ३० देशांमध्ये पोहोचला आणि १५० हून अधिक शोध पत्रकार OCCRP शी जोडले गेले. शोध पत्रकारांची जागतिक स्तरावर एक साखळी निर्माण करून, त्यांच्यात सहज संवाद घडवून आणणे आणि माहितीचे आदान-प्रदान करणे, जेणेकरून भ्रष्टाचार आणि गुन्हेगारीची जागतिक साखळी आणखी चांगल्या प्रकारे समजून घेऊन ती उघडकीस आणता येईल, हा OCCRP चा उद्देश आहे.

OCCRP काही प्रादेशिक स्तरावरील शोध पत्रकारिता करणाऱ्या संस्थांशी भागीदारी केली आहे. ज्यामध्ये अरब रिपोर्टर्स फॉर इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिजम (ARIJ), सेंट्रल लॅटिनो अमेरिकानो डे इन्व्हेस्टिगेशन पेरिओडेस्टिका (CLIP) आणि रेडिओ फ्री युरोप / रेडिओ लिबर्टी (RFE/RL) अशा संस्थांचा समावेश आहे. तसेच जागतिक शोध पत्रकारिता साखळीचे (Global Investigative Journalism Network) OCCRP सदस्य आहेत.

हे वाचा >> अदाणी समूहाला ठरवून लक्ष्य ! शरद पवार यांचा वेगळा सूर, ‘जेपीसी’च्या मागणीलाही विरोध

शोध पत्रकारितेमुळे जगभरात १० अब्ज डॉलर्सचा दंड वसूल

OCCRP ने स्वतःच दिलेल्या माहितीनुसार २००९ पासून ३९८ प्रकरणांचा अधिकृत तपास OCCRP ने केला आहे. त्यामुळे ६२१ जणांना अटक झाली असून, त्यांना शिक्षा झालेली आहे. १३१ लोकांना राजीनामा द्यावा लागला आणि १० अब्ज डॉलर्सहून अधिकचा दंड आकारला गेला असून, तेवढेच पैसे जप्त करण्यात आले आहेत. OCCRP ने आजवर अनेक उच्चभ्रू व्यक्ती, व्यावसायिकांची चौकशी केली आहे. त्यामध्ये रशियाच्या ओलिगार्क्स (oligarchs) आणि व्लादिमिर पुतिन यांच्याशी निगडित अनेक चौकशा केल्या आहेत. (ओलिगार्क्स म्हणजे भांडवलदारांचा एक छोटा गट, जो अप्रत्यक्षरीत्या सरकार चालवितो) OCCRP संस्था ही ‘इंटरनॅशनल कन्सोर्टियम ऑफ इनव्हेस्टिगेटिव्ह जर्नलिस्ट्स’ (‘द इंडियन एक्स्प्रेस’ही याचा भाग आहे) या संस्थेचीही भागीदार असून, त्यांनी एकत्रितपणे पनामा पेपर प्रकल्प उघडकीस आणला होता. पनामा पेपर्स अंतर्गत भ्रष्टाचाराशी निगडित ४० लेख प्रकाशित करण्यात आले होते. या लेखमालेला २०१७ सालचा पत्रकारिता क्षेत्रातील मानाचा मानला जाणारा ‘पुलित्झर’ पुरस्कारही मिळाला होता.

राजकीय भ्रष्टाचार आणि संघटित गुन्हेगारीचा बुरखा फाडून शांततेत योगदान देण्याबाबत OCCRP संस्थेला या वर्षी नोबल पारितोषिकासाठी नामांकन मिळाले आहे.

OCCPR आणि अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांचा काय संबंध?

अदाणी समूहाने OCCPR चा अहवाल फेटाळून लावताना त्यांना सोरोस यांचा पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. हिंडेनबर्गचा अहवाल समोर आल्यानंतर अमेरिकन अब्जाधीश व दानशूर व्यक्ती म्हणून प्रसिद्ध असलेल्या जॉर्ज सोरोस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गौतम अदाणी यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर भारतातूनही भाजपाकडून त्यांच्यावर जोरदार पलटवार करण्यात आला होता. तेव्हापासून सरकार किंवा अदाणी यांच्यावर झालेल्या टीकेला उत्तर देण्यासाठी सोरोस यांच्या नावाचा उल्लेख वारंवार होताना दिसत आहे.

आणखी वाचा >> “अदाणी प्रकरणामुळे भारताच्या विश्वासार्हतेला तडा, मोदींना उत्तर द्यावेच लागेल”, अमेरिकन अब्जाधीश जॉर्ज सोरोस यांची प्रतिक्रिया

OCCRP च्या संकेतस्थळावर त्यांना निधीचा पुरवठा करणाऱ्या संस्थांची नावे देण्यात आली आहेत. २१ संस्थांच्या या यादीत जॉर्ज सोरोस यांच्या ओपन सोसायटी फाऊंडेशन या संस्थेचा समावेश आहे. सोरोस यांच्या संस्थेसह रॉकफेलर ब्रदर्स फंड, फोर्ड फाऊंडेशन, यूस डिपार्टमेंट ऑफ स्टेट, जर्मन मार्शल फंड आणि द स्वीडिश इंटरनॅशनल डेव्हलपमेंट को-ऑपरेशन एजन्सी यांसारख्या संस्थांकडूनही OCCRP ला निधी मिळतो. तसेच लहान देणगीदार, सरकारी किंवा बिगरसरकारी संस्थांकडूनही OCCRP ला निधी मिळत असतो, असे त्यांच्या संकेतस्थळावर नमूद करण्यात आले आहे.

Story img Loader