‘द इंडियन एक्सप्रेस’च्या वृत्तानुसार भारतातील अव्वल कुस्तीपटूंना आलेल्या अनेक फोन कॉल्सची मालिका या खेळाच्या प्रशासकांविरुद्ध अभूतपूर्व निषेध करण्यामागचे कारण ठरली. दोन वेळेची विश्व चॅम्पियनशिप पदक विजेती विनेश फोगटला राष्ट्रीय शिबिरात असलेल्या ‘असुरक्षित वातावरण’ बद्दल मिळालेली माहिती ही शिबिरातील भीती व्यक्त करणाऱ्या अनेक तरुणींकडून मिळाली होती. अनेक तरुण कुस्तीपटूंनी तिला शिबिरावर बहिष्कार टाकण्याच्या आणि अगदी खेळ सोडण्याच्या त्यांच्या योजनेबद्दल सांगितल्यानंतरच विनेशने बुधवारी भारतीय कुस्ती महासंघ (WFI) चे अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंग आणि इतर राष्ट्रीय प्रशिक्षक यांच्यावरचे लैंगिक छळाचे आरोप सार्वजनिक करण्याचा निर्णय घेतला.
भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षपीटी उषायांचे आश्वासन
बुधवारपासून सुरू होणाऱ्या लखनौ शिबिरात महिला कुस्तीपटूंना या महिन्याच्या सुरुवातीला बोलावण्यात आले होते, ते क्रीडा मंत्रालयाने रद्द केले. राष्ट्रीय राजधानीतील जंतरमंतर येथे दुसऱ्या दिवशी सुरू असलेल्या या आंदोलनाला आतापर्यंत व्यापक स्वरुपात पाठिंबा मिळाला आहे. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन (IOA) चे अध्यक्ष आणि माजी स्प्रिंट स्टार पीटी उषा यांनी त्यांना संघटनेसोबत “पुढे येऊन त्यांच्या समस्या मांडण्याची” विनंती केली असतानाही गुरुवारी उशिरा क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी कुस्तीपटूंची भेट घेतली. “न्याय सुनिश्चित करण्यासाठी आम्ही संपूर्ण तपासाची खात्री करू,” असे उषा यांनी ट्विटरवर पोस्ट केली.
हेही वाचा: अन्वयार्थ : शोषक मानसिकतेची लक्तरे
बजरंग पुनियाचा इंस्टाग्रामवर पाठिंबा मागितल्याचा व्हिडीओ पोस्ट
दरम्यान, WFI फेडरेशनचे सहाय्यक सचिव विनोद तोमर यांच्या म्हणण्यानुसार, आरोपांवर चर्चा करण्यासाठी रविवारी अयोध्येत आपत्कालीन सर्वसाधारण परिषदेची बैठक घेण्याचा निर्णय घेतला गेला. आदल्या दिवशीच्या रात्री ऑलिम्पिक कांस्यपदक विजेते बजरंग पुनियाने इंस्टाग्रामवर पाठिंबा मागितल्यानंतर शेतकरी नेते नरेंद्र ताऊ यांच्यासह हरियाणा, यूपी आणि राजस्थानमधील आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि दंगल पहिलवान एकत्र आल्यानंतर दिल्लीतील धरणे आंदोलनाचे स्थळ खचाखच भरले होते.
इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना निषेध गटाच्या एका मुख्य सदस्याने सांगितले की, “त्या कॉल्सनंतर (महिला कुस्तीपटूंकडून) विनेश फोगट, ऑलिम्पिक पदक विजेते साक्षी मलिक आणि बजरंग यांनी आपापसात चर्चा केली आणि ठरवले की ब्रिजभूषण आणि प्रशिक्षक हे या लैंगिक संबंधाच्या प्रकरणात गुंतलेले आहेत. वर्षानुवर्षे होणारा हा त्रास दूर करावा लागेल. इतर मातब्बर कुस्तीपटू अंशू मलिक आणि सोनम मलिक (दोघेही टोकियो ऑलिम्पिकच्या तुकडीचा भाग होते) देखील तेथे हजार झाले होते.”
