पावसाने मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी धुमाकूळ घातला आहे. या पावसात अनेक नागरिकांचे जिवन विस्कळीत झाले आहे. अनेक जणांच्या चारचाकी गाड्या देखील पाण्यात अडकल्या आहेत. काहींच्या गाड्या तर पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या आहेत. दरम्यान पुराच्या पाण्यात गाडी अडकल्यास काय करावं?, अशा पद्धतीने आपण जीव वाचवू शकतो, याबाबत जाणून घेऊया.
जर पुराच्या पाण्यात गाडी अडकली आणि आपण गाडीत असाल तर ऐसी फ्रेश मोडवर ठेवणे आवश्यक आहे. तसेच समोरच्या सीटचे दोन्ही ग्लास दोन इंच उघडावेत जेणेकरुन क्रॉस वेंटिलेशन होईल.
अशा पद्धतीने वाचवू शकतो जीव
- अशावेळी कारमध्ये थांबू नका, कारण थोड्या वेळाने कारमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासू शकते आणि हे धोकादायक ठरू शकते.
- जर पाणी कारच्या दाराजवळ पोचले असेल तर कारमधून खाली उतरा. अशावेळी कारमध्ये शॉर्टसर्किट होऊ शकतो आणि कारमधील तांत्रिक बिघाड आपल्याला आतून लॉक करू शकते.
- जर कार जवळजवळ पाण्यात बुडली असेल आणि आपण पाण्यात किती खोलवर आहात याची आपल्याला कल्पना नसते. अशावेळी दरवाजा उघडू नका. आपण दरवाजा उघडल्यास, कारमध्ये पाणी शिरेल आणि कार बुडेल.
- जर आपणास वाटत असेल की कार बुडणार आहे तर सीट बेल्ट काढा. काच फोडून बाहेर या. कारमध्ये हातोडा नसल्यास आपल्या हाताचा कोपरा किंवा पायात बुट असतील तर त्याचा काच फोडण्यास उपयोग करा.
- जर आपणास पाणी असलेल्या भागात वाहन चालवायचे असेल तर, इंजिन रेव्ह हाय ठेवा तसेच कार पहिल्या गेरमध्ये ठेवा, म्हणजे पाणी अॅक्जॉस्ट मध्ये घूसनार नाही.
हेही वाचा – समजून घ्या : मान्सून नेमका ओळखायचा कसा? मान्सूनपूर्व आणि मान्सून पावसामधील फरक काय?
पाण्यात गाडी बंद पडली तर
पाणी असलेल्या भागातून जातांना मध्येच गाडी बंद पडली तर अॅक्सिलेटर देत इंजिनवर जोर देण्याता प्रयत्न करा. आणि गाडी बाहेर काढण्याचा प्रयत्न करा. नवीन तंत्रज्ञानासह इंजिन विशेषत: डिझेल इंजिन अतिशय संवेदनशील असतात. पाणी सहजपणे त्यांच्यात प्रवेश करू शकते. अशा परिस्थितीत, आजूबाजूच्या लोकांच्या मदतीने आपली कार पाण्यातून बाहेर काढणे आणि मॅकेनिकव्दाके पाणी फ्यूल सिस्टममधून काढून टाकणे, हा उत्तम उपाय आहे.
गाडी बंद पडल्यानंतर रीस्टार्ट करण्याचा जास्त प्रयत्न करू नका
पाण्यातून जाताना आपली गाडी बंद पडत असेल तर ती पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करू नका. कारण इंजिन सुरू करताना बर्याचवेळा वाहने सुरुवातीच्या सेकंदात एक्झॉस्ट (सायलेन्सर) द्वारे बाहेरील हवा आत खेचतात, ज्यामुळे पाणीही आत जाऊ शकते. यामुळे वाहनाचे इंजिन देखील सीज होऊ शकते.
पाणी भरण्याच्या नुकसानीपासून कारचे संरक्षण कसे करावे
पाणी असलेल्या रस्त्यावर, आपल्या वाहनाचा वेग पूर्णपणे कमी करा आणि कमी अॅक्सिलेटर देत वाहने हळू हळू पुढे न्या. यामुळे कार थांबणार नाही आणि सहजतेने पाण्यातून जाईल. अशावेळी कारमधील एसी बंद ठेवा आणि कारच्या खिडक्या किंचित खुल्या ठेवा.