Thirumayam Fort secret chamber: देशभरात अनेक ठिकाणी किल्ले बांधण्यात आले आहेत. तर प्राचीन काळी भारतीय गाव- शहरे हीदेखील कडेकोटच होती. महाराष्ट्राला तर गडकिल्ल्यांचा देश असंच म्हटलं जातं. पण महाराष्ट्राबाहेरही अनेक ठिकाणी किल्ले तत्कालीन राज्यकर्त्यांनी बांधले होते. अलीकडे झालेल्या भूकंपानंतर अशाच एका किल्ल्यावर असलेल्या भव्य खडकाखाली एक गोपनीय कक्ष आढळला आणि त्या विषयी सर्वत्र चर्चा सुरू झाली, त्याविषयी…

तिरुमयम हे गाव भारताच्या तामिळनाडू राज्यातील पुदुकोट्टई जिल्ह्यात आहे. हे गाव पुदुकोट्टईची शहरापासून अंदाजे २२ कि.मी. आणि कारैकुडी शहरापासूनही २२ कि.मी. अंतरावर आहे. सुप्रसिद्ध भारतीय स्वातंत्र्यसेनानी सत्यमूर्ती यांचा जन्म १८८७ साली तिरुमयम येथे झाला. तिरुमयम हा शब्द ‘तिरु-मय्यम’ या तमिळ शब्दांपासून तयार झाला आहे. ज्याचा अर्थ ‘सत्याचे ठिकाण’ असा होतो. भगवान तिरुमल यांना ‘मय्यार’ या नावानेही ओळखले जाते. असे मानले जाते की, ते या गावात वास्तव्यास होते, म्हणून या ठिकाणाला ‘तिरुमय्यम’ असे नाव पडले. ‘तिरु’ या शब्दाचा अर्थ ‘पवित्र’ किंवा ‘पावन’ असा आहे.

dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
Eurasian Water Cat Pune District, Indapur,
पुणे जिल्ह्यात प्रथमच दुर्मीळ ‘युरेशियन पाणमांजरा’चा शोध, इंदापूरमधील विहिरीमध्ये पडलेल्या पाणमांजराची सुटका
amitabh bachchan
विकी कौशलच्या वडिलांनी सांगितली अमिताभ बच्चन यांची आठवण; म्हणाले, “चिखलाने माखलेल्या अवस्थेत…”
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : “प्रवीण महाजन यांना गोपीनाथ मुंडेंनी पिस्तुल घेऊन दिलं होतं, पूनमला..”, सारंगी महाजन यांचा दावा
saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”

अंडाकृती खडकाखाली…

तामिळनाडूमधील तिरुमयम किल्ला १६८७ साली बांधण्यात आला. सध्या त्याच्या एक रहस्यमय गुपितामुळे तो चर्चेत आला आहे. किल्ल्यातील एका भव्य अंडाकृती खडकाच्या आत एक झाकोळला गेलेला एक कक्ष भूकंपाच्या धक्क्यांमुळे उघडकीस आला. या कक्षात अतिशय सुबक कोरलेल्या दरवाजामधून प्रवेश करता येतो. या कक्षाच्या आत एक शिवलिंग आढळले आहे.

अधिक वाचा: London–Calcutta bus service: लंडन ते कलकत्ता, सर्वाधिक लांबीचा बससेवा मार्ग; कुणी चालवली ही बससेवा? कुणासाठी?

प्राचीन अभियांत्रिकीचे आश्चर्य

तामिळनाडूच्या मध्यभागी असलेला तिरुमयम किल्ला या प्रदेशाच्या समृद्ध इतिहास आणि अप्रतिम वास्तुकलेचा पुरावा आहे. हा किल्ला १६८७ साली रामनदचे राजा विजय रघुनाथ सेतुपती यांनी बांधला होता. हा किल्ला आता शतकांचा इतिहास, युध्द आणि रहस्यांचा साक्षीदार आहे. हा ऐतिहासिक चमत्कार एक अशक्य वाटणारे रहस्य सामावून घेतो, जे भारतीय इतिहास आणि संस्कृतीला जागतिक ऐतिहासिक संस्कृतींपेक्षा विलक्षण वेगळेपण प्रदान करते. तिरुमयम या गावात पुदुकोट्टई- कारैकुडी महामार्गावर स्थित असलेला हा किल्ला प्राचीन अभियांत्रिकीचे आश्चर्य आणि इतिहासप्रेमींसाठी एक प्रेरणास्थान आहे.

अंडाकृती खडकातील रहस्ये

तिरुमयम किल्ल्यातील एक आश्चर्यकारक वैशिष्ट्य म्हणजे तिथे एक भव्य अंडाकृती खडक उभा आहे. हा खडक दहा फूट उंच असून त्याचा गुळगुळीत, चकचकीत पृष्ठभाग अंड्यासारखा आहे, ज्यामुळे अनेक पर्यटक आणि स्थानिक लोक याकडे आकर्षित होत असतात. The Dest of Gav या रंबलवरील व्हिडिओ प्लॅटफॉर्मने दिलेल्या माहितीनुसार काही वर्षांपूर्वी झालेल्या एका भूकंपाने या खडकाचे खरे रहस्य उघडकीस आणले. भूकंपाच्या वेळी खडकात एक भेग दिसून आली आणि त्यातून एक परिपूर्णपणे कोरलेला दरवाजा उघडकीस आला. जो खडकाच्या पृष्ठभागाशी इतका एकसंध होता की त्याचे अस्तित्व कधीच जाणवले नव्हते. हा गुप्त दरवाजा खडकाच्या आत लपलेल्या कक्षाकडे घेऊन जात होता, त्यामुळे सर्वजण थक्क झाले. या कक्षात एक शिवलिंग आढळले.

