Zoologist Adam Britton: प्रसिद्ध प्राणीशास्त्रज्ञ ॲडम ब्रिटन यांच्यावर प्राणी अत्याचाराचे एकूण ६० गुन्हे दाखल करण्यात आले होते. ज्यामध्ये ४९ श्वानांचा लैंगिक छळ करून त्यापैकी ४२ श्वानांचा खून केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. एवढेच नाही तर या किळसवाण्या कृत्याचे त्यांनी व्हिडीओ रेकॉर्डिंगही केले होते. याशिवाय गेल्यावर्षीही एका बातमीची प्रचंड चर्चा झाली होती. अमेरिकेतील एका तरुण मुलाला त्याच्या आईने त्यांच्या घरातल्या श्वानासोबत बळजबरीने समागम करताना पकडले. ही घटना खरतरं तिच्यासाठी चक्रावून टाकणारी होती. परंतु तिने धैर्य दाखवून त्या श्वानाला वाचविण्याचा प्रयत्न केला. परिणामी तिच्याच मुलाने तिच्यावर हातोड्याने हल्ला केला. जखमी अवस्थेतेतही हार न मानता त्या महिलेने पोलिसांत तक्रार केली. सध्या तो मुलगा म्हणजेच ब्लेक राफेट हा एलखार्ट काउंटी कारागृहात आहे. ही घटना अमेरिकेतील असली तरी काही वर्षांमागे रत्नागिरी मधील एक ध्वनीचित्रफित व्हायरल झाली होती. रत्नागिरी येथे जंगलातल्या एका घोरपडी सोबत काही जणांनी लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले होते. त्या आधी मुंबईच्या मालाड येथील मालवणी मध्ये एका श्वानावर लैंगिक अत्याचार करून तिला अर्धमेल्या अवस्थेत सोडून देण्यात आले होते. या सारख्या घटनांची संख्या वाढते आहे. माणसाच्या विकृत भुकेला प्राणीही बळी पडत आहेत. याच पार्श्वभूमीवर मानव-प्राणी यांच्यातील लैंगिक संबंधांविषयी वापरण्यात येणाऱ्या झूफिलिया आणि बेस्टीयालीटी या संज्ञा व संकल्पनांविषयी जाणून घेणे समयोचित ठरणारे आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
झूफिलिया (Zoophilia) आणि बेस्टीयालीटी (Bestiality) म्हणजे नेमके काय?
‘झूफिलिया’ ही संकल्पना फारशी प्रसिद्ध नाही. परंतु गेल्या काही वर्षांमधील घटनांनी जगाचे लक्ष याकडे वेधले आहे. झूफिलिया हा शब्द लैंगिक प्रवृत्तीचा निदर्शक आहे. (अमानवी) प्राण्यांकडे लैंगिकदृष्ट्या आकर्षित होणाऱ्या मानवी प्रवृत्तीसाठी हा शब्द वापरला जातो. किंबहुना यापुढे जावून प्रत्यक्ष त्या मुक्या जनावराशी बळजबरीने ठेवण्यात येणाऱ्या लैंगिक संबंधांच्या निदर्शक ‘बेस्टीयालीटी’ ही संज्ञा वापरण्यात येते. मुख्यत्त्वे दोन्ही शब्दांचे अर्थ प्रथमदर्शनी एकच वाटले तरी त्यात फरक आहे. ‘झूफिलिया’ हा शब्द प्राण्यांविषयी वाटणाऱ्या अमानवी लैंगिक आकर्षणाविषयी वापरला जातो. (यात प्रत्यक्ष लैंगिक कृती समाविष्ट असेलच असे नाही.अभ्यासकांच्या मते प्राण्यांसोबतच्या केवळ लैंगिक कल्पना करणे हे नेहमीच ‘झूफिलिया’चे थेट उदाहरण असेल असेही नाही.) तर बेस्टीयालीटी हा शब्द प्राण्यांवर होणाऱ्या बळजबरीकरता वापरला जातो.
