सध्या एकीकडे पॅलेस्टाईनमधील हमास ही दहशतवादी संघटना तसेच इस्रायल यांच्यात युद्ध सुरू आहे. तर दुसरीकडे रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धदेखील अद्याप संपलेले नाही. जागतिक पातळीवर अशा प्रकारे अस्थिरता असताना रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी नुकतेच चीन देशाचा दौरा केला. आपल्या या दौऱ्यात त्यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली. दरम्यान, चीनच्या दौऱ्यादम्यान पुतीन यांच्यासोबत असलेल्या एका ‘न्यूक्लियर ब्रिफकेस’ची चांगलीच चर्चा होत आहे. याच पार्श्वभूमीवर या ब्रिफकेसमध्ये नेमके काय आहे? पुतीन ही ब्रिफकेस नेहमी सोबत घेऊन का फिरतात? या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊ या…
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पुतीन यांच्याकडे असलेल्या ब्रिफकेसमध्ये नेमके काय आहे?
पुतीन यांचा चीनच्या दौऱ्यादरम्यानचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये पुतीन यांच्यासोबत दोन नौदलाचे अधिकारी आहेत. या दोन अधिकाऱ्यांपैकी एकाच्या हातात एक ब्रिफकेस आहे. याच ब्रिफकेसला ‘न्यूक्लियर ब्रिफकेस’ म्हटले जाते. रशियन या ब्रिफकेसला ‘चेगेट’ म्हणतात. रशियातील एका डोंगराच्या नावावरून या ब्रिफकेसला चेगेट हे नाव देण्यात आलेले आहे. एखाद्या देशावर अणूहल्ला करायचा असेल तर याच चेगेटच्या माध्यमातून रशियन लष्कराला संदेश दिला जातो. म्हणजेच अण्वस्त्र हल्ल्याचा आदेश देण्यासाठी या ब्रिफकेसचा वापर होतो. हा संपूर्ण संवाद ‘काझबेक’ नावाच्या इलेक्ट्रॉनिक कमांड अँड कंट्रोल नेटवर्क प्रणालीच्या माध्यमातून केला जातो. काझबेक या प्रणालीला ‘कावकाझ’ नावाची आणखी एक प्रणाली संदेशवनास मदत करते.
एखाद्या शत्रूने हल्ला केलाच तर रडार ऑपरेटरच्या माध्यमातून या हल्ल्याची माहिती संबंधित लष्करी अधिकाऱ्यालाही दिली जाते. हीच माहिती लष्करी अधिकारी कावकाझ प्रणालीला पाठवतो. कावकाझ ही केबल्स, रेडिओ सिग्नल्स, उपग्रह यांची एक जटील आणि गुंतागुंतीची नेटवर्क प्रणाली आहे. हाच सतर्कतेचा इशारा नंतर तिन्ही न्यूक्लियर ब्रिफकेसला पाठवला जातो.
न्यूक्लियर ब्रिफकेस काम कसे करते?
शत्रूच्या संभाव्य कारवाईनंतर लष्कराला सतर्क राहण्याचा आदेश दिला जातो. न्यूक्लियर ब्रिफकेसच्या बाबतीतही सतर्कता बाळगली जाते. रडार ऑपरेटरने शत्रूच्या हल्ल्याची माहिती दिल्यानंतर न्यूक्लियर ब्रिफकेसशी संबंधित रशियन इलेक्ट्रॉनिक कमांड अँड कंट्रोल नेटवर्क प्रणाली सक्रिय केली जाते.
पांढरे बटण दाबल्यास अण्वस्त्र हल्ल्याचा संदेश जातो
रशियन टीव्हीने २०१९ साली या ब्रिफकेसमध्ये नेमके काय आहे? याबाबतचे वृत्त दाखवले होते. या ब्रिफकेसमध्ये अनेक बटण आहेत. यामध्ये एक पांढऱ्या रंगाचेही बटण आहे. पांढरे बटण दाबताच लष्करी अधिकाऱ्यांना अणूहल्ला करण्याचा संदेश मिळतो. तर याच ब्रिफकेसमध्ये लाल रंगाचे बटण आहे. लाल रंगाचे बटण दाबल्यास अणूहल्ला थांबवा, असा संदेश लष्कराला जातो.
