UGC-NET 2024 मंगळवारी (१८ जून) विद्यापीठ अनुदान आयोग-राष्ट्रीय पात्रता परीक्षा (यूजीसी नेट) ही परीक्षा पार पडली. त्याच्या दुसर्‍याच दिवशी म्हणजे बुधवारी शिक्षण मंत्रालयाने परिपत्रक काढत ही परीक्षा रद्द केली. केंद्रीय गृह मंत्रालयाला या परीक्षेत अनियमितता आढळून आली. मंत्रालयाच्या अखत्यारीत येणार्‍या भारतीय सायबर क्राइम को-ऑर्डिनेशन सेंटरच्या नॅशनल सायबर क्राईम थ्रेट ॲनालिटिक्स युनिटला परीक्षेविषयी महत्त्वपूर्ण माहिती प्राप्त झाली; ज्यानंतर परीक्षा रद्द करण्यात आली. परीक्षा रद्द झाल्यामुळे या वर्षी परीक्षेला बसलेल्या नऊ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना मोठा फटका बसला आहे. या निर्णयाला विद्यार्थी संघटनांनी विरोध दर्शविला आहे. आता विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा परीक्षा द्यावी लागणार आहे.

काही दिवसांपूर्वी नीट-यूजीचे कथित पेपर लीक प्रकरण समोर आल्यानंतर वाढीव गुण देण्यात आलेल्या १,५६३ विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा द्यावी लागेल हा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता यूजीसी नेट परीक्षेतही असेच काहीसे घडल्याने देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. यूजीसी नेट परीक्षा कशी असते? ही परीक्षा कोण घेते? परीक्षेची रचना काय आणि कोण या परीक्षेसाठी पात्र ठरते? याविषयी सविस्तर जाणून घेऊ या.

schedule for postgraduate medical admissions announced after changing eligibility criteria
पात्रता निकष बदलल्यानंतर वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठीचे वेळापत्रक जाहीर
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
Mumbai Municipal Corporation , Class two Test,
मुंबई : स्वयंअध्ययनातील निपुणतेसाठी दुसरीच्या विद्यार्थ्यांची चाचणी
Idol exam today but some students don't have admit cards for exam Mumbai
‘आयडॉल’ची आज परीक्षा; मात्र काही विद्यार्थ्यांच्या हातात ‘प्रवेशपत्र’च नाही; मुंबई विद्यापीठाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह, परीक्षा केंद्रांवर संभ्रमाचे वातावरण
nta decides to postponed ugc net exam date due to festivals
‘यूजीसी-नेट’ परीक्षा लांबणीवर, एनटीएचा निर्णय
MPSC announced that it will now conduct screening exams for 33 posts of various types
मोठी बातमी: ‘एमपीएससी’कडून तब्बल ३३ पदांच्या चाळणी परीक्षेसाठी…
Maharashtra Board s Class 12admit card will be available online from Friday January 10
राज्य मंडळाकडून बारावीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र उपलब्ध
upsc exam preparation tips,
यूपीएससीची तयारी : सीसॅट पेपर

हेही वाचा : मक्कामध्ये एक हजार हज यात्रेकरूंचा मृत्यू, मृतांमध्ये ६८ हून अधिक भारतीय; यात्रेकरूंच्या मृत्यूला जबाबदार कोण?

यूजीसी नेट म्हणजे काय आणि ही परीक्षा कोण घेते?

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए)द्वारे यूजीसी नेट परीक्षा घेतली आते. ही परीक्षा वर्षातून दोनदा म्हणजेच जून आणि डिसेंबरमध्ये घेतली जाते. नॅशनल टेस्टिंग एजन्सी जेईई, नीट-यूजी व सीयूईटीसारख्या सार्वजनिक परीक्षादेखील घेते. एनटीए डिसेंबर २०१८ पासून यूजीसी नेट परीक्षा घेत आहे. याआधी ही परीक्षा सीबीएसईकडून घेतली जात होती. १९८९ पासून सहायक प्राध्यापक पदासाठी उमेदवारांची पात्रता निश्चित करण्यासाठी म्हणून ही यूजीसी नेट परीक्षा घेतली जात आहे. यूजीसीच्या नियमांनुसार सहायक प्राध्यापक व्हायचे असल्यास किंवा पीएचडीमध्ये प्रवेश हवा असल्यास, यूजीसी नेट परीक्षेत उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.

१९८४ पासून ज्युनियर रिसर्च फेलोशिप (जेआरएफ) मंजूर करण्यासाठी यूजीसी नेट परीक्षा देणे आवश्यक आहे. कनिष्ठ संशोधन फेलोशिपसाठी पात्र ठरलेल्या अभ्यास आणि संशोधन करीत असलेल्या विद्यार्थ्यांना भारत सरकारकडून आर्थिक साह्य प्रदान केले जाते. नेट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांपैकी केवळ सहा टक्के विद्यार्थीच रिसर्च फेलोशिपसाठी पात्र ठरतात.

