इंडियन प्रिमिअर लीग २०२२ स्पर्धेत दिनेश कार्तिकची बॅट चांगलीच तळपत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी दिनेश कार्तिक हा एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून उदयास आला आहे. बंगळुरूने दिनेश कार्तिकला लिलावात अवघ्या ५.५ कोटी रुपयांमध्ये आपल्या ताफ्यात घेतलं असून निर्णय योग्य ठरला आहे. दिनेश कार्तिकने आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर संघाला या स्पर्धेत अनेक सामने जिंकून दिले आहे. यासाठी त्याला या मोसमातील सर्वोत्तम फिनिशर म्हटलं जात आहे. ३६ वर्षीय कार्तिक आपल्या कामगिरीमुळे पुन्हा एकदा टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी दार ठोठावत आहे. आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेत खेळून संघाला विजय मिळवून देण्याची इच्छा खुद्द कार्तिकने व्यक्त केली आहे. कार्तिक अलीकडेच जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत समालोचन करताना एका नव्या भूमिकेत दिसला. यानंतर आयपीएलच्या मेगा लिलावात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने त्याला सामील केले.

दिनेश कार्तिकच्या जबरदस्त पुनरागमन पाहता चाहत्यांनी त्याचे कौतुक केले. पण असं असताना दिनेश कार्तिकशी संबंधित एक मॅसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर ‘वेळ सगळ्यांची येते, फक्त संयम ठेवा’ या शीर्षकाखाली एक मेसेज व्हायरल होत आहे. यामध्ये दिनेश कार्तिकच्या कमबॅकची गोष्ट सांगितली आहे. त्याच्या वैयक्तिक आयुष्यात कशी उलथापालथ झाली आणि त्याने कसं पुनरागमन केलं याचं वर्णन केलं आहे. पहिल्या पत्नीपासून त्याने घटस्फोट कसा घेतला, तामिळनाडू संघाचे कर्णधारपद कसं हिसकावले, महेंद्रसिंग धोनीमुळे कसं संघातून वगळण्यात आले आणि नंतर त्याने आयपीएलमध्ये कसं पुनरागमन केलं याचा घटनाक्रम लिहिला आहे. मात्र या व्हायरल मॅसेजमध्ये कोणतंच तथ्य नसल्याचं समोर आलं आहे.

Sachin Tendulkar Can Play Domestic Cricket at 40 Why Cant Rohit Sharma and Virat Kohli Fans Ask Questions After Flop Show in IND vs NZ Test
IND vs NZ: “सचिन तेंडुलकर ४० व्या वर्षी…”, न्यूझीलंडविरूद्ध अपयशी ठरलेल्या रोहित-विराटला सचिनचं उदाहरण देत चाहत्यांचा तिखट सवाल
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
IND vs NZ Tom Latham reaction after the historic win
IND vs NZ : ऐतिहासिक विजयानंतर टॉम लॅथम भारावला, ‘या’ दोन खेळाडूंना दिले विजयाचे श्रेय
indian team poor performance against new zealand
न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघाला अतिआक्रमकतेचा फटका? गंभीरच्या धाडसी निर्णयाचा पुनर्विचार आवश्यक आहे का?
Virat Kohli worst shot of his career against Mitchell Santner video viral
Virat Kohli : विराट कोहली फुलटॉसवर त्रिफळाचीत; चाहते अवाक, सोशल मीडियावर चर्चेला उधाण,VIDEO व्हायरल
Washington Sundar credit given Ashwin in IND vs NZ Pune Test Performance
Washington Sundar : वॉशिंग्टन सुंदरने कोणाच्या मदतीने घेतल्या सात विकेट्स? कर्णधार किंवा प्रशिक्षकला नव्हे, ‘या’ खेळाडूला दिले श्रेय
eknath shinde attack uddhav thackeray
आपटीबार : हल्ला पुरे!
IND vs NZ Sarfaraz Urges Rohit for DRS
IND vs NZ : सर्फराझच्या हट्टाने भारताला मिळवून दिली विकेट, रोहितकडे DRS घेण्यासाठी आग्रह करतानाचा VIDEO व्हायरल

क्रिकेट तज्ज्ञांनी सांगितली वस्तुस्थिती

दिनेश कार्तिक संबंधित व्हायरल होत असलेल्या मेसेजचं सत्य क्रिकेट तज्ज्ञांनी जाणून घेतलं आहे. क्रिकेटबाबत माहिती देणाऱ्या अमित सिन्हा यांनी या मेसेजची सत्यता पडताळून वास्तव सांगितलं आहे. अमित सिन्हा यांनी सोशल मीडियावर व्हायरल मेसेजमधील एक एक मुद्दे खोडून काढले आहेत. २०११ मध्ये दिनेश कार्तिकऐवजी मुरली विजयला कर्णधार बनवण्यात आले होते, असं व्हायरल मेसेजमध्ये आहे. मात्र त्यावेळी लक्ष्मीपती बालाजीला कर्णधार बनवण्यात आले होते. अगदी उलट मुरली विजयच्या जागी दिनेश कार्तिकला पहिला कर्णधार बनवण्यात आले होते. याशिवाय २०१२ च्या दौऱ्यात दिनेश कार्तिकला संघातून वगळण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र, तो २०१० पासून संघाबाहेर होता, त्यावेळी विश्वचषकाची वेळ होती, त्यामुळे त्याला संघात स्थान मिळाले नव्हते. २०१३ मध्ये दिनेश कार्तिकने संघात पुनरागमन केलं आणि १५ सामने खेळला.

रणजी स्पर्धेबाबत केलेला दावाही खोटा असल्याचं सिद्ध झालं आहे. दिनेश कार्तिकने २०१२ च्या पर्वात तामिळनाडूसाठी ५७७ धावा केल्या. त्याची सरासरी ६४ होती. व्हायरल मॅसेजमध्ये दिनेश कार्तिक या काळात डिप्रेशन-ड्रगचा बळी ठरला होता, असं लिहिलं आहे. दिनेश कार्तिक आयपीएलमधून बाहेर असल्याचा दावाही चुकीचा ठरला आहे, कारण २०१२ ते २०१५ दरम्यान दिनेश कार्तिक जवळपास प्रत्येक सामना खेळला आहे. या दरम्यान त्याने चांगल्या धावा केल्या आहेत.

दिनेश कार्तिक आयपीएल २०२२ चांगली कामगिरी करत आहे. या मोसमात आतापर्यंत १२ सामन्यांमध्ये २७४ धावा केल्या असून, त्याची सरासरी ६८.५० इतकी आहे. दिनेश कार्तिक १२ डावांपैकी ८ डावात नाबाद राहिला आहे. तर त्याने आतापर्यंत २१ चौकार आणि २१ षटकार मारले आहेत. दिनेश कार्तिकने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत भारतासाठी २६ कसोटी सामने खेळले असून त्याच्या नावावर १०२५ धावा आहेत. तर ९४ एकदिवसीय सामन्यांमध्ये १७५२ धावा आणि ३२ टी-२० सामन्यात ३९९ धावांची नोंद आहे.