रविवारी (२५ जून) रशियाच्या वॅग्नर या खासगी सैन्यदलाने मोस्कोच्या दिशेने चाल केली आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या दोन दशकांच्या निरंकुश सत्तेला आव्हान दिले. त्यानंतर अचानक एका दिवसात चक्रे फिरले आणि वॅग्नरच्या ग्रुपच्या येवजेनी प्रिगोझिन यांनी एका दिवसात बंड मागे घेतले. आता या सर्व घडामोडींचा धुरळा जमिनीवर बसल्यानंतर काय परिस्थिती आहे? प्रिगोझिन आणि त्यांच्या खासगी सैन्यदलाचे काय होणार? याबाबत द न्यूयॉर्क टाइम्सने आढावा घेतला आहे. त्याचा थोडक्यातला गोषवारा.

प्रिगोझिन यांच्यासोबत काय होणार?

मंगळवारी (दि. २७ जून) सकाळी प्रिगोझिन यांचा सर्वात ताजा फोटो बाहेर आला. प्रिगोझिन एका गाडीत बसून रोस्तोव्ह शहराच्या बाहेर जात असून त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्यही दिसत आहे. रोस्तोव्ह शहरावर वॅग्नर सैन्यांनी ताबा मिळवल्याचा दावा प्रिगोझिन यांनी केला होता. रोस्तोव्ह येथून प्रिगोझिन बेलारूसमध्ये जातील, अशी शक्यता वर्तविली गेली. बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेन्को हे पुतिन यांचे निष्ठावान मानले जातात. त्यांनी मध्यस्थी केल्यानंतर हे बंड शमल्याचे सांगितले जाते. मंगळवारी (दि. २७ जून) लुकाशेन्को यांनी सांगितले की, अब्जाधीश आणि पुतिन यांचे एकेकाळचे जवळचे सहकारी प्रिगोझिन बेलारूसमध्ये येणार आहेत.

Ajit Pawars trusted Bhausaheb Bhoir rebelled deciding to contest Chinchwad elections independently
चिंचवड : अजित पवारांच्या पक्षातून बंडखोरी; ‘या’ नेत्याने केला अपक्ष लढण्याचा निर्धार
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
sonam wangchuk s indefinite hunger strike
सोनम वांगचुक यांचे बेमुदत उपोषण
In Badlapur case accused Akshay Shinde Thane alleged encounter
चकमकी अखेर पोलिसांवरच का शेकतात?
Ikra predicts that banks will raise funds through bonds as growth in bank deposits slows
बँकांची रोख्यांवर मदार, ठेवीतील वाढ मंदावल्याने पाऊल; १.३ लाख कोटींच्या निधी उभारणीचा इक्राचा अंदाज
bjp minister ravindra chavan target over potholes issues by publish banner on birthday
डोंबिवलीत मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसाची टिंगल करणारे फलक लावणाऱ्यांविरुध्द गुन्हा
Small child seriously injured in attack by dog in Pune
पुण्यात कुत्र्याच्या टोळक्यांच्या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी; चाकणमधील घटना
home minister amit shah slams rahul gandhi over reservation remark in america
राहुल यांच्या वक्तव्यावरून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

प्रिगोझिन यांचे भवितव्य काय असणार, हे आजच सांगणे कठीण आहे. बेलारूसमध्ये ते कुठे राहणार? बेलारूस देशांतर्गत आणि देशाच्या बाहेर त्यांना प्रवास करता येणार का? रशियामधील राजकीय व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांचा येथे किती प्रभाव पडेल? हे येणाऱ्या काळात समजू शकेल. तसेच त्यांचे रशिया आणि खासकरून पुतिन यांच्याशी पुढील काळात संबंध कसे राहणार? हादेखील मोठा प्रश्न आहे. याआधी पुतिन यांचे सहकारी जेव्हा जेव्हा त्यांच्या विरोधात गेले, तेव्हा त्यांना रशियन सुरक्षा सेवा दलाच्या रोषाचा सामना करावा लागला आहे.

