इंडियन प्रिमिअर लीग २०२२ स्पर्धेत दिनेश कार्तिकची बॅट चांगलीच तळपत आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी दिनेश कार्तिक हा एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून उदयास आला आहे. बंगळुरूने दिनेश कार्तिकला लिलावात अवघ्या ५.५ कोटी रुपयांमध्ये आपल्या ताफ्यात घेतलं असून निर्णय योग्य ठरला आहे. दिनेश कार्तिकने आपल्या दमदार कामगिरीच्या जोरावर संघाला या स्पर्धेत अनेक सामने जिंकून दिले आहे. यासाठी त्याला या मोसमातील सर्वोत्तम फिनिशर म्हटलं जात आहे. ३६ वर्षीय कार्तिक आपल्या कामगिरीमुळे पुन्हा एकदा टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी दार ठोठावत आहे. आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेत खेळून संघाला विजय मिळवून देण्याची इच्छा खुद्द कार्तिकने व्यक्त केली आहे. कार्तिक अलीकडेच जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत समालोचन करताना एका नव्या भूमिकेत दिसला. यानंतर आयपीएलच्या मेगा लिलावात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने त्याला सामील केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा