इस्रायल देशावर ७ ऑक्टोबरच्या मध्यरात्री पॅलेस्टाइनच्या हमास या संघटनेकडून भीषण हल्ला करण्यात आला. या हल्ल्यामुळे ५० वर्षांपूर्वी घडलेल्या योम किप्पूर युद्धाचे स्मरण पुन्हा करण्यात येत आहे. ६ ऑक्टोबर १९७३ साली इजिप्त आणि सीरियाने योम किप्पूर या ज्यू सणाच्या दिवशी इस्रायलवर हल्ला केला होता. योम किप्पूर युद्धामुळे मध्य आशियातील भूराजकीय समीकरणे कायमची बदलली. योम किप्पूर युद्ध कशामुळे झाले? हमासने केलेल्या हल्ल्याची तुलना या युद्धाशी का करण्यात येत आहे? याचा घेतलेला हा आढावा…

योम किप्पूर युद्धाशी आताच्या हल्ल्याची तुलना का?

७ ऑक्टोबर २०२३ रोजी हमासने केलेल्या हल्ल्याकडे १९७३ सालच्या योम किप्पूर युद्धानंतर इस्रायलवर झालेला सर्वांत मोठा हल्ला म्हणून पाहिले जात आहे. हातात बंदुका घेतलेल्या हमासच्या दहशतवाद्यांनी शनिवारी (७ ऑक्टोबर) इस्रायलच्या शहरांमध्ये हिंसक विध्वंस केला; ज्यामध्ये ४०० इस्रायली नागरिक मारले गेल्याचे सांगण्यात येते. शेकडो नागरिकांचे अपहरण करण्यात आले आहे. या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी इस्रायलनेही पॅलेस्टाइनवर प्रतिहल्ला केला; ज्यामध्ये ३१३ पॅलेस्टाईन नागरिक मारले गेले. योम किप्पूर युद्धात २,५०० पेक्षा जास्त इस्रायली सैनिक मृत्युमुखी पडले होते.

Russian President Vladimir Putin, nuclear weapons policy,
विश्लेषण : रशियाचे अण्वस्त्र धोरणच बदलण्याचा पुतिन यांचा निर्णय कशासाठी? या बदलांमुळे अणुयुद्धाची शक्यता बळावणार?
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
protest against netyanahu in israel
ओलिसांच्या हत्येमुळे इस्रायलमध्ये आंदोलन पेटले; कारण काय? मारले गेलेले सहा ओलिस कोण होते? त्यांची हत्या का करण्यात आली?
Outrage in Israel over hostage killing
ओलिसांच्या हत्येमुळे इस्रायलमध्ये संताप,नेतान्याहू जबाबदार असल्याचा आरोप; युद्ध थांबवण्याची मागणी
Israel Hamas war marathi news
विश्लेषण: इस्रायल आणि हमासला खरोखर युद्ध थांबवायचे आहे का? कोणताच तोडगा का निघू शकत नाही?
Polio, Polio Gaza, polio crisis, war Gaza,
विश्लेषण : प्रबळ शत्रूंनाही युद्धविराम करायला लावणारा पोलिओ… गाझात युद्धापेक्षाही पोलिओचे संकट भयावह?
readers comments on loksatta editorial readers reaction on loksatta articles readers reaction on loksatta
लोकमानस : युक्रेनने केले ते योग्यच!
ukraine tanks kursk
युक्रेनच्या आक्रमणाला ब्रिटिश रणगाड्यांची कुमक; रशियात तणाव

हे वाचा >> अग्रलेख:‘बिबीं’चा ‘पुलवामा’

योम किप्पूर युद्धाप्रमाणेच या वेळीही इस्रायलची सुरक्षा यंत्रणा हल्ल्यासाठी सज्ज नव्हती, अशी टीका होत आहे. जगातील सर्वांत उच्च गुप्तचर यंत्रणा आणि क्षेपणास्त्रविरोधी जाळे (Iron Dome) अशी चोख सुरक्षा व्यवस्था असतानाही हा हल्ला झाला कसा? याचेच अनेकांना आश्चर्य वाटत आहे. योम किप्पूर युद्धाच्या वेळीही इस्रायलच्या सुरक्षा यंत्रणेत कसूर झाली होती. योम किप्पूर किंवा अटोनमेंट (Atonement) सणाच्या निमित्ताने अनेक सैनिकांना सुट्या देण्यात आल्या होत्या. योम किप्पूर हा यहुदी धर्मातील (Judaism) सर्वांत पवित्र धर्म मानला जातो.

शनिवारी हमासने जेव्हा हल्ला केला, तेव्हा अनेक इस्रायली नागरिक टोरा या धर्मग्रंथाचे वार्षिक पठण संपवून पुन्हा नव्याने पठणाची सुरुवात करत होते. टोरा हा यहुदी धर्माचा पवित्र ग्रंथ मानला जात असून, त्याला हिब्रू बायबल म्हटले जाते. ‘टोरा’मध्ये पाच ग्रंथांचे एकत्रीकरण करण्यात आले आहे.

योम किप्पूर युद्ध कसे झाले?

इस्रायल विरुद्ध इजिप्त व सीरिया यांच्यामध्ये ६ ते २५ ऑक्टोबर १९७३ दरम्यान तुंबळ युद्ध झाले. या युद्धाला योम किप्पूर युद्ध वा ऑक्टोबर युद्ध किंवा रमजान युद्ध, असे म्हणतात. या युद्धाला चौथे अरब-इस्रायल युद्ध, असेही म्हणतात. त्याआधी १९४९, १९५६ व १९६७ रोजी अरब आणि इस्रायलदरम्यान तीन युद्धे झाली होती.

