पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी (१७ डिसेंबर) वाराणसी येथे ‘विकसित भारत संकल्प यात्रेबाबत’ महत्त्वाचं वक्तव्य केलं. “विकास भारत संकल्प यात्रा माझ्यासाठी मैलाचा दगड आहे. मी जे काही बोललो, मी जे काही केले ते सर्व मला हवे होते तसे झाले आहे का? ज्यांच्यासाठी ते केलं तो हेतू साध्य झाला आहे का? हे मला मोजायचे आहे,” असं मत मोदींनी व्यक्त केलं. तसेच विकास भारत संकल्प यात्रा हे एक मोठे स्वप्न आहे, एक मोठा संकल्प आहे आणि हा संकल्प आपण स्वतःच्या प्रयत्नाने पूर्ण केला पाहिजे, असंही नमूद केलं.

पंतप्रधान मोदी त्यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. सोमवारी ते सेवापुरीतीस बर्की ग्रामसभेत विकसित भारत संकल्प यात्रा कार्यक्रमात सहभागी झाले. तेथे त्यांनी वाराणसी आणि पूर्वांचलसाठी १९ हजार १५५ कोटी रुपयांच्या ३७ प्रकल्पांची पायाभरणी केली. या दौऱ्यात मोदी काशी तमिळ संगमच्या दुसऱ्या आवृत्तीचे उद्घाटनही करतील. एकूणच विकसित भारत संकल्प यात्रा म्हणजे काय? काशी तमिळ संगम म्हणजे काय? याचा हा आढावा…

Ladakh Activist Sonam Wangchuk
‘हिमालय धोरणा’ची हाक दिल्लीस ऐकू जाते का?
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
Loksatta lokrang A disturbing story in the medical field
वैद्याकीय क्षेत्रातली अस्वस्थ करणारी कहाणी
Ratan Tata
‘टाटा’असणं हीच जबाबदारीची जाणीव
navratri tradition india
लोकसंस्कृतीचा जागर!
‘ताल’च्या क्लायमॅक्स शूटिंगपूर्वी अनिल कपूरने का घेतली होती रेकी! तज्ज्ञांकडून जाणून घ्या, रेकी म्हणजे काय?
India freedom movement book Dethroned Patel Menon and the Integration of Princely India
एकसंध भारत घडताना…
World Tourism Day 2024, Tourism,
पर्यटन म्हणजे निव्वळ उपभोग नव्हे, समृद्ध होणे आणि तेथील समृद्धी जपणेही महत्त्वाचे!

विकसित भारत संकल्प यात्रा

विकसित भारत संकल्प यात्रा हा एक सरकारी उपक्रम आहे. आयुष्मान भारत, उज्ज्वला योजना, पीएम सुरक्षा विमा, पीएम स्वनिधी इत्यादी प्रमुख केंद्रीय योजनांबद्दल नागरिकांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि त्या योजनांच्या अंमलबजावणीचा पाठपुरावा करण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

विकसित भारत संकल्प यात्रेची चार उद्दिष्टे

या योजनेच्या सरकारी संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार या उपक्रमाचे चार उद्दिष्टे आहेत. विविध योजनांसाठी पात्र असलेल्या परंतु आतापर्यंत लाभ घेतलेला नाही अशा वंचित लोकांपर्यंत पोहोचणे, योजनांच्या माहितीचा प्रसार आणि योजनांबद्दल जागरूकता निर्माण करणे. सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी वैयक्तिक संवाद करून त्यांचे अनुभव जाणून घेणे आणि यात्रेदरम्यान जमा झालेल्या माहितीच्या आधारे संभाव्य लाभार्थ्यांची नोंदणी करणे, या उद्दिष्टांचा यात समावेश आहे. केंद्र सरकारची वेगवेगळी मंत्रालये आणि राज्य सरकारांच्या सक्रिय सहभागाने हा कार्यक्रम राबवला जात आहे.