पीएचडी प्रवेशासाठीही यूजीसी नेट परीक्षेचे गुण पाहिले जातात. आधी पीएचडीसाठीचा प्रवेश विद्यापीठे आणि संस्थांच्या स्वतःच्या प्रवेश परीक्षांवर आधारित असायचा. मात्र, नवीन प्रणालीअंतर्गत पीएचडी प्रवेश नेट परीक्षेत मिळालेले गुण आणि मुलाखतीत मिळालेले गुण या दोन्हींवर आधारित असतो.

परीक्षेची रचना कशी असते आणि या परीक्षेसाठी कोण पात्र आहे?

तीन तास चालणाऱ्या या परीक्षेत दोन पेपर्स असतात; ज्यात बहुपर्यायी प्रश्न असतात. या परीक्षेत नकारात्मक मार्किंग नसते. पहिला पेपर १०० गुणांचा असतो; जो सर्वांसाठी सामान्य असतो. या पेपरद्वारे अध्यापन आणि संशोधन योग्यतेचे मूल्यांकन केले जाते. दूसरा पेपर २०० गुणांचा असतो; जो विशिष्ट विषयाचा असतो. त्यात उमेदवार सहसा पदव्युत्तर शिक्षणाचा विषय निवडतात. दुसर्‍या पेपरसाठी भाषा, इतिहास, कायदा, मानववंशशास्त्र, संगीत, तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र, भूगोल व तुलनात्मक साहित्य यासह एकूण ८३ विषयांचे पर्याय दिले जातात. दुसरा पेपर हा उमेदवारांच्या त्यांच्या दिलेल्या विषयातील प्रवीणतेचे मूल्यांकन करण्यासाठी आहे.

डिसेंबर २०१८ पासून एनटीए संगणक-आधारित चाचणी म्हणून यूजीसी नेट परीक्षा आयोजित करत आहे. या वर्षीची परीक्षा ओएमआर शीट वापरून पेन आणि पेपरची होती. केंद्रांच्या उपलब्धतेनुसार संगणक-आधारित चाचणी अनेक दिवसांत आणि अनेक शिफ्टमध्ये घेण्यात आली. उदाहरणार्थ, गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये जेव्हा यूजीसी नेट आयोजित करण्यात आली होती, तेव्हा ही परीक्षा १५ शिफ्टमध्ये आठ दिवसांत घेण्यात आली होती. त्याउलट पेन आणि पेपर चाचणी १८ जूनला एकाच दिवशी दोन शिफ्टमध्ये सकाळी ९.३० ते १२.३० आणि दुपारी ३ ते ६ या वेळेत घेण्यात आली.

यूजीसी नेटला बसण्यासाठी सामान्य श्रेणीतील उमेदवारांना त्यांच्या पदव्युत्तर पदवी परीक्षेत किमान ५५ टक्के गुण मिळालेले असणे आवश्यक आहे; तर एससी, एसटी, ओबीसी व अपंग उमेदवारांना त्यांच्या पदव्युत्तर पदवी परीक्षेत ५० टक्के गुण मिळालेले असणे आवश्यक आहे. या वर्षाच्या सुरुवातीला यूजीसीने सांगितले होते की, ज्या उमेदवारांनी चार वर्षांचा पदवीपूर्व पदवी अभ्यासक्रम उत्तीर्ण केला आहे, त्यांना किमान ७५ टक्के गुण असल्यास तेदेखील नेट परीक्षेसाठी बसू शकतात. सहायक प्राध्यापक पदांसाठी आणि पीएचडी प्रवेशासाठी यूजीसी नेट परीक्षा देण्याला कोणतीही वयोमर्यादा नाही. परंतु, जेआरएफसाठी ३० वर्षे वयोमर्यादा आहे.

हेही वाचा : पुरुषांच्या अंडकोषानंतर आता लिंगातही आढळले प्लास्टिक; इरेक्टाईल डिसफंक्शनचा धोका वाढला का?

किती लोक परीक्षा देतात आणि किती पात्र ठरतात?

या वर्षी या परीक्षेला सुमारे ९,०८,५८० उमेदवार ३१७ शहरांमधील १२०५ केंद्रांवर बसले होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत हो संख्या दुप्पट होती. गेल्या वर्षी जूनमध्ये परीक्षेला १८१ शहरांमधील ४,६२,१४४ उमेदवार या परीक्षेला बसले होते; तर गेल्या वर्षीच्या डिसेंबरमध्ये २९२ शहरांमधून ६,९५,९२८ उमेदवारांनी ही परीक्षा दिली होती. पण, परीक्षेला बसणार्‍या उमेदवारांच्या संख्येच्या तुलनेत उत्तीर्ण होणार्‍यांची संख्या फार कमी आहे. गेल्या जूनमध्ये सहायक प्राध्यापक पदासाठी ३२,३०४ उमेदवार पात्र ठरले; तर ४,९३७ उमेदवार जेआरएफसाठी पात्र ठरले. कट-ऑफ गुण सहायक प्राध्यापक पदासाठी आणि जेआरएफसाठी विषय व श्रेणीनुसार घोषित केले जातात.

Story img Loader