White Gold in Ukraine : बलाढ्य रशियाने युक्रेनवर आक्रमण करून दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झालाय. मात्र, अद्यापही हे युद्ध संपलेलं नाही. दोन्ही देशांचं प्रचंड नुकसान होत असलं तरी रशिया माघार घ्यायला तयार नाही, तर युक्रेन झुकायला तयार नाही. परिणामी युद्ध सुरूच आहे. रशियानं युक्रेनविरोधात युद्ध पुकारण्यामागे अनेक कारणे आहेत, त्यापैकीच एक म्हणजे युक्रेनच्या जमिनीत असलेला लिथियम म्हणजेच पांढऱ्या सोन्याचा (White Gold) साठा आहे, असे जाणकारांचे म्हणणे आहे. युक्रेनने या साठ्याचा योग्य वापर केला गेला तर युक्रेन हा लिथियमचा सर्वात मोठा साठा असलेला देश बनू शकतो, असे म्हटले जाते. विशेष बाब म्हणजे लिथियमचे बहुतेक साठे युक्रेनच्या पूर्वेकडील डोनबास भागात आहेत. हा तोच भाग आहे, ज्यावर २०१४ पासून रशियन फुटीरतावाद्यांनी कब्जा केला आहे. तसेच युद्ध पुकारल्यानंतरही रशियन सैन्याची आक्रमकता या भागात जास्त पाहायला मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

लिथियम म्हणजेच पांढरं सोनं नेमकं काय आहे?

लिथियम चांदीसारखा चमकणारा एक पांढरा रासायनिक धातू आहे. तो वजनाने खूप हलका आहे. गेल्या काही वर्षांत लिथियमचा वापर बॅटरी बनवण्यासाठी होत आहे. लिथियमचा वापर आता स्मार्टफोन आणि लॅपटॉपपासून इलेक्ट्रिक वाहनांपर्यंतच्या बॅटरीमध्ये केला जात आहे. यामुळेच जगभरात लिथियमची मागणी वाढू लागली असून कंपन्या लिथियमच्या मागे लागल्या आहेत. लिथियम हे जगाच्या ऊर्जेच्या गरजांचे भविष्य असल्याचे मानले जाते. भविष्यात जीवाश्म इंधने म्हणजेच पेट्रोल-डिझेल, कोळसा यांच्या घटत्या उपलब्धतेमुळे त्यांना पर्याय म्हणून क्लीन एनर्जीकडे वाटचाल करत आहे. क्लीन एनर्जी ही अशी ऊर्जा आहे, ज्यामुळे वातावरणात प्रदूषण होत नाही. सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा ही अशी अक्षय ऊर्जा म्हणजेच कधीही न संपणारी ऊर्जा आहे.

दैनिक भास्करने दिलेल्या वृत्तानुसार, सौर आणि वाऱ्यापासून ऊर्जा निर्माण करण्यासाठी लिथियम बॅटरीची आवश्यकता असेल. तसेच सूर्यप्रकाश नसताना किंवा वारा वाहत नसतानाही लिथियम बॅटरीमध्ये साठवलेली ऊर्जा मानवाच्या ऊर्जेची गरज भागवण्यासाठी वापरली जाऊ शकते. २०४० पर्यंत जगातील क्लीन एनर्जीमध्ये ९० टक्के वाटा हा लिथियमचा असेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. येत्या काही वर्षांत लिथियमची मागणी ५१ पटीने वाढण्याची अपेक्षा आहे.

बॅटरीमध्ये लिथियमचा वापर जास्त होण्याचे कारण काय?

लिथियम ऑयन बॅटऱ्यांचा वापर पहिल्यांदा १९९१ मध्ये सोनीने कॅमकॉर्डरमध्ये केला होता.२०१९ मध्ये लिथियम-ऑयन बॅटरीचा शोध लावणाऱ्या तीन शास्त्रज्ञांना रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक मिळाले होते, यावरून लिथियम किती महत्वाचे आहे, याचा अंदाज बांधता येतो. लिथियम बॅटरी इतर बॅटरींच्या तुलनेत अधिक शक्तिशाली आणि वजनाने हलक्या असतात. या बॅटरी लीड अॅसिड बॅटरीपेक्षा जास्त काळ टिकतात. या बॅटरीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे पारंपारिक बॅटरीपेक्षा जास्त ऊर्जा साठवण्याची त्यांची क्षमता. म्हणजेच लिथियम-ऑयन बॅटरी असलेली इलेक्ट्रिक कार किंवा स्कूटर दीर्घकाळ चालवता येते. त्याचबरोबर स्मार्टफोनमध्ये या बॅटऱ्यांचा वापर केल्याने त्याची बॅटरी जास्त टिकते.

एका इलेक्ट्रिक वाहनाच्या बॅटरीसाठी कमीत कमी आठ किलो लिथियम लागते. दरवर्षी सात अब्ज लिथियम-ऑयन बॅटरी जगभरात विकल्या जातात आणि २०२७ पर्यंत हे प्रमाण १५ अब्जांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे. टिस्टाच्या अहवालानुसार, २०२१ मध्ये चीन लिथियम-ऑयन बॅटरीचा जगातील सर्वात मोठा उत्पादक होता आणि या काळात जगातील ७९% बॅटरी चीनमध्ये बनल्या होत्या.

