CNG vs Hybrid : जग सध्या हरित उर्जेच्या दिशेने वाटचाल करते आहे. त्यादृष्टीने ऑटोमोबाईल उद्योगानेही मोठ्या प्रमाणावर सीएनजी आणि हायब्रीड तंत्रज्ञानावर काम सुरू केले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या तुलनेत सीएनजी आणि हायब्रीड तंत्रज्ञान हे हरित उर्जा म्हणून चांगला पर्याय आहे. तसेच सीएनजीच्या किमतीही थोड्या स्वस्त आहेत. दरम्यान, सीएनजी आणि हायब्रीड इंजिनमध्ये नेमका काय फरक आहे, जाणून घेऊया.
हेही वाचा – विश्लेषण : संभाषण ध्वनिमुद्रित करण्याचा पोलिसांना अधिकार असतो का? नवनीत राणांचा आक्षेप योग्य होता का?
सीएनजी तंत्रज्ञान नेमकं काय आहे?
सीएनजी म्हणजे कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस. या इंधनाचा वापर हरित उर्जा म्हणून केला जातो. त्यासाठी वाहनांमध्ये सीएनजी किट बसवण्यात येते. तसेच ते इंजिन पेट्रोलवरही काम करते. महत्त्वाचे म्हणजे सीएनजीची किट मार्केटमधूनही बसवता येते. भारतात मारुती सुझुकी, ह्युंदाई आणि टाटा मोर्टर्स सारख्या कंपन्यांच्या गाड्यांमध्ये सीएनजी किट प्री-इंस्टॉल असतात. या गाड्यांमध्ये सीएनजीची टाकी गाडीच्या मागील बाजूस बसवली जाते. या गाड्या अशी प्रकारे डिझाईन केल्या जातात, ज्या पेट्रोल आणि सीएनजी दोन्हीवर चालवता येतात. मात्र, एका वेळी एकाच इंधनावर गाडी चालवता येते.
हेही वाचा – विश्लेषण : ठाणे जिल्ह्यातील डम्पिंग ग्राउंड समस्या का बनली आहे उग्र?
हायब्रीड तंत्रज्ञान नेमकं काय आहे?
हायब्रीड इंजनमध्ये विविध प्रकारच्या इंधनांचा वापर केला जातो. मात्र, सामान्यात: वीज आणि तेल यांचे मिश्रण या इंजिनमध्ये वापरण्यात येते. या इंजिनमध्ये इलेक्ट्रिक मोटरदेखील वापरली जाते. हायब्रीड इंजिनचे तीन प्रकार आहेत. हायब्रीड, सेमी हायब्रीड आणि प्लग-इन हायब्रीड. पूर्ण हायब्रीड वाहन फक्त पेट्रोल इंजिन किंवा इलेक्ट्रिक मोटरीवर धावू शकते. सौम्य हायब्रीडमध्ये इलेक्ट्रिक मोटरीचा वापर करण्यात येतो. तर प्लग-इन हायब्रीडमध्ये बॅटरी चार्ज करून वापण्यात येते. हायब्रीड इंजिनमध्ये गाडीचा ब्रेक दाबल्यानंतर गाडीचं इंजिन बंद होते आणि एक्सिलेटर दाबल्यास परत सुरू होते. यामुळे इंधनाची बचत होते. हायब्रीड इंजिनच्या यशस्वी प्रयोगानंतर अनेकांनी या तंत्रज्ञानावर काम करण्यास सुरूवात केली आहे.