-गौरव मुठे
भारताने इंग्लंडमध्ये ठेवलेले १०० टन सोने सरलेल्या आर्थिक वर्षात देशाच्या तिजोरीत हलवले आहे. वर्ष १९९१ मध्ये परकीय चलनाचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे देशाला इंग्लंडकडे सोने गहाण ठेवावे लागले होते. मात्र नंतर कर्जाची परतफेड केल्यानंतरही ते सोने इंग्लंडमध्येच ठेवण्यात आले होते. आता मात्र ते पुन्हा भारतात आणल्याने रिझर्व्ह बँकेकडील सोन्याचा साठा वाढला आहे.

इंग्लंडमधून किती सोने माघारी आणले?

भारताने इंग्लंडमध्ये ठेवलेले १०० टन सोने सरलेल्या आर्थिक वर्षात देशाच्या तिजोरीत हलवले आहे. वर्ष १९९१ मध्ये परकीय चलनाचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे देशाला इंग्लंडकडे सोने गहाण ठेवावे लागले होते. मात्र नंतर कर्जाची परतफेड केल्यानंतरही ते सोने इंग्लंडमध्येच ठेवण्यात आले होते. दोन दशकांहून अधिक काळातील ही पहिलीच वेळ आहे की, एखाद्या देशातून एवढ्या मोठ्या प्रमाणावर सोने पुन्हा भारतात आणले गेले. शिवाय देशातील रिझर्व्ह बँक येत्या काही महिन्यांत पुन्हा एकदा तितक्याच प्रमाणात सोन्याच्या राखीव रकमेची भर घालू शकते. रिझर्व्ह बँकेने इंग्लंडमधून १०० टनांहून अधिक सोने देशातील तिजोरीत स्थलांतरित करणे ही देशातील व्यवस्थापनाची रणनीती (पोर्टफोलिओ मॅनेजमेंट स्ट्रॅटेजी) आहे. आणि १९९१ नंतर, एवढ्या मोठ्या प्रमाणावर सोन्याच्या साठ्याचे एका देशातून दुसऱ्या देशात स्थलांतराची पहिलीच घटना आहे.

Indian rupee latest marathi news
रुपयाची प्रतिडॉलर ८५ च्या दिशेने वाटचाल
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
hindustan coca cola beverages
ज्युबिलंट भारतीय समूहाची हिंदुस्तान कोका-कोला बीव्हरेजेसमध्ये ४० टक्के हिस्सेदारी
gold price increased
लग्नाच्या हंगामात सोन्याच्या दराने वाढवली चिंता… हे आहे आजचे दर…
public sector banks npa marathi news
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे ‘एनपीए’ ३.१६ लाख कोटींवर
Gold Silver Price Today 10 December 2024 in Marathi
Gold Silver Rate : सोनं ७७ हजारांच्या पार ! जाणून घ्या, तुमच्या शहरातील सोन्या-चांदीचा दर
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?
3 percent errors possible in ladki bahin yojana application scrutiny
लाडकी बहीण योजनेच्या अर्ज छाननीत तीन टक्के त्रुटींचा संभव;  नाशिक विभागातील स्थिती

आणखी वाचा-AC Blast: कडक उन्हाळ्यात एसीमध्ये स्फोट होण्याची कारणं काय? कोणती खबरदारी घ्यावी?

सोने परत आणून काय साधले जाणार?

देशातच सोन्याची साठवणूक केल्याने बँक ऑफ इंग्लंडसारख्या परदेशी बँकेला देण्यात येणाऱ्या साठवणूक खर्चात मोठी बचत होणार आहे. याचबरोबर हे भारतीय अर्थव्यवस्थेबाबत आत्मविश्वासाचे संकेत आहेत. जागतिक पातळीवर सोन्याकडे एक सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून पाहिले जाते आणि ते देशांतर्गत ठेवणे हे भारतीय अर्थव्यवस्थेच्या स्थिरतेच्या विश्वासाचे संकेत देत आहे.

रिझर्व्ह बँकेकडील सोन्याचा साठा किती?