रशियाच्या पंतप्रधानांसह रशियाचे संरक्षणमंत्री आणि संरक्षण दलप्रमुखांकडेही (Chief of General Staff ) अशीच एक ब्रिफकेस आहे. अण्वस्त्र हल्ल्याचा आदेश मिळालाच तर या तिन्ही ब्रिफकेसच्या माध्यमातून देशाचे संरक्षणमंत्री, राष्ट्राध्यक्ष आणि संरक्षण दलप्रमुखांना संदेश मिळतो.
ब्रिफकेसची निर्मिती का करण्यात आली?
अमेरिकेतील सेंटर फॉर आर्म्स कंट्रोल अँड नॉन-प्रोलिफरेशन (सीएसीएनपी) या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार या ब्रिफकेसचा पहिला आणि शेवटचा वापर १९९५ साली करण्यात आला होता. १९९८ साली ‘द वॉशिंग्टन पोस्ट’ने याबाबत एक वृत्त दिले होते. या वृत्तात न्यूक्लियर ब्रिफकेस का आणि कशी निर्माण करण्यात आली होती? याबाबत सांगण्यात आले होते. १९८० च्या दशकाच्या सुरुवातीला शीत युद्ध आपल्या शेवटच्या टप्प्यात होते. याच शीत युद्धाच्या काळात न्यूक्लियर ब्रिफकेसची निर्मिती करण्यात आली होती. युरोपमधून आमच्यावर कोणत्याही क्षणी हल्ला होऊ शकतो, अशी भीती तेव्हाच्या सोव्हियत युनियनला होती. याच कारणामुळे कसलाही विलंब न करता या हल्ल्याला प्रतिक्रिया देता यावी म्हणून या ब्रिफकेसची निर्मिती करण्यात आली होती. मिखाईल गोर्बाचेव्ह रशियाचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर (१९९०-९१) ही ब्रिफकेस वापरू लागले. गोर्बाचेव्ह यांच्यानंतर १९९५ साली ही ब्रिफकेस बोरिस येल्तसीन यांच्याकडे आली.
याआधी न्यूक्लियर ब्रिफेकसचा वापर झालेला आहे का?
या ब्रिफकेसच्या वापराबाबत सीएसीएनपीने अधिक माहिती दिली आहे. या माहितीनुसार २५ जानेवारी १९९५ साली रशियाच्या वायव्येतील ओलेनेगोर्स्क रडार स्टेशनवर तैनात असलेल्या रशियन अधिकार्यांना रशियावर क्षेपणास्त्र डागल्याचे दिसले. हे क्षेपणास्त्र अमेरिकेनेच डागले आहे, असा समज रशियन लष्कराचा झाला. प्रत्यक्षात मात्र रशियन अधिकाऱ्याने जे पाहिले ते क्षेपणास्त्र नव्हते. उत्तरेकडील प्रकाशाचा अभ्यास करण्यासाठी पाठवण्यात आलेले ते एक संशोधन करणारे रॉकेट होते. अमेरिका आणि नॉर्वेने याबाबती सूचना याआधीच दिली होती. मात्र रशियाला या मोहिमेची कल्पना नव्हती. परिणामी रिसर्च रॉकेटला क्षेपणास्त्र समजून रशियाने आपल्या लष्कराला सतर्क राहण्याचा आदेश दिला होता. याच काळात हल्ल्याच्या तयारीसाठी न्यूक्लियर ब्रिफेकसचा उपयोग करण्याचे ठरवण्यात आले होते. सुदैवाने नॉर्वे देशाकडून आलेले रिसर्च रॉकेट क्षेपणास्त्र नाही, हे रशियाच्या वेळीच लक्षात आले आणि रशियाने आपली अण्वस्त्र हल्ल्याची योजना थांबवली होती. रशियाने आपल्यावरील हल्ल्याला जशास तसे उत्तर देण्यासाठी अवघ्या काही मिनिटांत तयारी केली होती. मात्र सुदैवाने होणारा अनर्थ टळला होता.
अन्य देशांकडे अशा प्रकारची ब्रिफकेस आहे का?