हे वाचा >> इस्रायल आणि पॅलेस्टाईनचे वैर कधीपासून आहे? आतापर्यंत कितीवेळा झाला संघर्ष?

१९६७ साली अरब-इस्रायलदरम्यान झालेल्या सहा दिवसांच्या युद्धात निर्णायक विजय प्राप्त केल्यानंतर इस्रायलने अजिंक्य राहण्याचा विक्रम केला होता. इस्रायलने युद्ध तर जिंकलेच; त्याशिवाय सीरियामधील गोलन हाइट्स आणि इजिप्तमधील सिनाई द्वीपकल्पावरही ताबा मिळवला.

सहा वर्षांनंतर पुन्हा दोन्ही देशांनी इजिप्तवर संयुक्तरीत्या हल्ला चढवला. शत्रूराष्ट्रांकडून सैन्याची जमवाजमव सुरू झाल्याची माहिती इस्रायलला होती; मात्र रमजानच्या पवित्र महिन्यात अरब राष्ट्रांकडून हल्ला होईल याची त्यांना कल्पना नव्हती. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे भंबेरी उडालेल्या इस्रायलला सावरायला थोडा वेळ लागला. योम किप्पूरच्या सणानिमित्त सुटीवर गेलेल्या सैनिकांना पुन्हा सेवेत रुजू होण्याचे आदेश दिले गेले. इस्रायल जमवाजमवी करीत असण्याच्या सुरुवातीच्या काळात सीरिया व इजिप्तने युद्धात आघाडी घेतली होती.

युद्धा सुरू होऊन तीन दिवस झाल्यानंतर सीरिया व इजिप्तचे हल्ले रोखण्यात इस्रायलला यश आले आणि त्यानंतर त्यांनी प्रतिहल्ल्याला सुरुवात केली. दरम्यान, अमेरिकेने इस्रायलला युद्धात पाठिंबा दिला; तर इजिप्त-सीरियाला सोविएत युनियनचे पाठबळ होते. दोन्ही महासत्तांनी या संघर्षात सहभाग घेतल्यामुळे तणाव वाढला होता. संयुक्त राष्ट्रांनी मध्यस्थी करीत २२ ऑक्टोबर रोजी युद्धविराम करण्याचा प्रयत्न केला; पण तो यशस्वी होऊ शकला नाही. त्यानंतर २५ ऑक्टोबर रोजी पुन्हा संयुक्त राष्ट्रांनी हस्तक्षेप करून युद्ध संपविण्याची घोषणा करण्यात आली; ज्यामुळे इस्रायलला निर्विवाद विजय मिळवता आला नाही.

योम किप्पूर युद्धाचे महत्त्व काय?

इस्रायलने दोन्ही हल्लेखोर देशांचा यशस्वीरीत्या सामना केला असला तरी योम किप्पूरच्या युद्धाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. कारण की, या युद्धात सुरुवातीच्या दिवसांत सैन्याची जमवाजमव करताना इस्रायल मेटाकुटीला आला होता. याचदरम्यान मोठी जीवितहानी झाली. त्यामुळे एक गोष्ट सिद्ध झाली की, इस्रायलचा युद्धात पराभव करता आला नाही तरी त्यांना जबरदस्त नुकसान पोहोचवता येऊ शकते. युद्धाला सहा महिने झाल्यानंतर इस्रायलच्या तत्कालीन पंतप्रधान गोल्डा मायर आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने राजीनामा दिला.

आणखी वाचा >> इस्रायलचे रॉकेट हल्ल्यापासून संरक्षण करणारी आयर्न डोम यंत्रणा काय आहे?

योम किप्पूरच्या युद्धामागे लष्करीदृष्ट्या वरचढ इस्रायलला पराभूत करणे ही मुळातच इजिप्तची रणनीती नव्हती, असे अनेक विश्लेषकांचे मत होते. वाटाघाटी करताना इस्रायलला धक्का पोहोचवण्यासाठी इजिप्तने हा हल्ला केला असल्याचे सांगण्यात येते. युद्धविरामाची घोषणा झाल्यानंतर शांततेची चर्चा सुरू झाली. १९७८ साली अमेरिकेतील मेरीलँड राज्यातील कॅम्प डेव्हिड शहरात झालेल्या बैठकीत इस्रायलने सिनाई द्वीपकल्पाचा भाग इजिप्तला परत केला. या कराराला कॅम्प ‘डेव्हिड करार’, असे म्हणतात. पुढच्या वर्षी १९७९ मध्ये इजिप्त-इस्रायल शांतता करार अस्तित्वात आला; ज्यामध्ये पहिल्यांदाच एका अरब राष्ट्राने इस्रायलला राष्ट्र, अशी मान्यता दिली.

सीरियामध्ये मात्र या युद्धाचे कोणतेही चांगले परिणाम झाले नाहीत. इजिप्त-इस्रायल शांतता करारात सीरियाला काहीच मिळाले नाही. उलट इस्रायलने सीरियामधील गोलन हाइट्स या सर्वांत सुपीक प्रदेशातील आणखी जमीन बळकावली; जी आजतागायत इस्रायलच्या ताब्यात आहे.