Olympic Medals ऑलिम्पिक पदक जिंकणे म्हणजे प्रत्येक देशासाठी गौरव आणि प्रतिष्ठेची बाब असते. भारताने २०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत चार खेळांमध्ये पाच पदके जिंकली. भारताने नेमबाजीत तीन, हॉकीत एक व भालाफेकीत एक पदक पटकावले. भारताला भालाफेकीत नीरज चोप्राकडून सुवर्णपदकाची अपेक्षा होती. परंतु, पाकिस्तानच्या अर्शद नदीमने सुवर्णपदक पटकावले; तर नीरज चोप्राने रौप्यपदक. अशा प्रकारे यंदा भारताला चार कास्य आणि एका रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. परंतु, ऑलिम्पिक विजेत्यांना मिळणार्‍या या पदकांची खरी किंमत किती असते, असा प्रश्न अनेकांच्या मनात घोळत असतो. या पदकांविषयीचा इतिहास, या पदकांची लिलावातील किंमत इत्यादी काही गोष्टी आपण सविस्तर जाणून घेऊ.

ऑलिम्पिक पदकांची रचना

ऑलिम्पिक सुवर्णपदके सोन्याची असतात, असा अनेकांचा समज आहे; परंतु खरे सांगायचे झाल्यास यात सोन्याचे प्रमाण फारच कमी असते. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (IOC) सुवर्ण आणि रौप्यपदकांमध्ये किमान ९२.५ टक्के शुद्ध चांदीचा वापर केला जातो, असे सांगितले आहे. पॅरिस २०२४ ऑलिम्पिक स्पर्धेत प्रत्येक सुवर्णपदकाचे वजन ५२९ ग्रॅम होते; ज्यावर २४-कॅरेट सोन्याचा केवळ सहा ग्रॅमचा मुलामा होता. प्रत्येक रौप्यपदकाचे वजन ५२५ ग्रॅम होते. तर प्रत्येक ४५५ ग्रॅम वजनाचे कास्यपदक ९५ टक्के तांबे आणि पाच टक्के जस्त या धातूंच्या मिश्रणाने तयार करण्यात आली होती.

gold etfs witness record rs 1961 cr inflow in october
‘गोल्ड ईटीएफ’ना चमक; ऑक्टोबरमध्ये विक्रमी १,९६१ कोटींची गुंतवणूक
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Ranji Trophy Goa Batters Highest Ever Partnership in 90 Year Old History
Ranji Trophy: ६०६ धावांची विक्रमी भागीदारी अन् गोव्याच्या २ फलंदाजांची त्रिशतकं, रणजी ट्रॉफीच्या ९० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं असं काही
gold prices dropping post Diwali it will reach 70000 per 10 grams soon
सोन्याचे दर ७० हजारांपर्यंत येणार? आणखी मोठी घसरण…
Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी अन्य देशात हलवल्यास पाकिस्तान बोर्डाला कोट्यवधींचा फटका; कसा ते जाणून घ्या
Gold prices at lows Big fall after Diwali
सुवर्णवार्ता… सोन्याचे दर निच्चांकीवर… दिवाळीनंतर मोठी घसरण…
Champions Trophy Javed Miandad Angry on India for Not Travelling Pakistan Said If We Dont Play India at all Pakistan cricket will Prosper
Champions Trophy: “भारत-पाकिस्तान सामनाच नाही झाला तर…”, टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी येणार नसल्याने BCCI, ICCवर संतापले जावेद मियांदाद
Korea Masters Badminton Tournament Kiran George in semifinals sport news
कोरिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा: किरण जॉर्ज उपांत्य फेरीत
(छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : मायक्रोवेव्ह म्हणजे बॅक्टेरियाचे घर? रक्तप्रवाहात शिरल्यास गंभीर आजारांचा धोका? आरोग्यासाठी किती घातक?

ऑलिम्पिक पदकांचे खरे मूल्य काय?

ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सने पॅरिस २०२४ ऑलिम्पिकमधील सुवर्णपदकाचे मूल्य १,०२७ डॉलर्स (८६ हजार), रौप्यपदकाचे मूल्य ५३५ डॉलर्स (अंदाजे ४५ हजार ) व कास्यपदकाचे मूल्य ४.६० डॉलर्स (अंदाजे ४०० रुपये) इतके होते. २०२८ मध्ये होणार्‍या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकपर्यंत या किमतींमध्ये बदल होणार आहे. या स्पर्धेत सुवर्णपदकाची किंमत १,१३६ डॉलर्स, रौप्यपदकाची किंमत ५७९ डॉलर्स व कास्यपदकाची किंमत ५.२० डॉलर्सपर्यंत वाढविण्यात येणार असल्याची माहिती आहे. २०३२ ब्रिस्बेन ऑलिम्पिकपर्यंत सुवर्णपदकाची किंमत १,६१२ डॉलर्स आणि रौप्य व कास्यपदकांची किंमत अनुक्रमे ६०८ डॉलर्स व सहा डॉलर्स इतकी करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे जर ऑलिम्पिक सुवर्णपदक पूर्णपणे शुद्ध सोन्याचे असेल, तर त्याची किंमत अंदाजे ४१,१६१.५० डॉलर्स इतकी असेल. परंतु, १९१२ मध्ये अखेरचे सुवर्णपदक शुद्ध सोन्याने तयार करण्यात आले होते.

२०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिक पदकांमध्ये काय वेगळेपण होते?

२०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पदकांमध्ये एक वेगळेपण आणण्यात आले; ज्याची रचना ऐतिहासिक फ्रेंच ज्वेलरी हाऊस ‘चाउमेट’ने केली. फ्रेंच आणि ब्रिटिश राजघराण्यांसाठी दागिने आणि मुकुट तयार करण्यासाठी हे ज्वेलरी हाऊस ओळखले जाते. ऑलिम्पिकच्या इतिहासात पहिल्यांदाच एका ज्वेलरी हाऊसने पदकांची डिझाईन तयार केली. २०२४ च्या पदकांमध्ये समाविष्ट करण्यात आलेली आयफेल टॉवरची आकृती पदकाच्या मध्यभागी षटकोनी आकारात देण्यात आली. तपकिरी रंगाची ही आकृती फ्रान्सच्या सांस्कृतिक वारशाचा संबंध दर्शविते आणि पदकांमध्ये प्रतीकात्मक मूल्य जोडते. पदकांच्या पुढील भागावर पॅरिस २०२४ स्पर्धेचे प्रतीक दिले गेले. आयफेल टॉवरच्या बाजूने अॅक्रोपोलिसदेखील चित्रित केले गेले, जे प्राचीन खेळांच्या उत्पत्तीत आणि या खेळांच्या आधुनिक पुनरुज्जीवनासाठी फ्रेंचने दिलेल्या योगदानाशी जोडते.

२०२४ च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पदकांमध्ये एक वेगळेपण आणण्यात आले. (छायाचित्र-रॉयटर्स)

पॅरालिम्पिक पदकांसाठीही, ‘चाउमेट’ने एक अद्वितीय डिझाइन तयार केले; ज्यामध्ये ब्रेलमध्ये ‘पॅरिस’ आणि ‘२०२४’, असे कोरलेले आहे. या पदकांमध्येही आयफेल टॉवरची आकृती आहे. दृष्टिहीन खेळाडूंच्या पदकांमध्ये फरक करण्यासाठी, संबंधित डिझाईन कोरलेल्या आहेत. पदकांच्या रिबनदेखील प्रतीकात्मक आहेत. त्यावरही आयफेल टॉवरचे चित्र देण्यात आले आहे. ऑलिम्पिक पदकांसाठी निळ्या रिबन आणि पॅरालिम्पिक पदकांसाठी लाल रिबन आहेत.

