सध्या पंजाबसह अन्य राज्यांमध्ये ‘व्हिसा शॉपिंग’ हा पर्याय लोकप्रिय होत आहे. ट्रॅव्हल कंपन्या आपल्या ग्राहकांना ‘व्हिसा शॉपिंग’चा पर्याय देताना दिसतात. खासकरून व्हिसा शॉपिंग युरोपियन राष्ट्रांमध्ये जाऊ इच्छिणाऱ्या प्रवाशांच्या गळी उतरवले जाते. पण ‘व्हिसा शॉपिंग’ म्हणजे काय? युरोपियन राष्ट्रांकरिता असणारे त्याचे महत्त्व, त्यासंबंधीच्या कायदेशीर बाबी-परिणाम जाणून घेऊया…

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हिसा शॉपिंग म्हणजे काय?

व्हिसा शॉपिंग म्हणजे एका ठराविक कालावधीत, व्हिसा असतानाच्या काळात वेगवेगळ्या देशांना भेट देऊ शकतात.असे व्हिसा लोकांना त्यांच्या पसंतीच्या देशांमध्ये, विशेषतः युरोपमध्ये फिरण्यासाठी महत्त्वाचा ठरतो. व्हिसा शॉपिंगमुळे ज्या लोकांना सध्या त्यांच्या पसंतीच्या शहराला भेट द्यायची नाहीये, पण काही काळाने जाऊ इच्छितात, अशांना त्यावेळी लवकर व्हिसा मिळू शकतो. कारण, व्हिसा प्रक्रियेला बराच वेळ लागतो. अर्ज, छाननी, मुलाखत याला वेळ लागतोच, तर कधीकधी व्हिसा रद्ददेखील होऊ शकतो. व्हिसा शॉपिंगमुळे व्हिसा काही वर्षांसाठी वैध राहतो.

हेही वाचा : आझम खान खोट्या कागदपत्रप्रकरणी दोषी; बनावट जन्मप्रमाणपत्र प्रकरणी कोणती शिक्षा होते ?

युरोपमधील एका देशाचा व्हिसाधारक दुसऱ्या देशाचा व्हिसा न घेता त्या देशात प्रवास करू शकतो का ?

पंजाबमध्ये ट्रॅव्हल एजन्सी ग्राहकांना ‘शॅन्गन व्हिसा’चा पर्याय उपलब्ध करून देत आहेत. या व्हिसा अंतर्गत प्रवाशांना प्रत्येक देशाच्या स्वतंत्र व्हिसा घेण्याची गरज नसते. अनेक युरोपीय देश फिरू इच्छिणाऱ्या लोकांसाठी ‘शॅन्गन व्हिसा’ सुवर्णसंधीच ठरतो. युरोपीय देशांमधील कराराद्वारे, १९८५ मध्ये ‘शॅन्गन’ प्रणाली निर्माण करण्यात आली. या करारांतर्गत सदस्य देश ‘शॅन्गन’ क्षेत्र ठरवतात. जे देश ‘शॅन्गन’अंतर्गत असतात, त्या देशांमध्ये फिरण्यासाठी लोकांना कोणत्याही सीमांच्या मर्यादा नसतात. त्यातील एका देशाचा व्हिसा घेऊन लोक शेंगेन क्षेत्रातील अन्य देशांमध्ये फिरू शकतात. शॅन्गन क्षेत्रामध्ये प्रवासी २४ पेक्षा जास्त देशांमध्ये मुक्तपणे फिरू शकतात.हा व्हिसा प्रवाशांना कमी कालावधीच्या मुक्कामाचीही परवानगी देतो.
जालंधर येथील एका ट्रॅव्हल एजंटने द इंडियन एक्सप्रेसला सांगितल्यानुसार, ‘शॅन्गन व्हिसा’ची मुख्य कल्पना सरळ-सोपी आहे. जर्मनी, फ्रान्स, इटली, लाटव्हिया, माल्टा, आइसलँड, स्लोव्हेनिया, लक्झेंबर्ग, हंगेरी, पोलंड इत्यादीसारख्या शेंजेन प्रदेशातील एका देशाचा व्हिसा मिळवा, आणि दुसर्‍या शेंजेन प्रदेशातील देशांमध्ये फिरा. ”

हेही वाचा : इस्रायलच्या सैन्यात अरब लोकांचा समावेश कसा झाला ? कोण आहेत बेड्वन सैनिक ?


