गेल्या काही वर्षांत मुंबई महानगर प्रदेशातील सर्वच शहरांमधील वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळते. ठाणे, नवी मुंबई, भिवंडी, घोडबंदर मार्ग, मीरा-भाईंदर, वसई-विरार या सर्व शहरांना लागून असलेल्या महामार्गांवर अवजड वाहतुकीचे प्रमाणही वाढले आहे. मुंबईस लागूनच असलेले आणि मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील महत्त्वाचा टप्पा असलेल्या मीरा-भाईंदर शहरास भेदून जाणाऱ्या महामार्गावर मागील काही वर्षांत वाहन संख्या तिपटीने वाढल्याचा वाहतूक पोलिसांचा अहवाल आहे. या वाढत्या वाहनसंख्येच्या तुलनेत शहरातील रस्ते, अंतर्गत मार्गिका कमी पडू लागल्या आहेत. त्याचा परिणाम म्हणून ही सर्वच शहरे आता कोंडू लागली आहेत. या पार्श्वभूमीवर मीरा-भाईंदर आणि वसई-विरार शहरांसाठी स्थानिक पोलिसांनी आखलेले वाहतूक धोरण सध्या चर्चेत आहे. शहरातील संपूर्ण वाहतूक व्यवस्थेचा फेरआढावा घेण्याचा प्रयत्न यानिमित्ताने पोलीस दलाने सुरू केला आहे.

वाहतूक कोंडीची समस्या का निर्माण झाली?

अरुंद रस्ते, वाढती लोकसंख्या आणि वाहनांची वाढती संख्या हे जवळपास सर्वच प्रमुख शहरांचे दुखणे होऊन बसले आहे. यामुळे शहरात वाहतुकीची समस्या निर्माण होऊ लागली आहे. महत्त्वाच्या रस्त्यांवर वाहनांच्या मोठ्या रांगा हे चित्र मीरा-भाईंदर आणि वसई-विरार या शहरांतही रोजचे आहे. वाहने उभी करण्याची जागा निश्चित नसल्याने वाहनधारकांनी वाहने कुठे उभी करायचा हा प्रश्नही पाचवीला पुजलेला दिसतो. मीरा-भाईंदर पोलीस आयुक्तालयामार्फत यासाठी विशिष्ट असे धोरण तयार केले जात आहे.

RTO officials fined over 40 Dombivli rickshaw drivers between 5,000 to 20,000 rupees.
डोंबिवलीत १२५ हून अधिक रिक्षा चालकांची ‘आरटीओ’कडून तपासणी, ४० हून अधिक रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Safe Waterway , Speed ​​Boat issue , Alibaug, Gharapuri ,
स्पीड बोटींचा स्वैरसंचार, अतिधाडस; अलिबाग, घारापुरीसाठी सुरक्षित जलमार्ग निश्चित करण्याची पर्यटकांची मागणी
Dhayari Locality Roads, Pune City Roads Traffic,
पुण्यातील रस्त्याची राष्ट्रपतींनी घेतली दखल! राज्याच्या मुख्य सचिवांना दिल्या सूचना
IIT mumbai inspects Dahisar cement concretisation road project,
दहिसरमधील रस्त्यांच्या सिमेंट कॉंक्रीटीकरण प्रकल्पाची आयआयटी मुंबईच्या चमूकडून पाहणी
police action against handcart pullers and auto driver for blocking roads and footpaths in dombivli
डोंबिवलीत रस्ते, पदपथ अडविणाऱ्या हातगाडी, रिक्षा चालकांवर कारवाई, नागरिकांनी व्यक्त केले समाधान
Action against rickshaw drivers violating traffic rules Mumbai news
वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई; ४२६ रिक्षा जप्त
Action taken against 20 dumpers for illegally dumping debris navi Mumbai news
नवी मुंबई: राडारोडा टाकणाऱ्या २० डंपरवर कारवाई

हेही वाचा – Black Friday Sale 2023: ब्लॅक फ्रायडे म्हणजे नेमके काय? ब्लॅक फ्रायडेच्या खरेदीची परंपरा कधी सुरु झाली?

वाहतूक धोरण कसे आहे?

वाहतूक विभागाकडून या शहरांमध्ये प्रथमच हे धोरण राबविले जात असून हा प्रयत्न प्रायोगिक स्वरूपाचा आहे. या धोरणात अति गर्दीची ठिकाणे, रेल्वे स्थानक परिसर, बाजारपेठा, ये-जा करण्याचे मुख्य मार्ग, रुग्णालये, शाळा- महाविद्यालयीन परिसर अशा भागांतील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला आहे. मीरा-भाईंदरमध्ये ५७, वसईत १०६, विरार १०९ अशा एकूण २७२ ठिकाणांवर वाहने उभे करण्यास मनाई करण्यात आली आहे. नऊ ठिकाणी एकदिशा मार्गिका तसेच दोन ठिकाणी अवजड वाहनांना विशिष्ट वेळेसाठी प्रवेशबंदी करण्यात आली आहे. सम आणि विषम अशा तारखेनुसार वाहतूक नियोजन करण्यात आले आहे.