झूफिलिया
झूफिलियाची व्याख्या एक ‘पॅराफिलिया’ म्हणून केली जाते. पॅराफिलिया ही संज्ञा अनैसर्गिक लैंगिक वर्तनासाठी वापरली जाते. ज्यामध्ये सामान्य लैंगिक गरजांच्या अगदीच विरुद्ध असामान्य परिस्थिती, कल्पना, वस्तू या लैंगिक उत्तेजनेस कारणीभूत ठरतात (यात काही विशिष्ट निर्जीव गोंष्टींच्या स्पर्शानेही लैंगिक उत्तेजना मिळण्यासारख्या गोष्टींचा समावेश असतो). झूफिलिया हा शब्द सर्व प्रथम क्रॅफ्ट-एबिंगने आपल्या ‘सायकोपॅथिया सेक्शुअलिस’ (१८८६) या पुस्तकामध्ये वापरला. मूलतः झूफिलिया हा ग्रीक शब्द आहे. ‘झोयॉन’, म्हणजे प्राणी आणि ‘फिलिया’, म्हणजे प्रेम या दोन शब्दांच्या एकत्रित समीकरणाने झूफिलिया ही संज्ञा तयार झाली आहे. २०११ साली, डॉ अनिल अग्रवाल यांनी ‘जर्नल ऑफ फोरेन्सिक अॅण्ड लीगल मेडिसिन’ मध्ये झूफिलियाची सर्वसमावेशक टायपोलॉजी प्रकाशित केली आहे. डॉ. अग्रवाल यांच्या नुसार झुफिलियात १० भिन्न प्रकारांचा समावेश होतो.
बेस्टीयालीटी
बेस्टीयालीटी हा मूलतः बलात्कारच असतो. कारण या मध्ये प्रत्यक्षात प्राण्याची सहमती असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. प्राण्यांसोबत लैंगिक कृत्यांमुळे विविध धोके होऊ उत्पन्न होवू शकतात, प्रामुख्याने प्राण्याला मृत्यूसह अनेक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. त्यामुळेच हा प्रकार प्राण्यांविरुद्धतेच्या क्रूरतेमध्ये समाविष्ट होतो. किंबहुना विरुद्धलिंगी व्यक्ती वगळता इतर लैंगिक संबंधाचा उल्लेख याच संज्ञेने केला जातो. लहान मुलांचे लैंगिक शोषणही याच गटात समाविष्ट होते.
झूफिलिया आणि बेस्टीयालीटी खरचं दुर्मिळ आहेत का ?
रेंजर आणि फेडोरॉफ यांनी आपल्या ‘झूफिलिया आणि कायदा’ (Ranger, R.; Fedoroff, P. 2014 “Commentary: Zoophilia and the Law”. Journal of the American Academy of Psychiatry and the Law Online.) या शोध लेखात नमूद केल्याप्रमाणे प्राण्यांबरोबरचे लैंगिक संबंध हा प्रकार दुर्मिळ असावा, असे वाटले तरी प्रत्यक्षात वस्तुस्थिती तशी नाही. यासाठी त्यांनी अमेरिकेत १९४० साली झालेल्या सर्वेक्षणाचा दाखल दिला आहे. १९४० च्या दशकात झालेल्या अभ्यासात अमेरिकेत शेतात वाढलेल्या सुमारे ५०% मुलांचे एखाद्या प्राण्याशी किमान एकदा तरी लैंगिक संबंध आल्याचे आढळून आले होते. यात स्त्रियांचे प्रमाण ३.६% इतके अत्यल्प होते. किंबहुना ‘An Adolescent with Bestiality Behaviour: Psychological Evaluation and Community Health Concerns’ (२०१६) या शोधनिबंधात नोंदविल्या प्रमाणे भारतातही अशाच स्वरूपाचे चित्र आजही पाहावयास मिळते. आधुनिक सर्वेक्षणानुसार ५ ते ८ % पुरुष तर ३ ते ४% स्त्रिया झूफिलिया आणि बेस्टीयालीटी सारख्या प्रकरणात गुंतलेल्या आहेत. झूफिलिया हा प्रकार विकार मानला जातो. वैज्ञानिक संशोधनानुसार व्यक्तीचे पौगंडावस्थेपर्यंत प्राण्यांसोबत लैंगिक आकर्षण किंवा लैंगिक संबंध कायम राहिल्यासच झुफिलिक विकाराचे निदान केले जाते. झूफिलिया ही एक पॅराफिलिक डिसऑर्डर आहे. डायग्नोस्टिक अँड स्टॅटिस्टिकल मॅन्युअलच्या (DSM-5) पाचव्या आवृत्तीत झूफिलियाचे वर्गीकरण ‘पॅराफिलिक डिसऑर्डर’च्या अंतर्गत करण्यात आले आहे.
