गूगल मॅपवर अनेक अनपेक्षित गोष्टींचा शोध लागत असतो. मात्र, नुकतंच एका ‘रेडिट’ वापरकर्त्याला बर्फाळ महाद्वीप असलेल्या अंटार्क्टिकामध्ये एक विलक्षण दरवाजा दिसून आला आहे. हा दरवाजा जपानद्वारे चालवल्या जाणाऱ्या शोवा स्थानकाच्या अगदी आग्नेय दिशेला असल्याची माहिती आहे. या दरवाजाचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडिया वापरकर्त्यांद्वारे अनेक तर्क वितर्क लावले जात आहेत. हे गुप्त नाझींचे तळघर असल्यापासून तर स्टार ट्रेक शटलक्राफ्टपर्यंत अनेक अंदाज लावले जात आहेत. परंतु, हा दरवाजा नक्की बर्फाळ प्रदेशात आला कुठून? त्यामागची खरी कहाणी काय आहे? त्याविषयी जाणून घेऊ.

सोशल मीडियावर या दरवाजाविषयी लावण्यात येणारे तर्क-वितर्क

“६९°००’५०”एस ३९°३६’२२”ई,” या लोकेशन कोऑर्डिनेट्सवर ‘रेडिट’ वापरकर्त्याला हा दरवाजा सापडला असल्याचे त्याने सांगितले. त्याने सोशल मीडियावर छायाचित्र पोस्ट करत ‘अंटार्क्टिकातील भव्य दरवाजा?’ असे लिहिले. त्यानंतर वेगाने हे छायाचित्र सोशल मीडियावर पसरले. छायाचित्रात अंटार्क्टिकाच्या बर्फाळ विस्ताराचे उपग्रह दृश्य दिसून येते आणि त्यात दरवाजासारखा एक आयातीकृती भागही दिसून येतो. या असामान्य रचनेमुळे लोकांची उत्सुकता वाढली आहे. एका वापरकर्त्याने जानेवारीत झालेल्या धक्कादायक मिडएअर दुर्घटनेचा संदर्भ देत हा केवळ एक बोईंग दरवाजा असल्याचे सांगितले. काहींनी हे एक ‘वेकेशन होम’ असल्याचा दावा केला.

Fossilized dinosaur dung revealing Jurassic era secrets
Fossilized Dinosaur Dung: डायनासोरची विष्टा आणि उलटी सांगतेय त्याच्या अस्तित्त्वाची कथा; नवीन संशोधनाने ज्युरासिक कालखंडाचे कोणते रहस्य उलगडले?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
attack by a wild dog on a deer
‘शेवटी मरण चुकवता येत नाही…’ हरणावर जंगली कुत्र्याचा क्रूर हल्ला; VIDEO पाहून उडेल थरकाप
Devendra Fadnavis Nagpur visit cancelled
प्रथम १२, नंतर १३ आणि आता १५, फडणवीसांच्या नागपूर दौऱ्याचा मुहूर्त का लांबला ?
Nazca lines
Nazca Lines AI discovery: अत्याधुनिक AIने उलगडली प्राचीन कातळशिल्पं!
Rare book Exhibition organized by BNHS
बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीतर्फे दुर्मिळ पुस्तकांचे प्रदर्शन
Dinosaur, India Dinosaur, Dinosaur Extinction,
भारतातील डायनासोर नामशेष का झाले? समोर आलं महत्त्वाचं संशोधन…
Time Moves Faster on the Moon Than on Earth
चंद्र पृथ्वीपेक्षा अधिक वेगवान?; नवीन संशोधनाने उलगडले वेळेचे रहस्य!

हेही वाचा : ‘या’ भारतीय स्टार्टअप संस्थापकाने कर्मचाऱ्यांना केलं करोडपती, कसं केलं शक्य?

काही वापरकर्त्यांनी याला नाझींचे बंकर्स असल्याचे म्हटले, तर काहींनी हा एका गुप्त बर्फाळ शहरापर्यंत पोहोचण्याचा रस्ता असल्याचे सांगितले. अशा विलक्षण गोष्टी यापूर्वीही सापडल्या आहेत, त्याविषयीही अनेक अंदाज लावले गेले आहेत. उदाहरणार्थ, २०१६ मध्ये एका गूगल मॅप वापरकर्त्याला पिरॅमिडसारखा एक पर्वत दिसून आला होता; ही एक प्राचीन रचना असल्याचा दावा त्यावेळी करण्यात आला होता. परंतु, याबाबत करण्यात आलेले अनेक सिद्धांत नाकारण्यात आले होते. “हा केवळ एक पिरॅमिडसारखा दिसणारा पर्वत आहे,” असे कॅलिफोर्निया विद्यापीठाचे प्राध्यापक एरिक रिग्नॉट यांनी ‘लाइव्ह सायन्स’ला सांगितले होते.

‘न्यूयॉर्क पोस्ट’च्या मते, रहस्यमय दरवाजा खरोखरच एक हिमखंड आहे. (छायाचित्र-रॉयटर्स)

या रहस्यमयी दरवाजामागील सत्य काय?

‘न्यूयॉर्क पोस्ट’च्या मते, हा रहस्यमय दरवाजा खरोखरच एक हिमखंड आहे. न्यूकॅसल विद्यापीठातील ग्लेशियोलॉजीचे प्राध्यापक बेथान डेव्हिस यांनी ‘गूगल अर्थ प्रो’वरील समन्वयांचे पुनरावलोकन केले आणि ऐतिहासिक प्रतिमा पाहिल्या, त्यानंतर त्यांनी प्रकाशनाला सांगितले, “हा एक हिमखंड आहे, जो जमिनीवर पडला आहे आणि अडकला आहे. आता हा हिमखंड वितळत आहे, त्यामुळे त्याचा आकार आयताकृती असल्याचे दिसून येत आहे.” ते पुढे म्हणाले, “तुम्ही या भागात इतर अनेक हिमखंड पाहू शकता.”

दरम्यान, लीसेस्टर विद्यापीठातील ज्वालामुखी शास्त्रज्ञ प्रोफेसर जॉन स्मेली यांनीदेखील ‘डेली मेल’ला सांगितले, “बर्फ वितळत असल्यामुळे तसा एक आकार तयार झाल्यासारखे मला दिसते.” त्यांनी स्पष्ट केले की, या हिमखंडाचा दरवाजासारखा आकार हवेची दिशा दर्शवते, म्हणजेच ज्या दिशेने हवा वाहते, त्या दिशेने बर्फ जमतो; त्यामुळे तिथे दरवाजाची आकृती तयार झाली आहे.

हेही वाचा : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष केवळ आठ वर्षे सत्तेवर का राहू शकतात? काय आहेत नियम?

दरवाजा नाही तर दरवाजाचा आकार

इम्पीरियल कॉलेज लंडनचे प्राध्यापक मार्टिन सिगर्ट यांनी बर्फाच्या नैसर्गिक हालचालींमुळे म्हणजेच वारा, वितळणारा बर्फ आदींमुळे दरवाजासारखी आकृती तयार झाल्याचे सांगितले आहे. “हा एक सामान्य बर्फ प्रवाहाचा नमुना आहे,” असे सिगर्ट यांनी ‘डेली मेल’ला स्पष्ट केले. “दरवाजाच्या दोन्ही बाजूला असलेला बर्फ वाऱ्याची दिशा दर्शवते. येथे असामान्य काहीही नाही, ही केवळ एक नैसर्गिक प्रक्रिया आहे,” असे ते म्हणाले.

Story img Loader