एकदिशा मार्गिकेचा कसा फायदा होईल?

शहरात अनेक रस्ते अरुंद तर काही ठिकाणी रस्त्यांची पुरेशी बांधणी झालेली नाही. शहरात काही ठिकाणी केवळ एकच वाहन जाऊ शकेल अशी स्थिती आहे. याचा विचार करता सर्वाधिक रहदारी असलेले मार्ग एकदिशा मार्ग तयार करण्यात आले आहेत. मीरा-भाईंदरमधील अजित पॅलेस ते भक्तिवेदान्त हॉस्पिटल चौक, मॅक्सेस मॉल ते जोशी रुग्णालयाकडून बद्रीनारायण गाडोदिया मार्गात आणि कोंबडी गल्लीमधून मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या दिशेने जाणाऱ्या मार्गाचा समावेश आहे. वसईमधील पारनाका ते वसई कोर्ट मार्ग आणि वसई-पश्चिम रेल्वे स्थानकापासून उपायुक्त कार्यालय, विरारमधील साईबाबा नाका ते वदर विनायक लेनकडून मजेठिया नाका रेल्वे स्टेशनपर्यंत, उंबरगोठण नाका ते नवापूर मार्गांवरून राजोडी मार्गाने सत्पाळा नाकापर्यंत आणि विरार पश्चिम रेल्वे स्टेशनबाहेरील मार्ग एकदिशा मार्गिका म्हणून घोषित केले आहेत. यामुळे वाहनचालकांना एकाच दिशेने प्रवास करावा लागणार आहे. या शहरांसाठी हा प्रयोग नवा आहे. त्यामुळे हे प्रयोग किती प्रमाणात यशस्वी होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अवजड वाहनांमुळे होणारी कोंडी कशी सुटणार?

मीरा-भाईंदर आणि वसई-विरार या भागांतील काही भाग औद्योगिक वसाहतीचा भाग आहे. या भागात मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची वर्दळ अधिक असते. विशेषतः रहदारीच्या वेळेत अवजड मालवाहतूक वाहने येतात तेव्हा वाहतूक कोंडी अधिक होते. मीरा-भाईंदरमध्ये सकाळी ८ ते दुपारी १२ आणि सायंकाळी ५ ते रात्री ८ पर्यंत प्रवेश बंद केला आहे. यात गोल्डन चौकातून साई बाबा फाटक मार्ग, इंद्रलोककडून भाईंदर पूर्व मार्ग आणि गोल्डन नेस्टकडून मॅसेक्स मॉलकडून जोशी रुग्णालय मार्ग, सुभाष चंद्र बोस मैदान व ९० फूट मार्गाचा समावेश आहे. वसई पूर्वेच्या नवघर एमआयडीसी येथून रेल्वे स्थानक परिसरात येणाऱ्या सर्व मालवाहतूक वाहनांना सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत प्रतिबंध करण्यात आला असून या वाहनांना अंबिका कॉम्प्लेक्समार्गे चौधरी कंपनीसमोरून सुरक्षा स्मार्ट सीटी एव्हरशाइनपर्यंतचा मार्ग निश्चित करून दिला आहे.

हेही वाचा – विश्लेषण : विद्यापीठातील प्र-कुलगुरू नियुक्तीच्या नव्या पद्धतीला वाढता विरोध का?

वाहतूक धोरणाची अंमलबजावणी कशी करणार?

वाहतूक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी सुरुवातीला नागरिकांमध्ये जनजागृती करणे, याशिवाय ज्या जागा निश्चित केल्या आहेत अशा ठिकाणी पालिकेकडून सूचना व निर्देशक फलक बसवून घेतले जातील. त्यानंतर धोरणाच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीला सुरुवात केली जाईल. वाहतुकीला अडथळे निर्माण करणाऱ्या वाहनांवर टोइंग व्हॅनद्वारे रस्त्यातील वाहने उचलून कारवाई केली जाणार आहे. याशिवाय सुरुवातीला मोटार वाहन कायदा १२२/ १७७ नुसार दंडात्मक कारवाया केल्या जात होत्या. आता त्या ठिकाणी न्यायालयीन खटलेसुद्धा भरले जाणार आहेत, जेणेकरून वाहनधारकांना शिस्त लागून वाहतूक नियमन करणे सोपे जाईल.

Story img Loader