विनेश फोगटने दिली छळाबद्दल माहिती सार्वजनिक करण्याची धमकी
मिळालेल्या माहितीनुसार इतर अनेक महिला कुस्तीपटूंनी देखील विनेशला भूतकाळातील अशाच घटना सांगितल्या. त्यानंतर तिने ठरवले आता खूप झालं शिबिराचे ठिकाण बदलण्याचे आवाहन या बहिऱ्या कानावर पडलेच पाहिजे. बैठकीच्या दुसऱ्या दिवशी, महिला कुस्तीपटूंनी विनेशशी सतत फोनवर संपर्क साधला होता ज्यांना WFI अध्यक्षांमुळे कथित छळाचा सामना करावा लागला होता, असे सूत्रांनी सांगितले.
पत्रकारांशी बोलताना विनेश म्हणाली, “काल (बुधवार) दोन ते तीन मुली होत्या ज्या पुराव्यासह लैंगिक छळाबद्दल बोलण्यास तयार होत्या. आज मी असे म्हणू शकतो की असे पाच ते सहा पहिलवान आहेत जे लैंगिक छळाबद्दल बोलण्यास आणि पुराव्यासह समोर येण्यास तयार आहेत. मला केरळमधील महिला कुस्तीपटूंचेही फोन आले. महाराष्ट्रातील लोकही असेच वाईट अनुभव आल्याचे सांगत आहेत.”
विनेश, बजरंग आणि इतरांनी क्रिडा मंत्रालयाच्या अधिकार्यांची भेट घेतली. त्यानंतर ते म्हणाले की WFI अध्यक्षांना पदावरून हटवल्याशिवाय कुस्तीपटू मैदान सोडणार नाहीत. याबाबतीत विनेश म्हणते, “मुलींना बाहेर येऊन त्यांची नावे द्यावी लागतील आणि छेडछाडीचा पुरावा द्यावा लागला तर कुस्तीसाठी वाईट काळ सुरु होईल. आम्हाला तसे करण्यास भाग पाडू नका. समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्यास ते सिंग यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करतील. ”गुरुवारी, बबिता आणि संगीता या बहिणींचे वडील आणि प्रशिक्षक तसेच आमिर खानच्या बॉलीवूड हिट सिनेमा ‘दंगल’ मागील प्रेरणास्थान असणारे विनेशचे काका महावीर फोगट देखील निषेधाच्या मंचावर सामील झालेल्यांमध्ये उपस्थित होते.
बबिता फोगट यांनी सरकार पाठिशी असल्याचे सांगितले
महावीर यांची कन्या आणि भाजप नेत्या बबिता यांनीही सरकारचा संदेश घेऊन घटनास्थळी भेट दिली. “मी त्यांना आश्वासन दिले आहे की सरकार त्यांच्या पाठीशी आहे. त्यांचे प्रश्न आजच सोडवण्याचा मी प्रयत्न करेन,” बबिता म्हणाली. योगायोगाने बजरंगचे लग्न देखील संगीतासोबत झाले आहे. बुधवारी, क्रीडा मंत्रालयाने WFI प्रमुख सिंग आणि फेडरेशनला स्पष्टीकरण सादर करण्यासाठी ७२ तासांचा अवधी दिला होता, तसे न झाल्यास राष्ट्रीय क्रीडा विकास संहितेच्या तरतुदींनुसार कारवाई केली जाईल.
हेही वाचा: विश्लेषण: जंतरमंतर का बनले कुस्तीगिरांचा आखाडा? कुस्ती महासंघाच्या अध्यक्षांवर आरोप नेमके काय?
सामूहिक शक्तीच्या जोरावर हे करून दाखवू
शिबिरांमध्ये बजरंगचा दीर्घकाळचा रूममेट आणि आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू जितेंदरने सामूहिक शक्तीच्या महत्त्वावर भर दिला. आशियाई चॅम्पियनशिप रौप्यपदक विजेता म्हणतो की, “जेव्हा आम्ही पहिल्यांदा निषेधाच्या कल्पनेबद्दल बोललो तेव्हा पहिली चर्चा एकजूट राहण्याबद्दल होती कारण आम्ही खूप शक्तिशाली लोकांविरुद्ध लढत आहोत. आज शेकडो कुस्तीपटू आमच्यात सामील झाले आहेत. एकदा WFI अध्यक्षांनी सांगितले की बहुसंख्य कुस्तीपटू निषेधास समर्थन देत नाहीत, बजरंगने काल संध्याकाळी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला ज्यात त्याने सर्व कुस्तीपटूंना सामील होण्यास सांगितले. तुम्ही आज प्रचंड प्रमाणात उपस्थित असलेले कुस्तीपटू पाहू शकतात.
