तामिळनाडू सरकारने राज्याच्या सीमेवर आरोग्यविषयक देखरेख वाढवली आहे. केरळमध्ये ‘टोमॅटो फ्लू’च्या (Tomato Flu) रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून येऊ लगाल्याने तामिळनाडू सरकारने खबरदाराचा उपाय म्हणून हा निर्णय घेतलाय. हा ताप आल्यानंतर अंगावर लाल रंगाच्या फोड्या येत असल्याने या तापाला टोमॅटो फ्लू असं नाव देण्यात आलंय. कोईम्बतूरमध्ये या टोमॅटो फ्लूने प्रशासनाबरोबरच सर्वसामान्यांचीही चिंता वाढवलीय. त्यामुळेच तामिळनाडू आणि केरळच्या सीमेवर आरोग्य अधिकारी तैनात करण्यात आले असून केरळमधून येणाऱ्या व्यक्तींची तपासणी करुनच त्यांना राज्यात प्रवेश दिला जातोय. मात्र तामिळनाडू सरकारने धसका घेतलेला हा टोमॅटो फ्लू नेमका आहे तरी काय हे पाहूयात…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोइम्बतूरचे मुख्य आरोग्य निर्देशक डॉक्टर पी अरुणा यांनी द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या माहितीनुसार, “तीन तुकड्यांना नियुक्त करण्यात आलं आहे. यामध्ये रेव्हेन्यू इनस्पेक्टर, आरोग्य निर्देशक आणि पोलीस यांचा समावेश असून शिफ्टनुसार त्यांना नियुक्त करण्यात आलंय. एखाद्या व्यक्तीला ताप किंवा फोड्यांचा त्रास होत असेल तर त्याची नोंद हे अधिकारी घेणार आहेत.”

टोमॅटो फ्लूची लक्षणं काय?
डॉक्टर अरुणा यांनी दिलेल्या माहितीनुसार टोमॅटो फ्लूचा त्रास पाच वर्षांहून कमी वयाच्या मुलांना होता. या तापाची लक्षणं म्हणजे अंगावर पुरळं येणं, खाज येणं, डायरिया ही आहेत. अनेक अहवालांनुसार टोमॅटो फ्लूचा त्रास जाणवू लागला की थकवा जाणवं, सांधेदुखी, पोटदुखी, उलट्या, खोकला, शिंका येणं, वाहतं नाक, ताप येणं, अंगदुखी यासारखी लक्षणं दिसू लागतात. काही प्रकरणांमध्ये पायाच्या आणि हाताच्या त्वचेचा रंगही बदलतो.

“या फ्लूवर असं विशिष्ट औषध नाहीय,” असं डॉक्टर अरुणा यांनी म्हटलंय. म्हणजेच योग्य काळजी घेतल्यास त्रास कमी होऊन हा ताप हळूहळू कमी होतो असं डॉक्टरांना निर्देशित करायचं आहे.

काय काळजी घ्यावी?
फ्लू म्हणजेच तापाच्या इतर साथींप्रमाणे टोमॅटो फ्लूसुद्धा संसर्गजन्य आहे. “एखाद्याला याची लागण झाली तर त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवणं आवश्यक आहे. कारण हा ताप लगेच एकाकडून दुसऱ्यालाही होऊ शकतो,” असं डॉक्टर अरुणा सांगतात. या फ्लूमुळे अंगावर आलेलं पुरळ आणि फोड्यांच्या इथे मुलांनी सतत खाजवू नये याची काळजी घेणं आवश्यक आहे. योग्य आराम आणि स्वच्छता या दोन गोष्टींची काळजी घ्यावी. भांडी, कपडे आणि संसर्ग झालेल्या व्यक्तीने वापरलेल्या इतर गोष्टी सॅनेटाइज करुनच घ्याव्यात. या माध्यमातून संसर्गावर आळा घालता येतो असं डॉक्टर सांगतात.

डिहायड्रेशनवर मात करण्यासाठी द्रव्य स्वरुपामध्ये जास्तीत जास्त गोष्टी रुग्णांना द्याव्यात. वरील पैकी कोणतीही लक्षणं दिसून आल्यास यासंदर्भात आपल्या फॅमेली डॉक्टरांचा सल्ला घ्यावा आणि मगच उपचार सुरु करावेत.

तामिळनाडूमध्ये काय काळजी घेण्यात आलीय?
रेव्हेन्यू, आरोग्य आणि पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश असणाऱ्या टीम वलयार चेकपोस्टवर तैनात करण्यात आल्यात. ही चेकपोस्ट तामिळनाडू आणि केरळच्या सीमेवर आहे. कोइम्बतरू जिल्हा प्रशासनाने २४ तास या सीमेवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी तैनात केलेत. एखाद्या व्यक्तीला ताप किंवा पुरल अशी समस्या असल्याच त्यांनी नोंद या ठिकाणी केली जाणार आहे.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is tomato flu who does it affect scsg