अमोल परांजपे
शनिवारी पहाटे पॅलेस्टाईनमधील दहशतवादी संघटना ‘हमास’ने इस्रायलवर गेल्या अनेक दशकांतील सर्वात भीषण हल्ला चढवला. नियोजित पद्धतीने आधी अडीच ते पाच हजार छोटी क्षेपणास्त्रे डागण्यात आली आणि त्यानंतर जमीन, समुद्रमार्गे हमासचे सैनिक इस्रायलमध्ये शिरले. बेसावध असलेल्या इस्रायलमध्ये अक्षरश: मृत्यूचे तांडव करून शेकडो इस्रायली नागरिक आणि सैनिकांचे अपहरण करण्यात आले. अधिकृत माहितीनुसार, किमान २०० इस्रायली आणि इस्रायलच्या प्रतिहल्ल्यात किमान २५० पॅलेस्टिनी मारले गेले आहेत. हमासच्या या कृतीमुळे आखातामध्ये मोठे युद्ध भडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

हमासच्या हल्ल्याचे नियोजन कसे होते?

६ ऑक्टोबर १९७३ साली इजिप्त आणि सीरियाने योम किप्पूर या ज्यू सणाच्या दिवशी अचानकपणे इस्रायलवर केलेल्या हल्ल्यामुळे चौथ्या अरब-ज्यू युद्धाची ठिणगी पडली होती. या युद्धाला ५० वर्षे झाली. शनिवारी इस्रायली नागरिक पुन्हा एकदा योम किप्पूर साजरा करत असताना बेसावधपणे हमासने इस्रायलवर रक्तरंजित हल्ला चढविला. ‘ऑपरेशन अल अक्सा फ्लड’ ही हमासची मोहीम पहाटे साडेसहाच्या सुमारास सुरू झाली. आधी गाझाषपट्टी भागातून हजारो (हमासच्या दाव्यानुसार पाच हजार, इस्रायलच्या म्हणण्यानुसार अडीच हजार) क्षेपणास्त्रे डागण्यात आली. यातील काही क्षेपणास्त्रे थेट जेरुसलेम आणि तेल अविवपर्यंत पोहोचली. त्यानंतर इस्रायलमध्ये अनेक ठिकाणांहून हमासचे सैनिक घुसले. जीप, बाईक आदीवरून आलेल्या या सैनिकांनी वेगवेगळ्या किबुत्झमध्ये योम किप्पूरची सुट्टी साजरी करणाऱ्या नागरिकांवर बेछुट गोळीबार केला. अनेक लष्करी ठाण्यांना वेढा देण्यात आला. शेकडो सैनिक आणि नागरिकांना ठार करण्यात आले. अनेक महिला, लहान मुले, अपंग यांचे अपहरण करण्यात आले.

Israeli troops 100 hamas militant arrested
इस्रायलकडून हमासच्या १०० दहशतवाद्यांना अटक
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
police registered two cases over bomb rumors on plane pune
विमानात बाँम्बची अफवा; पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल, अफवा पसरविण्याचे प्रकार वाढीस
Israel attack 22 killed
इस्रायलच्या हल्ल्यात २२ जण ठार
israel, airstrikes across iran
विश्लेषण : इस्रायलचा अखेर इराणवर हल्ला! पश्चिम आशियात पुन्हा युद्धभडका?
Smart Bomb Israel Used to Flatten Buildings in Lebanon
Israel used Smart bomb: लेबनॉनमधील इमारती जमिनदोस्त करण्यासाठी इस्रायलने वापरला स्मार्ट बॉम्ब; नक्की काय आहे स्मार्ट बॉम्ब?
Israel attacks iran live updates
Israel Attack on Iran: इस्रायलचा इराणवर हवाई हल्ला; लष्करी तळांना लक्ष्य केले, पुन्हा युद्ध भडकणार?
Gulmarg Terrorist Attack
Gulmarg Terrorist Attack : काश्मीरमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला; २ जवान शहीद, २ कुली ठार, ३ जवान जखमी

आणखी वाचा-इस्रायलचे रॉकेट हल्ल्यापासून संरक्षण करणारी आयर्न डोम यंत्रणा काय आहे?

हल्ल्यानंतर इस्रायल व मित्रराष्ट्रांची प्रतिक्रिया काय?

इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी हा हल्ला नसून युद्ध आहे, असे जाहीर करत पुढील प्रसंगांची जणू नांदीच दिली आहे. या हल्ल्यानंतर इस्रायलने लष्कराची जमवाजमव सुरू केली असून राखीव सैनिकांना सेवेत दाखल होण्याचे आदेश सुटले आहेत. इस्रायली वायूदलाने पॅलेस्टाईनवर जोरदार हल्ला चढवले असून लवकरच जमिनीवरील कारवाईदेखील सुरू होण्याची शक्यता आहे. अमेरिकेने हमासच्या हल्ल्याचा निषेध केला असून इस्रायलला सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले आहे. अमेरिकेप्रमाणेच युरोपातील अनेक देशही इस्रायलला साथ देण्याची शक्यता आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ‘एक्स’ समाजमाध्यावर इस्रायलच्या पाठीशी उभे राहण्याची घोषणा केली आहे. मात्र या सर्व प्रतिक्रिया अपेक्षित आहेत. महत्त्वाचे आहे, ते इस्रायलच्या आसपास असलेली अरब राष्ट्रे कोणती भूमिका घेतात हे…

अरब राष्ट्रे या हल्ल्याकडे कसे बघतात?