रशियाव्यतिरिक्त अमेरिकेकडे अशाच प्रकारची ब्रिफकेस आहे. ही ब्रिफकेस नेहमीच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडे असते. या ब्रिफकेसला राष्ट्राध्यक्षांची आपत्कालीन पिशवी म्हणजेच ‘प्रेसिडेंशियल इमर्जन्सी सॅचेल’ म्हटले जाते. याच ब्रिफकेसला ‘फुटबॉल’ या नावानेही ओळखले जाते. १९६० साली राबवण्यात आलेल्या ‘ड्रॉपकिक’ नावाच्या मोहिमेनंतर या ब्रिफकेसला फुटबॉल असे नाव पडले. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांच्या कार्यकाळात ही ब्रिफकेस आल्याचे म्हटले जाते. अमेरिका आणि तेव्हाच्या सोव्हियत युनियन यांच्यातील शीतयुद्धाच्या काळात युद्धाची परिस्थिती निर्माण झाल्यास अणूहल्ला त्वरित व्हावा, यासाठी या ब्रिफकेसची निर्मिती करण्यात आली होती.
उपराष्ट्रपतींकडेही असते एक ब्रिफकेस
द अॅटोंमिक हेरिटेज फाऊंडेशन या संस्थेने अमेरिकेच्या फुटबॉल या ब्रिफकेसबद्दल अधिक माहिती दिलेली आहे. या माहितीनुसार फुटबॉल या ब्रिफकेसमध्ये वेगवेगळ्या ठिकाणांची माहिती आहे. तसेच तीन बाय पाच इंचाचे एक कार्ड आहे. या कार्डमध्ये ऑथेंटिकेशन कोड आहे. या कार्डला ‘बिस्किट’ म्टले जाते. याच ब्रिफकेसच्या मदतीने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष लष्कराला अणूहल्ला करण्याचा आदेश देऊ शकतात. अशीच एक ब्रिफकेस अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींकडेही आहे. युद्धात किंवा अपवादात्मक परिस्थितीत अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचा मृत्यू झाल्यास अण्वस्त्र हल्ल्यासंदर्भात उपराष्ट्रती निर्णय घेतात.
..तेव्हा अनर्थ टळला होता
जानेवारी २०२१ साली अमेरिकेचे संसदभवन असलेल्या ‘कॅपिटॉल’ या इमारतीवर आंदोलकांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात साधारण २ हजार लोक कॅपिटॉल इमारतीत घुसले होते. यावेळी अमेरिकेचे उपराष्ट्रपती याच इमारतीत होते. यावेळी त्यांच्याजवळ न्यूक्लियर ब्रिफकेस होती. ही ब्रिफकेस आंदोलकांच्या हाती लागली असती तर अनर्थ घडला असता. याच कारणामुळे या ब्रिफकेसच्या सुरक्षा प्रोटोकॉलचे मूल्यांकन करण्याची जबाबदारी अमेरिकेच्या संरक्षण खात्यावर लक्ष ठेवणाऱ्या वॉचडॉगवर सोपवण्यात आली होती.
कोड असेलेल बिस्किट अनेकदा हरवले होते
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना डोनाल्ड ट्रम्प शी जिनपिंग यांच्या भेटीसाठी चीनच्या दौऱ्यावर गेले होते. यावेळी चीनचे सुरक्षा अधिकारी आणि न्युक्लियर ब्रिफकेस असणाऱ्या अमेरिकेच्या अधिकाऱ्यांत वाद झाला होता. ब्रिफकेसचा कोड अनेकदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडून हरवल्याचेही प्रकार समोर आलेले आहेत. जिमी कार्टर राष्ट्राध्यक्ष असताना ते या ब्रिफकेसचे कोड आपल्या ड्रेसच्या खिशात विसरले होते. नंतर हे कपडे धुण्यासाठी नेण्यात आले होते. बिल क्लिंटन हेदेखील या ब्रिफकेसचा कोड अनेकदा विसरलेले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असताना रोनाल्ड रेगन यांची १९८१ साली हत्या करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यावेळी उपचारासाठी त्यांना रुग्णालयात हलवल्यानंतर त्यांचे कपडे काढण्यात आले होते. यावेळी ब्रिफकेसमधील बिस्किट रेगन यांच्या कपड्यांच्या खिशात होते. हे बिस्किट नंतर कचऱ्यात टाकून देण्यात आले होते. पुढे एफबीआयने हे बिस्किट शोधून काढून ते व्हाईट हाऊसमध्ये पाठवले होते.