गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात मोठ्या उलाढाली पाहायला मिळत आहेत. अनेक शेअर्सनी गुंतवणूकदारांना चांगलाच फायदाही मिळवून दिला आहे. ३१ मार्च २०२० ते ३१ मार्च २०२३ या तीन वर्षांच्या कालावधीत सेन्सेक्सने १०० टक्के उसळी घेतल्याने देशभरात काही मोठे बदल दिसून आले. विशेषत: गुंतवणूकदारांच्या वर्तनात आणि गुंतवणूकदारांचा इक्विटीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. या तीन वर्षांच्या कालावधीत CDSL आणि NSDL मधील डिमॅट खात्यांची एकूण संख्या २.८ पटीने वाढून ११.४४ कोटींहून अधिक झाली, तर थकबाकी असलेल्या SIP खात्यांची संख्या ३.११ कोटींवरून ६.२८ कोटी झाली. तसेच म्युच्युअल फंड उद्योगातील मासिक SIP योगदान वाढलेय. ते योगदान सुमारे ८,५०० कोटींवरून १४,००० कोटींहून अधिक झाले आहे.

अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने आणि भारताच्या बचतीच्या मार्गात सर्वात मोठा बदल म्हणजे व्यवस्थापनाखालील म्युच्युअल फंड मालमत्तेमध्ये (AUM) लहान शहरांचा वाटा वाढणे हा आहे. ‘असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड इन इंडिया’द्वारे इतर शहरे म्हणून वर्गीकृत केलेला हा एक गट आहे, ज्यात देशभरातील महत्त्वाच्या शहरांच्या व्यतिरिक्त इतर ११० शहरांचा समावेश आहे. या शहरांचा उद्योग AUM मध्ये १७.४४ टक्के वाटा आहे. उदाहरणार्थ, मार्च २०२३ पर्यंत एकूण ३९.४२ लाख कोटी रुपयांच्या उद्योगापैकी AUMचा वाटा ६.८७ लाख कोटी रुपये आहे. मार्च २०२० मध्ये त्यांचा वाटा १०.९९ टक्क्यांवरून झपाट्याने वाढला होता आणि त्यानंतर तो कमीसुद्धा झाला आहे. जून २०१४ मध्ये तो २.५५ टक्के होता.

Traders reported that price of coriander decreased compared to last week and price of fenugreek is on rise
कोथिंबिरेच्या दरात घट; मेथी तेजीत, फळभाज्यांचे दर स्थिर
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
p chidambaram article analysis maharashtra economy
समोरच्या बाकावरून : अर्थव्यवस्था तारेल त्यालाच मत
Mumbaikars contribution in mutual funds
म्युच्युअल फंडात मुंबईचाच सिंहाचा वाटा; १७.८३ लाख कोटींचे योगदान; मुंबईसह महाराष्ट्राच्या तुलनेत अन्य राज्यांत वाढती दरी
maharashtra vidhan sabha elections 2024, Rajura,
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलन न करणाऱ्या ॲड. चटप यांना मतदार स्वीकारणार का?
loksatta editorial no interest rate cut by rbi retail inflation surges in october
अग्रलेख : म्हाताऱ्या शब्दांचा आरसा…
readers comments on Loksatta editorial,
लोकमानस : अर्थव्यवस्थेत वाढ, मग रुपयाची घसरण का?
traffic cleared due to police planning in Pune print news
पाेलिसांच्या नियोजनामुळे वाहतूक सुरळीत-पंतप्रधानांच्या सभेसाठी कडक बंदोबस्त

नेमके समीकरण कसे बदलले?

या छोट्या शहरांनी गेल्या तीन वर्षांत म्युच्युअल फंड गुंतवणुकीत त्यांची गुंतवणूक वाढवली आहे, इतकेच नव्हे तर त्यांनी मोठ्या महानगरांचा वाटा खाल्ला आहे (टॉप ५ शहरांचा वाटा ६२.४ टक्क्यांवरून ५४.५ टक्क्यांवर आला आहे.) बाजारातील हालचाली प्रतिकूल असताना फंड हाऊसेससाठी निधीचा प्रवाह स्थिर केलाय. खरे तर महत्त्वाच्या ३५ शहरांचा वाटा मार्च २०२० मध्ये ८० टक्क्यांवरून मार्च २०२३ मध्ये ७२.३ टक्क्यांवर आला आहे; त्याच कालावधीत पुढील ७५ शहरांचा वाटा ५.३७ टक्क्यांवरून ६.२३ टक्क्यांवर पोहोचला. जून २०१४ मध्ये त्यांचा हिस्सा ५.२३ टक्के होता. विशेष म्हणजे सर्वात मोठा बदल इतर शहरे, अर्धशहरी आणि ग्रामीण भागातील पिरॅमिडच्या तळाशी आला. खरे तर वैयक्तिकरीत्या ते उद्योगाच्या AUM मध्ये ०.०१-०.०३ टक्के किंवा त्याहूनही कमी योगदान देत आहेत, परंतु एकत्रितपणे एक मोठा बदल घडवून आणला आहे.