अद्याप कोणत्याही अरब राष्ट्राने हमासच्या हल्ल्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली नसली, तरी इस्रायलचा शेजारी लेबनॉनमधील दहशतवादी गट ‘हिजबुल्ला’ आणि इस्रायलमध्ये सातत्याने संघर्ष घडत असतो. लेबनॉनमधील हमासचा नेता ओसामा हमदान याने अन्य अरब राष्ट्रांना थेट इशाराच दिला आहे. ‘इस्रायलच्या संरक्षणात्मक मागण्या पूर्ण करून परिसरात शांतता नांंदू शकत नाही, हे अरब राष्ट्रांनी समजून घ्यावे,’ असे हमदान याचे म्हणणे आहे. त्यामुळे नेतान्याहू यांनी पॅलेस्टाईनवर सर्व ताकदीनिशी हल्ला चढवल्यानंतर त्यांना लेबनॉन सीमेवर लगेचच दुसरी फळी उभारावी लागेल, यात शंका नाही. मात्र महत्त्वाचा मुद्दा आहे तो अलिकडेच इस्रायलशी शांतता करार केलेली किंवा करार करण्याची प्रक्रिया सुरू केलेली अरब राष्ट्रे काय करणार याचा. सीरिया, जॉर्डन आणि इजिप्त यांच्या सीमा इस्रायलला भिडल्या आहेत. या देशांनी पॅलेस्टाईनची बाजू घेतली, तर आखातामध्ये दीर्घकालीन आणि रक्तरंजित युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे सौदी अरेबियाची भूमिकाही महत्त्वाची असेल. किंबहुना इस्रायल-सौदी करारात खोडा घालण्यासाठीच हा हल्ला करण्यात आल्याची शक्यता काही तज्ज्ञांनी बोलून दाखविली आहे.

आणखी वाचा-फ्रान्समध्ये ढेकणांचा प्रादुर्भाव? ऑलिम्पिक आयोजनावर परिणाम होणार? नेमके वास्तव काय?

करार उधळण्यासाठी हमासचा हल्ला?

अमेरिकेच्या मध्यस्थीने सौदी अरेबिया आणि इस्रायलमध्ये दीर्घकालीन करार होऊ घातला आहे. हा करार होऊ नये, यासाठी इराणचे पाठबळ असलेल्या हमासने हा ताजा हल्ला चढविल्याचे बोलले जाते. एका अरब राष्ट्राविरुद्ध युद्ध पुकारणाऱ्या इस्रायलशी सौदी सुलतान करार करणार नाहीत, असे गणित या हल्ल्यामागे असू शकेल. इस्रालयमध्ये हल्ला करणाऱ्या हमासच्या सैनिकांनी फेकलेल्या पत्रकांमध्ये ‘पॅलेस्टाईनला बाजुला ठेवून शांततेचा कोणताही करार होऊ शकत नाही,’ असा इशारा देण्यात आल्यामुळे ही शक्यता बळावली आहे. दुसरीकडे हमासच्या प्रवक्त्यांनी सर्व अरब विश्वाला इस्रायलविरुद्ध युद्ध पुकारण्याचे आव्हान केले आहे. इस्रायल प्रतिहल्ल्यावर ठाम असला, तरी मुख्य प्रश्न आहे तो हमासने अपहरण केलेल्या इस्रायली नागरिकांच्या सुरक्षेचा…

अपहृत इस्रायलींचे भवितव्य काय?

नेमक्या किती इस्रायली नागरिकांना वेस्ट बँकमध्ये पळवून देण्यात आले आहे, याची आकडेवारी जाहीर झालेली नाही. मात्र खुद्द हमासने हा आकडा बराच मोठा असून काही डझनांपेक्षा जास्त इस्रायली नागरिक ओलीस असल्याचा दावा केला आहे. या नागरिकांना एका जागी ठेवण्यात आले नसून संपूर्ण वेस्ट बँक परिसरात विखरून ठेवण्यात आल्याचेही जाहीर करण्यात आले आहे. इस्रायलने मोठा हल्ला चढवू नये, यासाठी या ओलिसांचा मानवी ढालीसारखा वापर केला जाण्याची शक्यता आहे. इस्रायलसह पाश्चिमात्य देशांशी वाटाघाटी करण्यासाठीही त्यांचा उपयोग केला जाऊ शकतो. हा प्रश्न इस्रायल कसा सोडवणार, हा आता सर्वात कळीचा मुद्दा आहे.

amol.paranjpe@expressindia.com