पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी बुधवारी ईशान्य भारत आणि बांगलादेशला जोडणाऱ्या रेल्वे लिंकचे व्हर्च्युअली उदघाटन केले. आगरतळा-अखौरा प्रकल्पामुळे आगरतळा आणि कोलकातामधील प्रवासाचा वेळ ३१ तासांवरून १० तासांनी कमी होणार आहे. त्यामुळे वेळेत मोठी बचत होईल. या प्रकल्पामुळे पर्यटन आणि व्यापाराला तर चालना मिळेलच, त्याशिवाय दोन्ही देशांतील लोकांना प्रवास करणे अतिशय सुलभ होणार आहे.

प्रकल्प काय आहे?

१२.२४ किमीच्या आगरतळा-अखौरा रेल्वे प्रकल्पामधील ५.३६ किमी अंतर भारताच्या त्रिपुरा राज्यात आहे, तर ६.७८ किमी अंतर बांगलादेशच्या ब्राह्मणबरिया जिल्ह्यातील अखौरा भागातील आहे. आगरतळा (त्रिपुराची राजधानी) येथून निघालेली ट्रेन बांगलादेशच्या मार्गे पश्चिम बंगालच्या निश्चिंतपूर येथे पोहोचेल. दरम्यान, भारत-बांगलादेश सीमेवर रेल्वेतील प्रवाशांचे इमिग्रेशन तपासले जाणार आहे. या नव्या मार्गिकेवर सोमवारी मालवाहू ट्रेनची चाचणी करण्यात आली. बांगलादेश रेल्वेचे वरिष्ठ अभियंता लियाफत अली मजूमदार यांनी सांगितले की, मालवाहू ट्रेनची चाचणी तर यशस्वी झाली आहे, पण प्रवाशांची वाहतूक करण्यासाठी दोन्ही देशातील सरकार आपसात चर्चा करून पुढील निर्णय घेतील.

crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
Matheran Mini Toy Train , Mini Train Vistadome Coach,
माथेरानच्या राणीचा ‘विस्टाडोम’विनाच प्रवास
mumbai lhb coaches train
कोकण मार्गावरील एक्सप्रेसला जोडले जाणार एलएचबी डबे, प्रवाशांच्या सुरक्षेत होणार भर
nashik vidhan sabha
नाशिक परिक्षेत्रात २५ दिवसांत ५० कोटींचा मुद्देमाल जप्त, १७ हजार गुन्हेगारांविरुध्द कारवाई
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
Dharavi Redevelopment Dharavi Adani Small and Micro Enterprises
धारावीच्या पुनर्विकासाचे मृगजळ

हे वाचा >> विश्लेषण: बांगलादेश निर्मिती हा भारतासाठी ऐतिहासिक विजय आणि पाकिस्तानसाठी दारुण पराभव का होता? वाचा सविस्तर…

प्रवाशांच्या रेल्वेची चाचणी पार पडल्यानंतर आगरतळा-अखौरा आणि आगरतळा -चटग्राम या स्थानकांदरम्यान नियमित प्रवासी ट्रेन चालविल्या जाणार आहेत. हा प्रकल्प ढाका आणि कोलकाता यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरेल, असे दोन्ही देशांचे नेते सांगत आहेत.

प्रकल्पाला निधी कोण देणार?

२०१३ साली या प्रकल्पासाठी सामंजस्य करार करण्यात आला. प्रकल्पाच्या कामासाठी २०१६ साली ९७२.५२ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. यापैकी ५८० कोटी रुपये भारताच्या बाजूच्या भूमीत काम करण्यासाठी आणि ३९२.५२ कोटी रुपये बांगलादेशच्या बाजूचे काम करण्यासाठी मंजूर करण्यात आले. प्रकल्पाच्या खर्चात वाढ आणि इतर सहायक खर्च वाढल्यामुळे या निधीत वाढ करण्यात आली. सुधारित अंदाजानुसार प्रकल्पाची किंमत १२५५.१० कोटींवर पोहोचली. यापैकी भारताकडील भूभागावर काम करण्यासाठी ८६२.५८ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. प्रकल्पाची सर्व जबाबदारी भारताने आपल्या खांद्यावर घेतली आहे. ईशान्य भारत प्रदेश विकास मंत्रालयाने (DoNER) भारतातील कामासाठी निधी पुरविला आहे. बांगलादेशच्या भूमीतील कामासाठी परराष्ट्र मंत्रालयाने निधी देऊ केला आहे.

भारतीय रेल्वेच्या अखत्यारित काम करणारी द इंडियन रेल्वे कन्स्ट्रक्शन इंटरनॅशनल लिमिटेड (IRCON) या सार्वजनिक कंपनीने भारतीय बाजूचे काम केले आहे आणि बांगलादेशच्या बाजूचे काम टेक्समॅको या भारतीय खासगी कंपनीकडे दिले होते. प्रकल्पासाठी भारतातील ८६.८५ एकर जमीन अधिग्रहित करून IRCON च्या ताब्यात दिली गेली.