रिझर्व्ह बँकेकडील सोन्याचा साठा ८२२.१० मेट्रिक टनांवर पोहोचला असून सरलेल्या आर्थिक वर्षात त्यात २७.४६ मेट्रिक टन सोन्याची भर पडली आहे. मौल्यवान धातू असलेल्या सोन्याचा बराचसा भाग परदेशात साठवला जातो. इतर देशांप्रमाणे देशाचे सोने इंग्लंडची मध्यवर्ती बँक असलेल्या बँक ऑफ इंग्लंडमध्ये आहे. देशात १०० टन सोने पुन्हा आणल्यामुळे रिझर्व्ह बँकेकडील देशांतर्गत गंगाजळीतील सुवर्ण-साठा ४०८ टनांपेक्षा अधिक झाला आहे, याचा अर्थ रिझर्व्ह बँकेकडील देशात असलेला सोन्याचा साठा आणि परदेशी असलेला सोन्याचा साठा आता जवळजवळ समान पातळीवर आला आहे. रिझर्व्ह बँकेच्या वार्षिक अहवालानुसार, जारी केलेल्या रोख्यांसाठी तरतूद म्हणून ३०८ टनांहून अधिक सोने भारतात आहे, तर आणखी १००.२८ टन सोने बँकिंग विभागाची मालमत्ता म्हणून राखीव ठेवण्यात आले आहे. एकूण सोन्याच्या साठ्यापैकी ४१३.७९ मेट्रिक टन सोन्याचा साठा परदेशात आहे. देशात सध्या मुंबई आणि नागपूर येथे रिझर्व्ह बँकेकडे मोठ्या सुरक्षा व्यवस्थेखाली सोने सुरक्षित ठेवण्यात आले आहे. भारताच्या एकूण परकीय गंगाजळीत सोन्याचा वाटा सुमारे ८ टक्के आहे.

आणखी वाचा-विश्लेषण : ट्रम्प यांच्या विरोधातील इतर तीन खटल्यांचे काय? त्यांच्या निकालांचा अध्यक्षीय उमेदवारीवर कितपत परिणाम?

१९९१ मध्ये काय झाले?

परकीय चलनाच्या तुटवड्यामुळे वर्ष १९९१ मध्ये अर्थव्यवस्था गंभीर संकटाचा सामना करत होती. इतर देशांकडून वस्तू व सेवांची आयात करण्यासाठी निधी उपलब्ध नसल्याने तत्कालीन केंद्र सरकारसमोर निधी उभारणीसाठी सोने गहाण ठेवण्याचा एकमेव पर्याय होता. तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर सरकारने आयात खर्च भागवण्यासाठी परदेशात सोने गहाण ठेवून निधी मिळवावा लागला. त्यावेळी बँक ऑफ इंग्लंड आणि बँक ऑफ जपानकडे रिझर्व्ह बँकेने ४६.९१ टन सोने तारण ठेवले आणि ४० कोटी डॉलर मिळविले. नंतर पुढे म्हणजे, १५ वर्षांपूर्वी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून २०० टन सोने खरेदी केले. अलिकडच्या काही वर्षांत, रिझर्व्ह बँकेने सातत्याने देशातील सोन्याचा साठा वाढवत आणला आहे.

मध्यवर्ती बँकांकडे किती सोने?

जागतिक सुवर्ण परिषदेच्या (वर्ल्ड गोल्ड कौन्सिल) अहवालानुसार, जागतिक मध्यवर्ती बँकांकडे आतापर्यंत उत्खनन केलेल्या सर्व सोन्याच्या साठ्यापैकी सुमारे १७ टक्के सोन्याचा मालकी हक्क आहे. २०२३च्या अखेरीस त्यांच्याकडे सुमारे ३६,६९९ मेट्रिक टन राखीव साठा आहे. न्यूयॉर्क फेडरल रिझर्व्हनंतर बँक ऑफ इंग्लंडकडे सर्वाधिक सोन्याचा साठा आहे. अनेक देशांचे सोने देखील बँक ऑफ इंग्लंडच्या तिजोरीत साठवले गेले आहे. आता रिझर्व्ह बँकेने देशांतर्गत तिजोरीत १०० टन सोने हस्तांतरित केल्यानंतर, साठवणुकीचा खर्च कमी होणार आहे. गेल्या काही वर्षांपासून रशिया आणि चीनसह इतर मध्यवर्ती बँकांनी आक्रमकपणे त्यांच्या सोन्याचा साठा वाढवण्यास सुरुवात केली आहे. त्यामागील एक मुख्य कारण म्हणजे, हे देश डॉलरवरील त्यांचे अवलंबित्व कमी करू इच्छित आहे.