आणखी वाचा: विश्लेषण : एक लाख वर्षापूर्वी मानवी संस्कृतीत अंत्यसंस्कारांचा विधी करणारे ‘होमो नालेडी’ कोण होते?
बेस्टीयालीटी मागे नेमके काय कारण असू शकते?
या विषयातील तज्ञांच्या मते, बेस्टीयालीटी या प्रकारात गुंतलेल्या बहुतांश व्यक्तींचे मानवी लैंगिक संबंध निरोगी नसतात. या प्रवृत्ती असणाऱ्या अनेकांना आपल्या मानवी जोडीदारासोबत लैंगिक संबंध निर्माण करण्यास अडचणी येतात. त्यांची मानवासोबत लैंगिक संबंध ठेवण्याची इच्छा हरवते किंवा त्यांना तशी इच्छा निर्माण होत नाही. मूलतः या अशा परिस्थितीत प्राण्यांचा केवळ वापर लैंगिक खेळण्यासारखा केला जातो. कारण प्राणी हे मानवाप्रमाणेच लैंगिक संवेदना प्रदान करतात. या प्रकरणात, प्राण्याला प्रेमळ जोडीदार म्हणून पाहिले जात नाही तर लैंगिक समाधानासाठी वापरात येणारी वस्तू म्हणून पाहिले जाते. एका संशोधनांतर्गत एका व्यक्तीला घोड्याचे चित्र दाखविण्यात आले होते, हे चित्र पाहता क्षणी त्याच्यात लैंगिक उत्तेजना निर्माण झाल्या; जसजशी चित्रांच्या संख्येत वाढ करण्यात आली, तसतशी त्याच्या लैंगिक आवेगात वाढ झाल्याची नोंद अभ्यासकांनी केली आहे. ‘फॉनोइफिलिया’ हा आणखी एक प्रकार पॅराफिलियाच्या अंतर्गत येतो. यात प्राण्यांचा समागम पाहून लैंगिक उत्तेजना मिळते. संशोधनानुसार, फॉनोइफिलिया हे अव्यक्त झूफिलियाचे सूचक मानले जाते.
शारीरिक धोके
बेस्टीयालीटी मुळे प्राण्यांपासून अनेक विकार मानवांमध्ये संक्रमित होऊ शकतात. यामुळे मानवांला झुनोसेस होवू शकतो. झुनोसेसच्या प्रमुख उदाहरणांमध्ये टॉक्सोकेरियासिस आणि क्यू ताप यांचा समावेश होतो. बेस्टीयालीटीमुळे अॅनाफिलेक्सिस झाल्याची नोंद करण्यात आलेली आहे. २००५ मध्ये, सिएटलमधील एका ४५ वर्षीय व्यक्तीला घोड्याशी समागम करताना आतड्याला छिद्र पडल्यामुळे मृत घोषित करण्यात आले होते.
प्राण्यांवरील अत्याचार- मुख्य कारणांपैकी एक पोर्नोग्राफी
आज बहुतेक देशांमध्ये प्राण्यांशी लैंगिक संबंध असलेली पोर्नोग्राफी दाखविणे बेकायदेशीर आहे. जगभरात प्राणी आणि मानव यांच्यातील लैंगिक संबंधांच्या विरोधात अनेक कायदे आहेत. असे असले तरी ज्या देशांमध्ये झुफिलिया या प्रकारावर बंदी नाही. अशा ठिकाणी या पोर्नोग्राफीचे चित्रण केले जाते आणि जगभरात त्याचे वितरण होते. किंबहुना प्लेबॉय सारखी मासिके उघडपणे प्राण्यांशी लैंगिक संबंध दर्शविणारी चित्रं प्रदर्शित करतात. त्यामुळे अशा स्वरूपाच्या प्रकाशनांचा झूफिलिया आणि बेस्टीयालीटी सारख्या विकृतींना हातभार लागल्याचा आरोप प्राणीप्रेमी आवर्जून करतात.