हे वाचा >> पुतिन यांना आव्हान देणाऱ्या प्रिगोझिन यांची कारकीर्द वादग्रस्त

तसेच वॅग्नर ग्रुपमध्ये प्रिगोझिन यांचा सहभाग कितपत राहणार हे अद्याप समजू शकलेले नाही. वॅग्नरच्या सैनिकांनाही बेलारूसमध्ये आश्रय घेण्याचा पर्याय देण्यात आलेला आहे.

वॅग्नरचे पुढे काय होणार?

पुतिन यांच्या नेतृत्वाखालील रशियामध्ये बंड करणे म्हणजे संकटाला आमंत्रण देण्यासारखे आहे. अगदी क्षुल्लक अशा विरोधालाही त्यांच्याकडे कठोर अशी शिक्षा दिली जाते. मात्र रशियन यंत्रणांनी प्रिगोझिन आणि त्यांच्या सैनिकांबद्दल मवाळ धोरण अवलंबल्याचे मंगळवारी दिसले. बेलारूसचे राष्ट्राध्यक्ष लुकाशेन्को यांच्या मध्यस्थीनंतर वॅग्नर ग्रुप आणि प्रिगोझिन यांच्यावरचा सशस्त्र बंडखोरीचा गुन्हा मागे घेण्यात आला.

रविवारी (दि. २५ जून) रशियाच्या अधिकृत वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार, वॅग्नर ग्रुपच्या सैन्य तुकड्यांना युक्रेन पूर्वमधील लुहान्स्क क्षेत्रातील तळावर परतण्यास सांगितले. लुहान्स्कचा अधिकतर भाग रशियाने बेकायदेशीररित्या बळकावला आहे. त्यासोबतच राष्ट्राध्यक्ष लुकाशेन्को यांनी मंगळवारी (२७ जून) सांगितले की, वॅग्नरचे सैनिक बेलारूसमध्ये आपला तळ ठोकू शकतात. पण बेलारूसने सैनिकांना नेमका कोणता प्रस्ताव दिला आणि किती सैनिकांनी बेलारूसमध्ये आश्रय घेण्याचा निर्णय घेतला आहे, याची माहिती बाहेर येऊ शकलेली नाही.

पुतिन यांनी सांगितले की, युक्रेनमध्ये वॅग्नरसह जे कुणी अनधिकृतपणे लढत आहेत, त्यांना रशियाच्या सरंक्षण मंत्रालयाशी करार करावा लागेल. पुतिन यांच्या घोषणेनंतर रशियन सैन्यदल या भाडोत्री सैन्यांना किती प्रमाणात आणि केव्हा सामावून घेणार हे अजून अस्पष्ट आहे. नव्या संस्थेसाठी सेवा द्यायची किंवा त्यांच्यासाठी लढताना मरण पत्करण्याची तयारी ठेवायची की नाही? हे वॅग्नरच्या सैनिकांच्या इच्छेवर अवलंबून आहे. युक्रेनियन सैनिकांनी दिलेल्या माहितीनुसार वॅग्नरचे सैनिक हे सुविधांनी सुसज्ज, युद्धासाठी नेहमी तयार आणि आक्रमकतेने लढण्यात रशियन सैनिकांच्याही एक पाऊल पुढे आहेत.

युक्रेन युद्ध हे वॅग्नरसाठी इतर कामाप्रमाणेच एक काम आहे. वॅग्नर ग्रुप मध्य आफ्रिकन प्रजासत्ताक, माली आणि सुदानमध्ये कार्यरत आहे. ज्या ज्या देशांना वॅग्नरने सुरक्षा सेवा प्रदान केली आहे, त्याबदल्यात त्यांनी पैसे किंवा त्या देशातील नैसर्गिक साधनसंपत्तीमध्ये वाटा मागितला आहे. मालीमध्ये मागच्यावर्षी झालेल्या नागरिकांच्या हत्याकांडात वॅग्नरचा हात असल्याचे पुरावे समोर आले आहेत. मध्य आफ्रिकन प्रजासत्ताकमध्ये वॅग्नर ग्रुपने युद्ध गुन्हे आणि भ्रष्टाचार केला असल्याचे वॉशिंग्टनमधील संशोधन संस्था ‘द सेंट्री’ने उघडकीस आणले आहे.