वर्षभरात लिथियमच्या किमतीत झालेली वाढ

गेल्या एका वर्षात लिथियमच्या किमती चार पटींनी वाढल्या आहेत. बॅटरी-ग्रेड लिथियम कार्बोनेटची किंमत २०१८ मध्ये १३०१ रुपये प्रति किलोवरून २०२० मध्ये ६१२ रुपये प्रति किलोपर्यंत घसरली होती. २०२१ मध्ये पुन्हा किमतीत वाढ होऊन ती १३०१ रुपये प्रति किलो झाली. पण एप्रिल २०२१ ते एप्रिल २०२२ या एका वर्षात लिथियमची किंमत पाच पटीने वाढून ६,२०० रुपये प्रति किलो झाली आहे.

युक्रेनच्या कोणत्या भागात लिथियम आढळते?

देशाच्या पूर्वेकडील भागात सुमारे 5 लाख टन लिथियमचे साठे आहेत, असा युक्रेनमधील संशोधकांचा विश्वास आहे. त्यांचा हा अंदाज बरोबर निघाल्यास युक्रेन हा जगातील सर्वात मोठा लिथियम साठा असलेला देश बनू शकतो. परंतु युक्रेनमध्ये असलेल्या या लिथियम साठ्याचा वापर अजूनही सुरू झालेला नाही. युक्रेनचा बहुतेक लिथियम साठा पूर्व युक्रेनमधील डोनबास भागातील डोनेस्तक आणि देशाच्या मध्यभागी किरोव्होहराडमध्ये असल्याचा अंदाज आहे. तर योगायोग असा की, रशियन सैन्याने गेल्या दोन महिन्यांपासून डोनबास भागात सर्वात भयंकर युद्ध सुरू केले आहे.

युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी २०२१ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि चीनमधील कंपन्यांसोबत युक्रेनमधून लिथियम, कोबाल्ट, तांबे आणि निकेल यांसारख्या खनिजांचे साठे शोधण्यासाठी आणि काढण्यासाठी करार केला होता. त्यानंतर नोव्हेंबर २०२१ मध्ये, ऑस्ट्रेलियन कंपनी युरोपियन लिथियमने युक्रेनमधील डोनेस्तक आणि किरोव्होहराड येथील लिथियमचे दोन संभाव्य साठे शोधण्याचे आणि काढण्याचे अधिकार विकत घेतले होते. परंतु रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामुळे लिथियमच्या या साठ्यांवर काम सुरू होऊ शकले नाही.

रशियाची युक्रेनच्या लिथियम साठ्यावर नजर का?

रशियामध्ये सुमारे दहा लाख टन लिथियमचा साठा असल्याचा अंदाज आहे. तरीही रशियाची नजर युक्रेनच्या लिथियमच्या साठ्यावर असण्यामागचे कारण काय आहे? हे जाणून घेऊयात..

रशियातील लिथियमचे बहुतेक साठे स्पोड्युमिनच्या स्वरूपात आहेत. परिणामी त्यापासून लिथियम काढणे ब्राइनपेक्षा खूप महाग आहे. रशियाने २०२१ मध्ये म्हटलं होतं त्यांच्याकडे लिथियम काढण्यासाठी पुरेशी संसाधनं नाहीत, त्यामुळे ते बहुतेक लिथियम आयात करतात. तसेच, रशियाचे लिथियमचे साठे पूर्व सायबेरियासारख्या अत्यंत थंड भागात आहेत. त्यामुळे तिथून अगदी कमी प्रमाणात लिथियम काढण्यासाठी खूप खर्च येतो.

सध्या रशियाला लिथियम कार्बोनेटची अधिक गरज आहे. रशिया हा लिथियम हायड्रॉक्साईडचा जगातील चौथा सर्वात मोठा निर्यातदार आहे, तर लिथियम कार्बोनेटचा सहावा सर्वात मोठा आयातदार आहे. म्हणूनच रशिया चिलीच्या लिथियम प्रकल्पातील ५१% शेअर्स खरेदी करत आहे. तसेच अर्जेंटिनाच्या लिथियम फर्ममध्ये १५% भागीदारी घेत आहे. दुसरीकडे रशिया बोलिव्हियामध्ये ३०० डॉलर मिलियनचे अणु केंद्र बांधत आहे आणि लिथियम ब्राइनच्या रूपात देशातील प्रचंड लिथियम साठा देखील खोदत आहे. तसेच रशिया झिम्बाब्वेच्या सर्वात मोठ्या लिथियम खाणीत ५१% हिस्सा खरेदी करण्याचा विचार करत आहे. त्यामुळेच रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यामागे लिथियमचा साठा हे मुख्य कारण नसले, तरी एक महत्वाचे कारण नक्कीच आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.

भारतात लिथियम उत्पादनात कुठे आहे?

भारतात लिथियमचे उत्पादन फारच कमी आहे. भारत आपल्या गरजेचा मोठा भाग आयात करतो. २०२० मध्ये, लिथियम आयात करण्याच्या बाबतीत भारत जगात चौथ्या क्रमांकावर होता. त्यावेळी भारताने सुमारे ११० कोटी रुपयांचे लिथियम आयात केले होते. भारत आपल्या लिथियम-ऑयन बॅटरी ८०% चीनमधून आयात करतो. या क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी भारत अर्जेंटिना, चिली, ऑस्ट्रेलिया आणि बोलिव्हिया यांसारख्या लिथियम समृद्ध देशांच्या खाणींमधील हिस्सा विकत घेण्यावर काम करत आहे.