कक्षाबद्दलचे सिद्धांत आणि तर्कवितर्क

या गुप्त कक्षाचे मूळ आणि उद्देश आजही गूढच राहिले आहे. काहींच्या मते, हा कक्ष उपासनेसाठी आणि प्राचीन धार्मिक विधींसाठी वापरली जाणारी पवित्र जागा असावी. तर इतरांचा तर्क आहे की, हा कदाचित गुप्त खजिना ठेवण्यासाठी किंवा किल्ल्याच्या बचावकर्त्यांनी वेढा टाकल्याच्या काळात आसरा घेण्यासाठी तो वापरलेला असावा. या कक्षात कोणताही शिलालेख किंवा पुरातत्त्वीय अवशेष नसल्यामुळे हे गूढ आणखी वाढले आहे.

तिरुमयम किल्ला

गावात पोहोचण्याच्या आधी एका उंच टेकडीवर वसलेला हा किल्ला दृष्टिपथास पडतो. भूतकाळात हा किल्ला आताच्या तुलनेत खूप मोठा होता. जुन्या किल्ल्याचे प्रवेशद्वार आजही अस्तित्वात आहे. या प्रवेशद्वाराजवळील प्रांगणात स्तंभांनी सुशोभित गॅलऱ्या आणि विविध देवतांची मंदिरे आहेत. स्तंभांवरील शिल्पे खरोखरच अप्रतिम आहेत. हायवे आणि गावाला जोडणाऱ्या रस्त्यावर प्रवेश करताच एक छोटेसे भैरव मंदिर (भैरवर कोविल) दिसते. हे मंदिर मुख्य रस्त्याला समोरासमोर असून वाहनचालकांसाठी ते एक श्रद्धास्थान आहे. सुरक्षित प्रवासासाठी पारंपरिकरीत्या येथे थांबून प्रार्थना केली जाते. हे मंदिर जुन्या किल्ल्याच्या बाह्य भिंतीवर बांधले गेले आहे. तिरुमयम किल्ला सुमारे ४० एकर (१ लाख ६० हजार चौरस मीटर) क्षेत्रात विस्तारलेला आहे आणि ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. पुदुकोट्टई संस्थानाचे संस्थापक तिरुमयम किल्ल्याचे राज्यपाल होते. त्यांनी आपले स्वतंत्र साम्राज्य स्थापन करण्यापूर्वी येथे सेवा बजावली होती. हा किल्ला भारताच्या इतिहासातील एक महत्त्वाचा भाग असून, स्थापत्यशैली आणि ऐतिहासिक घडामोडींसाठी ओळखला जातो.

अधिक वाचा: Operation Polo: भारतासाठी महत्त्वाचे ठरलेले ‘ऑपरेशन पोलो’ काय होते?

दोन मंदिरे

तिरुमयम येथे सत्यगिरीश्वरर मंदिर (शिव मंदिर) आणि सत्यमूर्ती पेरुमळ मंदिर (तिरुमल मंदिर) ही दोन प्रसिद्ध भुयारी मंदिरे आहेत. ही मंदिरे एकमेकांच्या शेजारी, गावाच्या दक्षिण बाजूच्या टेकडीच्या पायथ्याशी वसलेली आहेत.

शिव मंदिर (सत्यगिरीश्वरर मंदिर):

हे मंदिर टेकडीच्या मध्यभागी आहे, जिथे दुसऱ्या एका प्राचीन आणि उद्ध्वस्त किल्ल्याचे अवशेष दिसतात. या मंदिराजवळ एक भव्य शिलालेख आहे, जो तमिळनाडूमधील सर्वात मोठ्या शिलालेखांपैकी एक आहे. या शिलालेखांमध्ये संगीतासंदर्भातील माहिती आहे, त्यामुळेच हा शिलालेख एक अत्यंत दुर्मिळ विषय मानला जातो.

सत्यमूर्ती पेरुमळ मंदिर (तिरुमल मंदिर):

हे मंदिर देखील टेकडीच्या पायथ्याशी वसलेले आहे. या मंदिरात भारतातील सर्वात मोठी अनंतशायी मूर्ती आहे. मंदिरात ‘सत्य-पुष्करणी’आहे.

पुन्हा चर्चेत

ही मंदिरे तिरुमयमच्या धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाचा महत्त्वाचा भाग आहेत. सत्यगिरीश्वरर मंदिर संगीत आणि स्थापत्यशैलीसाठी प्रसिद्ध आहे, तर सत्यमूर्ती पेरुमळ मंदिर भाविकांसाठी श्रद्धास्थान आहे. अलीकडेच अंडाकृती खडकाखाली सापडलेल्या गुप्त कक्षामुळे हा संपूर्ण परिसर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.