याचा अर्थ काय?

इंडस्ट्रीतील अनेक तज्ज्ञांना असे वाटते की, हे भारतीय इक्विटी मार्केटच्या सखोल वाढीचे संकेत आहेत आणि देशातील इक्विटी संस्कृतीच्या लोकशाहीकरणाचेही प्रतिबिंब आहे. खरे तर गुंतवणुकीवरील अधिक परतावा आणि चांगल्या भविष्याच्या शोधात असलेल्यांना इक्विटी मार्केटवरचा भरवसा वाढला आहे. तसेच नियामकाने गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी उचललेल्या पावलांवर लहान शहरांमधील लहान गुंतवणूकदारांचा विश्वास वृद्धिंगत होत आहे. याशिवाय गेल्या काही वर्षांमध्ये गुंतवणुकीच्या सुलभतेत झालेल्या बदलाचा हा परिणाम आहे. इक्विटीमध्ये गुंतवणूक करताना काही जोखीम असते, विशेषत: जर ही गुंतवणूक अल्पकालीन असेल, तर अनेक सकारात्मक गोष्टी आहेत. भारताच्या वाढीच्या कथेत योगदान देण्यापासून ते गुंतवणुकीवरील उच्च दीर्घकालीन परताव्यापर्यंत अनेक घटक याला कारणीभूत ठरतात. फंड हाऊसेसचे म्हणणे आहे की, लहान शहरांतील एसआयपी गुंतवणूकदार त्यांच्या मासिक एसआयपींबद्दल अधिक चिकित्सक असतात आणि बाजारातील प्रतिकूल हालचाल पाहून ओघ थांबवत नाहीत.

हेही वाचाः विश्लेषण : आरबीआयने अडूर को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेचा परवाना केला रद्द, ग्राहकांच्या पैशांचे आता काय होणार?

म्युच्युअल फंड प्रत्येक गुंतवणूकदाराच्या पोर्टफोलिओचा भाग का असावा?

बर्‍याच गुंतवणूकदारांना सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या योजनेत गुंतवणुकीची चिंता असते. खरे तर त्यात गुंतवणूक करण्यापासून दूर राहण्यापेक्षा लवकर सुरुवात करणे कधीही योग्य ठरेल. चांगली कामगिरी करणाऱ्या फंडाबरोबर जाणे अधिक महत्त्वाचे आहे. उदाहरणार्थ, गेल्या १० दहा वर्षांत लार्ज कॅप श्रेणीमध्ये सर्वोच्च कामगिरी करणाऱ्या फंडाने सुमारे १४ टक्के चक्रवाढ वार्षिक परतावा व्युत्पन्न केला, तर इतर अनेकांनी सुमारे १२ टक्के परतावा मिळवून दिला. परंपरागत बचत साधने (फिक्स डिपॉझिट्स आणि लहान बचत योजना) आणि महागाई यांच्यावर मात करण्याचा विचार केला पाहिजे. साधारण १२ टक्के व्युत्पन्न करणार्‍या सरासरी फंडानेही मुदत ठेवींमधून मिळणार्‍या परताव्यापेक्षा सुमारे दुप्पट कामगिरी केली असती. गुंतवणूकदारांनी हेदेखील समजून घेतले पाहिजे की, चक्रवाढीचा फायदा दीर्घ कालावधीसाठी महत्त्वपूर्ण आहे. उदाहरणार्थ, जर दोन व्यक्ती २० वर्षांसाठी १०,००० रुपये प्रति महिना गुंतवणूक करीत असतील, तर २० वर्षांच्या शेवटी त्यांनी कुठे गुंतवणूक केली, यावर अवलंबून त्यांच्या कॉर्पसमध्ये मोठा फरक जाणवेल. ६ टक्क्यांच्या हिशेबाने पारंपरिक बचत साधनांमध्ये एका गुंतवणूकदाराला ४६.२ लाख रुपयांचा निधी मिळेल, तर अन्य गुंतवणूकदाराला २० वर्षांच्या कालावधीत त्याच्या इक्विटी फंडाच्या गुंतवणुकीवर १० टक्के CAGR मिळतो, त्यात त्याचा कॉर्पस दिसणार असून, तो वाढून ७५.९ लाख रुपये झालेला असेल.

हेही वाचाः विश्लेषण : वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांपेक्षा वंदे मेट्रो कशी वेगळी?, जाणून घ्या खासियत