बजरंग पुनियाचे स्पष्टीकरण
बजरंगने सांगितले की, सुरुवातीची योजना अशी होती की विरोधासाठी फक्त कुस्तीपटूंचे जवळचे मंडळ असावे. तो म्हणाला, “अध्यक्षांनी काल सांगितले की केवळ 3 टक्के कुस्तीपटू आमच्यासोबत होते. आज आजूबाजूला पहा, भारतातील सर्व कुस्ती केंद्रातील कुस्तीपटू येथे आहेत.” बजरंगच्या इंस्टाग्राम पोस्ट व्यतिरिक्त, टोकियो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता रवी दहियाने एक व्हिडिओ अपील देखील ऑनलाइन पोस्ट केले होते. दहिया राजधानीच्या छत्रसाल स्टेडियममधील सर्वात मोठ्या कुस्ती केंद्राशी संबंधित आहे ज्याला भारतातील सर्वात महान कुस्तीपटू सुशील कुमार यांनी प्रसिद्ध केले होते,परंतु ते सध्या एका खुनाच्या गुन्ह्यात गुंतल्यामुळे तुरुंगात आहे.
निषेधाच्या ठिकाणी, बागपतमधील कुस्तीपटू राकेश यादव यांनी सांगितले की, बजरंगच्या व्हिडिओने समर्थनासाठी कॉल केल्यानंतर ते डझनभर कुस्तीपटूंसोबत जंतरमंतरला पोहोचले. बागपतचा आणखी एक कुस्तीपटू, माजी आशियाई चॅम्पियनशिप पदक विजेता संदीप तोमर, गुरुवारी झालेल्या निषेधाच्या वक्त्यांपैकी एक होता.
अगदी अलीकडे व्यवस्थेचा भाग असलेले प्रशिक्षकही कुस्तीपटूंना भेटायला आले. महिला संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक कुलदीप मलिक यांनी सांगितले की, विनेशची विनंती टेलिव्हिजनवर पाहिल्यानंतर त्यांनी कुस्तीपटूंसोबत एकजुटीने उभे राहण्याचा निर्णय घेतला. “कदाचित मुली आधी बोलायला घाबरत होत्या. मी प्रशिक्षक असताना माझ्याकडे कधीही तक्रार आली नाही. पण काय घडले याची सखोल चौकशी होणे आवश्यक आहे,” असे २०१३ ते २०२१ पर्यंत मुख्य प्रशिक्षक असलेले मलिक म्हणाले.
आंदोलनस्थळी संख्या वाढत असताना, राजकारणी, शेतकरी नेते आणि कार्यकर्त्यांनी मंचावर एकच गर्दी केली. माजी सीपीआय(एम) खासदार वृंदा करात त्यांच्यापैकी एक होत्या परंतु कुस्तीपटूंनी त्यांना निषेधाचे राजकारण करायचे नाही असे जाहीर करत त्यांना मंचावरून खाली उतरवले. दरम्यान, डब्ल्यूएफआय प्रमुख सिंग यांच्या अशोका रोडवरील अधिकृत निवासस्थानी, निषेध स्थळापासून फार दूर, पोलिस बंदोबस्त होता. बंगल्यात असलेल्या WFI कार्यालयातही बाहेरच्यांना परवानगी नव्हती. बाहेर थांबलेला एक विरोधक पहिलवान म्हणाला, “आम्ही हनुमानाची पूजा करतो आणि लक्षात ठेवा, त्याने रावणाची लंका जाळली. कुस्तीच्या बाहुबली (बलवान) चीही अशीच नशीब वाट पाहत आहे.”