२०२० पर्यंत सदर प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षित होते, मात्र जमीन अधिग्रहणासाठी लागलेला वेळ आणि करोना महामारीमुळे प्रकल्प पूर्ण होण्यास उशीर लागला. तीन वेळा मुदतवाढ दिल्यानंतर हा प्रकल्प आता पूर्णत्वास येत आहे.

हे वाचा >> UPSC-MPSC : भारत-बांगलादेश संबंध; बांगलादेशची निर्मिती, भारताची भूमिका आणि १००वी घटना दुरुस्ती

त्रिपुरासाठी हा प्रकल्प का महत्त्वाचा आहे?

चारही बाजूनी जमिनीने वेढलेल्या त्रिपुरासाठी असा प्रकल्प महत्त्वाचा आहेच. त्रिपुराचे मुख्यमंत्री डॉ. माणिक साहा यांचीही या प्रकल्पाच्या उदघाटन कार्यक्रमाला व्हर्चुअली उपस्थिती होती. उदघाटनानंतर माणिक साहा म्हणाले, “ईशान्य भारतासाठी हा प्रकल्प अतिशय महत्त्वाचा असून यामुळे त्रिपुरा पर्यटनाचे केंद्र म्हणून पुढे येऊ शकते. भारत-बांगलादेश संबंधांमध्ये आजच्या दिवसाची सुवर्ण अक्षरात नोंद होईल. भारत आणि बांगलादेश यांच्या दरम्यान पर्यटन आणि वाहतुकीचा दुवा म्हणून त्रिपुराची ओळख आता होणार आहे. आगरतळा-औखरा रेल्वे प्रकल्पामुळे आगरतळा आणि कोलकातामधील अंतर १६०० किमीवरून थेट ५०० किमीपर्यंत खाली येणार आहे.”

तथापि, बांगलादेशसह प्रकल्पाच्या माध्यमातून जोडण्यामागे भावनिक बंधही आहेत. त्रिपुरा राज्य आणि बांगलादेश यांच्या दरम्यान ८५६ किमींची आंतरराष्ट्रीय सीमा आहे. पश्चिम बंगालनंतर द्वितीय क्रमाकांची ही सर्वात मोठी आंतरराष्ट्रीय सीमा आहे. त्रिपुराच्या तीनही बाजूंना बांगलादेशने वेढले आहे, चौथ्या बाजूस आसामची थोडीशी सीमा लागते. १९७१ साली भारत-पाकिस्तान युद्धानंतर बांगलादेशची निर्मिती झाली. त्यावेळी त्रिपुराची लोकसंख्या केवळ १४ लाख एवढी होती, त्यातही पूर्व पाकिस्तानमधील निर्वासितांच्या छावणीत जवळपास १५ लाख लोक होते. मुक्तीयोद्धांना (स्वातंत्र्यासाठी लढणारे सैनिक) प्रशिक्षण देणारी आठ मोठी शिबिरे या ठिकाणी होती. या नव्या रेल्वे प्रकल्पामुळे दोन्हीकडच्या लोकांना आता सुलभरितीने एकमेकांशी संपर्क साधता येणार आहे.

भारत आणि बांगलादेशदरम्यान कोणकोणत्या ट्रेन चालतात?

मागच्या काही वर्षांपासून भारत आणि बांगलादेश यांच्यात रेल्वे प्रकल्प उभारण्यासाठी प्रयत्न सुरू होते, त्याचाच भाग म्हणून आता हा प्रकल्प सुरू होत आहे. पश्चिम बंगाल आणि बांगलादेश यांच्यादरम्यान बंधन एक्सप्रेस, मैत्री एक्सप्रेस आणि मिताली एक्सप्रेस या तीन रेल्वे सुरू आहेत. बांगलादेशमधील तिसरे मोठे शहर खुलना ते कोलकातादरम्यान बंधन एक्सप्रेस चालविली जाते. भारत – पाकिस्तान यांच्यादरम्यान १९६५ साली युद्ध होईपर्यंत या मार्गावर बरीसल एक्स्प्रेस धावत होती. युद्धानंतर या मार्गावरील रेल्वे बंद करण्यात आली. २०१७ साली पंतप्रधान मोदी आणि पंतप्रधान शेख हसीना यांनी या मार्गावरील रेल्वे पुन्हा एकदा सुरू केली. बेनापोल-पेट्रापोल या बॉर्डर क्रॉसिंगवरून बंधन एक्स्प्रेस चालविली जाते.

आणखी वाचा >> बांगलादेश डॉलरपेक्षा आता रुपयाला महत्त्व देणार; दोन बँकांनी बनवला जबरदस्त प्लॅन

एप्रिल २००८ पासून कोलकाता आणि ढाका कन्टेन्मेंटदरम्यान मैत्री एक्स्प्रेस चालविली जाते. मार्च २०२१ रोजी पंतप्रधान मोदी यांनी ढाका येथे भेट दिली असताना मिताली एक्स्प्रेसची सुरुवात करण्यात आली होती. उत्तर बंगालमधील सिलिगुडी आणि बांगलादेशमधील ढाका या शहरांना मिताली एक्स्प्रेसने जोडले होते.