नैतिकतेचा वाद
बेस्टीयालीटी नैतिक की अनैतिक, याविषयी बरेच वादविवाद आहेत. समाजात बऱ्याच अंशी प्राण्यांकडे भूतदयेच्या दृष्टिकोनातून पहिले जाते. त्यामुळे बेस्टीयालीटी सारखे प्रकार प्राण्यांसाठी हानिकारकच असल्याचे बहुसंख्य लोक मान्य करतात. ह्युमन सोसायटी ऑफ द युनायटेड स्टेट्स (एचएसयूएस) यांनी नमूद केल्याप्रमाणे जरी प्राण्याला इजा झाली नाही तरी कोणत्याही परिस्थितीत मानव आणि प्राणी यांच्यातील सर्व लैंगिक क्रिया स्वाभाविकपणे अपमानास्पदच आहेत.
आणखी वाचा : विश्लेषण: चीनच्या कावेबाजपणाला भारतीय मुत्सद्देगिरीचे उत्तर!
मानसिक विकृती
अमेरिकेच्या शासकीय नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमधील ‘An Adolescent with Bestiality Behaviour: Psychological Evaluation and Community Health Concerns’ या शोधप्रबंधात भारतात घडलेल्या एका घटनेचा दाखल देवून प्राण्यांशी ठेवण्यात येणाऱ्या लैंगिकसंबंधांमागील मानसिकतेचे विवेचन करण्यात आले आहे. या लेखात नमूद करण्यात आलेल्या घटनेनुसार एका १८ वर्षीय व्यक्तीने गायीच्या वासरासोबत संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला, यात त्या वासराचा मृत्यू झाला. स्वॅप टेस्ट मधून त्या व्यक्तीने त्या वासरासोबत संबंध ठेवल्याचे उघड झाले. याच व्यक्तीचा मनोविकारतज्ज्ञांनी अभ्यास केल्यावर काही महत्त्वाची निरीक्षणे नोंदविली, सदर (रुग्ण) व्यक्ती ही डेअरी फार्मवर काम करत होती. तज्ज्ञांनी या व्यक्तीच्या भूतकाळात झालेल्या घटनांचा क्रमश: अभ्यास केला. मूलतः ही व्यक्ती समाजाच्या सांस्कृतिक तसेच आर्थिकदृष्ट्या निम्नस्तरीय गटातील आहे. वडील व मोठा भाऊ आपल्या पत्नींना सतत मारझोड करत हेच दृश्य त्याच्या समोर होते. स्वतः ती व्यक्ती वयाच्या अकराव्या वर्षी लैंगिक शोषणाची बळी ठरली होती. वयाच्या तेराव्या वर्षी आईचा मृत्यू, इंटरनेटवर प्राण्यांशी संबंधित पोर्नोग्राफी पाहण्याची सवय इत्यादी अनेक गोष्टींचा त्या व्यक्तीच्या जडण घडणीत हातभार लागला होता. म्हणूनच तज्ज्ञांनी एक प्रयोग केला; त्या प्रयोगात त्याला महिलांविषयी लैंगिक आकर्षण प्रस्थापित करण्यात अडचण येत असल्याची नोंद करण्यात आली. एकूणच सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक अशा सर्वच बाबींचा परिणाम तज्ज्ञांनी नोंदविला. बालपणीच झालेल्या लैंगिक शोषणामुळे नैसर्गिक विरुद्धलिंगी आकर्षणाच्या भावनेवर परिणाम होवू शकतो, असे मत संशोधकांनी नोंदविले. त्यामुळे लैंगिक अतिरेकी आक्रमकता यासारखी मानसिकता बळावू शकते. अशा परिस्थितीत केवळ प्राणीच नाही तर अबोध बालकेदेखील बळी ठरू शकतात, असा संशोधकांचा निष्कर्ष आहे.
उपाय काय असू शकतो?
अशा प्रकारचे अनैसर्गिक लैंगिक वर्तन ही एक सामाजिक समस्या आहे. अशा प्रकारच्या घटनांना आळा घालणे ही काळाची गरज आहे. या गोष्टींचा समूळ विचार करताना केवळ मनोवैज्ञानिक घटकांचा विचार न करता, यात सर्वसमावेशक गोष्टींचा विचार होणे आवश्यक आहे. बेस्टीयालीटी सारख्या विकृतीचे निदान योग्य वेळी झाले; तर भविष्यात घडू शकणारे प्रसंग टाळता येवू शकतात. त्या दृष्टिकोनातून योग्य ते मार्गदर्शन दिले जावू शकते. इतकेच नव्हे तर अनेक सामाजिक संस्था या सारख्या विषयांवर कार्यरत आहेत. त्यांची मदतही घेतली जावू शकते.