बरेच लोक गुंतागुंतीची अर्ज प्रक्रिया नसलेल्या देशाच्या व्हिसाचा पर्याय निवडतात. एकदा तो मंजूर झाल्यानंतर प्रवासी शेंजेन क्षेत्रातील अन्य देशांमध्ये फिरू शकतात आणि आवडीच्या ठिकाणी राहू शकतात. एका इमिग्रेशन व्यावसायिकाने सांगितले की, “’व्हिसा शॉपिंग’मध्ये शेंजेन व्हिसा सर्वाधिक मागणी असलेला व्हिसा आहे.
‘शॅन्गन व्हिसा’ फायदेशीर असल्यामुळे त्याची मागणी अधिक आहे. ‘शॅन्गन व्हिसा’च्या वैशिष्ट्यांबाबत सांगताना एका कंपनीने दोन प्रकरणे उदाहरणादाखल सांगितली. एकाला त्याच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी स्पेनला जायचे होते, पण त्याचा स्पॅनिश व्हिसा दोन वेळा नाकारण्यात आला होता. त्याने ‘शॅन्गन व्हिसा’अंतर्गत दुसऱ्या देशाचा व्हिसा मिळवला आणि तो स्पेनला गेला. एका विद्यार्थ्याला जर्मन व्हिसा हवा होता, पण काही कारणास्तव तो नाकारण्यात आला. त्याने लक्झेंबर्ग व्हिसा मिळवला आणि नंतर जर्मनीला गेला. अनेक व्यक्ती पोर्तुगालमध्ये प्रवेश करण्यासाठीही शॅन्गन प्रदेशातील व्हिसा खरेदी करतात. त्या प्रदेशात जाऊन स्थानिक एजंटच्या मदतीने काम शोधतात. शॅन्गन व्हिसा सल्लागाराच्या मदतीने तेथे स्थायिक होण्यासाठी, वर्क व्हिसासाठीची कागदपत्रे मिळवण्याचा प्रयत्न करतात.

‘व्हिसा शॉपिंग’मधील कायदेशीर समस्या

एखाद्या प्रवाशाने ‘शॅन्गन व्हिसा’चे सर्व नियमांचे आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केल्यास ते बेकायदेशीर नाही. परंतु, व्हिसा मिळवलेला देश आणि राहण्याचे ठिकाण असणारा देश यामध्ये तफावत असल्यास कायदेशीर अडचणी निर्माण होऊ शकतात. वेगळ्याच देशाचा व्हिसा हा केवळ युरोपियन राष्ट्रांमध्ये प्रवेश करण्याचे साधन म्हणून वापरण्यात आल्यास कायदेशीर कारवाई होऊ शकते. मे २०२३मध्ये, नवी दिल्लीतील एस्टोनियाच्या दूतावासाने व्हिसा शॉपिंगवर मर्यादा आणणारे एक निवेदन जारी केले. शॅन्गन व्हिसाच्या नियमांनुसार, ”एकापेक्षा जास्त देशांमध्ये प्रवास करत असल्यास, मुक्काम करण्यासाठी त्या देशाच्या व्हिसासाठी अर्ज करावा.” व्हिसा आणि प्रवासाबद्दल सतत सूचना देण्यात येत आहेत. प्रवास योजनांची अधिकाऱ्यांकडून सखोल चौकशी करण्यात येईल. यामध्ये काही संशयास्पद आढळल्यास व्हिसा रद्द करण्यापासून, विमानातून उतरवण्यात येऊ शकते, तसेच युरोपियन राष्ट्रांमधून परत जाण्यावर परिणाम होऊ शकतो. सतत व्हिसा शॉपिंग करणाऱ्या व्यक्तींविषयी अधिकाऱ्यांना संशय येऊ शकतो. एखाद्या व्यक्तीचा व्हिसा दुसर्‍या युरोपियन देशाचा असेल आणि ती व्यक्ती वेगळ्याच विमानतळावर उतरली, तर आक्षेप घेण्यात येऊ शकतो, असे शॅन्गन व्हिसा सल्लागाराने सांगितले.

मराठीतील सर्व लोकसत्ता विश्लेषण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is visa shopping and why is it being done to enter countries in europe vvk
Show comments