यात्रा १५ नोव्हेंबरला झारखंडमधील खुंटी येथून सुरू

पंतप्रधान मोदींनी १६ डिसेंबरला राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या नुकत्याच विधानसभा निवडणुका पार पडलेल्या पाच राज्यांमध्ये या यात्रेला हिरवा झेंडा दाखवला. देशातील इतर राज्यांमध्ये याआधीच या यात्रेला सुरुवात झाली होती. मात्र, निवडणुकीपूर्वी आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने या पाच राज्यांमध्ये या उपक्रमाची अंमलबजावणी झाली नव्हती. ही यात्रा १५ नोव्हेंबरला झारखंडमधील खुंटी येथून सुरू करण्यात आली होती.

यात्रा २.५० कोटींहून अधिक नागरिकांपर्यंत पोहोचली

सरकारच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोनुसार, फक्त एका महिन्याच्या अल्पावधीत ही यात्रा देशातील ६८ हजार ग्रामपंचायतींमध्ये आणि २.५० कोटींहून अधिक नागरिकांपर्यंत पोहोचली आहे. पुढे, जवळपास २ कोटी लोकांनी विकसित भारत संकल्प घेतला आहे आणि २ कोटींहून अधिक लाभार्थ्यांनी ‘मेरी कहानी मेरी जुबानी’ उपक्रमांतर्गत त्यांचे अनुभव शेअर केले आहेत. लोक योजनेच्या वेबसाइटवर एक फॉर्म भरून आणि नंतर प्रमाणपत्र डाउनलोड करून ‘संकल्प’ (प्रतिज्ञा) घेऊ शकतात.

काशी तमिळ संगम

काशी तमिळ संगम उपक्रम मागील वर्षीपासून सुरू झाला आहे. या उपक्रमाचा उद्देश उत्तर आणि दक्षिण भारताचे ऐतिहासिक आणि सभ्यतेशी संबंधित अनेक पैलूंचा उत्सव करणे हा आहे. यावर्षी हा उपक्रम १७ डिसेंबर ते ३१ डिसेंबर दरम्यान होणार आहे. काशीमध्ये तामिळनाडू आणि वाराणसीतील विविध सांस्कृतिक गट सादरीकरण करणार आहेत.

काशी आणि तामिळनाडूतील बंध पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न

पीआयबीनुसार लोकांना जोडणाऱ्या या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश काशी आणि तामिळनाडूतील प्राचीन भारतातील शिक्षण आणि संस्कृतीची दोन महत्त्वाची केंद्रांमधील बंध पुनरुज्जीवित करणे हा आहे. ज्ञान आणि संस्कृतीच्या या दोन परंपरांना जवळ आणणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. दोन्ही संस्कृतींमधील प्राचीन बौद्धिक, सांस्कृतिक, अध्यात्मिक आणि कलाविषयक संबंध पुन्हा शोधणे आणि मजबूत करणे हाही याचा उद्देश आहे.

या कार्यक्रमासाठी तामिळनाडू आणि काशी येथील कला आणि संस्कृती, हातमाग, हस्तकला, पाककृती यांचे स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. आधुनिक शोध, व्यवसाय आणि पुढील पिढीचे तंत्रज्ञानासह साहित्य, प्राचीन ग्रंथ, तत्त्वज्ञान, अध्यात्म, संगीत, नृत्य, नाटक इत्यादी विषयांवर चर्चासत्र, व्याख्यानांचे आयोजन केले जाईल.

कार्यक्रमासाठी ‘गंगा’ नावाचा तमिळनाडूतील विद्यार्थ्यांचा पहिला गट रविवारी काशीला पोहोचला. शिक्षकांचा यमुना नावाचा गट, व्यावसायिकांचा गोदावरी, आध्यात्मिक सदस्यांचा सरस्वती, शेतकरी आणि कारागीरांचा नर्मदा, लेखकांचा सिंधू आणि व्यापारी व व्यावसायिकांचा कावेरी नावाचा गट असे आणखी सहा गट येत्या काही दिवसांत काशीला पोहोचणार आहेत.