हे ही वाचा >> अल्पजीवी बंडाचे दीर्घकालीन परिणाम; बेलारूसमधील हद्दपारीवर प्रिगोझिन यांचे मौन 

आफ्रिकेत क्रेमलिनच्यावतीने वॅग्नर ग्रुप काम करत होता. सध्याची घडामोड पाहता आफ्रिकन देशांशी केलेले करार वॅग्नर ग्रुप अबाधित राखेल की त्यातून माघार घेईल, हे काही दिवसांनी कळू शकेल.

पुतिन अधिक बलवान झाले की कमकुवत?

वॅग्नरच्या बंडामुळे पुतिन यांच्या व्यक्तिमत्त्वातील जादू कमी होत गेली आहे, असे म्हणणाऱ्या विश्लेषकांची सध्या कमतरता नाही. दोन दशकांपासूनच्या पुतिन यांच्या अनिर्बंध वर्चस्वाला या बंडामुळे धक्का पोहोचला, हे नक्की. विश्लेषकांनी असेही नमूद केले की, जो नेता स्वतःला कणखर असल्याचे भासवतो, त्याने भाडोत्री सैनिकांना चक्क न्याय देण्याची भाषा वापरली. ज्यांना एका दिवसापूर्वी देशद्रोही म्हटले गेले होते, दुसऱ्याच दिवशी त्यांच्यावरील सर्व गुन्हे मागे घेण्यात आले. बंडखोरीची कुणकुण लागताच पुतिन यांनी देशाची एकता आणि ताकद दाखविण्याचा प्रयत्न केला. प्रिगोझिन यांना देशद्रोही ठरवून रशिया या उठावच्या विरोधात सर्व स्तरावरून प्रयत्न करेल, असे सांगितले. दुसऱ्या दिवशी त्यांनी गृहयुद्ध थांबविल्याबद्दल रशियन सैन्याचे आभार मानले.

पुतिन यांची सत्तेवरील पकड किती सैल झाली किंवा त्यांच्या अधिकारांना किती लवकर आव्हान दिले जाऊ शकते, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. विश्लेषक अब्बास गलेमोव्ह हे पूर्वी भाषण लिखाणाचे काम करायचे, त्यानंतर ते स्वतः राजकारणी झाले. अब्बास यांनी सांगितले की, सोमवारी पुतिन यांनी दिलेले भाषण ही त्यांची अंत्यत कमकुवत अशी कामगिरी होती.

आणखी वाचा >> नेपाळ गोरखा वॅग्नर ग्रुपच्या खासगी सैन्यदलात भरती का होतायत? भारताच्या अग्निपथ योजनेशी त्याचा संबंध काय?

युक्रेनमधील युद्धावर याचा कसा परिणाम होईल?

वॅग्नर ग्रुप पुढचे काही दिवस अशांत राहण्याची शक्यता असल्यामुळे युक्रेन सैन्याला लढाईपासून थोडी उसंत मिळण्याची शक्यता आहे. प्रश्न हा आहे की, युक्रेन या संधीचे भांडवल करून वॅग्नर ग्रुपचे मनोधैर्यचे खच्चीकरण करू शकतो का? १ जुलैपासून वॅग्नर सैन्याला रशियन सैन्याच्या अधिपत्याखाली आणल्यानंतर वॅग्नर संघटनेला काही प्रमाणात धक्का बसण्याची शक्यता आहे. मग वॅग्नर सैनिकांच्या रणांगणातील सामर्थ्याचे काय होईल? हा प्रश्न आहे. वॅग्नरच्या भाडोत्री सैनिकांनी रशियासाठी युक्रेनच्या पूर्व भागातील बखमुत शहरात प्राणपणाने लढाई केली, ज्यामुळे रशियाला पुढे सरकण्यासाठी मदत झाली होती. या लढाईमुळे हजारो लोक जखमी झाले आहेत.
रशियन सैन्यांना भाडोत्री सैन्यापेक्षा कमी वेतन दिले जाते. त्यामुळे वॅग्नरचे सैनिक रशियन सैन्य दलात सामील होतील की नाही? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.