गौरव मुठे

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडमधून विलग झालेला वित्तीय सेवा उपक्रम ‘जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड’च्या (जिओफिन) समभागात भांडवली बाजारातील पदार्पणापासूनच घसरण कळा सुरू आहे. भांडवली बाजारात सोमवारी प्रथमच पाऊल ठेवलेल्या जिओफिनच्या समभागात सलग तीन सत्रात १५ टक्क्यांहून अधिक घसरण झाली. यामागची नेमके कारणे काय, सामान्य गुंतवणूकदारांना पुढे करावे काय, याची उत्तरे जाणून घेऊया.

rs 28677 crore withdrawn by foreign investors from stock market
शेअर बाजाराकडे परदेशी गुंतवणूकदारांची पाठ? बाजार कोसळण्याचे तेच एक कारण?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
sensex drops 110 points nifty settles at 23532
मंदीवाल्यांचा जोर कायम; ‘सेन्सेक्स’मध्ये ११० अंशांची घसरण
Biggest Stock Market Crashes in India
मंदीच्या सावटाने बाजार गडगडला! अवघ्या दीड महिन्यात सेन्सेक्समध्ये ८,२८७ ने घट
readers comments on Loksatta editorial,
लोकमानस : अर्थव्यवस्थेत वाढ, मग रुपयाची घसरण का?
reserve bank of india latest marathi news
विश्लेषण: १४ महिन्यांतील उच्चांकी चलनवाढीमागे कारणे कोणती? व्याजदर कपात आणखी लांबणीवर? जीडीपी वाढही मंदावणार?
nifty stock market marathi news
सेन्सेक्सची १० शतकी गटांगळी, महागाई आणि परकीय निधीच्या निर्गमनाने बाजार बेजार

‘जिओफिन’च्या बाजार पदार्पणानंतर नेमके काय झाले?

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागातून विलग झालेल्या ‘जिओफिन’च्या समभागाची २१ जुलै रोजी बाजारात झालेल्या विशेष व्यवहार सत्राअंती संशोधित किंमत २६१.८५ रुपये निर्धारित करण्यात आली. सोमवारी मुंबई शेअर बाजारात (बीएसई) समभाग २६५ रुपये आणि राष्ट्रीय शेअर बाजारात (एनएसई) २६२ रुपयांच्या पातळीवर सूचिबद्ध झाला. पदार्पणावेळी समभागाला अल्प अधिमूल्य प्राप्त झाले. मात्र सोमवारच्या सत्रात समभागाला दिवसअखेर ५ टक्के घसरणीसह ‘लोअर सर्किट’ लागले. मंगळवारीदेखील ५ टक्के घसरणीसह समभाग २३९.३० या नीचांकी पातळीवर बंद झाला. तर जिओफिनचा समभाग बुधावारच्या सत्रात ११.८० रुपयांच्या घसरणीसह २२४.६५ रुपयांवर विसावला.

जिओफिनच्या समभागात घसरण का?

निर्देशांकावर बेतलेले इंडेक्स फंडांप्रमाणे ‘पॅसिव्ह’ म्युच्युअल फंडांसारख्या संस्थात्मक गटात मोडणाऱ्या गुंतववणूकरांकडून मोठ्या प्रमाणावर समभाग विक्रीचा मारा सुरू आहे. समभाग भांडवली बाजारात सूचिबद्ध झाल्याच्या दिवसापासून पुढील १० सत्रात ‘ट्रेड टू ट्रेड’ अर्थात ‘टी’ श्रेणीमध्ये व्यवहार करणार आहे. बाजार विश्लेषकांच्या मते, ‘टी’ श्रेणीमध्ये समभाग असल्याने संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून विक्री मारा सुरू आहे.

‘टी’ श्रेणी म्हणजे काय?

बाजार मंचाकडून सभागाच्या खरेदी-विक्रीतील जोखीम, भांडवल आणि निकषांनुसार समभागाचे – ए, बी, झेड, टी आणि एस अशा श्रेणीमध्ये वर्गीकरण केले जाते. जिओफिनचा समभाग सध्या जोखीम जास्त असल्याने ‘टी’ श्रेणीमध्ये वर्गीकृत केला आहे. समभाग ‘टी’ श्रेणीमध्ये असला तरी खरेदी-विक्रीचे व्यवहार काही निर्बंधांसह भांडवली बाजारात सक्रियपणे सुरू असतात. ‘टी’ श्रेणीमध्ये समावेश असलेल्या कंपनीचा समभाग केवळ ‘डिलिव्हरी’ पद्धतीनुसारच विकत घ्यावा लागतो आणि त्यामध्ये इंट्रा-डे आधारावर (आजच खरेदी करून त्याच दिवशी समभाग विकणे) व्यवहार करण्यास परवानगी नसते. शिवाय एकाच सत्रात समभागात कमाल ५ टक्के मर्यादेपर्यंत घसरण अथवा वाढ शक्य असते.

जिओफिनला निर्देशांकातून बाहेर काढण्याबाबत निर्देशांक निर्धारण समितीचा निर्णय काय?