आणखी वाचा-महिला पुरुषांपेक्षा जास्त जगतात, तरी महिलांमध्ये आजाराचे प्रमाण जास्त का? ‘लॅन्सेट’चा अहवाल काय सांगतो?

बँक ऑफ इंग्लंड किती भाडे आकारते?

बँक ऑफ इंग्लंडमध्ये सोने साठवणाऱ्या मध्यवर्ती बँकांना साठवणूक खर्च म्हणून प्रति रात्र प्रति बार ३.५ पेन्स आकारले जातात. याचा अर्थ, उदाहरणार्थ, बँक ऑफ इंग्लंडमध्ये १०० टन सोन्याची साठवणूक करणाऱ्या परदेशी मध्यवर्ती बँकेला साठवणूक खर्च म्हणून प्रति वर्ष अंदाजे १०२,२०० ब्रिटिश पौंड आकारले जातील. (१०० टन x ८० बार प्रति टन x ०.०३५ प्रति रात्र x ३६५ दिवस ). म्हणजेच वर्षाला १०० टन सोन्याची साठवणूक करण्यासाठी सुमारे १.०८ कोटी रुपये शुल्क द्यावे लागते. बँक ऑफ इंग्लंडच्या सोन्याच्या तिजोऱ्या त्यांच्या मुख्यालयाच्या इमारतीच्या तळघरात स्थित आहेत. लंडन शहरात थ्रेडनीडल स्ट्रीट येथे बँकेचे मुख्यालय आहे. थ्रेडनीडल स्ट्रीटवरील सध्याची बँक ऑफ इंग्लंडची इमारत १९२४ आणि १९३३ च्या दरम्यान बांधली गेली होती. बँक ऑफ इंग्लंडची ४,६५,०० सोन्याचे बार म्हणजेच ५,७८० टन सोने साठवणूक क्षमता आहे. २०१४ च्या आकडेवारीनुसार, सुमारे ७२ देशांच्या मध्यवर्ती बँकांनी तिच्याकडे सोने ठेवले आहे.

बँक ऑफ इंग्लंडकडे सध्या नेमके किती सोने आहे, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नाही. मात्र २८ फेब्रुवारी २०१५ रोजीच्या तिच्या वार्षिक अहवालात, बँक ऑफ इंग्लंडने सांगितले की, तिच्या ताब्यात ५,१३४ टन सोने आहे.

सर्वाधिक सोने कोणाकडे?

जागतिक सुवर्ण परिषदेच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेकडे सर्वाधिक सोने आहे. तर भारत या यादीत नवव्या स्थानावर आहे. सोन्याच्या साठ्यात भारत सौदी अरेबिया आणि युनायटेड किंगडमच्या पुढे आहे. प्राप्त माहितीनुसार, अमेरिकेकडे ८,१३३.४६ टन सोन्याचा साठा आहे. ३,३५२ टन सोन्याच्या साठ्यासह जर्मनी दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत इटली, फ्रान्स आणि रशिया हे अनुक्रमे तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहे. तर २,१९१.५३ टन सोन्यासह चीन सहाव्या क्रमांकावर आहे. स्वित्झर्लंड १,०४० टन तर जपान ८४५.९७ टन साठ्यासह अनुक्रमे सातव्या आणि आठव्या स्थानावर आहे.

gaurav.muthe@expressindia.com

Story img Loader