लिलावातील ऑलिम्पिक पदकांची किंमत कोटींच्या घरात

ऑलिम्पिक पदकांचे भौतिक मूल्य जरी कमी वाटत असले तरी त्यांचे लिलाव मूल्य कोटींच्या घरात आहे; विशेषत: महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांशी किंवा नामांकित खेळाडूंशी जोडलेल्या पदकांचे. वर्षानुवर्षे अनेक ऑलिम्पिक पदकांना लिलावात उच्च किमती मिळाल्या आहेत. १९६८ च्या मेक्सिको सिटी ऑलिम्पिकमध्ये अमेरिकन बॉब बीमनने लांब उडी स्पर्धेत जिंकलेले सुवर्णपदक हे याचे एक उल्लेखनीय उदाहरण आहे. बीमनने ऑलिम्पिकमध्ये ८.९० मीटरच्या लांब उडीचा विक्रम प्रस्थापित केला आणि इतिहासातील जागतिक विक्रमांना मागे टाकले. या पदकाचा फेब्रुवारी २०२४ मध्ये ४,४१,००० डॉलर्स (अंदाजे ३.७ कोटी रुपये) मध्ये लिलाव करण्यात आला.

बीमनने ऑलिम्पिकमध्ये ८.९० मीटरच्या लांब उडीचा विक्रम प्रस्थापित केला होता. (छायाचित्र-रॉयटर्स)

त्याचप्रमाणे १९३६ च्या बर्लिन ऑलिम्पिकमध्ये जर्मन लुझ लाँगने लांब उडी स्पर्धेत जिंकलेले रौप्यपदक ४,८८,००० डॉलर्स (अंदाजे ४.०९ कोटी रुपये) मध्ये विकले गेले. लाँगला केवळ त्याच्या ॲथलेटिक पराक्रमासाठीच नाही, तर ॲडॉल्फ हिटलरच्या वर्णद्वेषी प्रचाराला झुगारून एकाच स्पर्धेत चार सुवर्णपदके जिंकणाऱ्या आफ्रिकन-अमेरिकन ॲथलीट जेसी ओवेन्स याच्याशी एकजूट दाखविल्याबद्दलही ओळखले जाते. त्यामुळे या पदकाला विशेष महत्त्व होते. लिलावात विकले गेलेले सर्वांत मौल्यवान ऑलिम्पिक पदक जेसी ओवेन्सचे होते. १९३६ च्या बर्लिन ऑलिम्पिकमधील त्याच्या चार सुवर्णपदकांपैकी एका पदकाचा २०१३ मध्ये १.४ दशलक्ष डॉलर्स (अंदाजे ११.७५ कोटी रुपये)मध्ये लिलाव झाला.

लिलावात विकले गेलेले सर्वात मौल्यवान ऑलिम्पिक पदक जेसी ओवेन्सचे होते. (छायाचित्र-रॉयटर्स)

हेही वाचा : सेंट मार्टिन बेटावरून शेख हसीना यांचा अमेरिकेवर आरोप? काय आहे या बेटाचं महत्त्व? अमेरिकेला का हवे आहे हे बेट?

१९९६ च्या अटलांटा ऑलिम्पिकमध्ये युक्रेनियन हेवीवेट बॉक्सर व्लादिमीर क्लिट्स्कोने जिंकलेले सुवर्णपदक हा आणखी एक उल्लेखनीय लिलाव होता. ‘क्लिट्स्कोने युक्रेनियन मुलांसाठी पैसे उभारण्याकरिता २०१२ मध्ये या पदकाचा लिलाव केला आणि त्याला एक दशलक्ष डॉलर्स (अंदाजे ८.४ कोटी रुपये) मिळाले. आदर म्हणून खरेदीदाराने क्लिट्स्कोला पदक परत केले आणि त्याच्या यश व सेवाभावी प्रयत्नांची प्रशंसा केली.