भांडवली बाजाराच्या दोन्ही मुख्य निर्देशांकांचा भाग असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजचाच ‘जिओफिन’ हा विभक्त घटक आहे. त्यामुळे सूचिबद्धतेनंतर ‘जिओफिन’चा समभाग हा सेन्सेक्स आणि निफ्टी निर्देशांकातील अनुक्रमे ३१ वा आणि ५१ वा समभाग म्हणून समाविष्ट केला गेला. रिलायन्सचा समभाग पोर्टफोलियोमध्ये धारण करणाऱ्या ‘पॅसिव्ह फंडा’वर या घडामोडीचा कोणताही परिणाम होऊ नये असा यामागे हेतू होता. तथापि ही तात्पुरती सोय केली गेली होती. सेन्सेक्स तसेच राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीमधून हा समभाग २४ ऑगस्टला बाहेर काढला जाणार होता. मात्र समभागांतील सत्रांतर्गत कमाल मर्यादेपर्यंत घसरण पाहता, प्रमुख बाजारमंच असलेल्या मुंबई शेअर बाजाराने (बीएसई) ‘जिओफिन’ला ‘सेन्सेक्स’मधून वगळण्याचा निर्णय २९ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलला. राष्ट्रीय शेअर बाजाराकडून अद्याप या संबंधाने निर्णय घेण्यात आला नसला तरी सलग तीन सत्रातील जिओफिनमधील खालच्या सर्किटपर्यंतची घसरण पाहता, हा बाजारमंचही बीएसईच्याच निर्णयाचे अनुकरण करण्याची शक्यता आहे. जिओफिनचा समभाग सोमवारी भांडवली बाजारात सूचिबद्ध झाल्यापासून, सलग तिसऱ्या सत्रात प्रत्येकी ५ टक्क्यांच्या (खालचे सर्किट म्हणजेच एका सत्रातील कमाल मर्यादेपर्यंत) घसरण होत बंद झाला. परिणामी निर्देशांक निर्धारण समितीने जिओफिनला निर्देशांकातून वगळण्याचा कालावधी आणखी तीन दिवसांनी पुढे ढकलला आहे. बीएसईच्या परिपत्रकानुसार, जिओफिनच्या समभागाने आणखी दोन सत्रात खालचे सर्किट गाठल्यास निर्देशांकातून वगळण्याचा निर्णय आणखी तीन दिवसांनी पुढे ढकलला जाईल. ‘पॅसिव्ह फंडां’ना त्यांच्या पोर्टफोलियोचे फेरसंतुलन करण्यास पुरेसा वाव दिला जावा, हा या निर्णयामागील हेतू आहे.

बाजार विश्लेषकांचे सध्याच्या घडामोडींबाबत आणि जिओफिनच्या भवितव्याबाबत म्हणणे काय?

दलाली संस्था नुवामाच्या मते, येत्या काही दिवसांत जिओफिनचा समभाग निफ्टी आणि सेन्सेक्समधून वगळल्यास इंडेक्स फंडांकडून अधिक विक्रीचा दबाव दिसून येईल. निफ्टीमधून समभाग वगळल्यास पॅसिव्ह फंडांकडून ९ कोटी समभागांची विक्री होऊ शकते. तर सेन्सेक्सचा मागोवा घेणाऱ्या फंडांकडून आणखी ५.५ कोटी समभागांची विक्री करण्याचा अंदाज आहे. परिणामी बाजारातील समभागांचा पुरवठा मागणीच्या तुलनेत वाढल्याने घसरण विस्तारू शकते. तसेच इंडेक्स फंडांच्या विक्रीमुळे समभागात सध्याची घसरण झाली आहे, मात्र त्याचवेळी ‘एमएससीआय इंडेक्स’ आणि काही इतर काही जागतिक निर्देशांकांमध्ये समभागाचा समावेश केला जाण्याची शक्यता असल्याने नवीन खरेदी दिसून येण्याची आशा आहे.

सामान्य गुंतवणूकदारांना नुकसान भरून काढता येईल?

किरकोळ गुंतवणूकदारांना हा समभाग २६१.८५ रुपयांना प्राप्त झाला होता. आता मात्र ‘टी’ श्रेणीमध्ये असल्याने सामान्य गुंतवणूकदारांना समभाग त्यांच्या डिमॅट खात्यात जमा असून देखील त्यात खरेदी-विक्री करणे शक्य झालेले नाही. मात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांकडून समभाग विक्रीचा मारा सुरू असल्याने बाजार पदार्पणापासून सलग तिसऱ्या सत्रात समभाग ५ टक्क्यांनी घसरला आहे. परिणामी किरकोळ गुंतवणूकदारांना २६१.८५ रुपयांना मिळालेल्या या समभागाची किंमत बुधवारच्या सत्राअखेर २२४.६५ रुपयांपर्यंत खाली आहे. एका समभागामागे गुंतवणूकदारांचे ३७.२० नुकसान झाले आहे. पुढच्या आणखी काही सत्रात त्यात घसरण होण्याची शक्यता बाजार विश्लेषकांनी व्यक्त केली आहे. तथापि जिओफिनकडे मार्च २०२५ पर्यंत सुमारे ५० अब्ज डॉलरचे कर्ज वितरण करण्याची क्षमता आहे. बजाज फायनान्सला लागू केलेल्या मूल्यांकन गणिताशी तुलना केल्यास जिओफिनचे सध्याचे मूल्यांकन वाजवी आहे, असे इन्वास्टचे इन्व्हॅसेट पीएमएसचे भागीदार आणि संशोधन प्रमुख अनिरुद्ध गर्ग म्हणाले.

gaurav.muthe@expressindia.com